नेताजींचे काय झाले?

Submitted by षड्जपंचम on 21 August, 2012 - 02:21

नेताजी सुभाषचंद्र बोस हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातला एक ज्वलंत आणि तेजस्वी अध्याय म्हणता येईल. ते फक्त एक सच्चे देशभक्त नव्हते तर एक क्रांतिकारी, जनसामान्यांपर्यंत पोच असलेले आणि भविष्याचा विचार करणारे सुधारणावादी नेते होते. ते एक असे नेते होते की ज्यांना जाती, धर्म, भाषा इ. बंधने तोडून लोकांनी स्वीकारले होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक स्वतंत्र सेना स्थापून मोठ्या स्तरावर ब्रिटीशांशी युद्ध पुकारणारा हा पहिलाच नेता!

नेताजींच्या मृत्यूबद्दल अनेक तर्क-वितर्क लढवले गेले आहेत. अर्थातच, नेताजींच्या तथाकथित मृत्यूनंतरही देशाचे अनेक वर्षे नेताजींवर तेवढेच प्रेम होते. परंतु नेताजींचं काय झालं याची पक्की माहिती कधीच जनतेला मिळाली नाही. ती मिळाली नाही का मिळू दिली गेली नाही हा एक महत्वाचा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम मिशन नेताजी नावाची एक संस्था करत आहे . काही पत्रकार व ह्या विषयावर खरी माहिती मिळवण्याची इच्छा असणारे लोक ह्या संस्थेत आहेत. ह्या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नेताजींच्या बाबतीत १८ ऑगस्ट १९४५ नंतर काय झालं ह्याची खरी माहिती भारत व इतर देशांच्या सरकारांकडून मिळवणे व ती जनतेसमोर आणणे.

कुतूहल म्हणून ह्या संस्थेच्या संकेतस्थळावर गेल्यावर बरीच काही माहिती मिळते. ह्या विषयावर थोडे वाचन केल्यावर जाणवते, की भारत सरकारला ह्या विषयावर जास्त चर्चा झालेली नकोच आहे. किंबहुना भारत सरकारने वेळोवेळी हा प्रश्न तापू न देण्याचाच प्रयत्न केलेला आहे.

नेताजींनी देशासाठी काय काय केलं ह्यावर बरेच ग्रंथ आणि लेख लिहिले गेले आहेत. नेताजींनी ब्रिटीश साम्राज्याविरोधी शक्तींची मदत घेऊन भारताला कायमच आणि संपूर्ण स्वातंत्र्य देण्याचे स्वप्न पाहिलं. ते प्रथम जर्मनीला गेले. तिथे जर्मनीची मदत मिळवली. जर्मनीची युद्धात माघार सुरु होताच त्यांनी जपान ला प्रयाण केलं व जपान ची मदत मिळवली. ह्या दोन्ही देशांनी नेताजींना दिलेली मदत पाहता त्यांच्या जबरदस्त व्यक्तिमत्वाची कल्पना येते. एकट्याच्या जिवावर दोन महाशक्तिशाली देशांची मदत मिळवणे आणि एक मोठी फौज तयार करणे, हे असामान्य प्रभावशाली व्यक्तिमत्व असल्याशिवाय जमूच शकत नाही. नेताजींच्या चाणाक्ष मनाने बऱ्याच गोष्टींचा अंदाज घेतला होता. दुसऱ्या महायुद्धात जपानची अवस्था बिघडल्यावर जगाच्या पाठीवर असा एकाच देश उरला होता की जिथे इंग्लिश आणि अमेरिकन वर्चस्व सहजासहजी पोहोचू शकत नव्हते. सोविएत रशिया. भारतीय स्वातंत्र्ययुद्ध जपानमधून जास्त काळ सुरू ठेवणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत नेताजींनी रशियास जायचे ठरवले असे म्हणतात. जपाननेही त्यांना ह्यासाठी मदत केली होती. प्रचलित समजानुसार विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

नेताजींच्या मृत्यूच्या चौकशी साठी सरकारने अनेक कमिट्या नेमल्या. पण मिशन नेताजी ह्या साईट प्रमाणे बऱ्याच नेताजी-प्रेमींनी हेच म्हणलंय की ह्या कमिट्यांनी कधीही पूर्ण समाधान करणारे पुरावे सादर केले नाहीत. किंवा त्यांना करू दिले गेले नसावेत.

परंतु बऱ्याच नेताजी प्रेमींनी हे कधीच मान्य केले नाही. पुराव्यांचा विचार करता हा अपघात आजच्या तैवान मध्ये झाला, पण तैवान ने म्हणले आहे की असा अपघात कधीच झाला नव्हता. नेताजींनी सुरक्षित पणे निसटावे म्हणून त्यांनी व जपानी अधिकार्यांनी हा बनाव रचला. तैवानच्या माहितीनुसार १८ ऑगस्ट ला तैवान मध्ये कुठलाही विमान अपघात झाला नव्हता. जपानी अधिकाऱ्यांनी इतकेच सांगितले की जो देह नेताजींचा म्हणून आणला होता त्याचा चेहरा इतका बिघडला होता की छातीठोकपणे हे कुणीच सांगू शकत नव्हते की हे नेताजी आहेत, वस्तुत: अपघात १८ ऑगस्ट ला झाला आणि जगाला ह्याची माहिती २३ ऑगस्ट ला मिळाली. ५ दिवस का लागले हा प्रश्न बऱ्याच लोकांना सतावतो. नेताजींच्या पत्नी एमिली बोस ह्यांनी सुद्धा हेच म्हणले आहे की नेताजी रशियाला पोचले होते. तिथे ते स्टॆलिन ची मदत मिळवण्याच्या प्रयत्नात होते. आजपर्यंत रशियात त्यांचे काय झाले ह्याची पुराव्यानिशी माहिती कधीच मिळू शकली नाही.

मिशन नेताजी मधील पत्रकारांच्या म्हणण्याप्रमाणे रशिया कडे नेताजींच्या बाबतीत काही classified फायली आहेत व त्या रशियाने कधी जगासमोर आणल्या नाहीत. भारताकडेही नेताजींच्या बाबतीत बऱ्याच फायली असून त्या ' सुरक्षेच्या दृष्टीने अति-महत्वाच्या' ह्या कारणास्तव भारत सरकार ने त्या कधीही समोर आणल्या नाहीत. ह्याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना भारत सरकारने ताबडतोब थांबवले. सी आय ए च्या अहवालांनुसार १९५० मध्ये बोस जिवंत होते व ते भारतात येण्याचा प्रयत्न करत होते. याबद्दलची सी आय ए ची कागदपत्रे मिशन नेताजी वाल्यांनी मिळवली व ती साईट वर आत्ता उपलब्ध आहेत. सी आय ए ने नंतरही एकदा बोस जिवंत असल्याचे म्हणले होते असे वाचनात आले आहे. ही साईट असेही म्हणते की भारताच्या इंटेलिजन्स ब्युरो चाही हे प्रकरण दडपण्यात मोठा सहभाग होता. मिशन नेताजी संकेतस्थळावरील माहितीचा विचर केला तर, सध्याच्या राष्ट्रपतीं सकट भारताच्या बऱ्याच राजकारण्यांना ह्या प्रकरणाची माहिती होती.

दुसरे महायुद्ध संपल्यावर सुभाषबाबू युद्ध-गुन्हेगारांच्या यादीत गेले. भारतानेही ह्याला मान्यता दिली आणि कधीही त्यांचे नाव त्या यादीतून काढण्याचे प्रयत्न केले नाहीत ! गांधींशी वाद झाल्याने सुभाषबाबूंना निवडून येऊन सुद्धा राष्ट्रीय सभेचा चा राजीनामा द्यावा लागला होता हे सर्वज्ञात आहे. सुभाषबाबू जहाल मतवादी होते, आणि शांततेची कबुतरे उडवून राष्ट्र सुरक्षित राहत नाही हे मानणार्यातले होते. त्यामुळे भारत सरकारचा उदासीन दृष्टीकोन फारसे अप्रूप वाटण्यासारखा नाही. हेही वाचले आहे, की भारतात येण्याबाबातीत प्रक्रिया सुलभ करण्यासाठी नेहरूंना नेताजींनी एक पत्र लिहिले होते. ते पत्र खरेच गेले होते का, ते काय होते व त्या पत्राचे काय झाले कुणास ठावे? नेताजींच्या बाबतीत ब्रिटन कडेही काही कागदपत्रे असून 'परराष्ट्र संबंधाच्या दृष्टीने महत्वाची' ह्या कारणास्तव त्यांनी ती कधीही समोर आणलेली नाहीत.

रशिया नंतर नेताजींचे काय झाले ह्याबाबत पक्की माहिती नाही. भारतात सरळ मार्गाने येणे अशक्य होते. कारण ते ठरले युद्ध-गुन्हेगार, तेही भारताने राजमान्य केलेले! साहजिकच गुप्तहेर संस्था त्यांच्या पाळतीवर ! त्यामुळे असे मानले जाते की त्यांचा रशियातच मृत्यू झाला असावा. ह्याबाबतीत केजीबी ला माहिती असल्याचे सांगितले जाते. एक मात्र खरं की त्यांच्या येण्याने बर्‍याच लोकांची अढळपदे ढळायची शक्यता होती.

दुसरा तर्क म्हणजे ते भारतात लपून छपून नेपाळमार्गे आले असावेत आणि गुप्त स्वरुपात राहिले असावेत. गुप्तपणे नजरेतून निसटणे हे त्यांना नवीन नव्हते. इंग्रजांच्या तावडीतून निसटून ते अनेक देश फिरले होतेच. भारतात सरळ मार्गाने येणे अशक्य होते. यामुळे त्यांना एक तर भारतात लपून ओळख बदलून येणे हा एकाच पर्याय असावा. हा समज विश्वसनीय मानणाऱ्या लोकांचा पुरावा म्हणजे म्हणजे गुमनामी बाबा. उत्तर प्रदेशात फैझाबाद येथे गुमनामी बाबा नावाचे साधू अचानक प्रकटले. ते कुठून आले ह्याची कुणालाही कल्पना नाही. ते एकटे एकटे राहणारे होते व लोकांमध्ये मिसळत नसत. ते बंगाली होते. त्यांना मोजक्याच व्यक्ती भेटण्यास येत असत व ते त्यांच्याशी पडद्याआडून बोलत असत. ह्या बाबांबद्दल लोकांना संशय होता की हे नेताजी आहेत. त्या बाबांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडील सामानात नेताजींचे अनेक खासगी फोटो, पत्रे आणि पुस्तके सापडली. एका मान्यताप्राप्त त्रयस्थ हस्ताक्षर तज्ञाने त्यांचे हस्ताक्षर नेताजींशी जुळत असल्याचे सांगितले. भारत सरकार ने लगेच दुसरा हस्ताक्षर तज्ञ नेमला आणि त्याचे हे विधान खोटे ठरवले. एका साधू कडे नेताजींचे खासगी दुर्मिळ फोटो आणि विविध जागतिक विषयांवरची इंग्रजी पुस्तके असण्याचा काय संबंध असावा हेही गुलदस्त्यात आहे. १९९९-२००५ मध्ये नेमलेल्या मुखर्जी कमिशन ने हे मान्य केले की विमान अपघात झालाच नव्हता. कारण, त्या काळाच्या लोकांना तसेच तत्कालीन तैवानी वृत्तपत्रांना अपघाताची काहीही खबर असल्याचे दिसले नाही. [मुखर्जी कमिशन चा अहवालच शेवटी सरकारने अमान्य केला! ] परंतु गुमनामी बाबा हे नेताजी असल्याचे मुखर्जींनी त्यांच्या रिपोर्ट मध्ये अमान्य केले. त्या साधूंची DNA टेस्ट निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. ह्याच मुखर्जींनी नंतर एका व्हिडिओ मध्ये मान्य केले आहे की त्यांना गुमनामी बाबा हे नेताजीच असल्याचे वाटत होते.

नेताजी जिवंत असतील तर समोर का आले नाहीत हा प्रश्न काही लोक विचारतात. पण हाही विचार केला पाहिजे की ते जरी जिवंत असतील आणि बऱ्याच काळानंतर भारतात परतण्यात यशस्वी झाले असतील, तरीही समोर येणे इतके सहज शक्य नव्हते. एक म्हणजे भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले होते, त्यामुळे ज्या उद्दिष्टासाठी ते लढले ते महायुद्ध् आणि आझाद हिंद फौजेच्या प्रभावामुळे का होईना साध्य झाले होते. तसेच त्यांना भारत सरकारने स्वत:च युद्धगुन्हेगार ठरवले असल्याने गुप्तचर यंत्रणा त्यांच्या पाळतीवर असणार. त्यांचे ताबडतोब हस्तांतरण होण्याची शक्यता असणार. स्वातंत्र्यानंतर २० - २५ वर्षांनी प्रकट होऊन देश हातात घेणे सुद्धा इतके सरळ नव्हतेच. त्यामुळे फक्त खळबळ माजली असती. स्वत:च्याच देशवासियांमध्ये गोंधळ निर्माण करायची त्यांना कदाचित आवश्यकता वाटली नसेल. मंत्रालयात असणारे पण स्वत:चेच कधी काळाचे साथी त्यांच्या सोबतीला उभे ना राहिल्याने वेळ खूप बदललेली होती. आझाद हिंद फौजेचा विरोध करणाऱ्या लोकांनी, नंतर देशभर गाजलेल्या त्या खटल्याच्या जिवावर प्रतिष्ठा मिळवून घेतली. नेताजी एक सच्चे देशभक्त होते. मी हे मिळवून दिलं, हे ओरडून ओरडून सांगण्यापेक्षा देशाला हे मिळालं ह्याचे समाधान मानणारयातले ते होते.

ही गोष्ट स्पष्ट आहे की नेताजी फक्त भारताच्याच नाही तर जागतिक राजकारणातील एक असामान्य व्यक्ती होते. जर्मनी, जपान इ. देशांनी त्यांची खास बडदास्त ठेवण्याचे कारण काय? भारताव्यतिरिक्त ब्रिटन, जपान, रशिया, अमेरिका ह्या सर्व सरकारांकडे त्यांच्याबाबतीत इतक्या साऱ्या गुप्त फाईल्स असण्याचे कारण काय?

नेताजींच्या अचानक पडद्यामागे जाण्यावर अनेक पुस्तकेही प्रसिध्द झाली आहेत. ह्या विषयावर माहितीची इच्छा असलेल्यांनी missionnetaji.org ला भेट द्यायला हरकत नाही. तेथे बरीच माहिती, दस्तऐवज आणि पत्रे सविस्तर स्वरूपात आहेत. शेवटी हा जुने-पाने उकरून काढायचा नाही, तर आपल्या आवडत्या नेत्याचे काय झाले ह्या बाबतीत माहिती मिळवण्याचा प्रयत्न आहे. खरे खोटे शोधून खाढणे अतिशय अवघड असले, तरी कुणीतरी ह्यावर काम करतंय ह्याची जाणीव असणे आवश्यक !

टीप: वरील सर्व माहिती इंटरनेट वरून घेतली आहे. अधिक माहिती इंटरनेट वर उपलब्ध आहे. ह्या विषयावर पुस्तके सुद्धा विक्रीसाठी इंटरनेट वर उपलब्ध आहेत. अनुज धार ह्या लेखकाची पुस्तके शोधावीत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजिंक्य आणि हिरा , खरेय !
वासुदेव बळवंत फडके वरचे मत तर १०१% अनुमोदन..

वैद्य,
लेख वाचला आपण दिलेल्या लिंक वरचा, या धाग्यावर आलेल्या सर्वात महत्वपूर्ण लिंक पैकी हि लिंक आहे असे मला वाटते. लिंकबद्दल धन्यवाद..

युद्धगुन्हेगाराच्या यादीत त्यांचे नाव होते ह्याला कोणताही पुरावा नाही. किंवा अफवा मुद्दाम पसरवण्यात आली असू शकते. >>> धक्कादायक आहे !
नेताजी आल्याने कांग्रेस वाल्यांची वाताहत झाली असती पण म्हणून इथपर्येंत कारस्थानं जाऊ शकत असतील तर औघड आहे.

इथे स्वातंत्र्यसैनिकांबद्दल काही मते व्यक्त झाली आहेत. आधीच अवांतर झालेच आहे तर या विषयावर थोडे लिहिले तर चालून जाईल असे वाटते. सगळेच स्वातंत्र्यसैनिक हे सशस्त्र संघर्ष करीत नव्हते. किंबहुना फारच थोड्यांनी सशस्त्र मार्ग अनुसरला होता. बहुतेकांनी सविनय कायदेभंग, जेल भरो, पिकेटिंग, कर न भरलेले मीठ विकणे, खाणे, तिरंगा (किंवा त्या काळात भारताचा म्हणून जो ध्वज ठरवला होता तो) फडकवणे अशासारखी कृत्ये केली म्हणून त्यांची धरपकड करण्यात आली. काहींनी सरकारी नोकर्‍या, उत्तम चालत असलेली वकिली, शाळा-कॉलेजे सोडली आणि ते गावोगाव लोकजागृतीसाठी फिरू लागले. निषेध म्हणून वकिलीच्या सनदा परत केल्या, रायबहादुर वगैरे खिताब परत केले. यामुळे त्यांना कारावास भोगावा लागला. उत्पन्नाचे साधन नाहीसे झाल्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. शिक्षणे अर्धवट राहिली म्हणून स्वातंत्रोत्तर काळात नोकर्‍या मिळणे कठिण झाले.
१९४२ची छोडो भारत चळवळ मात्र समाजवाद्यांनी भूमिगत राहून सश्स्त्र रीतीने चालवण्याचा प्रयत्न केला. पण इंग्रजांनी भराभर बिनीच्या नेत्यांना अटक करून चळवळ निर्नायकी करून टाकली आणि थोड्याच काळात तिचा जोम ओसरला.
मला असे म्हणायचे आहे की सशस्त्र मार्ग न अनुसरताही प्रचंड लोकजागृती होऊ शकली.
क्रांतिकारकांबद्दल पूर्ण आदर आहे. त्यांचे शौर्य आणि देशप्रेम यांना खरोखरच सीमा नव्हती. पण या पंथाशी संबंधित बरेच वाचन केल्यावर, गदर पार्टीचा इतिहास आणि कार्य समजून घेतल्यावर असे म्हणावेसे वाटते की हे लोक शूर आणि देशप्रेमी जरूर होते पण त्यांच्याकडे दूरदृष्टी नव्हती, आपसात संपर्क नव्हता. हे अर्थात साहजिक होते. गुप्तता आणि साधनांचा अभाव यामुळे असे घडले. वेगवेगळे गट वेगवेगळ्या ठिकाणी छोट्याछोट्या प्रमाणात कार्यरत होते. एकसंध असा परिणाम ते घडवून आणू शकले नाहीत. कोमागाटा मारू या जहाजाचे दारुण अपयश वाचताना हळहळ वाटते. (मराठीत वीणा गवाणकरांच्या 'नाही चिरा नाही पणतीमध्ये याचे वर्णन आहे.) वेडात मराठे वीर दौडले सात असा आत्मघातकीपणा यातून दिसतो. वेडाने कार्यसिद्धी होतेच असे नाही, पण धोरणीपणाने अन शहाणपणाने यशाची टक्केवारी वाढते. याउलट अहिंसक मार्गामध्ये खुलेपणा होता. लोक उघडपणे यात सामील होऊ शकत होते. स्त्रिया, हरिजन सर्वच आपला हिस्सा उचलू शकले आणि आपणही राष्ट्रासाठी काही करू शकतो हा आत्मविश्वास त्यांना आला. जनसमूहांचे असे एकजिनसी होणे, एकाच ध्येयाने प्रेरित होणे ही फार मोठी घटना या काळात घडली. शिवाय सशस्त्र युद्धात एका पक्षाची हार आणि दुसर्‍याची जीत ही असतेच. पण माणसाशी वैर नाही,धोरणांशी वैर असा पवित्रा घेतला की हारजितीची धार बोथट होते. 'नथिंग तु लूझ' अशी सिट्युएशन होते. असो. बरेच लिहिण्यासारखे आहे,पण पुन्हा केव्हातरी.

हीरा,

>> अहिंसक मार्गामध्ये खुलेपणा होता. लोक उघडपणे यात सामील होऊ शकत होते. स्त्रिया, हरिजन सर्वच आपला
>> हिस्सा उचलू शकले आणि आपणही राष्ट्रासाठी काही करू शकतो हा आत्मविश्वास त्यांना आला.

या अहिंसक मार्गाचा ब्रिटिशांना घालवण्यात कवडीइतकाही उपयोग झाला नाही.

आ.न.,
-गा.पै.

हिरा .. अगदी सुंदर पोस्ट

हीरा है सदा के लिये

........

अ‍ॅडमिनने अहिंसक मार्ग वापरुन घालवलेला ब्रिटिश पैलवान वारंवार येत आहे.
यालादेखील एखादा हिंसात्मक कडक कायदेशीर मार्ग वापरुन घालवुन टाकावे का ?
Proud

लोकहो,

>> अ‍ॅडमिनने अहिंसक मार्ग वापरुन घालवलेला ब्रिटिश पैलवान वारंवार येत आहे.
>> यालादेखील एखादा हिंसात्मक कडक कायदेशीर मार्ग वापरुन घालवुन टाकावे का ?

अ‍ॅडमिनने अहिंसक मार्ग वापरुन घालवलेला कावड्या बैलवान वारंवार येत आहे.
याला हिंसात्मक मार्ग वापरुन घालवुन टाकू नका. कावळे चिमण्यांची हिंसा केली जात नसते.

आ.न.,
-गा.पै.

अगदी अशीच अवस्था भारतातील स्वातंत्र सैनानींचीही झाली होती, त्यांना असंख्य यातनातुन जाव लागल !!
आप ल्या लोकाम्ची अशी पिळवणु क क रणार्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नव्हती !१
>>

कायदेशीर कारवाई? काय पण राव! त्यासाठी आपल्याला युद्ध पुकाराव लागल नसत का ब्रिटनविरुद्ध आणि नुसत पुकारून नाही तर जिंकाव लागल असत!

एकदा स्वातंत्र मिळाल्यावर ते मुळ स्वातंत्र सैनिक गेले पडद्याआड.

>> त्यांनी निर्णय घेतला राजकारणात न जाण्याचा. त्यामुळे आपण इतरांनी राज्य केल आणि उपभोगल असा आरोप नाही करू शकत. हा त्यांच्या योगदानाचा आणि निर्णयाचा अपमान ठरेल.

या अहिंसक मार्गाचा ब्रिटिशांना घालवण्यात कवडीइतकाही उपयोग झाला नाही. > मग काय इंग्लंड मधे बसुन उपयोग झाला ?

हे तर असे झाले क्रिकेट मॅच जिंकल्यावर टिव्हीवर पाहणार्‍यामुळे मॅच जिंकली आहे असे म्हणने

हीरा,

उत्तम पोस्ट. अहिंसेच्या तत्वज्ञानाने संपूर्ण भारताला कवेत घेतले होते. आणि त्यामुळे जो प्रचंड लोकसहभाग मिळाला होता त्यास तोड नाही. २१ मध्ये चौरीचौरा घडले नसते तर कदाचित स्वातंत्र्य तेव्हाच मिळू शकले असते अशी परिस्थिती झाली होती. असो.

बाकी, जे स्वातंत्र्य रक्त सांडून मिळत नाही त्याची किंमत रहात नाही, हे माझ वैयक्तिक मत.

पिकेश,

धन्यवाद. नेताजी युद्धगुन्हेगार नव्हतेच. आणि तसा खटला जबरदस्ती दाखल केला असता तर त्यांना त्यांची बाजू मांडण्याची पुरेपूर संधी मिळाली असती. अगदी नाझी, जपानी लोकांना त्यांचे म्हणणे पूर्ण मांडण्याची संधी दिली होती. त्यांनी खरच गुन्हे केले होते.

नेताजींनी युध्द पुकारल होत, ब्रिटनच्या भारतावरील बेकायदेशीर आणि अनैतिक राज्यावर. त्यांनी युद्धात कोणतेही गुन्हे केले नव्हते, जे जे भाग जिंकले, तिथल्या जनतेवर आझाद हिंद सेनेनी काहीही अत्याचार केलेले नाहीत. त्या भागात झालेले गुन्हे जपानी फौजेने केले.

ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर त्यांच्यावरील युद्धगुन्हेगार हा शिक्का मारला गेलाय असे जाणवते.

इवान, काउ,

अहिंसेने स्वातंत्र्य मिळाले असे वाटत आहे तर २१ किंवा ४२ मध्येच का नाही आपण स्वतंत्र झालो?

अनिरुद्ध वैद्य..

हिंसेने स्वातंत्र्य मिळाले असे वाटत आहे तर १८५७ मध्येच का नाही आपण स्वतंत्र झालो ?

हिंसेने स्वातंत्र्य मिळाले असे वाटत आहे तर १८५७ मध्येच का नाही आपण स्वतंत्र झालो ?
>>

१८५७ मध्ये जिंकले असते तर तेव्हा स्वातंत्र्य मिळाल असत. काय पण प्रश्न नका विचारात जाऊ. हरले की आपले लोक्स १८५७ मध्ये.

बाकी ४३ - ४७ असे कोणते आंदोलन झाले ज्याने ब्रिटिशांना भारत सोडून जाणे भाग पडले गेले?

प्रिय नेते मोदी तेंव्हा नसले तरी काय झाले ... काँग्रेसच्या कामांचे श्रेय मोदी फुकट घेत आहेच.

स्वातंत्रलढा , १८५७ , पानिपत , जरासंधवध, हिरण्यकश्यपुचा वध यांचेही श्रेय आता फक्त मोदीनाच दिले जाणार आहे.

हिंसेने स्वातंत्र्य मिळाले असे म्हणता येणार नाही हे जरी खरे असते तरी स्वातंत्र्य फक्त अहिंसेने मिळाले असे म्हणणे अगदीच हास्यास्पद आहे.

स्वातंत्र्य का मिळाले याबद्दल असलेली हि एक लिंक पाहावी,
यामध्ये तत्कालीन ब्रिटीश अधिकाऱ्यांना असे विचारण्यात आले कि १९४७ मध्येच तुम्ही भारत का सोडला.?
कारण त्यावेळी तर दुसरे महायुद्ध जिंकलेले होते,
१९४२ चे आंदोलन असफल झाले होते...
मग १९४७ मध्येच असे काय घडले कि तुम्ही भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला..?

यावर ब्रिटीशांनी असे सांगितले आहे कि, भारतात मूळ ब्रिटीश असलेले सैनिक अत्यंत कमी होते. सर्व जी फौज होती ती भारतीयच होती. हे लोक जोपर्येंत आपल्या बाजूने आहेत तोपार्येन्तच आपला टिकाव लागणार आहे याची पुरेपूर कल्पना ब्रिटिशांना होती..
आझाद हिंद सेनेच्या लढ्यामुळे सैनिकांमध्ये ब्रिटीश विरोध सुरु होत होता, नेव्ही मध्ये सुद्धा त्यावेळी उठाव झाला( या बद्दल मला सविस्तर माहिती नाही)
एकंदर परिस्थिती पाहून आपली हिंसेला बळी न पडता, शांतपणे जाण्याची हीच वेळ आहे असे हे त्यांनी ताडले व ते गेले..

https://www.youtube.com/watch?v=SKpl7v_c-Qo

मागच्या पोस्टीमध्ये हि लिंक एकदा दिलेली आहे. ज्यांनी पहिली असेल त्यांनी पाहू नये..

धन्यवाद!

पिकेश,

अनुमोदन. Happy सैन्यात बंडाळी व्हायला लागल्याने ब्रिटिशांना भारत आधिपत्याखाली ठेवण कठीण होणार याचा अंदाज होता. खालील लेख वाचल्यास नौदलात किती मोठी बंडाळी झाली होती ते दिसून येते.

http://en.wikipedia.org/wiki/Royal_Indian_Navy_mutiny

जवळपास कोचीन पासून कराचीपर्यंत भरपूर जण सहभागी झाले होते. जरी बंड अयशस्वी झाले तरी जो परिणाम व्हायचा होता तो झालाच.

The weekly intelligence summary issued on 25 March 1946 admitted that the Indian army, navy and air force units were no longer trustworthy, and, for the army, "only day to day estimates of steadiness could be made". The situation has been thus been deemed the "Point of No Return.

ती लिंक फॅनक्लब ची आहे. म्हणजे तयार केली गेलेली यावर विश्वास ठेवणे म्हणजे ब्लॉग वर विश्वास ठेवणे आहे. असे असेल तर अनिता पाटील यांचा ब्लॉग वर सगळेच विश्वास ठेवतील. चालेल का?

बेफिकीर, वैद्य धन्यवाद,

इवान ,
ती लिंक फॅनक्लब ची आहे. >> हे खरय , पण अजित डोवल बद्दल माहिती असलेले लोक नक्कीच यावर विश्वास ठेवतील. याचे कारण म्हणजे फॅनक्लब वगेरे भानगडी काढून प्रसिद्धी मिळवायला ते काही राजकारणी नाहीत. ते फक्त एक प्रखर देशप्रेमी आहेत.
तसेच हि विश्वासाची गोष्ट आपण प्रत्येक ग्रंथ , वेबसाईट याबद्दल उपस्थित करू शकतो. असो..

आपण या लिंकवर विश्वास न ठेवण्याचा निर्णय नक्कीच घेऊ शकता,
Royal Indian Navy Mutiny हि घटना गुगला, आपल्याला योग्य वाटेल त्या ठिकाणावरून वाचा अशी विनंती..

आपण डोवल फॅनक्लब वर अविश्वास दाखवू शकता, पण या घटनेवर नाही हे आपल्याला गूगलल्या नंतर लक्षात येईल.. Happy

पण अजित डोवल बद्दल माहिती असलेले लोक नक्कीच यावर विश्वास ठेवतील. > अजित डोवल बद्दल सगळ्यांनाच माहीती आहे. कृपया या भ्रमात राहु नका की माहीती फार कमी लोकांनाच आहे.

फॅनक्लब वगेरे भानगडी काढून प्रसिद्धी मिळवायला ते काही राजकारणी नाहीत. ते फक्त एक प्रखर देशप्रेमी आहेत. >>
फॅनक्लब हे डोवल यांनी स्थापन केलेला नाही आहे. जसे इतरलोकांचे फॅनक्लब असतात तसेच त्यांच्यानावाने देखील लोकांनी स्थापन केला आहे.

आपण या लिंकवर विश्वास न ठेवण्याचा निर्णय नक्कीच घेऊ शकता,
Royal Indian Navy Mutiny हि घटना गुगला, आपल्याला योग्य वाटेल त्या ठिकाणावरून वाचा अशी विनंती.. > परत भ्रमात राहु नका ही आपल्यालाच विनंती करत आहे. आपण जे वाचले आहे ते इतर कोणीच वाचले नाही अश्या कल्पनेत राहु नयेच.

अच्छा, आपल्याला सर्व गोष्टी माहित आहेत तर .. ओके ओके ..
माफ करा मला आपली पोस्ट वाचून असे वाटले कि माहित नाही..
कारण माझा मुद्दा हा सैन्यामधील असंतोष आणि उठाव हा होता, आपण त्यावर भाष्य न करता लिंक वर भाष्य केले, त्यामुळे माझा गैरसमज झाला.. क्षमस्व! Happy

http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/india-gate/entry/netaji-mur...

अतिशय परखड लेख
फॅनक्लब वाली लिंक चालु शकते तर ब्लॉग वाली देखील चालायला हवी
अर्थात काही लोकांना पचनार नाहीच त्यांचा नाईलाज आहे Rofl

नेतजिन्ना असे परागंदा होवुन मरन आले याचे खुप दुख्ख वाटते.त्यांचे निर्दालन करनारे इथलेच होते आनि तीरडी वर जाइ पर्यंत राज्य केले.देव त्यांच वाइट करो.

लेख वाचला, पटलासुद्धा.. ..
पण हसू आले मला तुमचे .. विषय काय बोलताय काय..
खूपच फस्ट्रेट झालेले दिसताय मोदींमुळे .. Lol

Pages