आतला आवाज माझा,,,

Submitted by वैवकु on 23 December, 2012 - 00:53

तू नको समजूस की मी एकटा आहे
सोबतीला पोळणारा गारवा आहे

मी तुला कोरा कुठे पीतोय रे दु:खा
मिसळला माझ्या मनाचा गोडवा आहे

दे मला शोधून आता तूच तो पत्ता
जो तुझ्या शोधात माझा हरवला आहे

मी स्वतःशी बोलताना शब्द देशिल का
आतला आवाज माझा गोठला आहे

तो चहूबाजूस परिमळ होत दरवळला
मी कधी स्पर्शू न शकलो ही व्यथा आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रोफेसर साहेब,

गारवा
एकटा

या दोन शब्दामधील ''आ'' या स्वरास काफिया मानले जाते. त्यास स्वरकाफिया म्हणतात.

आ,ई,ऊ या स्वरातील काफियास मान्यता आहे.... ''अ'' कारान्त स्वरकाफिया चालत नाही.

वैभवा!
गझल आज आहे त्यापेक्षा अधिक चांगली , अधिक सुंदर होईल का अन् होवू शकत असेल तर आपल्याला ती कशी करता येईल हा प्रश्न आहे ;<<<<<<<<
सूट घेवून गझलेत सौंदर्य येत नसते!
सौंदर्य मुळात शायराच्या विचारात/मनात/हृदयात असायला हवे!
विचार मांडायला सुलभ जावे यासाठी सूट घ्यायची व वर त्याचे उदात्तीकरण करायचे हा कुठला न्याय?
नका पाळू ना कोणतेही बंधन, कुणी केली जबरदस्ती?
कोणत्याही प्रकारे लिहा पण सकस व अर्थगर्भ लिहा.
गझलच लिहा असे कोण म्हणते?
पण आम्ही लिहितो तीच सुंदर गझल असा अट्टाहास कशासाठी?
३०वर्षांच्या आमच्या लिखाणात आम्हास काय समजले हे माझे लेखन(आमचे आतापर्यंतचे लेखन)वर क्लिक करून डोळे फाडून वाच, म्हणजे कळेल!
आमची कोणतीही गझल/कोणताही शेर कुणालाही बाहेर ऐकव, तुला उत्तर मिळेल!
दुस-याला किती वर्षात किती समजले हे त्रैराशिक मांडण्याऐवजी आपल्याला स्वत:ला किती समजले, आपल्या लिखाणात ते किती उतरले हे पहावे! म्हणजे पाय जमिनीस राहतील तुझे!
वयाने लहान आहेस,आताच इतकी डोक्यात हवा भरलीस तर तुला खुद्द देवच वाचवो बाबा!
वयाने वडील असल्याने हे आम्ही तुला हक्काने, आपुलकीने व प्रेमाने सांगत आहे! त्याउपर तुझी मर्जी!
............प्रा.सतीश देवपूरकर

प्रमोदराव!
गुरू भेटावा लागतो!
गंडा बांधून का कुणी गुरू होतो?
योग्य गुरूचा गंडा बांधायला मिळण्यासाठी लागते साधना व पुण्याई!
आपल्याला बहुतेक वाटत आहे, की, आम्ही गंड्यांची लडीच घेवून बसलो आहोत!
आम्ही पेशाने जरी प्राध्यापक असलो तरी गझलेच्याच काय भूशास्त्रात देखिल आम्ही ३६ वर्षांच्या अध्यापनानंतरही विद्यार्थीच आहोत!
बर विद्यार्थीच म्हणाल तर आमचे साधारणपणे ५०० विद्यार्थी जगभरातील खनिजतेल कंपन्यांमधे उच्च पदावर काम करत आहेत जेआमच्या नित्य संपर्कात असतात!
तेव्हा गंडे हातात घेवून विद्यार्थी /चेले शोधण्यासाठी वणवणायची आम्हास गरज नाही! व तो आमचा स्वभाव नाही!
टीपो: संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक गझलकार संगणक यायच्या आधीपासून आमच्या संपर्कात आहेत!
.............प्रा,सतीश देवपूरकर

कैलासराव!
या दोन शब्दामधील ''आ'' या स्वरास काफिया मानले जाते. त्यास स्वरकाफिया म्हणतात.
आ या स्वराला काफियाचे स्वरचिन्ह म्हणता येईल!
स्वरकाफिया कसे म्हणता येईल?
प्रत्येक काफियाच्या शब्दाच्या शेवटच्या न बदलणा-या एक किंवा अनेक अक्षरांच्याआधी येणा-या विशिष्ट बदलणा-या अक्षरातील स्वराला (अ/आ/इ/ई/उ/ऊ/ए/ऐ/ओ/औ.....) अलामत वा स्वरचिन्ह म्हणतात!
स्वरास/स्वरचिन्हास काफिया कसे म्हणता येईल?
कैलासराव कृपया खुलासेवार सांगाल काय? रेफरन्स देखिल द्याल का?
..............प्रा.सतीश देवपूरकर
टीप....
काफियांतील स्वरमाधुर्य कानास गाताना/गुणगुणताना आल्हाददायक वाटते!
वै.म......म्हणूनच उर्दूत गझल लिहिण्यापेक्षा मराठीत गझल लिहिणे अवघड मानले जाते!

पुन्हा काही मुद्दे :

- सुरेश भटानी गझल मराठीत खर्‍या अर्थाने रूजवली, पण तिथेच मराठी गझलेचा प्रवास संपतो का ? मराठी गझल ही तंत्र आणि आशय या दोन्ही प्रतलांवर समृध्द झाली पाहिजे.

नव्या पिढीतल्या कवींनी आपले स्वतःचे अनुभव, जाणीवा , समकालीन आयुष्य याचा सखोल करून लेखन करावे. गुरू -शिष्य - गंडे - दोरे या साहित्यबाह्य गोष्टी आहेत. माझ्या मते कविता शिकवली जाऊ शकत नाही - तुम्ही कवी असता किंवा नसता . शिकवले जाऊ शकते ते तंत्र, कला नव्हे.

- स्वर यमकात लिहीणे सोपे नाही, कारण इथे तुमच्या मदतीला सळसळी नंतर येणारी खळबळ (आणि मग अपरिहार्य पणे येणारी तळमळ) नसते.

- स्वर यमक मराठी भाषेला नवीन नाही, जुन्या मराठी कविता वाचल्या तर हे सहज लक्षात येईल.

- उर्दूत अलीफ हे स्वतंत्र अक्षर लिहीले जात असल्याने उर्दूत स्वर यमक चालतो , पण मराठीतला 'आ' जोडून येत असल्याने चालत नाही हा एक मोठा गैरसमज आपल्याकडे रूढ आहे. वास्तविक, 'जा','था','गा' ने संपणार्‍या अनेक शब्दांमध्ये अलीफ जोडून येतो, स्वतंत्र अक्षर म्ह्णून नाही

उदाहरणे बघा:

पडा : پڈا ( इथे अलीफ स्वतंत्र आहे )
था : تھا ( इथे अलीफ जोडून आहे )

इथे अलीफ हा दोन वेगवेगळ्या प्रकारे लिहीलेला असला तरी 'पडा' आणि 'था'हे काफिये चालतात. याचाच अर्थ ही स्वतंत्र अक्षराची ऑर्गुमेंट इनवॅलीड आहे.

- शेवटी - वृत्त काफिये, रदीफ अलामत हे सर्व गझलेचे साधन आहे , साध्य नव्हे.

धन्यवाद अनंतजी, गझलेच्या भरीव वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरणारे अत्यंत महत्वाचे मुद्दे आपण अधोरेखीत केले आहेत.

प्रेफेसर साहेब,

स्वरयमक असलेली एक नितांतसुंदर गझल इथे पेस्ट करतोय..... आपल्या लक्षात वरील मुद्दे येतील.

ध्येयवेडा पोरगा तो कोण होता
थेट माझ्यासारखा तो कोण होता

पाहिले कित्येक दिवसांनी स्वतःला
आणि जो दिसला मला तो कोण होता

'जायचा होता ॠतू गेला निघूनी'
हे तुला जो बोलला तो कोण होता

ठेवलेली वेदना ज्याने उशाला
आसवांचा सोयरा तो कोण होता

बोलला ज्याच्यासवे हा रानवारा
ऐकली ज्याने कथा तो कोण होता..?

--अनंत ढवळे

(२००६ -मूक अरण्यातली पानगळ )

अहोभाग्य !!
ढवळे सर प्रत्यक्ष तुमच्याकडून काही शिकायला मिळते आहे

डॉ. साहेब तुमचेही विषेश आभार
मला आयुष्यात सर्वप्रथमच इतका जिवापाड आवडलेला शेर ढवळे सरांच्या ह्या गझलेतला मतला आहे

ध्येयवेडा पोरगा तो कोण होता
थेट माझ्यासारखा तो कोण होता

हा शेर त्यांनी माझ्यासाठीच लिहिला आहे असे मानून बसलो मी अन विचारही करू लागलो की कोणतीही ओळख्पाळख नसताना त्या शायराने असे कसे केले माझ्यासाठी वगैरे (त्यावेळी मला अनंत ढवळे कोण आहे हे अगदीच माहीत नव्हते पण हा माणूस एक फार फार मोठा गझलकार असाणार इतकेच मी ओळखले होते!)
....पण ही जादू शायरात नसून गझलेत असते हे त्यावेळी मला समजत नसे .......

यावरून मी केलीली तरही देखील आहे इथे माबोवर (त्यावेळी मला अनंत ढवळे कोण आहे हे अगदीच माहीत नव्हते पण हा माणूस एक फार फार मोठा गझलकार असाणार इतकेच मी ओळखले होते!)
अलमत बिलामत पाळायची असते हे माहीत होते पण कशी पाळायची कशी नाही हे कळत नव्हते ....त्या तरहीत मी मतला असाच्या असा ढापला !!पुढे ...पारखा ,तारखा हार खा !!,गोरखा..... असे काफिये योजले होते मी त्यात

असो

पुनश्च धन्स !!!

असाच लोभ असूद्या म्हटलं !!:)

कैलासराव!
आपण काय म्हणताय ते आम्हास पटते आहे!
अशी गझल लिहिली जावू शकते, पण तिचा सांगीतिक गोडवा हा निश्चितच कमी होतो असे आमचे वैयक्तिक मत आहे!
असे लिहिल्याने शेर जास्त चांगला होतो हे मात्र आम्हास पटत नाही!
हां, हवा तो शब्द, काफिया म्हणून स्वर सांभाळून वापरायला जास्त सुलभ जाते हे कबूल!
तरीही आम्हास तरी ही शायराने घेतलेली सूट/तडजोड वाटते!

ताकदीचा शेर, अशी सूट न घेताही लिहिला जावू शकतो, हे भटांनी व इतर असंख्य शायरांनी दाखवून दिले आहे!
त्यामुळेच ही मूळ गझललेखनाची शैली रूढ झाली!

तसे पाहिले तर आम्हास शाळेत आमच्या मराठीच्या सरांनी काव्याच्या व्याख्या, अलंकार व वृत्ते इयत्ता ८वीत शिकवताना उदाहरणासकट असे सांगितलेले आठवते की, दर्जेदार काव्यास कोणत्याही काफियाची, आपण म्हणता तसे स्वरकाफियाची आवश्यकता नसते!
कारण मुळात काव्य हे वृत्तात नसते, शब्दात नसते, यमकात नसते, स्वरयमकात नसते, तर ते आशयाच्या/विचारांच्या सौंदर्यातच असते!
मुळात कवीला जे म्हणायचे आहे तेच काव्याच्या पातळीवर जर जाणारे नसेल तर कोणतेही वृत्त, कोणताही काफिया,स्वरकाफिया वापरलेला असो, काहीही फरक पडत नाही.
कारण शब्द, रदीफ, काफिया, स्वर काफिया, म्हणी ही सर्व कवीच्या अंतरंगातील काव्याच्या अभिव्यक्तीची साधने आहेत, साध्य नव्हेत! शब्दांत/काफियांत/स्वरकाफियांत काव्य नसते तर ते वापरणा-या शायराच्या व्यक्तिमत्वात/पिंडात/हृदयात असते!
शब्दांना कवीचे व्यक्तित्व चिकटलेले असते! म्हणूनच सुरेश भटांची गझल/पाडगावकरांची गझल/गदिमांचे गाणे/शांता शेळकेंचे गाणे आपण ऐकल्या ऐकल्या ओळखू शकतो! असो.

मराठी गझल हा सर्वांगसुंदर(अंतर्बाह्य) नखशिखांत काव्यप्रकार आहे जिचे स्वरूप/नखरे/कायदे/डौल/ताल/तोल/नाट्य/ भावनांचा वा विचारांचा कडेलोट/सस्पेन्स, प्रासादिकता/अंतीम सत्यता वगैरे गोष्टी सांभाळणे हे काम सोपे नव्हे! म्हणूनच भलेभले गझलेपासून शेवटी दूर गेले! असो.

एक शेर व तुम्ही म्हणता तसे स्वरकाफिया योजलेली आमची जुनी अजाणता लिहिलेली गझल उदाहरणार्थ देत आहे................
१ शेर....कुठलेही यमक नाही तरीही यातील काव्य मनास भावते ..............
स्मशानी अस्थि माझ्या घ्यावया येवू नका कोणी......
इथे दिसतील माझी फक्त स्वप्ने राख झालेली!

.......................................................................
गझलेचे काही शेर.............

भेटण्यासाठी बहाणे रोज शोधू लागलो!
एकमेकांच्या अम्ही स्वप्नात येवू लागलो!!

पौर्णिमा आम्हास पोळू लागली तेव्हा अम्ही......
चांदणे मानून माध्यान्हात हिंडू लागलो!

झोप यावी याचसाठी रात्र जागू लागलो!
ऐन दिवसा मात्र मी झोपेत चालू लागलो!

एकही उरली न फांदी, सर्व त्यांनी छाटल्या.....
वाटले त्यांना.....अम्ही वाटेत येवू लागलो!

बाटलेला सूर्य उगवू लागला जेव्हा नभी;
मी घराच्या सर्व खिडक्या बंद ठेवू लागलो!

.......................प्रा.सतीश देवपूरकर

वा सर आता कसे मनतले(आमच्याही अन् तुमच्याही) बोललात !!
काही मुद्दे पटले !!

खालचे शेर मस्तचय्त
झोपेत चालू लागलो तितका नाही आवडला दुसर्‍या ओळीतला खयाल तितकासा गंभीर नाही वाटला
मध्यान्हात ऐवजी मध्यान्हीच असा बदल करून वचला

हे सर्व आधीच सांगायला काय झाले होते ??.असो!!

धन्यवाद !!!

झोपण्याचे स्वप्न घेवुन रात्र जागू लागली
मी तसे माझे मढे दिवसाच वाहू लगलो

खयाल टोटली चेंज !!!......मुसल्सल्पणाही हरवला आहे.....त्यामुळे हा पर्यायी नाही आहे गैरसमज नसावा !! तुमच्या शेरातील काही शब्द ,वृत्त, काफिया-रदीफ मात्र ट्रिगर सारखे वपरले आहेत

आवडल्यास अवश्य कळवा

धन्स !!!

वैभवा! धन्यवाद!
आम्ही दिलेली रचना, गझल म्हणजे काय, हे माहीत नसताना लिहिलेली साधारणपणे १९८५मधे लिहिलेली होती!
एक पूर्वीची , (मामींची लहानपणापासूनची गोड,गुलाबी)स्मृती म्हणून केवळ, आम्ही ही रचना आमच्या रानफुले या गझलसंग्रहात असू दिली!
अवांतर: आमच्या या गझलसंग्रहाचे नाव व मुखपृष्ठावरील रानफुलांचे चित्र व कल्पना मामींचीच!

आता स्वरकाफियांविषयी थोडेसे.............
स्वरकाफिया ही संज्ञाच आम्हास रुचली नाही व पटलीही नाही!
काफिया काय, रदीफ काय.......मूळात यमक असतात!
शाळेत जेव्हा अलंकार शिकलो, तेव्हा यमकाची व्याख्या शिकलो, तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की, यमकाच्या शब्दात शेवटचे १ किंवा अधिक अक्षरे ही सारखी असावी लागतात, ज्याने म्हणताना, गुणगुणताना, गाताना एक स्वरमाधुर्य निर्माण होते, ऐकताना कानास गोड वाटते! यमकांमधल्या या न बदलणा-या अक्षरा/अक्षरांमुळे एक नादमयता येते वगैरे वगैरे........

तेव्हा आमचे म्हणणे असे आहे की, मुळात यमक असे म्हटले की त्यात न बदलणारे अक्षर/अक्षरे ही असायलाच हवीत! नुसता स्वर कायम ठेवून ते शब्द यमकाचे कसे होतील? तितके नादमाधुर्य अशा यमकांत कसे कुठून येईल?

गझलेत तर सर्वप्रकारची सौंदर्य अपेक्षित असतात!
म्हणूनच स्वरकाफिया योजून लिहिलेली गझल ही रूढ/पारंपारिक पद्धतीने लिहिलेल्या गझलेपेक्षा काकणभर कमीच वाटणार! (इथे ज्या दोन गझलंची तुलना आपण करतोय त्या सारख्याच ताकदीच्या आहेत असे गृहीत धरले आहे!)

गझलेत स्वरकाफिया(चतुरपणे व नाविन्याचा पवित्रा घेतलयासारखे) योजणा्यामागे आम्हास खालील कारणे संभाव्य वाटतात........एक वैयक्तिक कयास!

१) शायराचे/ची शब्ददारिद्र्य/ काफियानिर्धनता

२) शायराची काफियाशरणता

३) शायराची वृत्तावर/भाषेवर असलेली ढिली पकड

४) शायराचा गझलउतावीळपणा

५) सूट/सुटी घेण्याची लागलेली सवय

६) शायराचे थिटे चिंतन

७) अधिकाधिक गझला लिहिण्याचा/पाडण्याचा सोस

८) गझलच लिहिण्याची हौस/अट्टाहास

९) नवनवीन काही तरी केल्याचा अविर्भाव

१०) शेरातील नाट्य, कडेलोट पेलण्याची असमर्थता

इत्यादी!
टीप: वर दिलेली मते ही आमची वैयक्तिक मते आहेत जी अनेक वर्षांच्या डोळस गझललेखना नंतर तयार झालेली आहेत! मायबोलीकरांनो! आपली मते वेगळी असू शकतील, ज्यांचा आम्हास आदर आहे!

शेवटी कवितेचा कोणताही प्रकार हाताळावा, जो आपल्याला पटला/रुचला आहे, ज्यावर आपली ब-यापैकी हुकुमत चालू शकते!
मग काफिया/रदीफ/स्वरकाफिया/यमक या बाबी रचनेच्या अंगीभूत सौदर्यच्या दृष्टीने गौण आहेत!
मराठी गझलेचे सर्व रूढ, प्रस्थापित, पारंपारिक संकेत पाळून सशक्त, समर्थ/प्रासादिक/थेट/सोपे/निसंदिग्ध, दिव्य, स्वर्गीय व कामयाब शेर/गझला लिहिण्यातच खरी मौज आहे, जिथे शायराच्या प्रतिभेचा व प्रज्ञेचा कस लागतो! प्रत्येकाची प्रत्येक गझल वा प्रत्येक शेर हा कामयाबच असेल असे छातीठोकपणे कुणीही सांगू शकत नाही!
प्रत्येक शेर/गझल लिहितानाची शायराची मानसिकता वेगळी असू शकते. एखाद्या शायराची पाच शेरांची गझल म्हणजे त्याशायराच्या ५ वेगवेगळ्या कविता असतात, ज्यांची कधीच तुलना होऊ शकत नाही व त्या सारख्याच गुणवत्तेच्या असतीलच असे नाही! एखाद्याचे सर्वच शेर सर्वाजणांना आवडतील असे नाही

...........प्रा.सतीश देवपूरकर

वैभवा!
तू दिलेला शेर आहे...........

झोपण्याचे स्वप्न घेवुन रात्र जागू लागली
मी तसे माझे मढे दिवसाच वाहू लगलो

पहिली ओळ बरी आहे, चालू शकेल!
पण दुस-या ओळीतील माझे मढे दिवसाच वाहू लागलो ......कल्पना हृद्य वाटली नाही व पहिल्या ओळीतील झोपण्याचे स्वप्न/रात्र जागू लागणे या गोष्टींशी तर्कदृष्ट्या सुसंगत व कलात्मक वाटत नाही! क्षमस्व!
पण प्रयत्न बरा आहे.........१००पैकी ४० गुण आम्ही मास्तर म्हणून या तुझ्या शेरास देवू!(हलके घे)

आम्हास तुझ्या या शेरास खालील पर्याय सुचला...........

स्वप्न झोपेचे पहातानाच सरली रात्रही.......
अन् दिवास्वप्नात सारा दिवस काटू लागलो!

आहे की, नाही खुन्नस तुझ्या शेराला! (थट्टेने म्हणतोय रे बाबा! आम्हास रागच येत नाही तर खुन्नस कुठून असणार?)
प्रा.सतीश देवपूरकर

प्रोफेसर साहेब,

तुमचे आत्मप्रौढीयुक्त प्रतिसाद पाहिल्यानंतर मी आता हा निर्णय घेतलेला आहे की तुमच्याबद्दल मनात असलेला उरलासुरला आदर झटकून टाकून तुमच्या गझलेतील त्रुटी, सपकपणा, उथळपणा हे सातत्याने मायबोली वा इतरत्र दाखवून देत राहायचे. अती झाले आणि हसू आलेच्या पलीकडील मनोवस्था आहे ही. इतके बोलणार्‍याची गझलच बोलायला हवी, पण ते तर होताना दिसत नाही. क्षमस्व, तुमचे वय, पेशा, गझललेखनाचा अनुभव व थोरामोठ्यांचा गझलस्पर्श यातील एकाही बाबीबाबत मनात आता काहीही आदर राहिलेला नाही व तुमच्या प्रत्येक आगामी गझलेतील प्रत्येक शेराची पिसे काढण्यासाठी हा 'बेफिकीर' यापुढे सिद्ध झालेला आहे.

-'बेफिकीर'!

आदरणीय भूषणराव!
आपला वरील प्रतिसाद वाचल्यावरही आमच्या मनातील आपल्याबद्दलचा आदर यत्किंचितही ढळलेला नाही, कारण आपण आमचे एक हुशार/समंजस स्नेही आहात! आमचे आवडते कवी आहात!

आमच्या गझलेतील त्रुटी, सपकपणा, उथळपणा आम्हास समजावा म्हणून तर मायबोली वा इतर संकेतस्थळांवर आमचा हा लेखनप्रपंच!

आम्ही मुळात विज्ञानाचे व कवितेचे आजन्म विद्यार्थी आहोत! शिकत आहोत! अगदी शेंबड्या पोरांकडून सुद्धा!
आमचे वय, आमचा लेखनकाल, आमचा हुद्दा, सामाजिक स्थान हे आमचे दोष नव्हेत!
open defenceला एक विज्ञानाचा विद्यार्थी व त्यातून पेशाने प्राध्यापक कधीच घाबरत नाही. आमचा रोजचा दिवस हा open defenceचाच /परीक्षेचाच असतो!
आमचा आमच्या धारणांवर, लेखनावर, आमच्या चिंतनावर, आमच्या गुरूंवर, त्यांनी दिलेल्या अनमोल मार्गदर्शनावर, अढळ विश्वास आहे!
आपले आम्ही हार्दिक स्वागतच करतो!
दाखवून दिलेल्या त्रुटी, सपकता, उथळपणा जर व्यक्तिनिरपेक्ष, निखळ व वाजवी असतील तर आम्ही आपणास लवून वंदनच करू!
आमच्यात आपल्या मौलिक मार्गदर्शनानुसार सुधरणा करू.
कारण हे आमच्या गुरूजनांचे, आईवडिलांचे, थोरांचे, तज्ञांचे आमच्यावर झालेले संस्कार आहेत!
नाही म्हटले तरी ५८पावसाळे पाहिले आहेत,
जरी आपल्या भाषेत आम्ही मागील पिढीतील, प्रौढ व expiery date उलटून गेलेले असलो तरी!

मायबोलीवरील वेचक मानाचे गणपती म्हणजे मायबोली नव्हे! हे येणारा काळच दाखवून देईल!
कळप करून, गझलेचा उदो उदो करून/ करवून गझल वा गझलकार मोठा होत नसतो.
जगातील असंख्य तज्ञ डोळे मायबोलीवरील लिखाणांचे, गझलांचे व प्रतिसादांचे साक्षीदार आहेत! हे आपण कुणीही विसरता कामा नये.
आम्हास रोज असंख्य फोन येत असतात(गझलविषयक), ज्यांचा उल्लेख आत्मस्तुती टाळण्यासाठी म्हणून आम्ही करत नाही.
आहो प्रौढीच मिरवायची तर ब-याच गोष्टी कनवटीस आहेत, पण, मिरवणुकींवर आमचा विश्वास नाही, आमच्यालेखी तिला किंमतही नाही! तो आमचा पिंड नाही व प्रांतही नाही!
अती झाले...हसू आले....हसू झाले....वगैरे व्यक्तिसापेक्ष आहे.

कुणाची गझल किती बोलते, काय बोलते हे ज्याचे त्याला ठाऊक असते.

आपली मनोवस्था आपणच नियंत्रणात ठेवावी माणसाने!
आपण फक्त आपल्या स्वत:ला बदलू शकतो, जगाला बदलायला गेले की, फक्त आणि फक्त निराशाच पदरी येते, असा आमचा तरी अनुभव आहे!
आपल्या आमचेविषयीच्या आदरविषयक भावना वाचून वैषम्य वाटले, पण क्षणभरच!
कारण कुणाला काय वाटावे याचा विचार करीत आम्ही कधीच जगलो नाही व कधी जगणारही नाही!
आम्ही असे ऐसपैस व रोखठोख आहोत!
मग याला कुणी प्रौढी म्हणो वा अजून काही गोंडस नाव देवो!
तुमच्या प्रत्येक आगामी गझलेतील प्रत्येक शेराची पिसे काढण्यासाठी हा बेफिकीर सिद्ध झालेला आहे<<<<<<<<
ये हुई ना बात! द्या टाळी भूषणराव! हेच आम्हाला तुमच्याकडून, तुमच्या तोंडून उघडपणे हवे होते!
गनिमी काव्यांवर, बुरख्यांवर झुलींवर आमचा पण विश्वास नाही!
बरे झाले एवढी धिटाई पांडुरंगाने आपणास दिली ते...
निदान आता कुठलाही आडपडदा/बुरखा रहाणार नाही!
आणि आमच्या आगामीच गझला कशाला, आमच्या २००/२१५ गझला आतापर्यंत मायबोलीवर आहेत! पहिल्या गझलेपासून प्रत्येक गझलेची पिसे का काय ते काढा! आम्ही लागले तर ती पिसे मोजायला मदत करू!
चुका पटल्या तर जाहीरपणे मान्य करू!

चला, कधीपासून श्रीगणेशा करायचा या शुभकार्याचा?
एक आमची गझल (पहिली)
एक तुमची गझल (पहिली)
दोघेही पिसे काढत बसू!

भूषणराव! आहो, आम्ही तर हाडाचे मास्तर आहोत!
कुठल्याही गोष्टीची पिसेच काय कीस काढत असतो रोज आम्ही! आम्हास ते काही नवे नाही, व कीस काढायला आम्ही डगमगतही नाही!

अगदी पहिल्या प्रकाशित केलेल्या दोघांच्या गझलेपासून सुरवात करू....
आमची मायबोलीवरील पहिली गझल......पिसे काढणार.....बेफिकीरजी!
बेफिरजींची मायबोलीवरील पहिली गझल.......कीस काढणार.....प्रा.सतीश देवपूरकर
हवे असल्यास यासाठी वेगळा धागा काढू!
निदान असे केल्याने जर झोपेचे सोंग घेतलेले जागे होणार असतील तर तसे सही!
टीप: पिसे वा कीस काढणे तर्कशुद्ध असावे.....कमीतकमी अपेक्षा!

आपला हितचिंतक, स्नेही, सहप्रवासी;
प्रा.सतीश देवपूरकर
.....................................................................

दे मला शोधून आता तूच तो पत्ता
जो तुझ्या शोधात माझा हरवला आहे

तो चहूबाजूस परिमळ होत दरवळला
मी कधी स्पर्शू न शकलो ही व्यथा आहे

व्वा! मस्त शेर...!!!

इतकं वाचायला जमेलंसं वाटत नाही....

सुंदर गझल वैवकु..

ह्याला स्वरकाफियाची गझल म्हणतात का? (कदाचित हाच मुद्दा चघळला गेला असावा वरील चर्चेत.. हो/ नाही मध्ये कुणी सांगू शकेल का?)

वेळ मिळाला.... आणि सगळा धागा वाचला....

सुरुवातीला 'स्वरकाफिया' ह्या संकल्पनेला पूर्णतः नाकारणारे (डिस्कार्ड करणारे) प्रोफेसर साहेब नंतर 'अशी गझल लिहिली जाऊ शकते... तिच्यात सांगितीक गोडवा कमी असतो..' असे म्हणून बचावात्मक झाले आहेत; हे मी ही चर्चा एकसंध वाचल्याने लक्षात आले.

मराठीत किती तरी सुंदर कवितांत स्वरकाफिया (स्वरयमक) योजला गेलेला असून, त्यांत मला तरी गायनानुकूलता कमी वाटत नाही.

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे दिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा

ह्या ओळी कविवर्य ग्रेसांच्या 'तुला पाहिले मी' ह्या कवितेतील... हे गीत ऐकताना, हे शेवटचं कडवं इतकं अंगावर येतं की काय सांगावं!! इथे तर स्वरयमकच आहे की ! त्यामुळे स्वरकाफियामुळे गायनानुकूलता कमी होते, हा मुद्दा निरर्थक आहे नक्कीच.

स्वरकाफियाच्या मराठीतील अश्या अनेक गझला आहेत, ज्या मला आवडल्या आहेत.

------------------------------------------

गझलनवाझ भीमराव पांचाळेंनी मला म्हटलं होतं की, "शक्यतो मी 'शुद्ध काफिया' असलेल्या गझलाच निवडतो"

अर्थात... हा त्यांचा प्रीफरन्स झाला... मला काही त्यात कमी-जास्त वाटत नाही.. सगळे नियम पाळून लिहिलेल्या सप्पाट गझलाही इथेच आहेत.... आणि किंचित सूट घेऊन स्वरकाफियात लिहिलेली एखादी गझल, जी वाचल्यावर मनात काही तरी चलबिचल झाली... तीही इथेच आहे..

>>>सगळे नियम पाळून लिहिलेल्या सप्पाट गझलाही इथेच आहेत.... आणि किंचित सूट घेऊन स्वरकाफियात लिहिलेली एखादी गझल, जी वाचल्यावर मनात काही तरी चलबिचल झाली... तीही इथेच आहे..<<<

उत्तम चपराक रसप!

गझलतंत्राबाबत इतकी चर्चा करणार्‍या महोदयांना गझलमंत्रावर निव्वळ व्याख्याने झोडणे जमते हे नवलाईजनकच!

हा प्रतिसाद पाहावात सर्वांनी: हा प्रोफेसरांनी समीर चव्हाणांना दिलेला आहे.

खुद्द भट हयात नाहीत म्हणून लोक छाती फुगवून काहीही बरळायला लागलेले आहेत! असो.<<<

पहिले म्हणजे हे विधान योग्य भाषेत नाही. दुसरे म्हणजे भटांनी गझलअध्यापनाचे एक्स्क्ल्युझिव्ह अधिकार प्रोफेसरांना बहाल केले असल्याच्या थाटात केलेले हे विधान आहे. माझ्यामते प्रोफेसरांच्या सर्व गझला भटांनी पाहिल्या असत्या तर त्यातील नव्वद टक्के गझलांचे कागद त्यांनी 'मराठी रद्दी' म्हणून विकून टाकायला सांगितले असते. तिसरे म्हणजे हे विधान जसेच्या तसे प्रोफेसरांनाही लागू होते.

=====================================

कोणते काफिये वापरावेत/वापरू नयेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे!<<<

हा जर ज्याचा त्याचा प्रश्न आहे, तर मुळात वैवकुच्या गझलेवर 'यात अलामत कोणती, न बदलणारे अक्षर कोणते' हा वाद काढला कशाला? पांडित्य दाखवायला? हे ज्ञान तर गझल शिकणार्‍यांना शिशुविहारमध्येच मिळते. ते काय वैवकुंना ठाऊक नसेल?

=====================================

आज समाजात भटांनी प्रस्थापित केलेल्या गझलेस लोक मानतात व पुढेही मानतील कारण ते जे बोलत असत, ते करत असत.<<<

जे बोलेल ते करणार्‍याची गझल समाज मानतो? हा कुठला निकष गझलेच्या श्रेष्ठतेचा? जे बोलेल ते करतो हे तत्व आयुष्याबाबत आदर निर्माण करण्यास कारणीभूत असणे समजू शकतो, गझलेबाबत आदर निर्माण करण्यास कसे काय? भटांची गझल श्रेष्ठ असल्याने समाजाने ती मानली, भट बोलतात तसे वागतात म्हणून नाही मानली. याशिवाय, तुम्हाला सुतरामही कल्पना नसेल, की आजकाल मराठीमध्ये नवी गझल मोठ्या प्रमाणावर ऐकली, वाचली व मानली जाऊ लागलेली आहे. ही गझल भटांच्या गझलेपेक्षा फारच निराळी व तरीही बर्‍यापैकी सुंदर आहे. बदलत्या काळाची पावले ओळखण्यात आपण अपयशी तरी ठरलेला आहात किंवा त्या वाटेवर चालण्याचे भय तुम्हाला निर्भय असल्याचा मुखवटा चढवायला भाग तरी पाडत आहे.

========================================

मराठी भाषेचा बाज, एकंदर तबीयत बघूनच काही संकेत त्यांनी स्वत:च्या लिखाणातून प्रस्थापित केले!
मराठी गझलही तितकीच गोड व्हावी हीच त्यांची कळकळ होती!
आता नाचता येइना अन् अंगण वाकडे असा प्रकार असला की, काहीही पळवाटा काढून त्यांना अभिनवतेचे गोंडस नाव देण्याची टूमच झालेली दिसते!<<<

हे तुम्ही त्या कवींना उद्देशून म्हणत आहात ज्यांचा मराठी गझल क्षेत्रात आदरयुक्त दबदबा आहे. बिनबुडाचा व भटांचे शिष्य असल्यामुळे आलेला निखालस उधारीचा दबदबा नाही. या कवींनी पूर्णपणे तंत्रानुसार गझल लिहूनही स्वरयमकांची गझलही लिहिलेली आहे. त्यामागे चिंतन आहे, पळवाटा नाहीत. अन्यथा त्यांना यमके सुचत नसतील असा काहीतरी बालीश अंदाजही आपण मांडू धजाल. तुमच्या येथील २५० ते ३०० गझलांसमोर 'पानगळ' हा एकच चाळीसएक गझलांचा संग्रह ठेवून कोणत्याही तज्ञाला अथवा सामान्य गझलरसिकाला मत द्यायला सांगा. मी तुलनाच करत आहे कारण ती तुलनाच व्हावी अश्या शैलीत तुम्ही मुक्ताफळे उधळलेली आहेत.

==========================

पण येणारा काळच ठरवील की काय टिकाऊ आहे आणि काय टाकाऊ आहे!<<<

हे सांगायला तुमची काहीही आवश्यकता नाही.

===========================

मायबोली वा इतर कोणत्याही संकेतस्थळावरील चारदोन डोकी म्हणजे समस्त मराठी जनता नव्हे!<<<

तुमची मते म्हणजे कोणतीही नियमावली किंवा संदर्भग्रंथ नव्हे. तुमची मते जेटच्या वेगात सर्वत्र धुळधाण करत असतात तेव्हाच मागून तुमची स्वतःची गझल रखडत रखडत बैलगाडीसारखी कशीबशी येत असते. दोन्हींचा वेग आधी समान करा, मग बाकीच्यांची डोकी काढा. तुम्हाला डोक्यावर घेणारे गझलरसिक म्हणजे मराठी माणसाच्या खर्‍या व उच्च अभिरुचीचे चिन्ह नव्हे.

============================

शेवटी लिहा कोणत्याही प्रकाराने, आधी ते दर्जेदार काव्य असले पाहिजे!<<<

मग हा वाद कशाला काढलात? याला गझल म्हणूच नये म्हणणारे तुम्ही कोण लागून गेलात? एकीकडे म्हणता मुक्तछंदातही गझल लिहिता येते. एकीकडे म्हणता स्वरकाफिया वापरू नये कारण भटांना मान्य नव्हते. आता म्हणता हवे तसे लिहा पण काव्य दर्जेदार पाहिजे. काव्य म्हणजे काय हे घरात फार पाली झालेल्या आहेत आणि आता मलाच घरात जागा नाही अश्या अर्थाचा तुमचाच शेर वाचून समस्त मायबोलीकरांना आधीच समजलेले आहे. जे तुम्ही रचता ते काव्य नाही ही व्याख्या येथे मुळातच निर्माण झालेली आहे.

====================================

काफिया/ स्वरकाफिया वगैरेंची वरील चर्चा म्हणजे निव्वळ धुरळा वाटत आहे!<<<

का बुवा? तुमच्याविरुद्ध मत आले की धुरळा? तुमच्या शेराची प्रशंसा करणार्‍याचा सौंदर्यबोध महान? हे कोणी ठरवले? आधीच शुद्ध आणि चांगली गझल लिहिणारे कमी, त्यात तुम्ही भटांचे नांव घेऊन अभिव्यक्तीला सीमीत करणार आणि बाकीच्यांना धुरळा उडवणारे म्हणणार. तुम्ही आहात कोण?

=================================

गझलेचे सर्व संकेत, डौल, ताल, तोल, नखरे सांभाळून अत्यंत बोलका अर्थपूर्ण व प्रासादिक शेर लिहिण्यातच तर खरी मजा आहे!<<<

तुमच्या दहा शेरांची उदाहरणे, येथेच, या चर्चेतच द्या ज्यांच्यात वरील निकष पाळले गेलेले आहेत. 'माझ्या लेखनखुणा बघा' असा प्रतिसाद डकवू नका. कळूदेत एकदा सगळ्यांना की तुमचे कोणते शेर तुम्हाला वरील निकष पाळणारे वाटतात आणि ते तसे खरंच आहेत का हे!

==================================

भट नेहमी म्हणायचे......कमीत कमी सूट घ्यावी गझलेत! शक्यतोवर सूट घेवूच नव्हे!
आता पाळायचे की नाही ते कवींनी ठरवायचे!<<<

मग तेच तर वैवकुने केलेले आहे ना? पाळायचे की नाही हे त्याने ठरवलेले आहे. तुम्ही का मधे वसवसताय?

==================================

काय चांगले आहे, कोणता मार्ग योग्य ते भटांनी दाखविले आहे <<<

भटांनी काय दाखविले आहे ते विसरा. तुम्ही काय केले आहेत ते सांगा.

================================================

अवांतर: भटांना आम्ही एकदा रुबायांबद्दल छेडले होते. तेव्हा ते आम्हास म्हणाले.............
रुबायांची २२/२४ वृत्ते आहेत, त्यातच कोणतीही सूट न घेता लिहायचे असते.
रुबाईत खयालाच्या नाविन्यतेला फार महत्व असते!
इतक्यात तू रुबायांच्या वाटेला जाऊ नकोस, मी देखिल रुबाया लिहायला धजावलो नाही!
सधया गझलेवरच लक्ष केंद्रीत कर. आजवर आम्ही ते पाळले आहे!<<<

मायबोली आपले हे उपकार कदापी विसरणार नाही.
==================================================

मग गझलेएवजी भावगीते, भक्तीगीते, कविता, मुक्तछंद लिहावा माणसाने !त्यात काय आला कमीपणा
हल्ली गझलेचा आवच जास्त व गझल कमी असे दिसून येते!......असे खेदाने म्हणावेसे वाटत आहे<<<

तुमचे सर्व धागे वाचून समस्तांचे हेच मत झालेले आहे.

-'बेफिकीर'!

हे तुम्ही अनंत ढवळे, समीर चव्हाण वगैरे कवींबाबत लिहीत आहात.

=================

>>>गझलेत स्वरकाफिया(चतुरपणे व नाविन्याचा पवित्रा घेतलयासारखे) योजणा्यामागे आम्हास खालील कारणे संभाव्य वाटतात........एक वैयक्तिक कयास!

१) शायराचे/ची शब्ददारिद्र्य/ काफियानिर्धनता

२) शायराची काफियाशरणता

३) शायराची वृत्तावर/भाषेवर असलेली ढिली पकड

४) शायराचा गझलउतावीळपणा

५) सूट/सुटी घेण्याची लागलेली सवय

६) शायराचे थिटे चिंतन

७) अधिकाधिक गझला लिहिण्याचा/पाडण्याचा सोस

८) गझलच लिहिण्याची हौस/अट्टाहास

९) नवनवीन काही तरी केल्याचा अविर्भाव

१०) शेरातील नाट्य, कडेलोट पेलण्याची असमर्थता

<<<

कॅन यू प्लीज एक्स्प्लेन द अबोव्ह पॉईंट्स विथ अ‍ॅन एक्झँपल ऑफ एनी ऑफ अनंत्स गझल?

आजघडीला प्रदीप कुलकर्णी, अनंत, वैभव, चित्त आणि समीर या पाचहीजणांची गझल एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न तरीही अतिशय सुंदर अशी आहे. वरीलपैकी कोणताही पॉईंट त्यांना कोणालाही लागू होत नाही. पण ते सर्वजण स्वतंत्र विचारांनी गझल रचत आहेत. भट एके भट असे ते म्हणत बसत नाहीत. आपण मात्र भटांच्या नावाचा जळीस्थळी वापर करताना दिसता. खणखणीत नाणे आपोआप खणखणीत ध्वनी निर्माण करते हेच खरे.

उत्तम चपराक!

तू मला ओवाळ, आता मी तुला ओवाळतो!

ओवाळण्याशिवाय काय येते आम्हाला? एकमेकांच्या पाठी थोपटण्यातच आमचा जन्म जाणार बहुधा!

काही कवी असेही असतात की, जयांचे;
लिहिणे कळ्याफुलांचे, जगणे जनावरांचे!

मुखवट्यांवर, झूलींवर, बुरख्यांवर व काव्यांवर आमचा विश्वास नाही, ज्यांचा आम्ही त्रीवार धिक्कारच करतो!

Pages