चित्रकलेविषयी माहितीचे संकलन

Submitted by यशस्विनी on 24 August, 2012 - 04:17

मी आणि मायबोलीकर वर्षा यांना चित्रकलेबाबत एखादा धागा असावा असे वाटले ज्यावर चित्रकलेच्या संदर्भात,त्यासाठी वापरत असलेली वेगवेगळी माध्यमे जसे तैल रंग, जलरंग, रंगीत पेन्सिल्स, ऑईल पेस्टल्स तसेच चित्र काढण्यासाठी वापरायची साधने यावर चर्चा करता यावी, एकमेकांबरोबर चित्रकलेसंदर्भातील आपले अनुभव शेअर करता यावेत म्हणुन या धाग्याचे प्रयोजन..... यामुळे सर्व माहीती एकत्र राहील आणि या ग्रुपमधील सदस्यांना त्याचा फायदा होईल Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मध्यंतरी हँडमेड पेपर आणायला गेले असताना, तिथे दिसलेला राईस पेपर घेवून आलेय. २ राईस पेपरच्या शिट्स खूप पातळ आहेत (अगदी हात पेपर हाताळताना फाटेल की काय वाटण्याइतका) आणि एक कागद मात्र किंचीतसा जाड आहे (२-३ राईस पेपरना जोडून जितका जाड बनेल तितका) . अशा हँडमेड राईसपेपरवर रंगवायचा कुणाला अनुभव आहे का? कोणते रंग /पद्धत वापरावी?

यशस्विनी, खुप सुंदर प्रयत्न, आज पर्यंत या धाग्या वर नजर कशी पडली नाहि हेच आश्चर्य वाटत...
असो, मी पण वेळ मिळेल तेव्हा प्रयत्न करत असतो... आता आपणा सर्वाचे मार्गदर्शन हि मिळेलच...
आपण सर्वाना एक विनंति आहे कि आपण सर्वानि एखादि वस्तु कुठुन खरेदि केली आणि ईतर माहिती हि द्यावि.. कारण साधे पेपर्स घ्याला गेलो तरि खुप गोंधळ होतो.. आणि ईतर माहिति उदा. पुस्तके, tutorial लिन्क्स हि द्यावी... कुणाला ऑन लाइन ख्ररेदि चा अनुभव असल्या तो हि शेअर करावा, www.flipkart.com वर बरेच साहित्य उपलब्ध आहे..
वॉटर कलर्स साठि एक छान link देत आहे.. http://www.watercoloursecrets.com/

अल्पना,
अगदी राईस पेपर नाही पण तशाच अत्यंत पातळ पेपरवर मी अमेरीकेत असताना जपानी कॅलिग्राफी चितारली होती. हा पेपर चायना टाऊनमध्ये मिळत असे. जपानी ब्रश आणि शाईने ही अक्षरं लिहिली होती.
हे बघः

थँक्स वर्षा. मी आत्तापर्यंत इंक वापरुन बघितली नाही कधी. नेटवर राइसपेपर वाल्या चित्रांचा शोध घेतला तर बहूतांशी चिनी किंवा जपानी चित्रं /कॅलिग्राफी सापडल्या मला. इंक आणि ब्रश किंवा इंक पेन वापरून रंगवलेल्या.

ही शाई काही स्पेशल असते का? इथे मिळेल का? लोकल दुकानात तर काही मिळायची शक्यता नाहीये. मी काल थोडा कगदाचा तुकडा काढून जलरंग वापरून बघायचे ठरवले होते शेवटी.

तूझी कॅलिग्राफी मस्त दिसतेय, पण ते काय लिहिलंय?

अगं ते वेगवेगळे शब्द/अक्षरे (कांजी म्हणजे चिनी अक्षरे) आहेत आणि त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. हा अक्षरांचा नुसता सराव आहे.
क्रमाक्रमाने,

नारु (to become) काझे (wind)
मिची (road) तातेरु (to build)
हिकारी (light) इके (pond)

सगळ्यात खाली बारीक अक्षरात दिसतंय ते माझं नाव आहे. Happy

माझ्या जपानी कॅलिग्राफीवरच्या ('शोदो'च्या) लोकप्रभामध्ये प्रकाशित झालेल्या लेखातला काही भाग इथे देते:

पारंपरिक शोदोसाठी लागणाऱ्या मूलभूत साहित्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.
• शिताजिकी: काळ्या रंगाचे, मऊसर कापड. यावर सुलेखन करायचा कागद ठेवायचा असतो जेणेकरुन शोदो लिखाण करण्यास एक सपाट, सलग पृष्ठभाग मिळेल.
• बुन्चिन: कागद सरकू नये म्हणून वर ठेवायची एक जड, धातूची पट्टी
• हान्शी: शोदोसाठी वापरला जाणारा खास जपानी पातळ कागद
• फुदे: फुदे म्हणजे ब्रश. यात मुख्यत्वे जाड ब्रश (मुख्य मजकूर लिहिण्यासाठी) आणि एक बारीक ब्रश (काम पूर्ण झाल्यावर लिहिणाऱ्याचे किंवा कवी/लेखकाचे नाव नमूद करण्यासाठी) असतात.
• सुझुरी: काळी शाई ठेवण्याचे काचेचे भांडे
• सुमी: कोळशापासून बनवलेली काळी शाई
• फुदेमाकी: ब्रश नेण्या-ठेवण्यासाठी बांबूपासून बनवलेली चटई
• फुदेमाकुरा: कॅलिग्राफी करताना, वापरात नसलेला ब्रश ठेवण्याची खोबणी

मला नाही वाटत ही जपानी शाई/ब्रश आपल्याकडे सहज मिळेल. Sad

ओके. नेटवर बघितलं इंडियन इंक पण मिळते आणि राइस पेपर वर चालते असं दिसतंय. सध्या घाईघाईनी काहीही न करता अजून कुणाला तरी विचारून बघते. मला तो कागद खूपच आवडला म्हणून मी याचं काय करायचं हा विचारही न करता घेवून आले होते.

http://www.ehow.com/how_5854726_paint-rice-paper.html इथे थोडी माहिती मिळाली.

अजून एक पद्धत दिसली नेटवर. ती म्हणजे खाली जलरंगात कॅनव्हासवर मूळ चित्र काढून त्यावर जलरंगातच अर्धवट रंगवलेला / वॉश दिलेला आणि चित्राच्या आउटलाइन्स असलेला राइसपेपर ओव्हरलॅप करायचा. राईस पेपरच्या टेक्श्चरमुळे छान इफेक्ट येत असणार.

(पण अजून जलरंगात रंगवताना चांगलीच दमछाक होतेय माझी, त्यामूळे हेही जमणार नाही. Sad )

Tortillons: कागदाच्या गुंडाळीसारखे रोल असतात. भारतात कुठे मिळतात ते माहिती नाही. पण वेगवेगळ्या shades blend करण्यासाठी खूप उपयोग होतो.>> हे कुठे शोधायची गरज पडत नाही.. रेग्युलर फोटोकॉपीसाठी वापरतात तो पांढरा कागद घ्यायचा आणि त्याच्या पुंगळ्या बनवायच्या..

आज शेवटी न रहावून घरातल्या पेनाच्या शाईनी एका राईस पेपरच्या तुकड्यांवर रंगवून बघितलंच. हा कागद पाणी अजिबात शोषून घेत नाही.मी वापरलेली साधी शाई कागदावर तितकीशी पसरत नव्हती. फ्लो तुलनेनी कमी होता. नेहेमीचे जलरंग पातळ करुन वापरून बघावे लागतिल. रंग कागदावर ओघळू देत डार्क आणि लाइट असे शेड्स करणे हे टेक्निक वापरुन चायनीज /जपानी स्टाईलमध्ये रंगवलेली चित्रं य कागदावर छान दिसतिल.
साधी शाई वापरून केलेले प्रयोग बरे झालेत तसे. Happy

आपले नेहेमीचे ब्रश पण तितकेसे कामाचे नाहीत. निमुळते होत जाणारे ब्रश - ४, ६ वैगरे नंबरचे वापरुन तसा इफेक्ट येवू शकतो. (मी ४ आणि १० नंबरचे ब्रश वापरून रंगवून बघितलं.)

जलरंगासाठी चांगला कागद (शक्यतो हँडमेड किंवा तश्या टेक्श्चरचा) कोणी सजेस्ट करू शकेल का?
मध्यंतरी जनपथवरच्या एका कागदाच्या दुकानात एक मस्त जाडसर आणि स्टिफ हॅडमेड कागद दिसला होता. हा जलरंगासाठीचा कागद आहे असं दुकानदारानी सांगितलं होतं. मी एकच कागदाचा तुकडा (गोलसर तुकडेच ठेवले होते फक्त तिथे विकायला) घेवून आले होते. त्यावर रंगवताना मजा आली होती.
परत त्याच दुकानात जाणं शक्य नाहीये सध्या. दुसरा एखादा स्टिफ, जाड आणि हँडमेडसारखं टेक्शचर असलेला कागद हवाय. ऑनलाइन मिळत असेल तर जास्तच छान.

अजून एक प्रश्न आहे. कॅनव्हसवर अ‍ॅक्रॅलिक पेंटींगला कसं प्रिझर्व करायचं? मी आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या कॅनव्हासना काचेमध्ये फ्रेम केलंय. पण काचेमूळे बर्‍याचदा ग्लॉसी दिसतं चित्र. जर काचेशिवाय फ्रेम करायचं असेल तर काय करावं. ?
(सध्या रंगवलेल्या एका चित्रामध्ये रंगाच्या खूप लेयर्स आहेत. नुसतंच ठेवलं तर चित्र खराब होण्याची भिती वाटतेय.)

अरे इथे कुणीच अजून उत्तर दिलं नाही. Happy
मिळाला मला जलरंगासाठी आधीचाच कागद, नाव मात्र नाही कळालं. आणि अ‍ॅक्रेलिकसाठी फक्त वॉर्निश स्प्रे वापरायचा सल्ला मिळालाय.

आता नविन प्रश्न. तुमच्यापैकी कुणी कॅनव्हास पॅड्स वापरून बघितलेत का? मी पिडीलाइटचे आर्टिस्ट ग्रेडचे ८*१२ साइझ्चे एक कॅनव्हास पॅड वापरून बघायला म्हणून आणले आहे. १० शीट्स आहेत त्यात. यावर ऑइल कलर्स किंवा अ‍ॅक्रेलिक कलर्सनी रंगवायच्या आधी काही स्पेशल काळजी घ्यावी लागते का?
त्या पॅडवरचे कॅनव्हासचे शीट बाजूला काढून त्यावर रंगवायचे की रंगवून झाल्यावर बाजूला काढायचे? एकदा चित्र रंगवून झाले की मग ते माउंट /स्ट्रेच किंवा फ्रेम करता येते ना?

अल्पना अगं मी कॅन्व्हास, अ‍ॅक्रिलिक, ऑइल कलर्स कधीही वापरले नाहीयेत. त्यामुळे काहीच सांगू शकत नाही. पण वाचते आहे. नवीन माहिती मिळते आहे.

अल्पना,
कॅनव्हास पेंटिंगला बबल पेपरने पक करुन ठेव, मी तसेच ठेवते. तरिहि कलसर धूळ दिसत असेल तर शीळा ब्रेड त्यावर घासायचा, मग तिस्सुए पेपरने पुसुन घ्यायच.
कॅनव्हास पॅडवरचे कॅनव्हासचे शीट रंगवून झाल्यावर बाजूला काढायचे. रंगवून झाले की मग ते माउंट /स्ट्रेच किंवा फ्रेम करता येते. त्यासाठी वूडन फ्रेम लागेल.
फ्रेम करताना नोन रिफ्लेक्शन ग्लास वापरायची, किंवा नाही वापरली तर उत्तम.

हो कंसराज, मी बर्‍याच बाबींसाठी तो ब्लॉग रेफर करते. बुकमार्क करुन ठेवलाय मी हा ब्लॉग. Happy

केश्विनी, अ‍ॅक्रेलिक वॉर्निश स्प्रे वापरता येतो बहूतेक त्यावर. त्या वरच्या ब्लॉगवरच वाचल्यासारखं वाटतंय.
स्केचेससाठी अ‍ॅसिड फ्री पेपर वापर. वर बहूतेक ब्रँड आलेला असेलच. आणि स्केचींग झाल्यावर फिक्सेटिव्ह स्प्रे /वॉर्निश स्प्रे मारून वाळल्यानंतर त्याला प्लास्टीक शीट्मध्ये ठेवून फाइलमध्ये ठेवता येईल. लॅमिनेट करून पण ठेवता येईल.

ह्म्म. तो ब्लॉग वाचून काढायला हवा. आणि आधी साधं काहीतरी गिरमिटून अ‍ॅक्रिलिक वॉर्निश स्प्रे वापरुन बघेन Happy

मस्त माहिती दिसतेय त्यावर. सगळ्या मटेरियल्सची नावं लिहून घेऊन जाईन दुकानात. मी साधे ड्रॉइंग पेपर्स आणले आहेत. त्यावरच स्क्वेअर्स काढणार होते. पण हे स्प्रे वगैरे मारायचेत तर अ‍ॅसिड फ्री पेपरवरच करायला हवं. निडेड एरेझरपण आणायचाय. स्प्रे मारल्यावर चित्र अजून डार्क दिसतं असं लिहिलंय त्या ब्लॉगमध्ये. म्हणजे ६बी च्या ऐवजी ४बी असं जरा कमी डार्क पेन्सील्स वापरायला हव्यात.

हे मी पहिल्यांदाच इथे व अश्या ब्लॉग्जवर वाचून काढणार आहे Uhoh आधी अशीच कितीतरी पेन्सिल स्केचेस काढली होती साध्या कागदावर आणि नंतर फेकून दिली. महामूर्ख आहे मी.

कॅन्व्हास पोर्ट्रेट्स कॉलेजमध्येच राहिली आणि डिग्रीनंतर कॉलेज सोडताना विचारायला गेले होते तर सांगण्यात आलं की रुपारेलला गेली पेंटिंग्ज आपलं सायन्स एक्झिबिशन झाल्यावर. पेंटिंग झाल्यावर आपली सही ठोकायची असते खाली ही पण अक्कल नव्हती.

असो... खूप आनंद दिला होता कोणे एके काळी ह्या कलेने Happy

www.wetcanvas.com चित्रकलेच्या माहितीसाठी खुप महत्त्वाची वेबसाईट आहे. उपयोगी माहितीचा खजिना आहे. चित्रकलेसंदर्भात वेळोवेळी या वेबसाईटचा मला खुप उपयोग झाला.

मी देखील सुरुवातीला साधे कागद, साधे रंग जे शालेय विद्यार्थी वापरतात तेच वापरायचे. हळुहळु आंतरजालावर माहिती शोधताना, लायब्ररी रेफर करताना, आर्ट शॉपमध्ये फिरताना वेगवेगळे कागद, रंगसामान, ब्रशेसचे प्रकार, चित्र जतन करण्यासाठीचे प्रकार कळु लागले. सध्या पेन्सिल स्केचेस प्लॅस्टिक शीट मध्ये ठेउन फाईल करुन ठेवले आहेत. कॅनव्हास पेटिंग्जना वार्निश करुन कपाटात ठेवले आहेत.

इथे कोणाला अ‍ॅबस्ट्रॅक्ट आर्ट प्रकाराबद्द्ल चांगली माहिती आहे का? परवाच इथल्या एका आर्ट म्युझियमला भेट दिली. काही ठराविक आर्ट गॅलरीज त्यांनी ओपन ठेवल्या होत्या. सर्व पेटिंग्ज अ‍ॅबस्ट्रॅक्ट प्रकारांमध्ये होती.. गॅलरी मधील महिला सर्व पेटिंग्ज बद्द्ल खुप छान माहिती देत होती. पण का कुणास ठाउक मला रियलास्टिक पेटिंग्ज बघताना जो आनंद मिळतो. तो अजुन अ‍ॅबस्ट्रॅक्ट बघताना मिळत नाही. कदाचित मला ते नीटसे कळत नाही. एखादया अ‍ॅबस्ट्रॅक्टची रंगसंगती सुरेख असेल तर थोडे तरी अपील होते. पण काही काही पेटिंग्ज तर आपण लाउ तेवढे अर्थ होतील असे वाटते. त्यासंदर्भातील पुस्तके वाचीनच पण इथे कोणाला अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेटिंग्ज बद्द्ल, ती कश्याप्रकारे व कोणता विचार ठेउन काढली जातात याबद्द्ल माहिती असेल तर इथे शेअर करा.

पण का कुणास ठाउक मला रियलास्टिक पेटिंग्ज बघताना जो आनंद मिळतो. तो अजुन अ‍ॅबस्ट्रॅक्ट बघताना मिळत नाही.

+१
मला अ‍ॅबस्ट्रॅक्ट्/मॉडर्न आर्ट आवडतच नाही.

आज मी चावडी बाजार, नई सडक, चांदनी चौक य दिल्लीतल्या भागात जावून आले. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे कागद (चित्रकलेचे, क्राफ्टींगचे, पत्रिकांचे), सगळ्या प्रकारचे रंग, कॅनव्हास आणि इतर बरंच काही चित्रकलेसंदर्भातलं आणि क्राफ्टचं सामान होलसेलच्या किमतींमध्ये मिळालं.
इतके दिवस मला बर्‍याच गोष्टी इथे मिळायच्याच नाहीत. आता सामान कुठे मिळतंय हे कळाल्याने कधीही जावून आणता येईल. Happy

अश्विनी अगं तेच मलाही कळतच नाही आणि समजा एखादं चित्र कळलंच तरी आर्ट म्हणून आवडत नाही.
अल्पना मस्त. काय काय घेतलंस ते पण सांग.:)

अगं माझे अ‍ॅक्रेमिक कलर्स संपले होते २-४ तर ते गेतले १२० मिली च्या ट्युब्ज घेतल्या आर्टिस्ट ग्रेडच्या. स्केच्बुक्स घेतली २, २ क्राफ्टींगसाठी हँडमेड पेपरच्या शीट्स घेतल्या. वॉर्निश स्प्रे, १ स्ट्रेच्ड कॅनव्हास, एक कॅनव्हास पॅडचं पॅक, एमडीफ चं बरंच चिल्लर सामान (पेनस्टँड, दागिन्यांसाठी छोटंस कपाट, ओव्हल आणि गोल शेपमधले एमडीएफ चे तुकडे - हे किचेन्स, फ्रिज मॅग्नेट आणि पेंडंट्स बनवण्यासाठी, मॅग्नेट्स, एअरड्रायींग क्ले - टेराकोटा, घड्याळाचे आकडे असलेला एमडीएफ्चा गोल इ.इ.)..
या सगळ्या एमडीफ सामानावर मी रंगवतेय सध्या. आधी ऑनलाइन प्लेन टी कोस्टर्स पण घेतले होते ...त्यापैकी बर्‍याच पिसेसवर रंगकाम करून झालंय.

वॉव अल्पना मस्त शॉपिंग केलीस... अश्या शॉपिंगच्यावेळी मला आवडले असते तुझ्याबरोबर यायला... अशी खरेदी माझी सर्वात आवडती आहे Happy

काशी तुमच्या आवडनिवडमध्ये चित्रकला पहिल्या क्रमांकावर आहे म्हणजे तुम्ही आमच्याच जहाजातील प्रवासी आहात तर... या तुमच्या पोस्टची वाट बघते Happy

Pages