घावन घाटलं

Submitted by _प्राची_ on 8 September, 2012 - 01:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदूळ, नारळ, गूळ, तेल, मीठ

क्रमवार पाककृती: 

तांदूळ कडकडीत पाण्यात १० मिनिट भिजवून मग धुवून सावलीत वाळवायचे. मिक्सरवर बारीक करायचे. जरा जाडसर पीठ झाल तरी चालतं. या पिठात तेलाच मोहन आनि मीठ घालून सरसरीत भिजवायचे. त्याचे घावन घालायचे. छान जाळीदार घावन होतात.
घाटलं : २-३ वाट्या नारळाचे दूघ काधून घ्यायचे त्याला १ चमचा तांदूळाची पिठी लावून (कालवून) ठेवायची. १/२ वाटी पाणी उकळवून त्यात १/२ वाटी गूल घालायचा. परत उकळल्यावर तांदूळाची पिठी कालवलेल्या नारळाच्या दूधात हे मिश्रण घालायचे. आणि १ उकळी आणायची. गॅस बन्द केल्यावर वेलदोडा पूड घालायची.
हे गारच खायचे असते. घाटले जास्त घट्ट वाटल्यास त्यात साधे दूध घालून सारखे करायचे.
बाळाच्या पहिल्या महिन्याच्या वाढदिवसाला करतात आमच्यात. काही जणांकडे गौरीच्या नैवेद्याला असते.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे घावन असतात पण घाटले क्वचितच होते. आमच्याकडे त्यात थोडे ओले खोबरेही घालतात.
पण दोन्ही एकत्र खायला, फर छान लागते.
गावचे तांदूळ असले कि, बिडाच्या तव्यावर छान उलटतात.

अरे वा Happy
आमच्या मातोश्री हे घावन करून मोदकातला नारळाचा चव / सारण यांचे एक एक थर करून छावाचे घावन करतात.
मोदकाचा उरलेला चव संपवायची युक्ती Wink

ahahaaa Ghavan Gahtla all time fav! Aai kade gaurila naivedya asto ha! Me ajun try kele nahi ata hya recipe pramane karun baghte Ghatle udyach!