चित्रकलेविषयी माहितीचे संकलन

Submitted by यशस्विनी on 24 August, 2012 - 04:17

मी आणि मायबोलीकर वर्षा यांना चित्रकलेबाबत एखादा धागा असावा असे वाटले ज्यावर चित्रकलेच्या संदर्भात,त्यासाठी वापरत असलेली वेगवेगळी माध्यमे जसे तैल रंग, जलरंग, रंगीत पेन्सिल्स, ऑईल पेस्टल्स तसेच चित्र काढण्यासाठी वापरायची साधने यावर चर्चा करता यावी, एकमेकांबरोबर चित्रकलेसंदर्भातील आपले अनुभव शेअर करता यावेत म्हणुन या धाग्याचे प्रयोजन..... यामुळे सर्व माहीती एकत्र राहील आणि या ग्रुपमधील सदस्यांना त्याचा फायदा होईल Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लले सेम पिंच... आमच्याकडे आदर्श फक्त बाबा नसुन मी आहे Happy
माझ्या मुडाला जाउन ५ वर्ष झाली.. एके काळी रंग, पेन्सीली ह्या शिवाय जगु शकेन की नाही असे वाटायचे.. Sad

काशी, इथेही A & K मॅच होतंय. मलाही चित्रांशिवाय काही सुचत नसे. अभ्यासाला बसलं की अंगावरही पेनाने चित्रं काढत असे Sad कॉलेजनंतर अचानक सगळं थांबूनच गेलं.

खुप म्हणजे खुप पुर्वी मी एक हार्ड्बोर्ड वर चित्र काढले होते.. चित्राची आऊट लाईन व डीटेल्स.. (चित्र इंडीयन आर्ट मधे आहे) मेंदिच्या कोनासारखा कोन करून केले आहेत.. व मधे पोस्टर कलर्स आहेत.. वरुन वॉर्निशचा हात दिला आहे.. ह्या चित्राला फ्रेम करावी का?? की फ्रेम केल्यावर त्यातील मजा जाईल..

तुमच्यापैकी कोणी कॅनव्हासवर किंवा कागदावर मिक्स मेडिया /टेक्श्चरींग करून पेंटींग केलं आहे का?
मिक्स मेडिया किंवा टेक्शचरींग फॉर डमीज किंवा बिगनर्ससाठी काही टीप्स, स्वस्त मटेरियल्स सुचवू शकाल का? गेस्सो, मॉडेलींग पेस्ट , एम्बोसिंग टुल्स वैगरे अगदी सुरवातीला वापरणं फारच खर्चिक वाटतंय.

अगदीच रहावलं गेलं नाही म्हणून एक मिक्स मिडियाचा छोटा प्रयोग करून बघितला. एमडीएफचा एक छोटा गोल तुकडा होता (पेंडंट, कि चेन किंवा फ्रिज मॅग्नेट बनवण्यासाठी`ठेवलेला) त्यावर प्रयोग केला.
प्रायमर म्हणून टेक्श्चर व्हाइट लावलं आणि मॉडलेंग पेस्ट किंवाटेक्श्चर पेस्ट ऐवजी होममेड टेक्शचर पेस्ट करून वापरली. (टाल्कम पावडर + कॉर्न फ्लोअर + फेव्हिकॉल आणि गरजेपुरतं पाणी). ही पेस्ट स्टॅप्युलाने लावून मग त्यावर जीन्सच्या बटनाच्या मागच्या बाजूने गोल गोल डिझाइन एम्बोस केलं. वाळल्यावर वॉर्निश लावून अ‍ॅक्रेलिक कलर्स लावलेत. मस्त इफेक्ट आलाय.
उद्या फोटो टाकेन.

अश्विनी, तुझी पोस्ट वाचल्यानंतर ठाण्याच्या त्या दुकानात जायचं ठरवलं होतं. काल जाऊन आले.
मला कधीपासून छोटं, वहीच्या आकाराचं स्केचबुक पाहिजे होतं ते मिळालं इथे. कुठेही सोबत न्यायला बरं पडतं.
ब्रँडनेम नाहीये काही पण कागद जाड आहे.
कॅमलच्या सॉफ्ट पेस्टल (स्टिक्स) घेतल्या. तिथे सॉफ्ट पेस्टलमध्ये एक जपानी ब्रँडही होता. (मुन्ग्यो बहुतेक) काळ्या रंगाच्या सिंगल (लूज) स्टिक्सही मिळतात तिथे.
कॅमलचाच फिक्सेटिव्ह स्प्रे होता (चारकोल, पेन्सिल ड्रॉइंग्जसाठीचा). कुणी वापरलाय का?
माझ्याकडे ऑल्रेडी कोहिनूर की असाच काहीतरी ब्रँडचा महागडा फिक्सेटिव्ह स्प्रे पडून आहे. त्याने माझं एक चित्र खराब झालं. (किंवा मला नीट स्प्रे करता आलं नाही! आणि भयंकर वास आहे त्याला).

माझं सामान अजून तसंच पडलंय. मध्येच विणकाम सुरु केलंय Uhoh ते झाल्यावर किंवा सायमल्टेनियसली चित्र काढायला हवं.

मी अजुन फिक्सेटिव्ह वापरुन बघितला नाही. पण कुठेतरी वाचल्याचे आठवतय कि पेन्सिल/ चारकोल/ पेस्टल स्केचवर फिक्सेटिव्ह स्प्रे करताना ते काही अंतर ठेवुन व हात एका जागी स्थिर न ठेवता करायचे. जर एकाच जागी थोडे जरी जास्त स्प्रे झाले तर चित्रातील रंग स्प्रेड होउन चित्र खराब होते.

धन्यवाद माशा.

तुम्ही सगळे चित्रं काढणारे लोक चित्रं काढताना सुरवातीलाच काय काय काढायचं आहे, कोणते रंग वापरायचे आहेत, कोणतं टेक्निक वापरायचं आहे हे सगळं ठरवता की यातली एखादीच गोष्ट ठरवून रंगवायला सुरवात करता? आता बास्स. हे इथेच चित्रं संपवायचं हे कसं ठरवता?
तुम्हाला काय रंगवायचं आहे हे रंगवायच्या आधी डोक्यात स्पष्ट असतं का?

मी नुकतेच चित्रकार रवी परांजपे यांचे आत्मचरित्र 'ब्रश माईलेज' हे पुस्तक वाचले. खूप आवडले. आर्टीस्ट लोकांनी नक्की वाचावं असं पुस्तक आहे.

Pages