कही जाम छलक न जाए

Submitted by कंसराज on 11 August, 2012 - 23:18

कलर पेन्सील स्केच

प्रिझ्मा कलर पेन्सील वापरल्या आहेत. आशा करतो की तुम्हाला आवडेल.

स्टेप १

स्टेप २

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रेट!! अतिशय प्रोफेशनल. उजवीकडची लिंबं आणि डावीकडे ग्रीन अ‍ॅपल आहे ना?
तुम्ही कागद पांढरा वापरलाय की ग्रे? तुम्ही काही प्रोटेक्टीव्ह फिक्सर किंवा स्प्रे वापरता का चित्र जतन (प्रिझर्व)करण्यासाठी?

हे चित्र मी आता बघितले आणि बघतच बसले.......... हे पेन्सिल चित्र आहे हे तुम्ही सांगितले म्हणुन कळते नाही तर कोणीतरी फोटो क्लिक केला आहे असे वाटते..... तुम्ही खुप अनुभवी दिसता या माध्यमात ,अजुन अशी चित्रे शेअर करा ना प्लीज आणि हो तुमचे हे माध्यम वापरताना आलेले अनुभव देखील शेअर करा, वाचायला आवडेल.

अशक्य सुंदर ! अप्रतिम !
सगळी विशेषणे मार खातील अशी कलाकृती आहे.
हा फोटो नसून स्केच आहे यावर अजूनही विश्वास बसत नाहीये.
दक्षिणा +१००००

चित्र कसलं फोटोच आहे तो Wink Wink

फारच सुरेख रेखाटलंय - डोळ्याला / मनाला पुन्हा पुन्हा बजवावं लागतंय - हे चित्रंच आहे, फोटो नाहीये.....

वा! अप्रतिम. शब्दच नाहीत.
रंगित पेन्सिल सारख्या माध्यमातुन काढलेले तर अजिबात वाटत नाही. तुमची इतर चित्रेही पहायला आवडेल. Happy

मला, पहिला फोटो बघुन खाली दोन स्टेपमधे चित्र काढले आहे असं वाटत होतं पण प्रतिक्रिया वाचुन समजल की पहिल पण चित्रच आहे. यावर मी फक्त ____/\____ करु शकते. (शब्दच नाही आहेत प्रतिसादासाठी )

Pages