ह्या कन्नडीगांना आलाय माज

Submitted by पाषाणभेद on 11 October, 2012 - 02:48

ह्या कन्नडीगांना आलाय माज

ह्या कन्नडीगांना आलाय माज
तो माज आता काढू मोडून
अर्रे 'देत नाही देत नाही' म्हणता कशाला
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||धृ||

लई तुरूंगवास करवला रे तुम्ही
काय सहन नाही केलं आम्ही
मराठीसाठी किती रक्त वाहवलं
ह्या कन्नडीगांना आम्हां डिवचलं
लई झालं आता
उठला मराठी माणूस पेटून
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||१||

अरे गल्या-बोळांना नावं आमची
सार्‍या दुकानांना नावं आमची
सार्‍या शाळा रे आमच्या आमच्या
सारी आडनावं आमची आमची
बेळगाव महानगरपालीका आमची
एका ठरावानं होईल का तुमची?
आता चाला तोडू कर्नाटक विधान भवन
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||२||

आहे जसं कन्नडी शासन मुजोर
त्याला सामील केंद्रशासन कमजोर
खेळी दोघांनी केली विधानभवनाची
साक्ष आहे जशी उंदराला मांजराची
बास झालं लई झालं
बंद करा तुमचं दडपशाहीचं संमेलन
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||३||

या सीमेपाई एक पिढी गेली की रं आमची
ही सारी जमीन आमच्या बापजाद्याची
जमवून सारी फौज मराठी माणसाची
ईच्छा पुरी करू महाराष्ट्री जाण्याची
सांगून ठेवतो मुस्कटदाबी करू नका
उगा आमच्यावर वार करू नका
महाराष्ट्रात जाण्यासाठी
आमची तर फोडूच पण तुमचीबी डोकी फोडू
सांगून ठेवतो मिशीला पिळ देवून
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||४||

-(अपुर्ण - योग आलाच तर पुर्ण करेन)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आपण सार्‍या 'ऑनलाईन मराठी कम्युनिटीजनी' मुजोर कर्नाटक, मरगळलेले मराठी नेते अन नाकर्ते केंद्रशासन यांचा ऑनलाईन निषेध करायला हवा.

-पाषाणभेद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून"

लोकशाहीत अशी ओढाताण करता येत नाही साहेब.
बाकी ऑनलाईन पद्य आंदोलनाने सीमाप्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नांस शुभेच्छा !

-एक मरगळलेला मराठी माणूस.

आपण भारतीय म्हणून कधी विचार करणार आहोत का?
हे दोन्ही पक्षाना लागू आहे.
पण ही आततायी कविता आणि भाषा काय दर्शवते?
जग एक होत आहे, पूर्व अन पश्चिम जर्मनी एक होत आहे आणि आपण अजून " पाषाण " युगात लडबडत आहोत.
आहो मी बेळगावचा आहे आणि तिथे दोन्ही भाषिक गुण्या गोविंद्याने , एकमेकाशी सोयरीक करून जगतात हो. पु.ल सारख्या जाज्ज्वल्य मराठी भाषिकाला तिथे कुणी त्रास दिला नाही. आपले भीमसेन तिथले.
कळकळीची विनंति, पब्लिक फोरमवर चिथवणारी विधाने नका करू.

अरे पण एकातरी कन्नडीगाने जावूद्या, सोडून द्या असे म्हटले आहे काय?
काय तरी उगाचच आपणच सामोपचार घ्यायचा. कर्नाटक सोडा, आंध्रने तरी पाण्याच्या प्रश्नाचे काय केले आहे?

अरे पण एकातरी कन्नडीगाने जावूद्या, सोडून द्या असे म्हटले आहे काय?
>> मी म्हणते. सोडून द्या.. (कानडी आहे मी). कानडीत कविता केली असती तर योग्य टार्गेट ऑडिअन्सपर्यंत पोचली असती. Happy

महाराष्ट्रात येऊन तरी काय भले होणार आहे आमचे? इथले राजकारण ठाऊकच आहे तुम्हाला. आगीतून सुटून फोफाट्यात का येताय?

आपण भारतीय म्हणून कधी विचार करणार आहोत का?>>>>>हे विचार फक्त मराठी माणसानीच करायचे.
पाभेजी आपल्या भावना पोहचल्या.

>>अरे पण एकातरी कन्नडीगाने जावूद्या, सोडून द्या असे म्हटले आहे काय?
>>काय तरी उगाचच आपणच सामोपचार घ्यायचा. कर्नाटक सोडा, आंध्रने तरी पाण्याच्या प्रश्नाचे काय केले आहे?+१०१

हल्ली बेळगावात गेले असाल तर, सिमाप्रश्न इर्रेलेव्हन्ट झालाय अस नाही का वाटत.
बेळगाव महाराष्ट्रात येउन कोल्हापुर जिल्ह्याचा एक मोठा तालूका झाले असते. कर्नाटकात सुखानी नांदतायत की उपराजधानी म्हणून. शिवाय ३०-३५ (बहुधा जास्तच) वर्षांपुर्वी सिमाप्रश्न जोरात लाउन धरला होता. आता च्या तरूण पिढीला जे कानडी कंपल्सरी भाषा म्हणून शिकलेत , सिमाप्रश्न म्हणजे इतिहास झाला आहे.

धन्य आहे! अजुन काय लिहु ? ज्या भारतात कोट्याविधी लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाहि, दोन वेळचे पोटभर अन्न मिळत नाहि, आजाराने मरायला टिकल्यावर टिचभर औषध मिळत नाहि त्या भारतात जात, धर्म, प्रांत, भाषची भांडणे लावुन तुम्हि सत्ता मात्र नक्कि मिळवु शकता.

ज्ञानेश,

>> लोकशाहीत अशी ओढाताण करता येत नाही साहेब.

लोकशाही मार्गाने जनतेच्या मागण्या मान्य होत नसतील तर काय करावं? Uhoh कर्नाटक शासन बेळगावात जे काही करतंय त्यास लोकशाही वर्तन म्हणता येत नाही!

भावना समजून घ्याव्यात ही विनंती.

आ.न.,
-गा.पै.

भावना आणि अस्मिता नामक दोन बहिणींनी विवेक नामक भावाची सगळी मालमत्ता हडप करून त्याला पार रस्त्यावर आणलाय पैलवानसाहेब. तुम्हाला त्याची काळजी वाटत नाही काय? Uhoh

वरच्या कवितेत देशातल्याच एका प्रांताने दुसर्‍या प्रांतावर फौज घेऊन चालून जायचे सुचवले आहे. यामुळे माझ्या 'भारतीय' मनाला आणि त्या मनातल्या भावनांना जी इजा होते, ती तुमच्या दृष्टीने महत्त्वाची नाही काय?

ज्ञानेश त्यांची बुद्धी नावाची बहिण सध्या घर सोडून गेलीय. ती आली परत की चौघेही सुखाने नांदतील.
बाकी बेळ्गाव, निपाणी नी अमुक तमुक सह महाराष्ट्र झालाच पाहिजे या ओरिजिनल घोषणेतील अमुक गावात मी सध्या रहाते.
भाषा प्रश्न कित्ती इनसिग्निफिकंट आहे किंवा भाशा प्रश्न फारच सिग्निफिक्म्ट आहे असे दोन्ही बाजु दाखविणारे अनुभव आम्हाला रोजच येतात.

कविता ; कविता म्हणून छान आहे !!
'बेळगाव-महाराष्ट्रात '............. गरज काय आहे हेच समजत नाही !! अन साध्य काय होणारय तेही !!
बाकी "ह्या कन्नडीगांना आलाय माज>>> तर मग बरोबरय की "तो माज आता काढू मोडून" ...बरोबरय हा मुद्दा इथे !!
पण यावर बेळगाव महाराष्ट्रात आणायचा हा उपाय नक्कीच नाहीये !!

ज्ञानेश,

>> वरच्या कवितेत देशातल्याच एका प्रांताने दुसर्‍या प्रांतावर फौज घेऊन चालून जायचे सुचवले आहे.
>> यामुळे माझ्या 'भारतीय' मनाला आणि त्या मनातल्या भावनांना जी इजा होते, ती तुमच्या दृष्टीने
>> महत्त्वाची नाही काय?

मलाही नाही पटत एका प्रांताने दुसर्‍यावर आक्रमण करणं. म्हणूनच वाटाघाटी व्हायला हव्यात. मात्र कर्नाटक सरकारला ते मंजूर नाही. ते बेळगाव हा भाग विवादास्पद आहे हेच मुळी मानत नाहीत. महाजन अहवालाचे तुणतुणे वाजवतात. हा अहवाल महाराष्ट्राने कधीच स्वीकारला नव्हता. चंडीगडवर पंजाब आणि हरियाणा दोन्ही हक्क सांगतात त्यामुळे तो केंद्रशासित केला आहे. तसं बेळगावच्या बाबतीत का होत नाही? त्यामुळे निदान कन्नडची सक्ती होणार नाही.

पण नीट शब्दांत सांगितलेलं ऐकायचं नाही असंच जर कानडी नेत्यांनी ठरवलं तर आम्ही करायचं काय?

आ.न.,
-गा.पै.

कन्नडची सक्ती केली काय आणि मराठीची केली काय, इंग्रजी शिकून परदेशात नोकर्‍या करुन जोडे झिजवणे, अंतिम ध्येय हेच असल्यावर अभ्यासात एक भाषा इंग्रजी असल्याशी मतलब! उरलेल्या भाषा मराठी की कन्नड यानी नेमका काय फरक पडतो?

मराठी आणि कन्नड करत बाप एकमेकांची डोकी फोडणार.. आणि दोघांचीही पोरं सिलिकॉन वॅलीत एकाच कंपनीत समोरासमोर बसलेली असणार.

दोन भाषांमध्ये युद्ध होवू नये या मताची तेथील मंडळी आहेत. मराठी माणसांत सामोपचार रोमारोमात भिडलेला आहे. पण तो उस मुळापासून खाण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकार पदोपदीने करत असल्याचे जाणवते. प्रत्येक छोट्या छोट्या कारणांवरून मराठी मंडळींची मुस्कटदाबी चालू आहे. आताच्या विधानसौध भवनावरून त्याचा कळस गाठलेला आहे.

तुम्हाला लोकशाही मान्य आहे ना?
१. मग बेळगाव नगरपालीकेने १९५६ मध्येच महाराष्ट्रात राहण्याचा केलेला ठराव का दडपला गेला?
२. महाजन आयोगाची बेजबादार विधानेच का ग्राह्य धरली जात आहेत?
३. १८५२ पासून बेळगाव नगरपालीकेचे दप्तर मराठीत आहे. असे असूनही २००५ साली कर्नाटकने बेळगाव महानगरपालीका बरखास्त का केली?
४. कानडी भाषेची सक्ती का?
५. सीमाप्रश्नाचे आंदोलन नेहमीच शांततेचे असतांना तेथील जनतेची टाळकी पोलीसांकडून का फोडली जातात?

या सारखे असंख्य प्रश्नांची उत्तरे कर्नाटकाकडून मिळतील काय? एक सासू सुनेला ज्याप्रमाणे टोमणे मारते (येथे विद्वान मंडळींडून 'सासू-सुन वाद' आदी फालतू चर्चा/ वाद अपेक्षीत नाहीत.) किंवा एखादा शिरजोर शेजारी ज्याप्रमाणे आधीच्या भांडणाचा राग मनात धरून वेळोवेळी पाणउतारा करतो त्याप्रमाणे कर्नाटक सरकार सीमावासीयांचा करत आलेले आहे.

एक महत्वाचा मुद्दा येथे मांडतो.
कर्नाटकाने ऐवीतेवी कानडीची सक्ती केली आहेच.त्यामुळे बळजबरी नव्या पिढीला कानडी शिकावे लागत आहे. हळूहळू कानडी जाणणार्‍यांची लोकसंख्या वाढत जाईल. तेथील नविन पिढीला कानडी इतिहास शिकावा लागेल.

लहाणपणी जे शिकतो ते लक्षात राहते. ती मते पक्की बनत जातात. माझेच उदाहरण घ्या. मला जयप्रकाश नारायण यांच्याबद्दल शालेय शिक्षणात एकही वाक्य नव्हते. त्यामुळे नक्की त्यांच्याबाबत काय झाले हे ओझरतेदेखील माहित नाही. पुढे मोठे झाल्यावर त्यांच्याबद्दल कामानिमीत्ताने म्हणा किंवा इतरकारणे वाचण्याची गोडी राहीली नाही. असो.

तर पुढेमागे जर कधी सीमाभागात 'कोणत्या भागात जायचे' याबद्दल मतदान झाले तर ते मतदान महाराष्ट्राच्या विरूद्ध जावू शकते.
असलेला प्रश्न रेंगाळत ठेवणे, भिजत घोंगडे ठेवणे, काळ हाच एक उपाय आहे हे मानणे हे वैशिष्ठ्य केवळ भारतीय न्यायसंस्थेत व लोकशाहीत आहे. असल्या प्रकारच्या मुद्यांमुळेच भारतात विविध प्रश्न रेंगाळत पडलेले आहेत.

सीमा भागातले लोक महाराष्ट्रात आले की त्यांचे काय भले होणार? - हा प्रश्न गैरलागू आहे. प्रश्न जेव्हा भाषा संस्कृती जगणे आदींवर येतो तेव्हा माणसाला आपली माती गोड लागते. भले तुम्ही बंगलोरला नोकरी करत असाल पण तेथे तुम्ही मराठी शब्द ऐकले की तुम्हाला प्रसन्न वाटत असेल हे नक्की. उगाच नाही येथील ऑनलाईन मराठी साईटवर मन मोकळे करायला परदेशातूनही लोक येतात ते.

आणखी एक लक्षात घ्या. सीमाभागातले लोक काही नोकरी करणारे उपरे, बिहार युपीमधून आलेले किंवा बांग्लादेशी नव्हेत. किंवा सीमाभाग हा पाकव्याप्त काश्मिरही नव्हे. शांततेने विचार करण्याची पात्रता त्यांचीही आहे. पण त्या शांततेला उसाचे मुळ समजा व तो उस कर्नाटकाने मुळापासून खावू नये.

बाकी बेळगावी विधानसभा सभागृहाचे बांधकाम करणार्‍या महाराष्ट्रातील (पुण्यातील) अस्सल मराठी उद्योजक श्री. बी.जी. शिर्के (शिर्के सिपोरेक्स फेम) यांच्या शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि.या केवळ मराठी कंपनीला काम देण्याचा कर्नाटकी कावा दिसतो. तो कावा शिर्केंना समजला नसेल तर ते वर प्रतिक्रियांच्या मतांसारखेच दुर्दैव.

बळ्ळारी नावच्या जिल्ह्यावर हीच वेळ कर्नाटकाने आणली. तो जिल्हा आधी आंध्रात होता. मग कर्नाटकात आला. आज तिथे कोणीही तेलगु बोलत नाही. हे दोन जिल्हे कर्नाटकाला जोडणारा सनदी अधिकारी मोठा हुशार असावा. त्याने नुसतेच हे जिल्हे कागदोपत्री कर्नाटकात आणले असे नाही तर इथे भाषावाद राहु नये म्हणुन एक स्ट्रॅटीजीही बनवली.

बेळगावात आज जे घडलय त्याचा हा परिपाक आहे. पण कर्नाटकाला हे जिल्हे का जोडले गेले ? कुणी याचा अभ्यास केलाय ?

जरा करा.

>>> कर्नाटकाला जोडणारा सनदी अधिकारी मोठा हुशार असावा
नविन, आपण नक्की ठाम आहात का की तो सनदी अधिकारी होता?
ठाम नसाल तर ते सारे कानडी काव्याने केले गेले असावे. तेथे जे जे घडले तसलीच पॉलीसी येथे लागू होते आहे.

मग बेळगाव नगरपालीकेने १९५६ मध्येच महाराष्ट्रात राहण्याचा केलेला ठराव का दडपला गेला?

कुठल्या राज्यात जायचे, हे ठरवायचा अधिकार नगरपालिकेला असतो का? उद्या एखाद्या नगरपालिके ठराव केला, आमच्या गावाचा स्वतंत्र देश करा.. मग काय करणार?

सीमाभागात लोकमत घ्यायचेच असेल तर निवडणुकीप्रमाणे मतदान अपेक्षित असते. लोकप्रतिनिधीनी ठराव करुन चालत नाही. लोकप्रतिनिधीनी म्हटले.. आम्ही महाराष्ट्रात जाणार, तर मग त्या गावाच्या विकासाला आमदार खासदार किंवा नगरपालिका फंडातून जो खर्च कर्नाटक सरकारने आजवर केला आहे. तो लोकानी परत करायला नको का?

पाभे, तुमच्या या पोस्टला अनुमोदन.

आमच्या गावातील मराठी शाळा, डी एड कॉलेजं एक एक करत बंद करत चाललेत.
पण सीमा प्रांतात तसेही हालच असतात.
आमची मातृभाषा कोणती हे सांगता येणे कठिण कारण प्रत्येक घरात तेलगू मराठी कानडी अशी भेळ आहे नी बेंगलोरकडची लोकं आम्ही आमच्या कानडीत बोलू लागलो की 'कन्नडमध्ये बोला ' म्हणतात. Happy

Pages