गणेशोत्सव २०१२ : स्पर्धांचा निकाल!

Submitted by संयोजक on 6 October, 2012 - 03:27

नमस्कार मंडळी,
गणेशोत्सवातील सर्व स्पर्धांमध्ये आपण बहुसंख्येनी सहभागी झालात, तसेच भरभरून दादही दिलीत, त्याबद्दल संयोजक मंडळातर्फे आपणासर्वांचे मन:पूर्वक आभार.

यावर्षी आम्ही ४ स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
१. तों.पा.सु. - हस्तकला स्पर्धा
२. गर्जा महाराष्ट्र माझा - गटलेखन स्पर्धा
३. मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम् ! - पाककृती स्पर्धा - गोड विभाग व तिखट विभाग
४. चित्र बोलते गुज मनीचे - काव्य-प्रकाशचित्र स्पर्धा

यातील पहिल्या ३ स्पर्धांचे निकाल जनमत चाचणीने लावण्यात आले आहेत. चवथ्या 'चित्र बोलते गुज मनीचे' या काव्य-प्रकाशचित्र स्पर्धेचा निकाल परीक्षकांकडे सोपवण्यात आला होता. मायबोली परिवारातील श्यामलीउल्हास भिडे यांनी हे परीक्षणाचे काम पाहिले.

या स्पर्धांचा निकाल खालीलप्रमाणे:-

तों.पा.सु. - हस्तकला स्पर्धा

प्रथम क्रमांक - लाजो : मिठास ६९ मते
द्वितीय क्रमांक - नीलू : सुरळीच्या वड्या (खांडवी) ६१ मते
तृतीय क्रमांक - (विभागुन) - sonalisl : ब्राऊन राईस नूडल्सवर्षा व्हिनस : पार्टी टाईम - २७ मते

मतदान इथे पहायला मिळेल.

गर्जा महाराष्ट्र माझा - गटलेखन स्पर्धा

प्रथम क्रमांक - रंग सोन्नलगीचे - लैभारी (विशाल कुलकर्णी, मुग्धानन्द, MallinathK, स्वप्ना_तुषार, कांचन कुलकर्णी) - ८७ मते
द्वितीय क्रमांक - खखाव्रत - "याबायका" (कविन, मंजूडी, अश्विनी के) - ७८ मते
तृतीय क्रमांक - "माणिकमोती" - उनाडके (रोहित ..एक मावळा, Yo Rocks, जिप्सी, सेनापती, इंद्रधनुष्य) - ३१ मते

मतदान इथे पहायला मिळेल.

मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम् ! - पाककृती स्पर्धा - गोड विभाग

प्रथम क्रमांक - किरमीजी गुलाबजाम - सुलेखा - ७४ मते
द्वितीय क्रमांक - 'स्विटी-पाय' - लाजो - ३० मते
तृतीय क्रमांक - सफरचंद मोदक -साक्षी - २७ मते

मतदान इथे पहायला मिळेल.

मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम् ! - पाककृती स्पर्धा - तिखट विभाग

प्रथम क्रमांक - सखो कचोरी - डॅफोडिल्स - ५५ मते
द्वितीय क्रमांक - 'स्पड थाय' - लाजो - ४० मते
तृतीय क्रमांक - सफरचंद-बटाटा थालिपीठ - अगो ३९ मते

मतदान इथे पहायला मिळेल.

चित्र बोलते गुज मनीचे - काव्य-प्रकाशचित्र स्पर्धा

चित्र बोलते गूज मनीचे - प्रकाशचित्र १

प्रथम क्र. अश्विनी के
द्वितीय क्र. (विभागून) क्रांति, देवचार
------------------------------------------------------

चित्र बोलते गूज मनीचे - प्रकाशचित्र २

प्रथम क्र. (विभागून) मामी, के. अंजली
द्वितीय क्र. (विभागून) रैना, पुरंदरे शशांक
------------------------------------------------------

चित्र बोलते गूज मनीचे – प्रकाशचित्र ३

प्रथम क्र. किंकर
द्वितीय क्र. (विभागून) सामी, विनार्च

ज्या मायबोलीकराचा जास्तीत जास्त स्पर्धा व उपक्रमांत उत्स्फुर्त सहभाग असेल अशा सभासदाचा विशेष प्रशंसा पत्र देऊन गौरव करायचा असं आम्ही ठरवलं. तर हा मान मिळवला आहे 'डॅफोडिल्स' यांनी. ही आधी घोषणा मुद्दामच केली नाही कारण आम्हाला त्यातली उत्स्फुर्तता आजमावयाची होती.

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व विजेत्यांचे मनःपुर्वक अभिनंदन!! Happy

"याबायकां" च्या वतीने सर्वांचे मनःपुर्वक आभार!

अतिशय उत्साही संयोजनाबद्दल संयोजक मंडळाचेही आभार आणि शाबासकी!
विचारपुशीत प्रशस्तीपत्रक देण्याची संयोजकांची कल्पना अभिनव आहे. मस्त वाटले ते प्रशस्तीपत्रक पाहून Happy

अरे वा....... सर्व विजेत्यांचं आणि स्पर्धकांचं खूप खूप अभिनंदन Happy
आयोजकांची जितकी तारीफ करावी तितकी कमी आहे.

सर्वच स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे अभिनंदन! परिक्षकांचेही स्पेशल अभिनंदन. Happy

लाजोचे त्रिवार अभिनंदन. Happy

सर्व सहभागी मायबोलीकर , विजेते , संयोजक , परिक्षकांचं अभिनंदन .....अभिनंदन .....अभिनंदन .....अभिनंदन .....

प्रकाशचित्र स्पर्धेत उत्तमोत्तम चारोळ्या असताना ,चार दोन फुटकळ लोकांना निवडले याचा मी निषेध नोंदवतो. प्रकाशचित्र १ मध्ये शेळीताई (जामोप्या) चे कौतुक त्याच धाग्यावर अनेकांनी जाहिरपणे करुनही त्यांना विभागुनही बक्षिस दिलेले नाही.विनयशा maithili pingale बडबडे ईत्यादिंच्या चारोळ्याही निकालापेक्षा चांगल्याच वाटल्या. हे दोन परिक्षक पुढच्या वेळेला नेमु नका काडीचीपण अक्कल नाहीए त्यांना.मतदान असते तर चांगले झाले असते.

मुळात आमच्या सोलापूराची कैफ़ियत मांडण्याची संधी दिल्याबद्दल मायबोली अ‍ॅडमिन आणी इतर चमुचे मनःपूर्वक आभार ! समस्त मायबोलीकर मंडळींनी दिलेल्या प्रोत्साहनासाठी ( मतदान (८७ मते) आणि लाईक्स (७४)) प्रचंड प्रचंड आभार !

सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन! Happy
लाजो, त्रिवार अभिनंदन! Happy
दक्षे, अग मराठीची काय वाट लावतेस? Uhoh Happy

सर्व विजेत्यांचे अभिनंदन Happy

ह्या वेळच्या गणेशोत्स्वात घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धा व कार्यक्रम अनोखे वाटले. प्रत्यक्ष भाग घेण्यास जमले नाही, पण वाचन अधुन मधुन जरूर केले. संयोजकांनी क्रीएटिव्ह आयडीयाज राबविल्या होत्या. त्या बद्दल संयोजकांचे आभार. Happy

" मायबोली " च्या संयोजकांचे ,आयोजकांचे ,परिक्षकांचे ,उस्फूर्तपणे विविध स्पर्धेतल्या भाग घेतलेल्या लहान -थोर सहभागींचे आणि सर्व उपक्रम यशस्वी करण्यात मोलाचा हातभार लावणार्‍या सर्व मायबोलीकरां चे अभिनंदन..
इतके छान संयोजन ,कार्यक्रमाची आखणी ...खरंच सर्व मान्यवर कौतुकास्पद आहेंत !!!!

सर्व सहभागी स्पर्धक आणि विजेते यांचे हार्दिक अभिनंदन! परिक्षक, अ‍ॅडमिन आणि प्रतिसादकांचे मनःपुर्वक आभार. Happy

Pages