फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!

Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28

खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अ‍ॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्‍याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का? Wink
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिणा,
इथे MAC gel eye liner $20 च्या आस पास आहे , भारतात ऑलमोस्ट दुप्पट किंमत असेल टॅक्सेस मुळे.

रोज कॉम्पक्ट, फाउंडेशन वापरत असु तर संध्याकाळी चेहरा कसा क्लिअर करायचा? नुसते फेश वॉशने चेहरा धुवायचा का?

इथे MAC gel eye liner $20 च्या आस पास आहे , भारतात ऑलमोस्ट दुप्पट किंमत असेल टॅक्सेस मुळे>> जवळ जवळ २००० होतील की. माझा आणण्याचा उत्साह खूप आहे पण वापरण्याचा नाही.
gel eye liner दुसऱ्या कुठल्या ब्रान्ड चे असते का? चांगले वाटले की मग MAC चे घेईन.

मृणाल, मी तुळशीबागेत एक मोठे कॉस्मेटिकचे दुकान आहे, (नाव आठवत नाही आता), तिथुन घेतले ते काजळ.
मृणाल, इथे एक essence कं. पण आहे,$६ ला. ते मिळते का पहा.

Thanks
बघते आता

महाग ही रिलेटिव टर्म आहे , जर १९९ ची आय पेन्सिल पैसे देउन नीट उठत नसेल तर ती माझ्या दृष्टीने २००० च्या मॅक आय लायनर पेक्षा महाग आहे कारण मॅक साठी दिलेले २००० वर्थ तरी आहेत :).
पण हो , यु.एस पेक्षा भारतात महाग आहे, इथे तरी इतर HD कॉस्मॅटिक्स पेक्षा MAC स्वस्त आहे.
बॉबी ब्राउन-मेक अप फॉरेव्हर- अर्मानी पेक्षा स्वस्तं आहे मॅक !

HD च्या नादाला लागू नये. सोसायटी मेकपसाठी तरी.
किंवा मग तुम्हाला मेकप ब्लेंडिंग प्रोफेशनल्सपेक्षाही फार जास्त चांगले जमले पाहिजे.
निकोल किडमन आणि एव्हा लंगोरियाचे जे भयंकर फोटो बघितलेत ना?

इबेवर ट्राय करुन बघा, कदाचित स्वस्त मिळेल.
भारतात रिटेल शॉपमधे लॉरिअलचे जेल आयलायनर रु.८२५ ला मिळते वाटते (जे इथे $२० आहे). काही ठिकाणी डिस्काउंटही मिळतात, तिथे रु.५०० ते रु. ६०० पर्यंत मिळु शकते.

मॅक म्हणजे महाग असणार!>>अर्थातच. मॅकची लिपस्टिक एकदा घेतली होती. टोटल पैसावसूल चीज आहे. शेडपण सुंदर होती आणि लावल्यावर खूपवेळ टिकायची. शिवाय लूक पण एकदम एलेगंट!! Happy

पुण्या-मुंबईत असणार्‍या मुलींनो, बहुतेक हाय एंडची कॉस्मेटिक्स मॉलमधे असणार्‍या ब्रँडच्या स्टॉलवर अथवा हाय एंड कॉस्मेटिक दुकानांतून मिळू शकेल. काही मोठी ब्युटीपार्लर्सदेखील बर्‍याचदा कॉस्मेटिक्स विकायला ठेवत असतात. मुंबईमधे कुलाबा कॉजवे, बांद्रा, सांताक्रूझ, अंधेरी इथे बहुतेक कॉस्मेटिक्स हमखास मिळतात.

सांताक्रूझ वेस्टला स्टेशनच्या समोर असणार्‍या शॉपिंग कॉम्प्लेक्समधे ट्रेंडप्रमाणे असणार्‍या बहुतेक अ‍ॅक्सेसरीज आणि एक्स्टेन्शन्स शिवाय विविध ब्रँडची कॉस्मेटिक्स इत्यादि मिळतात. बाद्र्याला हिल रोड आणी लिंकिंग रोड बेस्ट!

पेरू इथे बोले तो कुथे?

भारतात लोरियल किंवा शेम्बॉरचे मिळेल का पहायला हवं जेल लायनर.

मॅक टोटल पैसावसूल चीज आहे.
>>
हे मात्र सोला आने सच आहे नंदिनी!
मी दोनदा मॅक चे कॉम्पॅक्ट वापरले आहे.
ती करीना म्हणते ना एका अ‍ॅड मधे 'बस ब्लेंड हो जाये' तसा दिसतो चेहरा मॅक वापरल्यावर Happy

दक्षिणा, अगं मी पुण्यातचं! Happy
मॅक मिळते ना रोहितमधे! पण स्टॉक फार लिमिटेड असतो बाबा त्यांच्याकडे!

@ नीधप
HD च्या नादाला लागू नये. सोसायटी मेकपसाठी तरी.>>>
HD म्हणजे काय? ( कदाचित फारच बेसिक प्रश्न असावा)

Pages