चित्रकलेविषयी माहितीचे संकलन

Submitted by यशस्विनी on 24 August, 2012 - 04:17

मी आणि मायबोलीकर वर्षा यांना चित्रकलेबाबत एखादा धागा असावा असे वाटले ज्यावर चित्रकलेच्या संदर्भात,त्यासाठी वापरत असलेली वेगवेगळी माध्यमे जसे तैल रंग, जलरंग, रंगीत पेन्सिल्स, ऑईल पेस्टल्स तसेच चित्र काढण्यासाठी वापरायची साधने यावर चर्चा करता यावी, एकमेकांबरोबर चित्रकलेसंदर्भातील आपले अनुभव शेअर करता यावेत म्हणुन या धाग्याचे प्रयोजन..... यामुळे सर्व माहीती एकत्र राहील आणि या ग्रुपमधील सदस्यांना त्याचा फायदा होईल Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आणि माझी अजून एक दिल्लीतली माबोकर प्राजक्ताने, २६ तारखेला एका इव्हेंटमध्ये स्टॉल बुक केल होता. पेंटीग्ज, टी कोस्टर्स आणि दागिने, बुकमार्क्स असं काई हँडमेड सामान विकणार होतो. त्यासाठी बरंच सामान तयार केलं होतं, करत होतो. पण नेमका तो इव्हेंट कँसल झाल्याचा मेसेज आलाय आत्ता.

अल्पना, असू दे गं. तोच स्टॉक नीट जपून ठेव. अजून कुठेतरी तुला लवकरच संधी मिळेल तिथे ठेवण्यासाठी रेडी असेल.

हो ते आहेच. मुळात मला करताना छान वाटतंय. त्यामूळे वेळ मिळेल तसं काम करतंच जाईन. कधी ना कधी संधी मिळेलच.

आज अ‍ॅसिड फ्री पेपर, काही ग्राफाईट पेन्सिल्स, नीडेड एरेझर, फाईल, शार्पनर, वार्निश स्प्रे वगैरे घेतलं. नुसत सामान घेऊनच मस्त वाटलं. प्रत्यक्ष चित्र काढेन तेव्हा काहीतरी हरवलेले गवसले असं वाटेल Happy

तिथे काही इम्पोर्टेड कलर पेन्सिल्स होत्या आणि ते कलर्स वॉटर सोल्युबल होते. कुणी वापरल्यात का तश्या पेन्सिल्स?

एक बेसिक प्रश्न, आतापर्यंत मी साध्या ड्रॉईंग पेपरवर चित्रं काढली होती. अगदी चित्रकलेच्या मास्तरांनी जपानला पाठवायला माझ्याकडून चित्र काढून घेतलं होतं ते देखिल साध्याच पेपरवर Uhoh आज अ‍ॅसिड फ्री पेपर पहिल्यांदा पाहिला. त्याची एक बाजू खरखरीत आहे तर एक गुळगुळीत. कुठल्या बाजूवर काढायचं चित्र? हसू नका ह्या प्रश्नाला .... हसतील त्याचे दात दिसतील Lol

ठाण्यात वेस्टला स्टेशनजवळ इथे सगळी स्टेशनरी, चित्रकलेचं अA to Z सगळं सामान MRP पेक्षा कमी भावात मिळतंय. अगदी एक दोन वस्तू घेतल्या तरी होलसेलच्याच भावात मिळतायत. मला प्रिंटर कार्ट्रिजेस पण ९५० चे ८९० ला मिळाले.

व्हरायटी स्टेशनर्स, १, कॉस्मॉस विजय बिल्डिंग, पंजाब नॅशनल बँकेच्या समोर, शिवाजी पथ, आंबेडकर चौक. फोन नं: २५४२६४६७ / २५४३२९७५.

मला पण नक्की महित नाही अश्विनी. पण बहूतेक खरखरीत साइडलाच काढायचे असणार. माझ्याकडचा जलरंगासाठीचा अ‍ॅसिडफ्री पेपर दोन्ही बाजूंना खरखरीत आहे आणि जास्त खरखरीत असलेली बाजू सुलटी आहे.

मी अजून वॉटर सोल्यूबल पेन्सिल्स वापरल्या नाहीत पण त्या पेन्सिल्स वापरून काढलेली चित्रं बघितली आहेत. साधारणतः जलरंगाचा इफेक्ट येतो त्यांनी. मला वापरून बघायच्या आहेत. पण सध्या घरी असलेले आणि आत्तापर्यंत न वापरलेले सामान आधी वापरायचे आहे. नंतरच नविन प्रकार.

इथल्यापैकी कुणी मिक्स मिडिया पेंटींग्ज केली आहेत का?

जलरंगासाठीचा अ‍ॅसिडफ्री पेपर >>> हे असं पण असतं काय? Uhoh तरी मी पेन्सिल्स घेतल्या आणि ग्राफईट बद्दलच बोलत होते म्हणजे त्याने योग्य तोच पेपर दिला असावा.

शक्यतो कोणत्याही प्रकारच्या चित्रकलेसाठी अ‍ॅसिडफ्री पेपर वापरतात. जलरंगासाठीचा कागद नेहेमीच्या स्केचींगच्या कागदापेक्षा जाड असतो.आणि एक नाही त्यातही असंख्य प्रकार असतात.

खरंतर कागद, रंग, कॅनव्हास, इतर रंगवण्यासारखे सरफेसेस यात खूप प्रकार असतात. वापरून वापरूनच हळूहळू समजायला लागतं कोणत्या सरफेसवर कोणते रंग आणि कोणतं टेक्निक वापरावं. त्यातही परत लोक मिक्स मिडीया करतात... म्हणजे एकापेक्षा अनेक रंगांचे प्रकार वापरणं. (उदा: कॅनव्हासवर टेक्श्चरींगसाठीचं मटेरियल +कपडा + अ‍ॅक्रेलिक रंग + क्राफ्ट कलर्स + पेन्सिल्स /चारकोल्स इ.इ. यात तर अगदी हेवे तितके आणि वेगवेगळे प्रयोग चालू आहेत सध्या. )

आज अ‍ॅसिड फ्री पेपर पहिल्यांदा पाहिला. त्याची एक बाजू खरखरीत आहे तर एक गुळगुळीत. कुठल्या बाजूवर काढायचं चित्र? >>>

अश्विनी, खरखरीत बाजूवर चित्र छान येतं.

तूझ्या रांगोळ्यांचे फोटो बघितलेत मी. त्यामूळे सांगतो की तू चित्र काढू नकोस. तू चित्र काढलीस तर आम्हाला कोणी विचारणार नाही. (स्मायली आहे असे समज)

तूझ्या चित्रकारी साठी शुभेच्छा.

तूझ्या रांगोळ्यांचे फोटो बघितलेत मी. त्यामूळे सांगतो की तू चित्र काढू नकोस. तू चित्र काढलीस तर आम्हाला कोणी विचारणार नाही. (स्मायली आहे असे समज) >>> बस काय!!! Lol तू आणि वर्षासारखे मास्टर्स इथे आहात. मी १ली 'फ' मध्ये आहे Wink

शुभेच्छांबद्दल ठेंकू Happy

अश्विनी, खरखरीत बाजूवर चित्र काढ. (माझ्याकडील अ‍ॅसिड फ्री पेपरला गुळगुळीत पणा नाहीये)
दुकानाबद्दल धन्यवाद. जाऊन येते आता तिथे.
तशा वॉटर सोल्यूबल कलर पेन्सिल्स माझ्याकडे आहेत (स्टेडलरच्या).
आधी पेन्सिलने रंगवून त्यावर ब्रशने पाणी फिरवलं की ते स्ट्रोक्स एकमेकांत मिसळून वॉटर कलर दिल्यासारखंच दिसतं. (पण मग डायरेक्ट वॉटर कलरच वापरावेत ना असं मला वाटतं)
काही कलर पेन्सिल आर्टिस्ट्स वेळ वाचावा या दृष्टीने आधी असं रंगवून घेतात (विशेषतः पार्श्वभूमी जी पेन्सिलने रंगवण्यात बराच वेळ जातो) आणि मग वाटलं तर नंतर शेडींग करतात पेन्सिलने.

रच्याकने सीएसटीच्या हिमालय फाईन आर्टकडे पेन्सिल्स/ पेपर्सचे चांगले प्रकार आहेत.
फॅबर कॅसलच्या पेन्सिल्सचा पॉलिक्रोमोज म्हणून एक प्रकार आहे तो दुर्दैवाने आपल्याकडे मिळत नाही. पण पर्याय म्हणून युकेच्या डेरवन्ट या ब्रँडचा कलरसॉफ्ट नामक पेन्सिलींचा प्रकार हिमालयकडे मिळतो. (मँगोकडे नव्हत्या त्या) (पॉलिक्रोमोज = प्रिझमाकलर = डेरवन्ट कलरसॉफ्ट)
त्यासाठी आणि इतर मटेरियलसाठी मी मुद्दाम हिमालयमध्ये जाणार आहे.

बायदवे कलर पेन्सिल माध्यमात काम करणार्‍या भारतातील आर्टीस्ट्सपैकी बंगलोरस्थित श्री. सुनिल जोशी यांची अलिकडेच ऑनलाईन ओळख झाली. हे मुळात सायंटीस्ट आहेत पण कलर पेन्सिल्समध्ये अप्रतिम पोर्ट्रेट्स चितारतात. इंटरनॅशनल कलर पेन्सिल आर्टीस्ट्च्या मॅग्झिन्स/कॉन्टेस्ट्समध्ये यांच्या चित्रांना अ‍ॅवॉर्ड्जही मिळाली आहेत.
हे पहा: http://cdn.shopify.com/s/files/1/0236/2129/files/sjoshi.jpg?5700

प्रोफेश्नल ग्रेडमध्ये जे पेपर पॅड मिळतात ते बहुधा सर्वच अ‍ॅसिड फ्री असतात. फक्त त्याचा आकार, जाडी, कागदाचा गुळगुळीतपणा व खरखरीतपणा यामध्ये फरक असतो. जलरंगासाठी कागदाचे तीन प्रकार मुख्य आहेत. एक पुर्णतः गुळगुळीत असतो. ज्यात पाणी धरुन ठेवण्याची क्षमता कमी असते. हा पेपर पेन्सिल आर्टसाठी जास्त उपयोगी असतो. पेपर जितका जाडीने जास्त असेल (ibs क्षमता) तितके पेन्सिलचे लेयर जास्त देता येतात. दुसरा प्रकार थोडा खरखरीत असतो. ज्याला "पेपर टुथ्स" म्हणतात. या पेपर टुथ्समुळे कागदाची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता जास्त असते. बहुतेक व्यवसायिक जलरंग चित्रकार हा कागद जास्त वापरतात. तिसरा प्रकार खुपच खरखरीत अथवा खडबडीत असतो. या तीन्ही कागद प्रकारांनुसार चित्राच्या फायनल आउटपुटमध्ये थोडा फरक पडतो. जो अनुभवाने लगेच ओळखता येतो.

वॉटरकलर पेन्सिली वापरुन जलरंग चित्र काढता येतात. परंतु या पेन्सिलींचे रंग सुकल्यावर एवढे चमकदार वाटत नाहीत जेवढे जलरंगामुळे वाटतात. परंतु जलचित्रातील फाईन डिटेल्ससाठी याचा उपयोग करता येतो.

वर्षा, प्रिझ्मा पेन्सिली या वॅक्सबेस्ड आहेत. त्या जास्त मउ आहेत. डेरवन्ट कलरसॉफ्ट लेड थोडे कठीण आहे. त्याने चित्र काढताना कागदावर प्रेशर जास्त दयावे लागते. मला सर्वात जास्त स्टेडलरच्या वॉटर सोल्युबल पेन्सिली आवडल्या. त्याने चित्र काढताना मुळीच प्रेशर दयावे लागत नाही व रंग देखील खुप ठळक दिसतात. फाईन लाईन्सदेखील त्याने चांगल्या काढता येतात.

त्या दुकानात स्टेडलरचा मोठा बॉक्स दाखवला त्याने. फॅबर कॅसलच्या घरी होत्या त्या पेन्सिली घरातल्या ज्येनाने काहीबाही ड्रॉ करायला वापरुन इतस्तः टाकल्यामुळे त्या पण घेणार होते पण ३६ रंगांचा सेट काल नव्हता. आज मिळेल म्हणालेत. त्याऐवजी स्टेडलर वॉटर सोल्युबल हवं का विचारलंनी. त्याबद्दल काही माहित नसल्याने सद्ध्या ग्राफाईट पेन्सिलीचा मुहुर्त लागू दे म्हटलं आणि दुसरं सामान घेऊन बाहेर पडले. जी काही थोडीफार कला उतरली आहे ती ज्ये ना. कडूनच हेरिडेटरी आली आहे. वडिल आणि आत्या दोघेही कलाकार Happy

हे सगळ वाचुन लय म्हणजे लय स्फुरण आलं आहे.... ह्म्म .. पण अल्पनाप्रमाणे घरातील न वापरलेल्या गोष्टी आधी वापरुन मग नविन खरेदी करावी.. Happy
वॉट्रर सोल्युबल पेंन्सील बाबत यशस्वीनीला १००मोद्क..
वर्षा लींक मस्त आहे

ललीचा मुलगा छान काढतो ना चित्र? मला त्याचं एक चित्रं इथे बघितल्यासारखं वाटतंय खूप पुर्वी.

ललीचा मुलगा छान काढतो ना चित्र? >>> नॉऽऽय !

यशस्विनीताई, मलाही स्फूरण चढून सद्ध्या सामान तरी घरी आलंय Proud आता पांढर्‍यावर काळं कधी होतंय बघू Happy

अरे मग मला का वाटतंय मी आदित्यचं एक चित्र इथे मायबोलीवर बघितलंय म्हणून. बहूतेक गॉगच्या चित्रावरून काढलं होतं.

अश्विनीताई तुम्हाला ताई नाही आवडलं का? ओके नुसते अश्विनी बोलते. पण मला बाई, ताई बोलु नका. करिना कपुरपेक्षा लहान आहे हो मी Lol

अल्पना, मुलगा काढतो छान चित्रं, (इथे एका गणेशोत्सवात टाकलं होतं त्याचं चित्र) पण मूडवर अवलंबून आहे... गेली ३-४ वर्षं गेलेला मूड परत आलेला नाहीये. पण हातात निसर्गदत्त कला आहे...
मुलं मोठ्यांचं पाहूनच शिकतात. या बाबतीत त्याच्या पुढ्यात बाबाचा भक्कम आदर्श आहे. बाबाच्या मूडाला जाऊन १०-१२ वर्षं होत आली. Proud

यशस्विनी Lol

लले, माझ्या मूडला जाऊन तर ऑलमोस्ट २० वर्षं झाली Proud रांगोळ्या मूडला जाऊन ६ वर्षं झाली.
तरी अजून तो मूड परत आणायचा प्रयत्न चाललाय म्हणजे किती हिम्मत आहे माझ्यात बघ! Proud

अगं मी आत्ता सगळे गणेशोत्सव धुंडाळायला लागले होते त्याचं चित्रं बघायला.

मुलं मोठ्यांचं पाहूनच शिकतात. या बाबतीत त्याच्या पुढ्यात बाबाचा भक्कम आदर्श आहे. बाबाच्या मूडाला जाऊन १०-१२ वर्षं होत आली>> चित्रं काढणं आणि मूड गेल्याने थांबवणं दोन्हीसाठी आदर्श मिळालाय वाटत. Happy

चित्रं काढणं आणि मूड गेल्याने थांबवणं दोन्हीसाठी आदर्श मिळालाय वाटत. >>> दुसर्‍या प्रकारच्या आदर्शासाठीच ते वाक्य टाकलं होतं. Wink (पहिल्यासाठी आदर्शाची आवश्यकता तशीही नव्हती :हाहा:)

Pages