सध्या घरात तीन वृद्ध व्यक्ती आहेंत्.त्यांना खाण्यालायक या अंजिरी साटोर्या केल्या आहेंत. कमी साखर व कमीतकमी तूपाचा वापर केला आहे..तसेच मऊसर आहेत.पौष्टीक आहेंत त्यामुळे आकाराला लहान केल्या आहेंत.
साहित्याचे विशेष ,ठरावीक असे काही प्रमाण नाही..कमी-जास्त प्रमाणात घेतले तरी चालेल.
१० अंजिर,
१०-१२ खजुर,
१०-१२ बदाम,
२ टेबलस्पून गुलकंद,
२ टेबलस्पून भाजलेला जाड रवा,
३ चमचे तूप,
२ वाट्या मैदा,
२ चमचे गरम केलेले तेल मोहनासाठी,
चिमुटभर मीठ,
१ टेबलस्पून तांदुळपिठी/मैदा---पिठी लावुन लाटायला.
अंजिर व बिया काढलेला खजुर १/२ कप गरम दुधात भिजत घाला..
बदाम अर्धा कप गरम पाण्यात भिजत घाला.१५ मिनिटानी बदामाची साले सोलुन घ्या.बदामाचे सुरीने /अडकित्त्याने लहान-लहान तुकडे करुन घ्या.
भिजलेल्या अंजिर व खजुराचे सुरीने किंवा हाताने लहान लहान तुकडे करुन घ्या .
हे अंजिर-खजुर व बदाम मिक्सरमधे वाटुन घ्या.
या मिश्रणात गुलकंद घालुन पुन्हा एकदा वाटुन घ्या.
एका बाऊल मधे हे मिश्रण काढुन त्यात भाजलेला रवा मिसळा.
बाऊल वर झाकण ठेवुन मावेत १ मिनिट हे मिश्रण शिजवुन घ्या..
[हे शिजवले नाही तरी चालेल्.भाजलेला रवा मिसळला कि मिश्रण घट्टसर होईल्.मी सिनीयर सिटीझन्स च्या दृष्टीने शिजवले आहे. मावे. नसेल तर कढईत थोडे पाणी उकळत ठेवुन त्यात एका लहान पातेलीत हे मिश्रण ठेवुन किंवा तव्यावर मिश्रणाचे पातेले ठेवुन शिजवता येईल ..मिश्रण गरम झाले कि शिजले..फार वेळ शिजवणे गरजेचे नाही.]
मैदा ,मीठ व गरम तेलाचे मोहन घालुन भिजवा..
साधारण जितके सारण तितका भिजलेला मैद्याचा गोळा असावा.
लहान पुरीइतका गोळा घेवुन त्यात मिश्रण भरुन तांदुळपिठीवर हलक्या हाताने लहान लहान साटोर्या लाटाव्या..फ्राय पॅन /तवा गरम करुन त्यावर या साटोर्या डाग लागेल इतपत दोन्हीकडुन भाजुन घ्याव्या.
भाजलेल्या साटोर्या एका ताटात पसरुन थंड कराव्या.
प्रत्येक साटोरीला चमच्याने अगदी थोडेसे पातळ केलेले तूप पसरुन लावावे.
अंजिरी साटोर्या तयार आहेंत.
गुलकंदाची चव खूपच छान लागते..गुलकंदाचा गोडवा पुरेसा आहे.त्यामुळे वरुन पिठी साखर घालावी लागत नाही..
नेहेमीप्रमाणे फारच छान.
नेहेमीप्रमाणे फारच छान. गुलकंदाची कल्पना फारच आवडली.
भारी रेसिपी आहे एकदम
भारी रेसिपी आहे एकदम
व्वॉव. ह्या करून बघायलाच
व्वॉव. ह्या करून बघायलाच हव्या आता.
छान आहेत.
छान आहेत.
भारी रेसिपी. गुलकंद नाहीये.
भारी रेसिपी. गुलकंद नाहीये. पण अंजीर बर्फी करायला म्हणून आणलेलं अंजीर स्प्रेड आहे. वीक एंडला उत्साह आलाच तर नक्की करुन बघणार
व्वा सुलेखाताई. नेहेमीप्रमाणे
व्वा सुलेखाताई. नेहेमीप्रमाणे वेगळी पण चविष्ट कृती.
एक विचारते समजा ताजे अंजीर नाही मिळाले तर सुके अंजीर चालतील का? म्हणजे भिजवुन वगैरे?
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
अंजिर व बिया काढलेला खजुर १/२
अंजिर व बिया काढलेला खजुर १/२ कप गरम दुधात भिजत घाला.. >>>
सुके अंजीरच अपेक्षित आहेत रेसिपीसाठी.
धन्यवाद अगो. घाईत वाचल्याने
धन्यवाद अगो. घाईत वाचल्याने लक्षात नाही आले.
मस्त आहे रेसिपी. इथे गुलकंद
मस्त आहे रेसिपी. इथे गुलकंद मिळतो का? तो नसेल तर काय घालता येईल?
सही!
सही!
मस्त वाटतेय रेसिपी. माझ्याकडे
मस्त वाटतेय रेसिपी. माझ्याकडे योगायोगाने सुके अंजीर आणि गुलकंद दोन्ही आहे
मैद्याच्या ऐवजी कणिक वापरली तर जास्त बरं नाही का लहानमोठ्या सगळ्यांच्याच तब्येतींना? की कणिक वापरून नीट लाटता वगैरे येणार नाहीत?
वॉव मस्त दिसत आहे ..
वॉव मस्त दिसत आहे ..
सुके अंजिर च वापरले
सुके अंजिर च वापरले आहेत.
गुलकंद नाही वापरला तरी चालेल.
वाटताना स्ट्रॉबेरी क्रश ही घालता येईल.
जरदाळु /फिग च्या साटोर्या करता येतील.
गोडी वाढवण्यासाठी पिठीसाखर्/खडीसाखर बारीक वाटुन घालता येईल.
मैद्याऐवजी कणिक वापरली तर जास्त छान.
स्प्रेड कोणतेही चालेल.त्यात रवा भाजुन घालावा.मुरल्यावर सारण घट्ट होईल.स्प्रेड ज्या चवीचे त्या चवीच्या साटोर्या बनतील.
बेरीजचे स्प्रेड - जॅम नाही -
बेरीजचे स्प्रेड - जॅम नाही - हेल्दी होईल.
बेरीज - स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, चेरी सही लागतील चवीला किंवा अॅपल/पेअर सॉस पण थोडा आटवून बरा लागेल. आयडिया भारी आहे.
छान आहे रेसिपी. एकदम हेल्दी.
छान आहे रेसिपी. एकदम हेल्दी.
मस्त, तों पा सु.
मस्त, तों पा सु.
सॉल्लिडे - तों पा सु
सॉल्लिडे - तों पा सु
सुलेखा स्लर्प! स्लर्प! कधी
सुलेखा स्लर्प! स्लर्प! कधी येऊ खायला?
अप्रतिम.... चला आजुन एक
अप्रतिम....
चला आजुन एक चांगली पाकृ.... रोज डब्याला काय द्यायचं हा यक्ष प्रश्ण आहे. ही कॄती मस्त आणि हेल्दी. सगळी तयारी आदल्या दिवशी वरुन पहाटे करुन देता येइल....
नेहमीप्रमाणेच मस्त रेसिपी
नेहमीप्रमाणेच मस्त रेसिपी !!
एक प्रश्न : साटोर्या किती दिवस टिकु शकतील??
मस्त! मस्त!! आमची आजी खजूर
मस्त! मस्त!!
आमची आजी खजूर पोळी करायची, पण हे अंजीर, स्ट्रॉबेरी वगैरे व्हेरीएशन जबरीच आवडलेय. अंगात आलं, तर करूनही बघेन.
सही दिसतायत साटोर्या !
सही दिसतायत साटोर्या !
मस्त आहेत..
मस्त आहेत..
मी डब्यात भरुन तो डबा फ्रीज
मी डब्यात भरुन तो डबा फ्रीज मधे ठेवला आहे.[जवळ्-जवळ २० ते २२ नग आहेत्] सकाळी त्यातील ३-४ साटोर्या बाहेर काढुन त्या अजुन एका डब्यात काढुन ठेवते आहे..फ्रीज मधे ठेवल्याने टिकतीलच .
मोमी, एकसाथ सगळ्या करुन फ्रीज मधे ठेव.
मंजुडी,गुलकंदाऐवजी बिनाबियांच्या मनुका वापरता येतील्..
फक्त खजुर्+बदाम्/काजु च्याही करता येतील तसेच अंजिर न वापरुन ही करता येतील.
तोपांसु नक्की करुन पाहण्यात
तोपांसु
नक्की करुन पाहण्यात येतील
छान आहे रेसिपी.
छान आहे रेसिपी.
मस्तचं! गव्हाचे पिठ वापरुन
मस्तचं!
गव्हाचे पिठ वापरुन करुन बघेन.