डॉक्टरचे हस्ताक्षर !!

Submitted by डांबिस on 7 September, 2012 - 03:39

हा विनोदी लेख नाही !!!

डॉक्टर ने प्रिस्क्रिप्शन लिहीताना कॅपिटल लेटरचाच वापर करावा अस आवाहन सरकारने केले आहे.

ही म टा मधिल बातमी आहे,
लिंकः http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16288855.cms

चुकीची औषधे घेऊन अमेरीकेत दरवर्षी सात हजार लोक मरण पावतात !
आरोग्य सेवेतील चुकांमुळे जगभरात डॉक्टर व वैद्यकीय संस्थांना वर्षाकाठी २९ अब्ज डॉलर्सचा भुर्दंड पडला आहे.
' वर्ल्ड हेल्थ असेंब्ली ने २००२मध्येच ठराव करून आरोग्य सेवांमधील चुका टाळण्याकरिता करायच्या उपाययोजनेची जंत्री जारी केली आहे.

खराब हस्ताक्षर असलेली मुले हमखास डॉक्टर होतात , असा प्रवाद किंवा विनोद आहे.
मात्र आता या प्रवादाला धक्का लावत महाराष्ट्रातील डॉक्टरांना त्यांचे हस्ताक्षर सुधारावे लागणार असून प्रिस्क्रिप्शन कॅपिटल लेटरमध्ये लिहिण्याचे बंधन कर्नाटक व गोव्यातील डॉक्टरांप्रमाणे स्वतःवर घालून घ्यावे लागणार आहे. प्रिस्क्रिप्शन कॅपिटल लेटरमध्येच लिहिण्याबाबत महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या मेडिकल कौन्सिलने पुढाकार घ्यावा , असे आवाहन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी केले आहे.

डॉक्टरांचे अक्षर समजत नाही म्हणून चुकीचे औषध देण्याचे व त्यामुळे पेशंटच्या जिवावर बेतण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे कर्नाटक मेडिकल कौन्सिलने २४ ऑगस्ट २०१२ रोजी ठराव करून त्यांच्याकडे नोंदणी केलेल्या ९६ हजार ९२० डॉक्टरांना कॅपिटल लेटरमध्ये प्रिस्क्रिप्शन देण्याचे बंधन घातले. महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या मेडिकल कौन्सिलने याकरिता पुढाकार घ्यावा , असे आवाहन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी केले आहे. चेंबूरमधील २०० डॉक्टरांनी त्यांच्या बैठकीत कर्नाटकमधील डॉक्टरांचे अनुकरण करण्याचे ठरवले असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. गोव्यातील मेडिकल कौन्सिलनेही डॉक्टरांनी आपल्या चुका टाळण्याकरिता कोणती खबरदारी घ्यावी , याची आचारसंहिता तयार केली असून प्रिस्क्रिप्शन स्वच्छ व शुद्ध हस्ताक्षरात लिहिणे डॉक्टरांवर बंधनकारक केले आहे.

महाराष्ट्रात डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमधील हस्ताक्षरामुळे चुकीचे औषध घेतल्यामुळे किंवा नर्सने भलतेच इंजेक्शन दिल्यामुळे किती पेशंट दगावले , याची आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या हस्ताक्षरावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आल्याचे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याहुन सोपा उपाय आहे कि डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन संगणकाद्वारे लिहुन प्रिंट कराव.म्हणजे कॉपी पेस्ट पण करता येत त्यामुळे तेच तेच वारंवार लिहिण्याचे कंटाळवाणे कामही कमी होते आणि रुग्णांना चांगले अक्षरही मिळते.
करा म्हणाव मग पारायण प्रिस्क्रिप्शनची!!!

>>रोगाचं निदान लिहिणं खरंतर आवश्यक आहे, पण काहीजणांकडून लिहिलं जात नाही<<

प्रिस्क्रिप्शनवर लिहिलेले कधीच पाहिले नाही. केसपेपरवर लिहिलेले पाहिले आहे.

Happy

इथे ऑस्ट्रेलियात डॉक्टर एका स्पेसिफिक कागदावरच प्रिस्किप्शन प्रिंट करुन देतात. कोणत्याही डॉक्टरकडे गेले तरी प्रिस्किप्शनचा कागद सेमच. त्यावर डॉक्टरचे नाव, पत्ता, पेशंटचे नाव, पत्ता आणि हे प्रिस्किप्शन रिपिट आहे कि नाही ते पण लिहिलेले असते. केमिस्टकडे गेल्यावर त्या प्रिस्किप्शनचा एक पार्ट फाडुन त्याच्याजवळ ठेवतो, दुसरा आपल्याला देतो आणि एका स्टिकरवर पेशंटची माहिती, डॉ. ची माहिती गोळ्या कशा व कधी घ्यायच्या हि माहीती प्रिंट करुन ते स्टिकर गोळ्यांच्या पाकिटाला लावतो.

आमच्या फॅमिली डॉक्टर चे प्रिस्किप्शन प्रिन्टेड असते, जेव्हा मी ते सासरच्या जवळील मेडीकल स्टोअर मधे घेवून गेले तेव्हा दुकानाचे वयस्कर मालक म्हणाले की माझ्या पुर्ण आयुष्यात मी पहिल्यांदा एवढे नीट प्रिस्किप्शन पाहिले.
त्यात खालील डिटेल्स असतात.
Docto's details
Patient's name, date, time , age
Diagnosis
medicin names - brand/pharmaceutical company - instructions on dosage
सर्वात खाली फार्मासिस्ट साठी instruction
For Pharmasist : Do not substitute

Pages