"सगळं विजोड असूनही संसार का टिकतात?"

Submitted by सौ. वंदना बर्वे on 30 December, 2012 - 21:51

"सगळं विजोड असूनही संसार का टिकतात?"

चिटक्या मोडता मोडता निलमने सोडलेली पुडी बऱ्याच वादांना जन्म देऊन गेली. तसं पहायला गेल्यास अनुरूपता ही कुठल्याच जोडप्यात असत नाही. बहुतांशी जोडपी ही विजोडच असतात. तशी ती असावी अशीच बहुतेक त्या नियंत्याची योजना असावी.

एकेकीचे अनुभव कथन तर फारच विलक्षण होते. "आमगेलो हो", "घो म्हणपाचो ना", "मावशेक ना म्हणचे पड्टा म्हणोन आवयन हय म्हटलें आनी हांव त्रासान पड्ले." इथपासून ते "सामको बोणेर", "भाणशिरें", "मात्तूय अक्कल म्हंटा ती ना" इथपर्यंत स्वत:च्या यजमानाची संभावना या बौध्दीक चर्चे दरम्यान झाली. आम्ही स्त्रिया जे संसारासाठी भोगतो ते सहसा मी पुरूष म्हणणाऱ्या कर्तृत्ववान माणसासही सहजी जमणार नाही. मला मान्य आहे की आम्ही सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, ज्ञानाच्या क्षेत्रात फारसं काही नाही करत. आम्ही लहान आहोत. आमचं कार्यक्षेत्र मर्यादित आहे. पण घर संभाळणारी स्त्री ही उच्चपदस्थ स्त्री किंवा कर्तृत्ववान स्त्रीपेक्षा दुय्यम असते, हे म्हणणं पटत नाही. भले गृहीणेचे प्रोब्लेम्स काम करणाऱ्या स्त्रीहून निराळे असतील पण प्रोब्लेम्स असतातच. अगदी लहान लहान अडचणी असतात. गृहीणीचा झगडा हा नित्यनूतन आणि नित्यनवा असतो. अनुरूपतेविषयी त्यांच्या प्रतिक्रिया त्यांना शब्दांच्या कोंदणात नाही मांडता येत. म्हणूनच त्यांच्या प्रतिक्रिया ह्या थेट येतात.

बहुतेक मैत्रिणींचा म्हणण्याचा सूर हा मी आहे म्हणून संसार चालला आहे असाच होता. बहुतांशी ते खरच आहे. जसे समाजाला सांसारिक स्त्रीच्या लहानसहान अडचणी समजत नाहीत तसेच लहानसहान त्यागही समजत नाही. गृहीणीला कायम गृहीतच धरलं जातं. त्यामानाने नोकरी, उद्योग करणारी स्त्री ही थोडी तरी दुय्यमतेच्या मर्यादा ओलांडते. काही ठिकाणी तर ती कमावते तरीही दुय्यमच राहते.

विजोड असण्याचे अनेकविध अनुभव ऐकायला मिळाले. सगळं नीट नेटकं, व्यवस्थित ठेवणाऱ्या स्त्रीचा जोडीदार कमालीचा अव्यस्थित. त्याला सकाळी बाहेर जाताना चपलांची आठवण होते तेंव्हा काल घरी परतल्यावर भिरकवटलेल्या होत्या हे नाही आठवत. अशा नवरोबाला, बायकोला किमान दिवसातून पंचवीस वेळा हाका माराव्या लागतात. नमुनेदार उदाहरण म्हणजे अंघोळीला जाताना टॉवेल घेउन न जाणं, अंग पुसायची वेळ झाली की मग त्याची आठवण होणं. दिवसभरात अशा गोष्टींची यादीच असते. कंजुष स्त्रीला उधळ्या नवरा मिळतो तर उधळ्या स्त्रीला कंजुष नवरा. सडपातळ स्त्रीला ढेरपोट्या जाड्या नवरा व सिक्स पॅक अ‍ॅब असलेल्या नवऱ्याला, वन पॅक थ्री टायर स्त्री. कुठे शारिरीक ठेवण विजोड असते तर कुठे विचार विजोड असतात. मला हाच प्रश्न नेहमी पडतो, असं पराकोटीचं विजोडत्व असूनही आधीच्या काळी संसार कसे वर्षानुवर्षे टिकून रहात? व थोड्या प्रमाणात आत्ताही कसे टिकून आहेत?

नवरा बायकोचा संसार टिकण्यासाठी परस्परांविषयी आदर असणे, प्रेम असणे अत्यंत आवश्यक आहे.

शिक्षण अहंकार निर्माण करतं. अहंकार हा आदराचा सर्वात मोठा शत्रू आहे. "त्यात काय विशेष, हे मी सुध्दा करेन" ही जोडीदाराबद्दलची भावनाच अनादराला जन्म देते. म्हणूनच जोडीदारामध्ये एकमेकांची कार्यक्षेत्रे भिन्न असली पाहिजेत. भिन्नत्व आदर निर्माण करतच असही नाही. उलटपक्षी असूया उत्पन्न होऊन दुय्यम स्थान देणे किंवा हेटाळणी करणे हेच प्रकार जास्त अनुभवास येतात. सुशिक्षित, नोकरी करणाऱ्या नवऱ्याला बायकोचा जास्त पगार खुपतो किंवा तिचे त्याच्या नोकरीच्या ठिकाणी असलेल्या पदापेक्षा, तिच्या नोकरीच्या ठिकाणी उच्चपदस्थ असणे असह्य होते. बऱ्याचदा अशा बायकोने केलेली साधी संसारोपयोगी सुचनासुध्दा नवऱ्याला "डॉमिनेटिंग" वाटते.

प्रेमविवाह हे संसार सुखी करतात हे देखिल काही प्रमाणात सत्य असलेलं गोड अर्धसत्य आहे. विवाहानंतर जोडीदाराविषयी निर्माण झालेलं प्रेम हे बऱ्याच अंशी संसार टिकवून ठेवतं. लग्नाआधी एकमेकांना समजून घेतलं, आवड निवड, स्वभाव अनुरूप आहेत की नाही ह्याची चाचपणी केली तर पुढे संसार सुखी होतो असा समज आहे. प्रेम असण्यात तशीच अपेक्षा असते. पण गंमत म्हणजे लग्नाआधी प्रेम असतं तिथे नेहमी चांगलीच बाजू बघितली जाते. लग्नानंतर जोडीदाराची वाइट बाजूच दिसू लागते. अवास्तव अपेक्षा व तडजोड ही प्राधान्यक्रमाने प्रेमात घडते. लग्न झाल्यावर संसारात प्राथमिकता बदलत जातात. लग्नाआधी चांद तारे तोडून आणायला तयार असणारा प्रियकर नवरा झाला की साधी कोथिंबिरीची जुडी आणायलाही कचरतो. "विवाहप्रेमात" म्हणजे विवाह झाल्यानंतर जिथे प्रेम निर्माण होतं ते अनेक सांसारीक अनुभवानी समृध्द होत जातं. जोडीदाराची ती सवय नाही, तसा स्वभाव नाही तरी देखिल दोघेही एकमेकांच्यासाठी आपापल्या सवयींना, स्वभावांना मुरड घालतात हीच भावना प्रेम जुळवत जाते. जोडीदार गुणदोषांपलिकडे जाऊन आवडायला लागतो. हे आवडणं, हेच प्रेम टिकतं. विजोडत्वाकडून अनुरूपतेकडचा हा प्रवास खडतर, भांडणानी भरलेला असला तरीही नात्यांची वीण घट्ट करणारा असतो. हे खरं "मी" पासून "आम्ही" होणं असतं, खरं अनुरूप होणं असतं.

चर्चेच्या ओघात नवऱ्याला नावं ठेवणाऱ्या मैत्रिणी, "तसं असेल तर नवऱ्याला सोडून का नाही देत?" ह्या प्रश्नावर बुमरॅंन्ग झाल्यासारख्या त्याचे चांगले गुण सांगू लागल्या. लोकांनी कायम वापरूनच घेतलेला "भाणशिरें" नवरा मुलांच्यावर जीवापाड प्रेम करणारा होता. व्यवहारशून्य "बोंडेर" नवरा बायकोच्या आजारपणात रात्र रात्र जागून काळजी घेणारा होता. तोडून टाकावं हा पर्याय न स्विकारण्यासाठी त्यांच्या पोतडीत बरेच अनुभव, गोष्टी होत्या. पदरही जळू नये आणि निखाराही विझू नये असा पदर होता.

"लोक काय म्हणतील", "इतकी वर्ष झाली लग्नाला आता काय तोडायचं नातं" असेही सूर होते. घटस्फोटितेकडे पाहण्याची समाजाची नजर ही दुषित असते. सामाजिक असुरक्षितता संसार टिकून राहण्याचं कारण होतं. काडीमोड झाल्यावर स्वत:च्या पायावर उभं राहण्याएवढं शिक्षण, तेवढी धमक नाही म्हणून संसार चाललेला होता. संसार तोडला तरी आणि टिकवला तरी हाल हे स्त्रीचेच होतात. तिलाच दोषी धरलं जातं. दारूपायी महिना पंचवीस हजार जोडून आणणाऱ्या नवऱ्याच्या बायकोच्या गळ्यात फुटका मणी होता. त्यातही पुन्हा दिवसरात्र मारबडव, मुलगा नाही म्हणून सासूचा छळवाद. ना सुटकेला केलेले संसार हे असून नसल्यासारखेच असतात. नाण्याची ही दुसरी बाजू विषण्ण करणारी होती.

अनुरूप नसणे हा सहजीवनातला, संसारातला दोष नाही. एकमेकांच्या कष्टाची जाणीव, तडजोडीची जाणीव, आदर, प्रेम हे संसार टिकवतात, फुलवतात.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरदा +१०

(ह्या "सनातन मानवजात" ह्या आयडीला अजून माबोवर येउन २७ मिनिटे सुद्धा नाही झाली अजून...
तरीही टायपिंग बरंय नाही? मी अजूनपण जीमेल मध्ये लिहून इथे कॉपी-पेस्ट करते. :()

सिरीयस व्हा. <<<
पण चांगले धडधाकट बरे आहेत की ते. कशाला सिरीयस होऊन इस्पितळात जायला सांगताय त्यांना..

काळ्या मांत्रिकाची छाया असली तरी कैप्पण होत नाही हो. त्यांची १०० टक्के उन्नती झालेली आहे.

पळून गेले मुद्द्यावर बोला म्हटलं कि. दात काढायला येतात फक्त यांना. काय पन विचार म्हणे

.

त्या सनातन्यांच्या मुद्द्यांकडे कशाला लक्ष देता? इग्नोर
ही नोज नॉट व्हॉट ही इज रायटिंग (दॅट टू ट्वाईस)!!!

ही नोज नॉट व्हॉट ही इज रायटिंग (दॅट टू ट्वाईस)!!!
>>>
चूक! ही परफेक्टली नोज व्हॉट ही इज रायटिंग (दॅट टू ट्वाईस अँड दॅट टू डीलीबरेटली!!) !!!

म्हणूनच जोडीदारामध्ये एकमेकांची कार्यक्षेत्रे भिन्न असली पाहिजेत. >>> सौ वंदना बर्वे, ह्याबद्दल जास्त लिहू शकाल का?? जोडीदार आणि कार्यक्षेत्र आणि विजोड हे त्रैराशिक पूर्णपणे तुम्ही मांडताय तस लक्षात नाही आल मला ...

महात्मा फुले, धोंडो कर्वे चुकले की काय ते अजुनही सिध्द व्हायचं आहे. त्याची उत्तरे काळच देईल. आज मिळणाऱ्या शिक्षणातून अहंकारच येतो, ज्ञान नाही. तुम्हाला पटो वा न पटो

>> ह्यालाच हिंदीत एहेसानफरामोश का कायसं म्हणत असावेत का?

महात्मा फुले, धोंडो कर्वे चुकले की काय ते अजुनही सिध्द व्हायचं आहे. >> Happy म्हणजे सावित्री बाईनी रस्त्यात लोकांनी दगड मारली किंवा आनंदीबाई जोशी परदेशात शिकली त्यांचे कष्ट!! ज्या स्त्रियांनी स्त्री शिक्षणात वाटा उचलला त्यांचा उल्लेख हि नसावा कारण त्या शेवटी त्या त्या नवर्याशी अनुरूप होण्याचा प्रयत्न करीत होत्या... पाहिलत अनुरूप होण्याचा प्रयत्न केल की काय झाल? तुम्ही जो मूळ मुद्दा मांडायचा प्रयत्न करताय त्यालाच विरोधी लेख का लिहिताय?

वळवळतंय नी खळबळतंय नी आवळतंय नी ढवळतंय हे छळतंय मला कोण?
मग घे ना धौती योग!

(बाबूंच्या विचारसारकला विशुद्ध पर्याय)

एच्चेन्वाय (HNY Happy New year)

"तुला काय कळतं त्यातलं? तू दहावी नापास. मी ग्रॅज्युएट झालोय. तोही फर्स्टक्लास."

"मी एवढं सगळं शिकले ते काय घरातला केर काढायला?"

चार घरची धुणी भांडी करून मुलाला पोस्ट ग्रॅज्युएट करणाऱ्या आईला "तुला अक्कल नाही. निरक्षर तू तुला काय कळणार?" मुलाने ऐकवलेले आहे.

अशा अनेक प्रतिक्रिया प्रत्यक्षात सभोवताली अनुभवल्या आहेत. सुशिक्षित व्यक्तींना आपल्याच घरातली कामे करायला लाज वाटते. शिक्षण अहंकार निर्माण करते हा मुद्दा सार्वत्रिक नसुन जोडीदाराला देण्यात येणाऱ्या दुय्यमतेशी त्याचा संबंध आहे.

फुले, कर्वे यांना अपेक्षित शिक्षण आज मिळतय असं नाही मला वाटत. तो स्वतंत्र विषय होईल. आज आपण फक्त सुशिक्षित होतोय, सुसंस्कृत नाही.

१)नवरा बायकोचा संसार टिकण्यासाठी परस्परांविषयी आदर असणे, प्रेम असणे अत्यंत आवश्यक आहे.

२)अनुरूप नसणे हा सहजीवनातला, संसारातला दोष नाही. एकमेकांच्या कष्टाची जाणीव, तडजोडीची जाणीव, आदर, प्रेम हे संसार टिकवतात, फुलवतात.

हे दोन मुद्दे माझ्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत. लेखातले एक एक वाक्य सुटे काढून त्याचा संदर्भाशिवाय अर्थ काढला तर गोंधळ होणारच. सामान्यत: कार्यक्षेत्र भिन्न असलं की त्याचा जोडीदाराला आदर असतो. यालाही अपवाद आहेतच.

सौ. वंदना बर्वे

वंदना ताई, हिन्दी , मराठी डेली सोप बघणे बंद करा बघू.
काय सारखे सारखे संसार आणि लग्न आणि नवरा !!!!
कंटाळा आला बघा. सोडून द्या जऊ दे.

सेक्स अ‍ॅन्ड सिटी बघायला सुरवात करा. सगळे सीझन्स बघून झाले की या परत इथे नविन लेख घेऊन. मग बघा Happy

सेक्स अ‍ॅन्ड सिटी बघायला सुरवात करा. सगळे सीझन्स बघून झाले की या परत इथे नविन लेख घेऊन. मग बघा <<<
Rofl

<सेक्स अ‍ॅन्ड सिटी बघायला सुरवात करा. सगळे सीझन्स बघून झाले की या परत इथे नविन लेख घेऊन. मग बघा >

Lol Lol Lol

<डेलिया, डेस्परेट हाऊसवाईफ्स नको का?>

Lol Lol Lol

लिहीन अवश्य लिहीन.

सौ. वंदना बर्वे.

"तुला काय कळतं त्यातलं? तू दहावी नापास. मी ग्रॅज्युएट झालोय. तोही फर्स्टक्लास."

"मी एवढं सगळं शिकले ते काय घरातला केर काढायला?"

चार घरची धुणी भांडी करून मुलाला पोस्ट ग्रॅज्युएट करणाऱ्या आईला "तुला अक्कल नाही. निरक्षर तू तुला काय कळणार?" मुलाने ऐकवलेले आहे.

अशा अनेक प्रतिक्रिया प्रत्यक्षात सभोवताली अनुभवल्या आहेत. सुशिक्षित व्यक्तींना आपल्याच घरातली कामे करायला लाज वाटते. शिक्षण अहंकार निर्माण करते हा मुद्दा सार्वत्रिक नसुन जोडीदाराला देण्यात येणाऱ्या दुय्यमतेशी त्याचा संबंध आहे.>>>>>>>>>>>>>>>> असं वागणारी माणसं केवळ शिकली म्हणुन नाही तर एरवीही अशीच वागली असती. त्यासाठी शिक्षणाचा उद्धार करण्याची गरज नाही
विचारसारक, sex and the city, desperate housewives >>>> Lol

Pages