आतला आवाज माझा,,,

Submitted by वैवकु on 23 December, 2012 - 00:53

तू नको समजूस की मी एकटा आहे
सोबतीला पोळणारा गारवा आहे

मी तुला कोरा कुठे पीतोय रे दु:खा
मिसळला माझ्या मनाचा गोडवा आहे

दे मला शोधून आता तूच तो पत्ता
जो तुझ्या शोधात माझा हरवला आहे

मी स्वतःशी बोलताना शब्द देशिल का
आतला आवाज माझा गोठला आहे

तो चहूबाजूस परिमळ होत दरवळला
मी कधी स्पर्शू न शकलो ही व्यथा आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वर्गीय / दिव्य काव्य, मग ते कुणाचे का असेना त्याला वंदन करणे हा आमचा स्वभाव! दम व धमक नसलेलेच दुस-याच्या काव्याची तिस-याच्या काव्याशी आगंतुक तुलना करून स्वत:ची पाठ थोपटण्यात धन्यता मानतात!
दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती!...............हे आमचे संस्कार!
कलेत अहंकारास जागा नसते!
जिथे अहंकार असतो तिथे कुठलीही दिव्य कला राहूच शकत नाही!

तुलनाच म्हणाल तर आपलीच आपल्याशी करावी!
ज्याला त्याला आपली खरी पात्रता/कुवत काय आहे हे समजलेले असते!

लिखित/मुद्रित संदर्भ असल्याशिवाय प्राध्यापक विधाने करत नसतात! पोकळ लोकांनाच हवेत गोळीबार करावा लागतो!

आपला वेग आपण पहावा! दुस-याच्या काळ-काम-वेगाची रूक्ष आकडेमोड करत बसू नये!

जीवन हे परिवर्तनशील असते! कुठल्याच वस्तूला/व्यकतीला कुठलेच लेबल डकवायचे नसते!
लेबलांना आमच्या लेखी किंमत शून्य!

समस्त मायबोलीचा ठेका सोडावा माणसाने!

तुम्ही आहात कोण?<<<<<<<
आज थोडाफार जो मी काय आहे.....
ती कृपा सारी असे हितचिंतकांची!

सुगंधी गर्भ ज्याचा तोच दरवळणार गाभारा!
न त्याला काळजी कसली....सुटो किंवा पडो वारा!!
असे जात्याच दरवळते हृदय वक्षामधे ज्याच्या,
नको त्याला तुझे अत्तर, नको कुठलाच फव्वारा!
....................................................................
बोल तू सारे उद्या पण, आज नाही!
आज माझाही मला अंदाज नाही!!

तुमच्या दहा शेरांची उदाहरणे, येथेच, या चर्चेतच द्या ज्यांच्यात वरील निकष पाळले गेलेले आहेत<<<<<<<<<<<<<<
पिसाट नसलेल्या रसिकांचे प्रतिसाद डोळे फाडून वाचा ..............उत्तर मिळेल! १०च काय रेलचेल दिसेल!

तुम्ही का मधे वसवसताय?<<<<<<<<<<<<<<<
वसवसणे हा पिसाटांचा स्वभाव असतो, आमचा नाही!

मायबोली आपले हे उपकार कदापी विसरणार नाही<<<<<<<<
मग आपले काय?
आपण आलात की समस्त मायबोलीच आली त्यात! ठेका जो घेतला आहात आपण!

तुमचे सर्व धागे वाचून समस्तांचे हेच मत झालेले आहे. <<<<<<<<<<
परत ठेकेदाराचीच भाषा!
मायबोलीचे की आपले मत?
की, आपले म्हणजेच समस्त मायबोलीचे मत या नेहमीच्या भ्रमातलेच समजायचे!

कॅन यू प्लीज एक्स्प्लेन द अबोव्ह पॉईंट्स विथ अ‍ॅन एक्झँपल ऑफ एनी ऑफ अनंत्स गझल?
झोपी गेलेल्यांना आम्ही उठवतो, झोपेचे सोंग घेतलेल्यांना नाही!

आजघडीला प्रदीप कुलकर्णी, अनंत, वैभव, चित्त आणि समीर या पाचहीजणांची गझल एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न तरीही अतिशय सुंदर अशी आहे. कबूल! (हे आदर्श सर्व्हेक्षण समजायचे का?)
मग आपले काय?
गझलेत पंचमहाभूतांपेक्षा किती तरी जास्त भूते आहेत! मायबोली म्हणजेच मराठी
गझल हा गैरसमज आपला असेल, आमचा नव्हे!

आपण मात्र भटांच्या नावाचा जळीस्थळी वापर करताना दिसता. खणखणीत नाणे आपोआप खणखणीत ध्वनी निर्माण करते हेच खरे.
कारण भट हे गझलसम्राट होते (स्वयंघोषित नव्हे) !
गुरूचे नामस्मरण करणे गुन्हा नव्हे!

नाण्यांचे म्हणाल तर..............
इथे खोट्याच नाण्यांची अशी वहिवाट पडली की,
खरे नाणे किती आता दचकते चालण्यासाठी!
(रानफुले गझलसंग्रहातून)

दुस-यांची वकीली करणे व एवढा उमाळा, कैवार आणणे सोडा आता ! आपल्या स्वत:बद्दल काय ते बोला!
व्यक्तीशहा प्रत्येकास निपटायला हा प्राध्यापक खंबीर आहे! दाखलेच द्यायचे तर स्वत:चे द्यावे माणसाने!
दुस-याचे क्रेडिट वापरून स्वत:ची पाठ थोपटणे सोडा! किती दिवस दुस-याच्या तव्यावर स्वत:ची पोळी भाजायची आणि का?

हे तुम्ही अनंत ढवळे, समीर चव्हाण वगैरे कवींबाबत लिहीत आहात.

आम्ही कुणाचीही नावे घेतलेली नाहीत. स्वरकाफियाच्या अभिनव , पवित्रेबाज व चतुर वापराच्या फोल उदात्तीकरणाचे विदारक सत्य समोर मांडले आहे! ही आमची वैयक्तीक मते आहेत हेही लिहिले आहे.
आम्ही दिलेली ही तळटीप>>>>वाचा डोळे फाडून........
टीप: वर दिलेली मते ही आमची वैयक्तिक मते आहेत जी अनेक वर्षांच्या डोळस गझललेखना नंतर तयार झालेली आहेत! मायबोलीकरांनो! आपली मते वेगळी असू शकतील, ज्यांचा आम्हास आदर आहे!
बिनबुडाची व निखालस खोटी विधाने देवून गैरसमज निर्माण करणे सोडा!
तसेही कुणाची नावे घेणे, कुणाला ओवाळत बसणे, कुणाच्या भोवती घोटाळणे आमच्या रक्तात नाही व स्वभावातही नाही!

घोटाळता न आले मज भोवती कुणाच्या!
माझ्याशिवाय बाकी सारे हुशार होते!.............(रानफुले गझलसंग्रहातून)

प्रमोदजी!
मामा ३१ डिसेंबरला अजून दोन दिवस आहेत..इतक्यातच?
काही नाही आहो पिसाळलेल्याला शांत करतोय!
टीप: इतक्यातच?<<<<आमचा हा प्रांत नाही! शिक्षक आहोत!

झा लं का स ग ळं बो लू न ????
बास करा आता!!!!!!!!!!!!!!!!!!!!
_____________________________________________________________________
या सर्व गदारोळात ज्यांचे आभार मानायचे राहिले त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार
_____________________________________________________________________
देवसर नमस्ते
मागे मी तुम्हाला म्हणालो होतो. की एखाद्या गझलेत / शेरात काय छान वाटते आहे तेच व तितकेच प्रतिसदात लिहित जा म्हणून
या पुढे या गझलेबबत या धाग्यावर बोलयचे असेलच तर वर मी ठळक अक्षरात सांगीतलेले वाक्य मान्य असल्यासच बोलावे
बाकी सर्व ठीक
कळावे
कितीही एती झाले तरी आपलाच
-वैभवा

वैभवा! जे काहीबाही बेताल बरळत सुटलेत ते बघ आधी! त्यांना सांगण्याची हिंमत दाखविलीस तर तुला मानले!
ऐकून घेणा-याला काहीही बोलण्यास कुठलीच हिंमत लागत नाही!

वैभवा!
मागे मी तुम्हाला म्हणालो होतो. की एखाद्या गझलेत / शेरात काय छान वाटते आहे तेच व तितकेच प्रतिसदात लिहित जा म्हणून <<<<<<
हे तू त्या पिसाटांना सांग......आहे हिम्मत तेवढी?

प्रोफेसर साहेब,बेफिकीरजी,वैभव सर आपण सगळे गझलकार आहात,सारस्वत आहात, कलाकार आहात.
तुमच्या सगळ्यांच्याच गझला मी खूप आदरपूर्वक वाचतो.मला गझलेच तंत्र,काव्य खरच काळत नाही हो पण तुमच्या सगळ्यांच्याच गझला खूप आवडतात. पुन्हा पुन्हा वाचाव्याश्या वाटतात.
तुमच्या मध्ये मी खरच काही बोलू नये कारण तो माझा अधिकार नव्हे. वरील personal होत गेलेला वाद वाचला आणि मला खरच खूप वाईट वाटलं.
हा वाद कृपया थांबवावा ही सगळ्याच मायबोली वरील गझल प्रेमीनतर्फे मी कळकळीची विनंती करतो. तुम्हा सगळ्यांच्याच नवीन गझलेच्या प्रतीक्षेत..

श्रीयूजी!
धन्यवाद आपल्या सदिच्छेबद्दल!
अगदी आमच्या मनातील बोललात! आम्हास विवाद/भांडण कुणाशीच आवडत नाही!
कुणाबद्दलही राग तर आमच्या मनात कधीच टिकत नाही!
फरगेट आणि फरगिव्ह हीच आमची जीवनशैली आहे!
आमच्याकडून वाद, भांडण, उणीदुणी, वैयक्तिक टीका यापुढे होणार नाहीत हा आम्ही आपणास शब्द देतो!
मायबोली ही एक गझलदिंडी आहे व आपण सर्व तिचे वारकरी आहोत!
आपल्या सर्वांची पंढरी एकच आहे....गझलपंढरी!
कसला आला अहंकार आणि कसली आली तुलना?
आम्ही जे काही चुकीचे बिकीचे, बरे वाईट लिखाण करतो त्याचे श्रेय कधीच स्वत:कडे घेत नाही!
तो पांडुरंगच आमच्याकडून लिहून घेतो, आम्ही फक्त निमित्त आहोत, हे आम्ही जाणतो!
जिथे जिथे दिव्यत्वाची प्रचीती येते तिथे आम्ही नतमस्तकच होवू व त्या परमेश्वराचे आभारच मानू की, त्याने त्याच्या दिव्यत्वाचे दर्शन घडवले म्हणून!
राग ना माझा कुणावर, मी जगावर प्रेम केले!
जा तुलाही माफ केले, मी तुझ्यावर प्रेम केले!!........ही आमची भावना!
आमच्याकडून कळत/नकळत कुणी दुखावले गेले असल्यास आम्ही त्यांची माफी मागतो!
पुन्हा असे गढूळ वातावरण होणार नाही यासाठी आम्ही जातीने कसोशीने प्रयत्न करू असे आपणास वचन देतो!
पुन्हा आपल्या मनातील पवित्र भावनांना वंदन करतो व थांबतो!
..............प्रा.सतीश देवपूरकर

Pages