ह्या कन्नडीगांना आलाय माज

Submitted by पाषाणभेद on 11 October, 2012 - 02:48

ह्या कन्नडीगांना आलाय माज

ह्या कन्नडीगांना आलाय माज
तो माज आता काढू मोडून
अर्रे 'देत नाही देत नाही' म्हणता कशाला
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||धृ||

लई तुरूंगवास करवला रे तुम्ही
काय सहन नाही केलं आम्ही
मराठीसाठी किती रक्त वाहवलं
ह्या कन्नडीगांना आम्हां डिवचलं
लई झालं आता
उठला मराठी माणूस पेटून
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||१||

अरे गल्या-बोळांना नावं आमची
सार्‍या दुकानांना नावं आमची
सार्‍या शाळा रे आमच्या आमच्या
सारी आडनावं आमची आमची
बेळगाव महानगरपालीका आमची
एका ठरावानं होईल का तुमची?
आता चाला तोडू कर्नाटक विधान भवन
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||२||

आहे जसं कन्नडी शासन मुजोर
त्याला सामील केंद्रशासन कमजोर
खेळी दोघांनी केली विधानभवनाची
साक्ष आहे जशी उंदराला मांजराची
बास झालं लई झालं
बंद करा तुमचं दडपशाहीचं संमेलन
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||३||

या सीमेपाई एक पिढी गेली की रं आमची
ही सारी जमीन आमच्या बापजाद्याची
जमवून सारी फौज मराठी माणसाची
ईच्छा पुरी करू महाराष्ट्री जाण्याची
सांगून ठेवतो मुस्कटदाबी करू नका
उगा आमच्यावर वार करू नका
महाराष्ट्रात जाण्यासाठी
आमची तर फोडूच पण तुमचीबी डोकी फोडू
सांगून ठेवतो मिशीला पिळ देवून
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||४||

-(अपुर्ण - योग आलाच तर पुर्ण करेन)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आपण सार्‍या 'ऑनलाईन मराठी कम्युनिटीजनी' मुजोर कर्नाटक, मरगळलेले मराठी नेते अन नाकर्ते केंद्रशासन यांचा ऑनलाईन निषेध करायला हवा.

-पाषाणभेद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसली भाषा आणी कसले काय डोंबलाचे ! बेळगाव पालिकेचा मेवा कोणी खायचा ह्याची भांडणे आहेत सगळी.
आणी लागले लगेच लोक अस्मिता-अस्मिताचा खेळ करायला!

निपाणी बेळगाव धारवाड तंजावर पानिपत, न्युजर्सी ,बे एरीया, युगांडा, मादागास्कर यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पायिजे Proud

आपल्याकडे अमेरीकेतील यादवी युध्द इतिहासात शिकविले जात नाही. त्यापासून धडा घेतला पाहीजे. गुलामगीरी बंद करायची की नाही यावर राज्याराज्यात मतभेद होते. ते वाढत वाढत लढाई सुरु झाली. उत्तरेकडील राज्ये विरुध्द दक्षीणेकडील राज्ये १८६१ ते १८६५ असे चार वर्षे लढत होती. त्यात ७००,००० सैनीक शहीद झाले. एक पुर्ण तरुण पिढी गारद झाली. त्यानंतर तिथे राज्याराज्यात भांडणे झाली नाही.

हरीश

काहीही मूर्ख विधाने करु नका आंबा ! >> काहीही अपेक्षा, विशाल! कसं जमावं हे!! Wink
त्यांना आणि इतरांना त्यांच्या विधानातली विसंगती कळत का नसेल?
"येण केण प्रकारेण" श्लोक त्यांनी फार पूर्वीपासून फारच मनावर घेतला असावा का? (विचारात पडलेली बाहुली)

त्यासाठी राज ठाकरेच कशाला पाहीजेत मग? बेळगावात पण मराठी लोक, नेते आहेतच की? मग तिथल्या मराठी लोकांना तरी कन्नड शिकायची गरज काय?
काहीही मुर्ख विधाने करु नका आंबा ! >>>>>>>>>>

का ? राज ठाकरे का नकोत ? अरे हो, त्यांनी फक्त महाराष्ट्रात मराठीचे नाव घेउन राजकारण करायचे ! . मग इतर ठिकाणी मराठी मेले तरी ह्यांचे काय जाते. इथली मते तर मिळताहेत ना लोकांना मुर्ख बनवुन ! मग झाले.

त्यासाठी राज ठाकरेच कशाला पाहीजेत मग?

. भैय्या लोकांचे नेते मुंबईत तळ ठोकून असतात. जे यु पीत आहेत तेही मुंबईशी संपर्क ठेऊन असतात .. जरा काही झाले की, हेलिकॉप्टरात बसून गरगरत मुंबईला येतात. सभा घेतात आणि लोकाना धीर देतात.

आणि हे 'साडेतीन' 'सामना' वाले , मुंबईत बसून गर्जना करातात. आणि यांचे लोक बेळगावासाठी कोल्हापुरात रॅली आणि तोडफोड करतात ! Proud कुठं भैय्या लोकांचे नेते, आणि कुठे हे!!

काढा तुमची हेलिकॉप्टरं आणि बेळगावात सभा घ्या

भाषा ही त्या भु-भागाची ओळख असते, म्हणुन कोणत्याही माणसाला मातुभाषेचा अभिमान असायलाच हवा, मला वाटतं बेळगावाचा प्रश्न हा दोन्ही राज्यांच्या दुष्टीने भावनिक झाला आहे. म्हणुन त्याचा उपयोग राजकारणासाठी होतोय, अन् राजकारण कोणत्याही मुद्द्यावरुन करता येऊ शकतं.
इग्रजी ही व्यवहारीक भाषा झाली आहे, म्हणुन तिचं महत्व वाढलेलं आहे.

ज्या वेळेला सीमा तयार होत होत्या; त्या वेळेला हे लोक झक मारत होते काय? आता रडून काय उपयोग? आणि का रडायचे? तुम्ही कन्नड - मराठी शिका. कन्नडमधून व्यवहार करा. काय बिधडले? महाराष्ट्रात येऊन काय करणार? असंख्य घोटाळ्यांमुळे त्रासलेला एक सामान्य माणूस हीच प्रतिमा कायम राहणार ना?

भारतीय,

राज ठाकरे 'कर्नाटकातील मराठी माण्सांनो मरा' असे म्हणत नाहीत. ते म्हणतात, 'इथे मी परप्रंतियांना मराठी भाषा, संस्कृती शिका म्हणतो; तसे तिथल्या मराठी माणसांनी कन्नड संस्कृतीचा भाग होऊन जगले पाहिजे'.

भारतीय,

राज ठाकरे 'कर्नाटकातील मराठी माण्सांनो मरा' असे म्हणत नाहीत. ते म्हणतात, 'इथे मी परप्रांतियांना मराठी भाषा, संस्कृती शिका म्हणतो; तसे तिथल्या मराठी माणसांनी कन्नड संस्कृतीचा भाग होऊन जगले पाहिजे'.

राज ठाकरे 'कर्नाटकातील मराठी माण्सांनो मरा' असे म्हणत नाहीत. ते म्हणतात, 'इथे मी परप्रांतियांना मराठी भाषा, संस्कृती शिका म्हणतो; तसे तिथल्या मराठी माणसांनी कन्नड संस्कृतीचा भाग होऊन जगले पाहिजे >>>>>

ह्यालाच राजकिय भाषा म्हणतात. म्हणजेच दुसर्या शब्दात ते त्यांना 'मरा' असेच म्हणत आहेत!

शरद,

>> तसे तिथल्या मराठी माणसांनी कन्नड संस्कृतीचा भाग होऊन जगले पाहिजे'.

मुळात तो कर्नाटकाचा भाग आहे हे तुम्हाला सांगितले कोणी? शिवाय कन्नडची सक्ती का म्हणून?

लोकशाही मार्गाने प्रश्न सुटत नसल्यास मराठी माणसाने काय करावे याविषयी आपल्याकडून कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती.

आ.न.,
-गा.पै.

मुळात तो कर्नाटकाचा भाग आहे हे तुम्हाला सांगितले कोणी? शिवाय कन्नडची सक्ती का म्हणून? >>>
छान. आता बोला. बेळगावात मराठी माणसांनी कन्नड संस्क्रुती शिकायची का कन्नड माणसांनी मराठी ? आणी बेळगावातील परप्रांतियांनी कोणती संस्क्रुती शिकायची?

आणी हे सर्व संस्क्रुती शिकायची म्हणुन कामधंदे सोडावे लागले कि राजसाहेबांनी त्यांच्या उदर्निर्वाहाचेहि बघावे!

ज्या वेळेला सीमा तयार होत होत्या; त्या वेळेला हे लोक झक मारत होते काय? आता रडून काय उपयोग? आणि का रडायचे? तुम्ही कन्नड - मराठी शिका. कन्नडमधून व्यवहार करा. काय बिधडले? महाराष्ट्रात येऊन काय करणार? असंख्य घोटाळ्यांमुळे त्रासलेला एक सामान्य माणूस हीच प्रतिमा कायम राहणार ना? >>>
मायबोलीची सध्याची स्थिती सांगणारा प्रतिसाद आहे हा Sad (शरद जी वैयक्तिक तुम्हाला नाही म्हणत आहे ,हे सर्वच धाग्यावर सुरू आहे)
याच धाग्यावर नाही सर्वत्रच .
आपल्याला त्या विषयातल काही माहित असो , नसो फक्त प्रतिसाद द्यायचा .
जे लोक खरोखर ती समस्या झेलतायत त्याना अशा प्रतिसादानी किती त्रास होत असेल हा विचार करून कस चालेल Sad

पैलवान त्यापेक्षा तुम्ही इंग्लन्ड आणि आयर्लंडमधला वाद मिटवायचा प्रयत्न करा आधी. ते बरे राहील.

अरे काय हे जिकडे पहावे तिकडे असल्या टुकार आयड्यांचा आणि त्यांच्या त्याहुन जास्त टुकार लिखाणाचा सुळसुळाट झालाय. Angry
मुळात येथे जे लोक हा सीमावादच नको म्हणत आहेत त्यांची वये आणि बुद्धी ही बरीच लहान आहे असे दिसत आहे. जरा प्रत्यक्ष त्या भागात जाऊन तिथल्या लोकांना विचारा.
बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती होती आणि ती निवडून पण येत होती याच मुद्द्यावर, म्हणुनच त्यांनी ठराव केला होता महाराष्ट्रात सामिल होण्याचा.
या आधीच्या पिढ्यांनी केवढे हाल आणि यातना सोसल्या आहेत याची कोणाला सुतरामतरी कल्पना आहे का ? स्वातंत्र्यानंतर देखील या मुद्द्यासाठी कर्नाटक पोलिसांनी सिमाभागातल्या आंदोलकांवर केवढे अत्याचार केले आहेत ते विचारा तिकडे जाऊन. आंदोलकांना पकडून थर्ड डिग्री (यामधे अगदी सिनेमात दाखवतात तसे बर्फाच्या लादीवर झोपवणे, इ.) एवढे अत्याचार केले गेले आहेत.
वर अक्कलकोटचा उल्लेख केला गेला आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्राला पेचात टाकले होते. आम्ही जर बेळगाव आणि त्याजवळचा भाग देऊ तर आम्हाला अक्कलकोट, सोलापूर, इ. भाग मिळाला पाहिजे.
साधी गोष्ट आहे, जर भाषावार प्रांत रचना केली गेली होती तर ती निट काळजीपुर्वक केली जायला हवी होती.
नशिब आपले की तुमच्यासारखे वीर साठ सालाच्या आधी नव्हते नाही तर हे सगळे गुजरातीमधे लिहायची वेळ आली असती. Angry
हे वाद नको असतील तर करा सगळी राज्ये बरखास्त आणि एकच केंद्र शासन चालू द्यात. जमणार आहे का ?
मला भाजप शिवसेनेचा राग या एका कारणासाठी येतो, कर्नाटकात भाजप सरकार असुन देखील हा वाद का मिटू शकला नाही.

मला भाजप शिवसेनेचा राग या एका कारणासाठी येतो, कर्नाटकात भाजप सरकार असुन देखील हा वाद का मिटू शकला नाही>>> हे शक्य नाही. कानडी लोकांना दुखउन कशाला हातात असलेली सत्ता भाजपा घालवील. जर बेळगाव महाराष्ट्रात आले तरी भाजपाला सत्ता मिळायची शक्यता खुप कमी. ह्या प्रश्नात आता फार दम नाही उरला. त्यामुळे राज ठाकरेनी पण ह्या प्रश्नात रस दाखवला नाही. बेळगावातील नविन पिढीला पण यात जास्त रस आहे असे वाटत नाही.

रा

मुळात येथे जे लोक हा सीमावादच नको म्हणत आहेत त्यांची वये आणि बुद्धी ही बरीच लहान आहे असे दिसत आहे>>
मला भाजप शिवसेनेचा राग या एका कारणासाठी येतो, कर्नाटकात भाजप सरकार असुन देखील हा वाद का मिटू शकला नाही.>>>
गम्माडी गम्मत.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आपण सार्‍या 'ऑनलाईन मराठी कम्युनिटीजनी' मुजोर कर्नाटक, मरगळलेले मराठी नेते अन नाकर्ते केंद्रशासन यांचा ऑनलाईन निषेध करायला हवा.>>>> आता उरले निषेधापुरते

मला या कवितेबद्द्ल अनेक व्यक्तिगत निरोप आलेले आहेत.
त्यात "कृपया माज हा शब्द काढून टाका. ", सर्वच कन्नडीगा तसे असतात का? असले प्रश्न आलेले आहेत.

त्यावर खुलासा:

कृपया ही कविता एक जनरलाईज्ड आहे. त्यात कुणाही कन्नडीगांचा, कन्नड भाषा बोलणार्‍यांचा अपमान करण्याचा हेतू नाही. माझ्यालेखी सर्व भाषा समान आहेत.

फक्त कुणावरही त्याची भाषा सोडून इतर भाषेचा आहे म्हणून अपमान करण्याचा अधिकार नाही हे माझे स्पष्ट मत आहे. त्याचबरोबर इतर प्रांतात गेल्यावर तेथील भाषेचाही आदर करावा हे मतदेखील त्रीव्र आहे. उद्या मी जर दुसर्‍या प्रांतात गेलो तर तेथील भाषा समजावून घेईन. त्यात अपमानास्पद काहीच नाही. पण केवळ मी सीमेवर राहत असेल अन मला जर बळजबरीने 'बाटवण्याचा'प्रयत्न केला जात असेल तर त्या वेळच्या कवितेतील भावना माझ्या आहेत.

पण तुम्हाला अन्न, रेशन, रस्ते, पाणी , शाळा हे सगळे कर्नाटक पुरवते ना? मग त्यांची भाषा तुम्ही का नाही शिकत?

हाच प्रश्न मुंबईत राहणार्‍या बिहारी, भय्यांना विचारला आहेत का कधी?
का त्यांना अन्न, रेशन, रस्ते, पाणी, शाळा हे सगळे युपी-बिहारमधून पुरवण्यात येते?

तुमच्या कन्नड शिकण्याबद्दलच्या मुद्द्याला माझी सहमती आहे आंबा. पण इथल्या इथे बेळगावातील मराठी लोक आणि मुंबईतील युपी-बिहारी लोक यांच्याबाबत तुम्ही ज्या कोलांट्या उड्या मारताय ते बघून अंमळ करमणुक होतेय खरी !

कसली कोलांटी ???? प्रत्येकाचे सर्वायवल पोटेन्शल भिन्न असते. भैय्या मराठी शिकला नाही, तर त्याचे महाराष्ट्रातील सर्वायवल पोटेन्शल तसूभरही कमी होत नाही.

पण मराठी मनुष्य दुसर्‍या प्रांतात तिथली भाषा शिकला नाही, तर त्याचे सर्वायवल पोटेन्शल कमी होते. दोन्ही भाषा शिकणे हे कधीही उत्तम.

डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन प्रत्येक पेशंटला वेगळे असते. Proud त्यामुळे तुम्हाला त्यात कोलांटी दिसते. हा तुमचा दृष्टीदोष. Proud एकच आजार असला, तरी एखाद्याला डॉक्टर बेड रेस्ट सांगतो . आणि एखाद्याला रोज चालायचा व्यायम करा, असे सांगतो. असे सांगणे म्हणजे कोलांटी नव्हे. ती ज्याची त्याची गरज असते.

दोन भाषा शिकल्या म्हणून मेंदू झिजत नाही. होय ना? श्रीकांत जिचकार, पी व्ही नरसिंहराव याना ८ -१० भाषा येत होत्या असे म्हणतात.

भैय्यांना मराठी शिकायचे असेल तर तेही शिकतील. भैय्या मराठी शिकत नाही, म्हणून आम्ही कन्नड शिकत नाही, हा दावा व्यर्थ आहे.
- डॉ. आंबा

काही वर्षांपुर्वी चिकोडीत असताना खानावळवाल्या बबनशी आमची मस्त दोस्ती झाली होती. त्याला एकदा सहज विचारलं की या सीमाप्रश्नाबद्दल तुमचं मत काय किंवा कुठच्या बाजूने आहे; तर बबन हसून म्हणाला, 'ते काऽय बी हूंद्या, त्ये बेळगावाला कुटंबी कसंबी जाऊंद्या खरं, आमचं आयुष्य खानावळीत, घरदार चिकोडीत नि सासूरवाडी संकेसरातच र्‍हानार तुमाला सांगतो बगा!'

हे सहज आठवलं म्हणून.

Pages