फार काही बदलल नाहिये तुमच्या जाण्याने....

Submitted by रीया on 4 September, 2012 - 02:01

फार काही बदलल नाहिये तुमच्या जाण्याने....

आता मेसेज होतात कमी नी फोनच जास्त
तरीही बिल आता आटोक्यात असतं
थँक्स, सॉरी चा रतिब लावलाय
पण शिव्या घालायला कोणीही नसतं

दिवसभर चहाचे लाखो कप रिचतात
एका कंटीगसाठी भांडणार्‍यांना फिदीफिदी हसतात
गाडीतलं पेट्रोलही टाकीभर वाहतय
वीकेंड असेच रूममध्ये पडल्या पडल्या संपतात

मॉलमधे आवडेल ती गोष्ट माझी होतेय
तुळशीबागेतली बार्गेनिंग मलाच वेडावतेय
वस्तू माझी, इच्छा माझी कोणाचाही कल्ला नसतो
कोणास ठाऊक चॉईस तरीही अनोळखी का वाटतेय

लंचमध्ये डब्बा आता शेरिंगविनाच संपतो
नाक्यावरला वडापाव कधी कधी खुणवतो
एका वडापावची ऑर्डर मोठ्या तोर्‍यात देते
पण मिर्चीविनाच घास आता जीवाला झोंबतो

आता पाऊस येतो तो अडोश्या आडूनच
मीही त्याला पहाते मग जराशी दुरुनच
त्याने सुद्धा ओळख दाखवायचं सोडलय
दिवस असेच वाहतात आठवणी भरुनच

सगळं काही ठिक आहे एकदा कळवावं म्हणलं
येते का माझी सय एकदा पहावं म्हणलं
फार काही बदलल नाहिये तुमच्या जाण्याने
फक्त श्वासाशिवाय हृदय आता चालवावं म्हणलं.

-प्रियांका उज्ज्वला विकास फडणीस
(माझ्या लाडक्या कॉलेज फ्रेण्ड्संना समर्पित)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

एकदम खूप आठवणी जाग्या केल्यास......... आधीच सांगितलय तुला ही कविता खूप आवडली..... Happy

एकेक कडवे म्हणजे जुनी चित्रेच डोळ्यासमोर उभी राहत आहेत.......

चांगली आहे ....
.
तु अजून ही उभी आहेस
त्याच आठवनींच्या वळणावर
्हातात बॅग घेऊन
बस ची वाट पाहत....
चल पुढे चाल आता
गेली ती बस निघून..
आयुष्याच्या वाटेवर
प्रत्येकाला चालावे लागते...

मस्तच! खुप आवडली. कविता शक्यतो कधी वाचत नाही पण एवढे प्रतिसाद बघीतले आणि उत्सुकता वाटली, बघुया तरी काय आहे म्हनुण आलो आणि आवडली.

Happy
Thanks Happy

@ रिया - मला टायटल बघुन वाटले की तू "मिष्टी" च्या माबो सोडुन जाण्यावर लगेच एक कवित पाडली आहेस. Happy

कविता चांगली आहे.

Pages