तों.पा.सू - सुरळीच्या वड्या (खांडवी) - नीलू

Submitted by नीलू on 23 September, 2012 - 08:35

सुरळीच्या वड्या (खांडवी)
IMG909.jpgIMG908.jpgIMG912i.jpg

साहित्य : क्ले, कागद, मणी
कृती: एकदम सोप्पी.. क्ले मळून घेतला त्यानंतर ताटलीत लाटण्याने लाटून त्याच्या वड्या काढल्या. वरुन काळे मणी टाकले आणि सफेद - हिरवा कागद कापून शिवरला. Happy
आधी आलेल्या दोन प्रवेशिकांच्या मानाने मी फारच कमी कष्ट घेतले आहेत Proud

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसल्या खतरनाक दिसताहेत वड्या. सांगूनही खरे वाटणार नाही ह्या बेसनाच्या नाहीयेत म्हणून. अगदी हुबेहुब खर्‍या. मान गये नीलु.

खर्‍या वड्यांच्या वरताण - कल्पकता व प्रेझेंटेशन - हॅट्स ऑफ....

हे जर पेशवाईत श्रीमंतांच्या नजरेस पडले असते तर ३-४ गावे वगैरे सहज इनाम म्हणून मिळून गेली असती...... नजरबंदीची करामत म्हणून (प्रत्यक्ष अशा वड्या श्रीमंतांना मिळाल्या असत्या तर !!!!! )

सुंदर !
<< मी फारच कमी कष्ट घेतले आहेत >> जगातले बरेच मोठे शोध कमी कष्टाना 'क्रिएटिव्हीटी' फोडणी दिल्यानेच लागले आहेत !! Wink

सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद!! Happy

>>जगातले बरेच मोठे शोध कमी कष्टाना 'क्रिएटिव्हीटी' फोडणी दिल्यानेच लागले आहेत >> अगदी खरा भाऊकाका. Happy
>> ३-४ गावे वगैरे सहज इनाम म्हणून मिळून गेली असती>> शशांक.... कसचं कसचं Lol

विद्या, अज्जिबात फसवणार नाही हो अवश्य या घरी Happy
>> खरं करायला जितका खटाटोप >> मानुषी हो ना, मला करता करता वाटलं खर्‍या सुरळीच्या वड्या करणं ईतक्या सहज सोप्या असत्या तर कित्ती बरं झालं असतं.

गजा Proud मी घरातही सगळ्यांना फसवलं. हा पदार्थ सहसा घरी होत नाही बाहेरुनच आणतो. काल दुपारी सगळे झोपले होते तेव्हा मी हे प्रयोग केले.. सगळे उठले तेव्हा हळूच टेबलवर नेऊन ठेवले. तर सगळे गोंधळले मी कधी बाहेर जाऊन घेऊन आले त्यांना कळलंच नाही. काही असे ना आता खाऊया पण सगळे सरसावून बसले तर Lol

>>अगदी विचार वगैरे ही केला की किती कमी तेल वापरलय फोडणीला>> Lol

नील्वाक्का, भारी!!!! Happy
या स्पर्धेसाठी तुझ्याकडून एंट्री असणार ही माझी अपेक्षा तू पुरी केलीस गो Wink

फोडणीसाठी फेविकॉल पाण्यात मिसळून त्या वड्यांवर ब्रशने लावायचं, सुकल्यावर छान तेलासारखी चकाकी येते. ते फेविकॉलपाणी ओलं असतानाच त्यावर काळे मणी टाकले तर व्यवस्थित चिकटून बसतील.

मी फारच कमी कष्ट घेतले आहेत >>>> तरीही मी तुलाच पहिला नंबर देवुन टाकते. अग्गदी हुबेहुब झाल्या आहेत. विश, खर्‍या सुरळीच्या वड्यांची कृती पण इतकीच सोपी असती तर.... Happy

( घरच्यांना फसवुन तु, दुर्योधनाला मयासुराने कसं फसवलं असेल त्याची ही एक अगदी छोटीशी झलक दिलीस. Happy )

निलतै, मी आत्ता उचलुन तोंडात टाकली असती कि गं!
शिवाय जिभेला चव कळेपर्यंत झेपलंही नसते, की क्ले आहे ते.............
लई भारी.
कलाकार आहेस खरे!

Pages