गणेशोत्सवाची तोंपासु स्पर्धा...... मग बाप्पाला नैवेद्य हवा ना ?
मोदक, पिस्ता बर्फी, चॉकलेट बर्फी, मोतीचूराचे लाडू देखील केले..
बाप्पा म्हणे कंटाळलो काहीतरी वेगळे दे आता मी अमेरिकेन आहे म्हणून तरी..
म्हणून मग कपकेक, डोनट्स आणि स्विस् रोल नैवेद्याला केले
तरीही स्वारी नाखुशच..म्हणे खूप खूप गोड झाले !
मग दिले मस्त तिखट तिखट मिर्च्यांसोबत दोन जंबो वडापाव..
बाप्पा म्हणाला, "वॉव ! सो य्म्म्म्म्म्मी.. बाकी सब भूल जाव !"
आमच्या डाएट फ्रेक बप्पा साठी किती छोटुकले पदार्थ आहेत पहा.
मोदक, पिस्ता बर्फी आणि चॉकलेट बर्फी
डोनट्स, कपकेक आणि स्विस् रोल
जंबो वडापाव
बाप्पाच्या नैवेद्या साठी वापरलेले साहित्य :
लहान मुलांची खेळण्याची माती (प्ले डो)
मातीला आकार देण्यासाठी सुरी आणि एक सुई
कृती :
सगळे पदार्थ हाताने बनवले आहेत. माती चांगली मळून मउ करुन हवे ते आकार बनवले. गरज पडल्यास सुरी ने कापले. मोदकांना आणि केक ला सुई ने आकार दिलाय. कश्याचाच मोल्ड नाहीये.
पाव, मिर्च्या, वडा आणि वडापावची हिरवी चटणी बनवण्यासाठी आणि योग्य ते टेक्श्चर येण्यासाठी दोन रंगाची माती एकत्र केली आहे.
भारी!! आरती कधी आहे?
भारी!! आरती कधी आहे? प्रसादाला आलेच पाहिजे!
जबरी ! वॉव ! नक्की पहिला नंबर
जबरी ! वॉव ! नक्की पहिला नंबर

एव्हढे मिनिएचर करणे फारच कलात्मक हात बायो तुझा
वडापाव, त्या मिरच्या, केक्स, बर्फ्या, अफलातून सगळे ! तो बाप्पा पण क्लेचाच का ?
अमेलया आरती रोज संध्याकाळी ७
अमेलया आरती रोज संध्याकाळी ७ वा
अवल नाही गं तो गणोबा लाकडी आहे
सुरेख! वडापाव एक नंबर!
सुरेख! वडापाव एक नंबर!
तो वडापाव व बर्फी एकदम
तो वडापाव व बर्फी एकदम तोंपासु,,,, मस्त क्रियेशन
Pages