ग्रँड कॅन्यॉन - ब्राईस कॅन्यॉन - झायॉन नॅशनल पार्क्स

Submitted by दैत्य on 5 December, 2012 - 01:08

नमस्कार!

खूप दिवसांनी (खरंतर महिन्यांनी) मायबोली वर लिहीत आहे, त्यामुळे बिचकायला होतंय, सांभाळून घ्या प्लीज!

काही दिवसांपूर्वी थँक्सगिव्हींग च्या सुट्ट्या होत्या, तेव्हा अमेरिकेतल्या साऊथवेस्ट भागातली तीन नॅशनल पार्क्स बघण्याचं ठरवलं आणि प्रवास लास वेगास पासून चालू केला. पहिला टप्पा म्हणजे ग्रँड कॅन्यॉन ! ह्याबद्दल खूप गोष्टी ऐकल्या होत्या आणि अपेक्षेप्रमाणेच कॅन्यॉन अतिप्रचंड होती.

IMAG0256

प्र.चि. १ - ग्रँड कॅन्यॉन - साऊथ रिम

सूर्योदय पहायला गेलो तर पहाटे असले ३ एल्क लॉजच्या मागे निवांत चरत उभे होते!

DSC05857

प्र.चि. २ - ग्रँड कॅन्यॉन - एल्क

ग्रँड कॅन्यॉन हे खूप प्रसिद्ध ठिकाण आहे त्यामुळे ह्याचे फोटो मायबोली वर आधीच येऊन गेले असतीलही. तरीही हा अजून एका ठिकाणचा, जिथे ग्रँड कॅन्यॉन संपून अ‍ॅरिझोनाचं वाळवंट चालू होतं. ह्याला 'डेझर्ट व्यू' असं नाव आहे.

IMAG0322

प्र.चि. ३ - ग्रँड कॅन्यॉन - डेझर्ट व्यू

'डेझर्ट व्यू'ला एक मनोरा बांधला आहे आणि आतमध्ये भिंतीवर पूर्वीच्या आदिवासी स्टाईलमध्ये भित्तीचित्रं वगैरे चितारली आहेत. शिवाय काही जुन्या (जुनाट आणि भंगार दिसणार्‍या) खूर्च्या अगदी जपून ठेवल्या आहेत.

IMAG0311

प्र.चि. ४ - ग्रँड कॅन्यॉन - डेझर्ट व्यू टॉवर

ह्यानंतर वाटेत जाताना भुकेपोटी चुकून ट्युबा सिटी ला गेलो. हे गाव 'नावाहो नेशन' (Navajo Nation) मध्ये येतं. अजूनही ह्या नावाहो नेशन मध्ये प्रामुख्यानं 'नेटीव्ह अमेरिकन' जमातींमधले लोक राहतात. त्यामुळे तिथे अमेरिकेत इतरत्र असणारी सुबत्ता अचानक कुठे गायब झाली असं वाटून गेलं.

पुन्हा प्रवास चालू.
IMAG0334

प्र.चि. ५ - अ‍ॅरिझोना मधून युटा मध्ये जाताना

पुढे 'ब्राईस कॅन्यॉन नॅशनल पार्क' ला पोहोचलो, तर हे 'हूडू' ('Hoo-doo's) आमची कधीपासून वाट बघत उभे होते (कित्येक मिलियन वर्षं!). ब्राईस नावाच्या माणसानं हे पाहिलं आणि तो म्हटला , 'One hell of a place to lose a cow!'

DSC05868

प्र.चि. ६ - ब्राईस कॅन्यॉन - 'हूडू'ज - (amphitheater rocks)

हूडूजच्या मधे जाण्यासाठी डोंगरातून एक मजेदार पायवाट केली होती!
DSC05890

प्र.चि. ७ - ब्राईस कॅन्यॉन - 'हूडू'ज - (amphitheater rocks)

मागे दिसत होता दक्षिण- युटा (Southern Utah) चा विस्तीर्ण डोंगराळ प्रदेश!
DSC05869

प्र.चि. ८ - दक्षिण- युटा (Southern Utah)

त्या रात्री तिथेच राहिलो आणि सकाळी पुन्हा बाहेर पडलो.

IMAG0426

प्र.चि. ९ - ब्राईस कॅन्यॉन - नॅचरल ब्रिज

जाताना पुन्हा एकदा पाहिल्याशिवाय राहवेना!

IMAG0395

प्र.चि. १० - ब्राईस कॅन्यॉन - 'हूडू'ज - (amphitheater rocks)

त्याच दुपारी झायॉन नॅशनल पार्क ला गेलो आणि काही समजायच्या आत डोळे विस्फारून पाहू लागलो!

IMAG0470

प्र.चि. ११ - झायॉन नॅ.पा.

IMAG0491

प्र.चि. १२ - झायॉन नॅ.पा.

IMAG0508

प्र.चि. १३ - झायॉन नॅ.पा.

IMAG0505

प्र.चि. १३ - झायॉन नॅ.पा.

नंतर परतीच्या वाटेवर....

IMAG0572

प्र.चि. १४ - परतीच्या वाटेवर - नेवाडा

एक गमतीशीर पाटी!! - तुका खान किंवा तू-का खान?

IMAG0580

प्र.चि. १५ - लास वेगास च्या रस्त्यावर गमतीशीर पाटी!

तुम्हाला सगळी प्रकाशचित्रं कशी वाटली ते सांगायला विसरू नका!!!
धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांना अतिशय धन्यवाद!
मी तिथे गेल्यावर भारवल्यासारखा झालो होतो! शिवाय ऑफ-सीझन गेल्यामुळे पर्यटकही खूप कमी होते....
मी पूर्व किनार्‍यावर राहतो पण मला पश्चिम किनारा आणि त्याजवळची राज्यं फार आवडतात!
युटा, अ‍ॅरिझोना, न्यू मेक्सिको, कोलोरॅडो, वायोमिंग, मोंटाना आणि अर्थातच कॅलिफोर्निया ह्या राज्यांमध्ये खूप निसर्गसौंदर्य आहे, जे मला दर दोन-तीन महिन्यांनी एकदा आपल्याकडे खेचून घेतं!

@प्रिया७ : मला वाटतं अगदी dead-on winter सोडून कधीही सुंदर आहे! एप्रिल-मे मध्ये किंवा ऑक्टो-नोव्हेंबर मध्ये हवा छान असल्यामुळे जास्त मजा येईल..! ग्रँड कॅन्यॉनमध्ये पार्क च्या आत बरीच लॉजेस आहेत पण शक्यतो रिम ला लागून असणारं लॉज शोधा. मी ब्राईट-एंजल लॉज मध्ये राहिलो होतो आणि Brite angel trail (रिम वरून जाणारी पायवाट) अगदी १५ पावलांवर होती. सकाळी सूर्योदय पाहताना जी मजा आली ती वर्णन करणं अवघड आहे! ह्याचं बुकिंग मी १.५ महिने आधी केलं होतं, पण उन्हाळ्यात जाणार असाल तर आधी करावं लागेल असं वाटतं. लास वेगास मधून कारनं ५ तास आहे.

@संदीप आहेर : Lol Lol

@वर्षू नील : -- ह्या वेळी नाही जमलं पण प्लेन राईड पुढच्या वेळी नक्की करणार आहे! परत तिकडे एप्रिल-मे मध्ये जाण्याचा प्लॅन करतोय!

@बी : ग्रँड कॅन्यॉन पासून ब्राईस साधारण ५-५.३० तास असेल आणि वाटेत जाताना झायॉन पण आहे...

@उदयन : धन्यवाद! वूडूच्या आतले व्हिडीयो पण आहेत, सवडीनं टाकीनही!

@दिनेशदा : - खूशाल डाऊनलोड करून डेस्कटॉप करा!

फटू छाण आहेत. अगदी नॅट जिओची आठवण आली.
राग मानू नका पण पुढचे वाचा,
फ्लिकरवरून इथे टाकताना रिसाईझ करून छोटे करा, व टाका अशी विनंती करू इच्छितो. मोठी साईझ लिंकवर क्लिकून पहाता येईल.
कारणे २
१. मोठा फोटो उजवीकडे पसरतो व माबो वरील जाहिराती, महत्वाच्या लिंक्स इ. झाकून टाकतो. (माबोवर जाहिरात दिसावी तर माबो चालते.)
२. गरीब लोकांची ब्यांडविड्थ मोठे फोटू डाऊनलोड करताना जळते. होस्टेलची मुले इ. एक एक बाईट नेट जपून वापरत असतात.
पहा विचार करून Happy

छान आहेत फोटो .. ब्राईस चे सगळ्यात मस्त .. Happy

एव्हढी तीन पार्क्स् एकाच आठवड्यात ये बहुत नाइन्साफी है! Wink

कसले जबरी फोटो आहेत. फार फार आवडले. लेख अजून मोठा चालला असता. अंतरे, राहण्याची सोय याबद्दल पण माहिती आवडेल.
खरंच फोटोच इतके भव्य, दिव्य वाटताहेत तर प्रत्यक्ष कसं वाटत असेल!! Happy

दैत्य,
>>युटा, अ‍ॅरिझोना, न्यू मेक्सिको, कोलोरॅडो, वायोमिंग, मोंटाना आणि अर्थातच कॅलिफोर्निया ह्या राज्यांमध्ये खूप निसर्गसौंदर्य आहे, जे मला दर दोन-तीन महिन्यांनी एकदा आपल्याकडे खेचून घेतं!
>>
ऑरिगन आणि वॉशिंगटन पण पश्चिम किनार्‍यावर आहेत आणि वर उल्लेखलेली राज्ये रखरखीत निसर्ग देतात (हो कॅलिफोर्निया सुद्धा प्रचंड रखरखीत आहे Happy ) पण ही उत्तरेकडची दोन राज्ये म्हणजे पाचूची बेटे आहेत. प्रचंड हिरवी आणि स्वच्छ!!! Happy
कॅलिफोर्नियन्स, हलके घ्याच बरं का!!

>>पण ही उत्तरेकडची दोन राज्ये म्हणजे पाचूची बेटे आहेत <<
++१

पॅसिफिक नॉर्थवेस्ट - हेवन ऑन अर्थ! व्हिक्टोरिया (वॅन्कुवर) आयलंड - इंद्रप्रस्थ!!

वॉव सही ! पहातच रहावं असं Happy
६,७,९,१३, अप्रतिम सुंदर ! दहाव्यात कसल्या शेडस आल्यात, जबरी ! धन्यवाद इथे शेअर केल्याबद्दल Happy

इब्लिस यांच्याशी अगदी सहमत. आणी फोटो परत परत पहावेसे वाटतात. तो सोन्याचा सिनेमा आठवतो अगदी. Macanese Gold

पहिला फोटो त्या सिनेमाचीच आठवण करुन देतो.

Pages