अंजिरी साटोरी..

Submitted by सुलेखा on 13 December, 2012 - 08:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

सध्या घरात तीन वृद्ध व्यक्ती आहेंत्.त्यांना खाण्यालायक या अंजिरी साटोर्‍या केल्या आहेंत. कमी साखर व कमीतकमी तूपाचा वापर केला आहे..तसेच मऊसर आहेत.पौष्टीक आहेंत त्यामुळे आकाराला लहान केल्या आहेंत.
साहित्याचे विशेष ,ठरावीक असे काही प्रमाण नाही..कमी-जास्त प्रमाणात घेतले तरी चालेल.
१० अंजिर,
१०-१२ खजुर,
१०-१२ बदाम,
२ टेबलस्पून गुलकंद,
२ टेबलस्पून भाजलेला जाड रवा,
३ चमचे तूप,
२ वाट्या मैदा,
२ चमचे गरम केलेले तेल मोहनासाठी,
चिमुटभर मीठ,
१ टेबलस्पून तांदुळपिठी/मैदा---पिठी लावुन लाटायला.

क्रमवार पाककृती: 

अंजिर व बिया काढलेला खजुर १/२ कप गरम दुधात भिजत घाला..
बदाम अर्धा कप गरम पाण्यात भिजत घाला.१५ मिनिटानी बदामाची साले सोलुन घ्या.बदामाचे सुरीने /अडकित्त्याने लहान-लहान तुकडे करुन घ्या.
भिजलेल्या अंजिर व खजुराचे सुरीने किंवा हाताने लहान लहान तुकडे करुन घ्या .
हे अंजिर-खजुर व बदाम मिक्सरमधे वाटुन घ्या.
या मिश्रणात गुलकंद घालुन पुन्हा एकदा वाटुन घ्या.
एका बाऊल मधे हे मिश्रण काढुन त्यात भाजलेला रवा मिसळा.
बाऊल वर झाकण ठेवुन मावेत १ मिनिट हे मिश्रण शिजवुन घ्या..
[हे शिजवले नाही तरी चालेल्.भाजलेला रवा मिसळला कि मिश्रण घट्टसर होईल्.मी सिनीयर सिटीझन्स च्या दृष्टीने शिजवले आहे. मावे. नसेल तर कढईत थोडे पाणी उकळत ठेवुन त्यात एका लहान पातेलीत हे मिश्रण ठेवुन किंवा तव्यावर मिश्रणाचे पातेले ठेवुन शिजवता येईल ..मिश्रण गरम झाले कि शिजले..फार वेळ शिजवणे गरजेचे नाही.]
मैदा ,मीठ व गरम तेलाचे मोहन घालुन भिजवा..
साधारण जितके सारण तितका भिजलेला मैद्याचा गोळा असावा.
Anjiri Satori 001.JPG
लहान पुरीइतका गोळा घेवुन त्यात मिश्रण भरुन तांदुळपिठीवर हलक्या हाताने लहान लहान साटोर्‍या लाटाव्या..फ्राय पॅन /तवा गरम करुन त्यावर या साटोर्‍या डाग लागेल इतपत दोन्हीकडुन भाजुन घ्याव्या.
Anjiri Satori 003.JPG
भाजलेल्या साटोर्‍या एका ताटात पसरुन थंड कराव्या.
प्रत्येक साटोरीला चमच्याने अगदी थोडेसे पातळ केलेले तूप पसरुन लावावे.
Anjiri Satori 004.JPG
अंजिरी साटोर्‍या तयार आहेंत.

अधिक टिपा: 

गुलकंदाची चव खूपच छान लागते..गुलकंदाचा गोडवा पुरेसा आहे.त्यामुळे वरुन पिठी साखर घालावी लागत नाही..

माहितीचा स्रोत: 
स्व-प्रयोग..
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी रेसिपी. गुलकंद नाहीये. पण अंजीर बर्फी करायला म्हणून आणलेलं अंजीर स्प्रेड आहे. वीक एंडला उत्साह आलाच तर नक्की करुन बघणार Happy

व्वा सुलेखाताई. नेहेमीप्रमाणे वेगळी पण चविष्ट कृती.

एक विचारते समजा ताजे अंजीर नाही मिळाले तर सुके अंजीर चालतील का? म्हणजे भिजवुन वगैरे?

सही!

मस्त वाटतेय रेसिपी. माझ्याकडे योगायोगाने सुके अंजीर आणि गुलकंद दोन्ही आहे Happy
मैद्याच्या ऐवजी कणिक वापरली तर जास्त बरं नाही का लहानमोठ्या सगळ्यांच्याच तब्येतींना? की कणिक वापरून नीट लाटता वगैरे येणार नाहीत?

सुके अंजिर च वापरले आहेत.
गुलकंद नाही वापरला तरी चालेल.
वाटताना स्ट्रॉबेरी क्रश ही घालता येईल.
जरदाळु /फिग च्या साटोर्‍या करता येतील.
गोडी वाढवण्यासाठी पिठीसाखर्/खडीसाखर बारीक वाटुन घालता येईल.
मैद्याऐवजी कणिक वापरली तर जास्त छान.
स्प्रेड कोणतेही चालेल.त्यात रवा भाजुन घालावा.मुरल्यावर सारण घट्ट होईल.स्प्रेड ज्या चवीचे त्या चवीच्या साटोर्‍या बनतील.

बेरीजचे स्प्रेड - जॅम नाही - हेल्दी होईल.
बेरीज - स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, चेरी सही लागतील चवीला किंवा अ‍ॅपल/पेअर सॉस पण थोडा आटवून बरा लागेल. आयडिया भारी आहे. Happy

अप्रतिम....

चला आजुन एक चांगली पाकृ.... रोज डब्याला काय द्यायचं हा यक्ष प्रश्ण आहे. ही कॄती मस्त आणि हेल्दी. सगळी तयारी आदल्या दिवशी वरुन पहाटे करुन देता येइल....

मस्त! मस्त!!
आमची आजी खजूर पोळी करायची, पण हे अंजीर, स्ट्रॉबेरी वगैरे व्हेरीएशन जबरीच आवडलेय. अंगात आलं, तर करूनही बघेन.

मी डब्यात भरुन तो डबा फ्रीज मधे ठेवला आहे.[जवळ्-जवळ २० ते २२ नग आहेत्] सकाळी त्यातील ३-४ साटोर्‍या बाहेर काढुन त्या अजुन एका डब्यात काढुन ठेवते आहे..फ्रीज मधे ठेवल्याने टिकतीलच .
मोमी, एकसाथ सगळ्या करुन फ्रीज मधे ठेव.
मंजुडी,गुलकंदाऐवजी बिनाबियांच्या मनुका वापरता येतील्..
फक्त खजुर्+बदाम्/काजु च्याही करता येतील तसेच अंजिर न वापरुन ही करता येतील.