तों.पा.सु. - नैवेद्यम् समर्पयामी | - डॅफोडिल्स

Submitted by डॅफोडिल्स on 26 September, 2012 - 21:07

गणेशोत्सवाची तोंपासु स्पर्धा...... मग बाप्पाला नैवेद्य हवा ना ? Happy

मोदक, पिस्ता बर्फी, चॉकलेट बर्फी, मोतीचूराचे लाडू देखील केले..

बाप्पा म्हणे कंटाळलो काहीतरी वेगळे दे आता मी अमेरिकेन आहे म्हणून तरी..
म्हणून मग कपकेक, डोनट्स आणि स्विस् रोल नैवेद्याला केले Happy

तरीही स्वारी नाखुशच..म्हणे खूप खूप गोड झाले !

मग दिले मस्त तिखट तिखट मिर्च्यांसोबत दोन जंबो वडापाव..
बाप्पा म्हणाला, "वॉव ! सो य्म्म्म्म्म्मी.. बाकी सब भूल जाव !"

आमच्या डाएट फ्रेक बप्पा साठी किती छोटुकले पदार्थ आहेत पहा.

मोदक, पिस्ता बर्फी आणि चॉकलेट बर्फी Happy

डोनट्स, कपकेक आणि स्विस् रोल Happy

जंबो वडापाव Happy

बाप्पाच्या नैवेद्या साठी वापरलेले साहित्य :

लहान मुलांची खेळण्याची माती (प्ले डो)
मातीला आकार देण्यासाठी सुरी आणि एक सुई

कृती :

सगळे पदार्थ हाताने बनवले आहेत. माती चांगली मळून मउ करुन हवे ते आकार बनवले. गरज पडल्यास सुरी ने कापले. मोदकांना आणि केक ला सुई ने आकार दिलाय. कश्याचाच मोल्ड नाहीये.
पाव, मिर्च्या, वडा आणि वडापावची हिरवी चटणी बनवण्यासाठी आणि योग्य ते टेक्श्चर येण्यासाठी दोन रंगाची माती एकत्र केली आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खु प च सुं द र
अ प्र ति म
वडापाव आणि कपकेक डोनट्स तर असले सुंदर दिसतायेत ना
वाह!

__/\__

अफाट सुंदर झालाय नैवेद्य..वडापाव फार फार आवडला..बर्फी पण सही जमलीय

धन्यवाद मंडळी Happy

मोतीचूर खास जमले नाहीत असं वाटलं.>>> हो गं सायो बुंदी पाडताना कंटाळा केलाय.. चिनी मिनी चिनी मिनी.. चिकट काम...त्यातुन चार पाच दिवसांपूर्वी उजवा अंगठा कापलाय माझा.. कामचं बोट.. Uhoh

राजू७६ आणि लाजो >>> मुलांची क्ले वापरलीये. Happy
प्रिया७ >>>वर लिहिली कृती. Happy

मस्त आणि कल्पक प्रकार आहेत. दिसताहेतही एकदम रंगिबेरंगी. वडापाव तर सगळ्यात आवडले. त्याबरोबरच्या तळलेल्या मिर्च्या तर एकदमच तोंपासु. बर्फ्याही मस्त मस्त दिसतायत. Happy

डॅफो... कलर्स वगैरे खुपच सुंदर जमलेत Happy
लाजो खरंच का गं तुझ्यासारखे ?<< माझ्या खर्‍यांपेक्षा हे बेश्ट आहेत Happy

डॅफो.. ग्रेट!! किती किचकट काम ते!! काय पेशन्स आहे तुझ्याकडे!! सुं.. द...र!!!!!!!!!!!!!!!!!! Happy

बाप्पाला वडापावचा पण नैवेद्य!! Proud

Pages