पेरूचा कायरस

Submitted by deepac73 on 3 September, 2012 - 09:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३-४ पिकलेले पेरू
१ चमचा तिखट
१ चमचा तेल
७-८ मेथी दाणे
हिंग, हळद फोडणीसाठी
१ चमचा गोडा मसाला
१ मोठा चमचा चिंचेचा कोळ
चवीनुसार मीठ, गुळ

क्रमवार पाककृती: 

१. पेरूच्या ४ फोडी करून चमच्याने गर काढून घ्यावा. आता फोडींचे तुकडे करावेत
२. गर मिक्सर मधे घेऊन १/२ वाटी पाणी घालून २-३ वेळा pulse करावे. हे मिश्रण गाळून बिया टाकून द्याव्या.
३. फोडणीसाठी तेल गरम करून त्यात ७-८ मेथी दाणे, हिंग, हळद टाकून पेरूच्या फोडी आणि गर घालावा.
४. तिखट, गोडा मसाला, चिंचेचा कोळ, चवीनुसार मीठ, गुळ घालून ४-५ मिनीटे शिजू द्यावा.
५. गरम कायरस तयार

अधिक टिपा: 

कायरस फ्रिजमधे ३-४ दिवस टिकतो.

माहितीचा स्रोत: 
आई आणि एक गुजराथी मैत्रीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users