ह्या कन्नडीगांना आलाय माज

Submitted by पाषाणभेद on 11 October, 2012 - 02:48

ह्या कन्नडीगांना आलाय माज

ह्या कन्नडीगांना आलाय माज
तो माज आता काढू मोडून
अर्रे 'देत नाही देत नाही' म्हणता कशाला
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||धृ||

लई तुरूंगवास करवला रे तुम्ही
काय सहन नाही केलं आम्ही
मराठीसाठी किती रक्त वाहवलं
ह्या कन्नडीगांना आम्हां डिवचलं
लई झालं आता
उठला मराठी माणूस पेटून
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||१||

अरे गल्या-बोळांना नावं आमची
सार्‍या दुकानांना नावं आमची
सार्‍या शाळा रे आमच्या आमच्या
सारी आडनावं आमची आमची
बेळगाव महानगरपालीका आमची
एका ठरावानं होईल का तुमची?
आता चाला तोडू कर्नाटक विधान भवन
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||२||

आहे जसं कन्नडी शासन मुजोर
त्याला सामील केंद्रशासन कमजोर
खेळी दोघांनी केली विधानभवनाची
साक्ष आहे जशी उंदराला मांजराची
बास झालं लई झालं
बंद करा तुमचं दडपशाहीचं संमेलन
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||३||

या सीमेपाई एक पिढी गेली की रं आमची
ही सारी जमीन आमच्या बापजाद्याची
जमवून सारी फौज मराठी माणसाची
ईच्छा पुरी करू महाराष्ट्री जाण्याची
सांगून ठेवतो मुस्कटदाबी करू नका
उगा आमच्यावर वार करू नका
महाराष्ट्रात जाण्यासाठी
आमची तर फोडूच पण तुमचीबी डोकी फोडू
सांगून ठेवतो मिशीला पिळ देवून
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||४||

-(अपुर्ण - योग आलाच तर पुर्ण करेन)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आपण सार्‍या 'ऑनलाईन मराठी कम्युनिटीजनी' मुजोर कर्नाटक, मरगळलेले मराठी नेते अन नाकर्ते केंद्रशासन यांचा ऑनलाईन निषेध करायला हवा.

-पाषाणभेद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते आमचं नाय ओ, बबनरावांचं मत आहे. तेही काही वर्षांपुर्वीचं. आता एक्स्पायर झालं असेल, किंवा बदललंही असेल, कुणी सांगावं!

आंबा१,

>> प्रत्येकाचे सर्वायवल पोटेन्शल भिन्न असते. भैय्या मराठी शिकला नाही, तर त्याचे महाराष्ट्रातील
>> सर्वायवल पोटेन्शल तसूभरही कमी होत नाही.

प्रत्येकाचे सर्व्हायव्हल पोटेन्शियल? की प्रत्येक प्रांताचे सर्व्हायव्हल पोटेन्शियल? तुम्हाला प्रत्येक प्रांताचे सर्व्हायव्हल पोटेन्शियल म्हणायचे आहे असे दिसते.

महाराष्ट्राचे सर्व्हायव्हल पोटेन्शियल जरा ठीकठाक करायची वेळ आली आहे. नेमक्या शब्दांत विषय समजावून सांगितल्याबद्दल आभार! Happy

आ.न.,
-गा.पै.

भैय्यांना मराठी शिकायचे असेल तर तेही शिकतील. भैय्या मराठी शिकत नाही, म्हणून आम्ही कन्नड शिकत नाही, हा दावा व्यर्थ आहे.>>>

माझ्या प्रतिसादातील हे वाक्य तुम्ही वाचलेले दिसत नाही आंबा.

<<<,तुमच्या कन्नड शिकण्याबद्दलच्या मुद्द्याला माझी सहमती आहे आंबा. >>>
प्रतिसाद नीट न वाचता आपल्याला हवे तेवढेच पाहणे हा तुमचा गुण म्हणायचा की अजुन काही?

पण मराठी मनुष्य दुसर्‍या प्रांतात तिथली भाषा शिकला नाही, तर त्याचे सर्वायवल पोटेन्शल कमी होते.>>>

इतके दिवस मराठी माणसे राहतच आहेत की तिथे आणि कन्नड बोलतही आहेत. विरोध आहे तो सक्ती करण्याला. जसा तो मुंबईत युपी-बिहारींना मराठी शिकण्याची सक्ती करायला आहे तसाच बेळगावात मराठी माणसाला कन्नड शिकायची सक्ती करायला देखील राहील.

रच्याक आधी आंबा, आता आंबा१..., म्हणजे बहुतेक अ‍ॅडमिनने तुमचा पहिला आयडी ब्लॉक केला की तुम्हीच कंटाळलात त्या आयडीला? उत्तर नाही दिलत तरी चालेल Wink

उत्तर भारतीय माणूस मुंबईत राहून मराठी शिकत नाही, कारण त्याचे मराठी न शिकल्याने काही अडत नाही. मराठी माणसाचे कर्नाटकात कन्नडशिवाय अडेल, म्हणून त्याने शिकले पाहिजे. मला वाटते, आंब्याला हेच म्हणायचे आहे. (नॉट शुअर.)
मुंबईशिवाय उर्वरित महाराष्ट्रात उत्तर भारतीय (उर्फ 'भैय्ये') मराठी शिकल्याशिवाय फार काळ राहू शकत नाहीत. त्यांना शिकावे लागते, आणि ते शिकतातही ! जळगावला आमचे मेसवाले कुटुंब 'शर्मा' हे मूळचे उत्तर प्रदेशातले. अतिशय अस्खलित मराठी बोलतात. (कुणीही भाषेवरून त्यांचा प्रांत ओळखू शकत नाही.)

पण मुळात भाषेची सक्ती वगैरे विषय आहे का इथे? एक गद्य चर्चाविषय आक्रस्ताळ्या पद्धतीने कवितेत मांडल्यावर चर्चा आणखी कशी होणार? Uhoh

येथे भाषेवरून वाद घालणार्‍या लोकांनी एक विचार करून पहा. परिस्थिती उलट झाली असती. हा भाग महाराष्ट्रातच राहिला असता, तर तेथे आधीपासुन राहणार्‍या कन्नडिगांना मराठी शिकण्याची / बोलण्याची सक्ती झाली असती का ?

>>आपण भारतीय म्हणून कधी विचार करणार आहोत का?
>>हे दोन्ही पक्षाना लागू आहे.
>>पण ही आततायी कविता आणि भाषा काय दर्शवते?

परस्पर विग्रहे प्राप्ते वयं पंच च ते शतम
परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पंचाधिकं शतम

येथे भाषेवरून वाद घालणार्‍या लोकांनी एक विचार करून पहा. परिस्थिती उलट झाली असती. हा भाग महाराष्ट्रातच राहिला असता, तर तेथे आधीपासुन राहणार्‍या कन्नडिगांना मराठी शिकण्याची / बोलण्याची सक्ती झाली असती का ?>>.>>> +१

राजसाहेब धावले असते तेथे

ह्या कन्नडीगांना आलाय माज
तो माज आता काढू मोडून
अर्रे 'देत नाही देत नाही' म्हणता कशाला
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||धृ||

इति पाषाणभेद....तुम्ही महाराज तुमचं नाव्...म्हणजे आयडी का काय ते बदलून राश्ट्रभेदी असं ठेवा...
तुमचं वय काय्...वजन काय्....पगार किती ....तुम्ही बोलता किती....कै च्या कै......

>>> महेश
मुळात येथे जे लोक हा सीमावादच नको म्हणत आहेत त्यांची वये आणि बुद्धी ही बरीच लहान आहे असे दिसत आहे. जरा प्रत्यक्ष त्या भागात जाऊन तिथल्या लोकांना विचारा.>>>
Happy
Happy

मला बेन्गलोरमधे आजपर्यंत ८ ते १० लोक बेळगावचे भेटले, ते सगळेच्या सगळे मराठी आहेत. याला काय फक्त योगायोग म्हणायचे का ?

माझे मोजून सत्तावीस (व्यक्ती नव्हे, कुटुंब) नातेवाईक बेळगावात आहेत. (चुलत, मावस, मामीचे माहेर, असे अनेक) ते सर्वच्यासर्व कानडी आहेत. हादेखील एक योगायोगच, नाही का?

आमचेही बेळगावातील नातेवाईक कन्नड आहेत. काही नातेवाईक अगदी सीमाभागात आहेत. त्याना दोन्ही भाषा बोलता, लिहिता येतात.

..

माझे सर्व नातेवाईक बेळगावात आहेत व त्याना कानडी /मराठी हा प्रॉब्लेमच नाहीये .ते गेली ६० वर्षे तिथे आहेत.
धारवाडला असलेल्यांची देखील तिच परिस्थिती आहे?
तिथल्या लोकांपेक्षा आपल्यालाच फार खाज आहे!!!

>>> परस्पर विग्रहे प्राप्ते वयं पंच च ते शतम
परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पंचाधिकं शतम>>
अज्ञ बालकास अर्थ कोणी सांगेल का?

>>> परस्पर विग्रहे प्राप्ते वयं पंच च ते शतम
परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पंचाधिकं शतम>>
अज्ञ बालकास अर्थ कोणी सांगेल का?

>> Rofl

महेश, तू जागा चुकलासी!!

तुमचं संस्कृत अशुद्ध आहे महेश. श्लोक चुकला आहे.

परस्परविरोधे तु वयं पंचश्च ते शतम्l
परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पंचाधिकं शतम्ll - युधिष्ठीर

पुराणाबद्दल लिहायचेच असेल तर व्यवस्थीत लिहावे. पाठांतर करावे.

आपापसात विरोध असताना आम्ही ५ व ते शंभर आहेत. पण बाहेरच्या शत्रूशी लढायचा प्रसंग आला तर आम्ही १०५ आहोत!

येळ्ळूर गावातील मराठी लोकांनी तेथे "महाराष्ट्र राज्य" असा फलक स्वतःच लावला, यावरून कर्नाटक पोलिसांनी गावातील लोकांना पार घरात घुसून अमानुष मारहाण केलेली आहे. अगदी बायकांना आणि मुलांना सुद्धा सोडले नाही. अनेक लोक जखमी झाले आहेत. तसेच लोकांचे जेवणाचे देखील हाल होत आहेत.
जर कोणी जमाव जमवून गडबड करत असेल तर तेथे अगदीच गरज पडल्यास लाठीहल्ला समजू शकतो,
पण घराघरात घुसून मारहाण करणे कोणत्या कायद्यात बसते ?
ही ऐकीव माहिती नसुन, दुरदर्शनवर (टिव्ही९) याची प्रत्यक्ष दृश्ये दाखवित आहेत.
गुंडांप्रमाणे पोलिसांनी लोकांच्या घरावर दगडफेक केली, खिडक्यांच्या काचा फोडल्या,
दारे मोडून घरात घुसून लोकांना अमानुष मारहाण केली आहे.

कर्नाटक सरकारचा आणि पोलिसांचा तिव्र निषेध Angry

तमाम मराठी जनतेने या विरोधात जोरदार आवाज उठविला पाहिजे.
काय करता येऊ शकेल ?

येळ्ळुर गावाला पाणी वीज सरकारी अनुदान कोण देतं? कर्नाटक की महाराष्ट्र. ?

राज्य विभाजीत होताना एखाद्या गावात १०० % लोक मराठी किंवा कानडी असणार नाहीत. जास्तीत जास्त लोकसंख्या व भूभागाची सलगता हे मुद्दे विचारात घेऊन राज्य निरमिती झाली आहे ना ?

लोकांन कर्नाटकाचा विरोध म्हणुन भगवा झेंडा लावला!

ऐकुन करमणुक झाली.

हिंदु मुस्लिम विषय आला की भगवा म्हणजे हिंदु.

आता म्हाराश्ट्र करनाटक वादात भगवा म्हणजे मराठी !

घोडा चतुर घोडा चतुर एक पे रैना ना !

लगो, उगाच बाष्कळ मुद्दे काढू नकाच प्लिजच.
येथे मुद्दा आहे की पोलिसांची ही दंडेलशाही योग्य आहे का ?
मी वर लिहिलेले वाचा परत एकदा कशाप्रकारे मारहाण झालेली आहे ते.
इतर अनेक घटनांमधे माणुसकीच्या नावाने गळे काढणारे लोक या विषयावर का नाही तावातावाने लिहित ?
गंभीर घटना आहे आणि तुम्हाला करमणूक सुचते आहे ??? Angry

काय फरक पडतो कर्नाटकात राहिल्याने? त्याराज्याची चांगली प्रगती झालीए, लोकसंख्या कमी आहे, माणसे हुशार आहेत ,कशाला इकडे येण्यासाठी गळे काढतात...
अवघ्या मराठीजनांचा कैवारी कानडा विठ्ठलु हा एक कन्नडीगच आहे.
अनेक परिचीत कर्नाटकात आहेत व फार सुखी आहेत.
सोलापुरच्या सीमा भागात कानडी व तेलगु जास्त बोलली जाते ,त्यावर हक्क सांगितल्यास आपण चवताळतो, तसे ते बेळगावच्या बाबतीत चवताळतात.
आणि इथल्या समस्त हिंदुराष्ट्रवाद्यांना काश्मिरच्या पंडीतांपासुन ते पाकिस्तानतल्या हिंदुची पडलेली असते, त्यांनी कानडींना शत्रु मानने हे अजबच आहे.
मोदिकाकाने मनात आणले तर झटक्यात बेळगाव केंद्रशासित करता येईल व या कानडिचा त्रास जाईल, पण काँग्रेसच्या नावाने गळे काढायला मुद्दा नको काय...

Pages