दवंडी पहिली - मायबोली गणेशव्रत वसा - मायबोली गणेशोत्सव २०१२

Submitted by संयोजक on 27 August, 2012 - 16:12

2012_Davandi_1_final.jpgमायबोलीकरांनो, आजच्या अंगारक संकष्ट चतुर्थीच्या सुमुहूर्तावर पहिली दवंडी सादर करत आहोत.

ज्या स्पर्धांसाठी स्पर्धकांना वेळ लागणार आहे आणि पूर्वतयारी आवश्यक आहे अशा स्पर्धा आधी जाहीर करत आहोत. उपक्रम - स्पर्धांचे विषय, त्याचे नियम आणि प्रवेशिका कुठे व कशा पाठवायच्या हे तुम्हाला खालच्या निळ्या शब्दावर टिचकी मारल्यावर कळेल.

चित्र बोलते गुज मनीचे
बालचित्रवाणी

मूळ श्री गणेश व्रताची कहाणी इथे पहा.

नमस्कार मंडळी,

दरवर्षीप्रमाणे, भाद्रपद शुद्ध चतुर्थी, शके १९३४, दिनांक १९ सप्टेंबर २०१२ रोजी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) श्री गणेशाचे मायबोलीवर आगमन होणार आहे.

स्पर्धांची सुरुवात गणेश चतुर्थी, १९ सप्टेंबर २०१२ (भारतीय प्रमाण वेळ) या दिवशी होऊन, अनंत चतुर्दशीपर्यंत, २९ सप्टेंबर २०१२ (अमेरिकेची पश्चिम किनार्‍याची प्रमाणवेळ) तुम्ही त्यामधे भाग घेऊ शकता.

ध्यानात असू द्या...

स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांव्यतीरिक्त, तुम्ही गणेशोत्सवानिमित्त काही खास लेख लिहून आम्हांस पाठवावे ही आपणांस आग्रहाची विनंती. तसेच स्वरचित आरत्या सुद्धा (मायबोलीवर पूर्व प्रकाशित न झालेल्या) पाठवावयास विसरू नका.

साहित्याबरोबरच आता मायबोलीवर सांगितीक संस्कृतीही रुजते आहे. आपल्या कलाप्रेमी बाप्पाच्या सेवेत तुम्ही स्वतः गायलेली (वा चाली दिलेली) गाणी, श्लोक, आरत्या, छान छान चित्रं, रेखाटनं आमच्याकडे पाठवलीत तर आणखी बहार येईल...

चला तर मग... कुंचल्यानी रेखाटायला, शब्द वेचायला, सूर आळवायला सुरुवात करा.

हे सर्व आम्हाला sanyojak@maayboli.com वर पाठवा.

तसेच, मायबोली सभासदांनो, तुमच्या घरच्या बाप्पाचे दर्शन, फोटोरुपात, घडवायला विसरु नका. बाप्पाचा थाटमाट, सजावट, देखावे, नैवेद्य आणि काय काय...आरास निश्चित करतांनाची प्रक्रिया, पर्यावरणाचा व नाविन्याचा विचार, त्यासाठी केलेली धडपड हे सगळं मायबोलीकरांना जाणून घ्यायला आवडेल.

तुमच्या गावातील, शहरातील, देशा-परदेशातील गणपतीबाप्पांचे दर्शन समस्त मायबोलीकरांना घडवा.

धन्यवाद,
गणेशोत्सव संयोजन समिती २०१२.

------------------------------------------------------------------------------------

दुसरी दवंडी
तिसरी दवंडी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दवंडी ल ई भारी!! ह्या वर्षी गणपति ची मूर्ती पुण्याहून आलेली आहे. घरांत सर्व गणरायाच्या आगमनाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

मी ही कहाणी आता वाचली...
ज्यांनी तयार केलीये त्यांचे तोंडभरून, मनभरून कौतुक, ह्यापेक्षा बेस्ट शब्दगुंफण नसलीच असती, इतकी बढिया जमलीये Happy

कलाकार संयोजक!!! गणेशोत्सव जोरदार होणार ह्यांत शंका नाही, टीमला मनःपूर्वक शुभेच्छा Happy

Pages