समुद्रमेथी/बाटलीमेथी

Submitted by मनी on 7 August, 2012 - 21:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ दिवस
लागणारे जिन्नस: 

एक मोठी काचेची बाटली, झाकण नको, पातळ कापड किंवा जाळी, जाड रबरबँड किंवा दोरा, २ टेस्पू मेथी, २ कप पाणी किंवा मोड आलेल्या मेथ्या ३-४ टेस्पून

क्रमवार पाककृती: 

दिनेशदांनी समुद्रमेथीची आठवण करून दिल्यापासून केव्हा ही मेथी उगवतेय आणि भाजी बनवतेय असं झालं होतं, तेव्हा मी थोड्या मेथ्या कॉस्टकोच्या पालकाच्या डब्यात माती टाकून पेरल्या होत्या, त्याही छान झाल्या होत्या. मग एक jar sprouting ची पोस्ट माझ्या चेपुवर आली आणि म्हटलं एकदा करून तर बघूया आणि ते इतकं मस्त जमलं की आता दर पंधरा दिवसांतून एकदा असतेच. एकदा उगवली की फ्रिजमध्ये ही बरेच दिवस टिकते. बिनमातीची आणि घरात खुपच छान उगते.

मी आधी मेथ्यांना उसळीसाठी मोड आणून घेतले होते तेच वापरले होते. एका बाटलीत मेथ्या टाकून त्या बाटलीला जाळीचा कापड बांधायचा. मग त्या बाटलीत पाणी टकून चकलीसारखं गोल-गोल फिरवायचं (Swirl) म्हणजे सगळ्या मेथ्यांना पाणी मिळेल, मग बाटली पलटून ते पाणी काढून टाकायचं...
हे दिवसातून दोनदा करायचं , एकदा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना, बाहेर फार उष्णता असेल तेव्हा दिवसातून चारदा करावे. किचन काउंटरवर उन्हाची तिरिप येत असेल तर तेथे ठेवावे पण खुप उन्हात ठेवू नये. ३-४ दिवसांत समुद्रमेथी किंवा बाटलीमेथी Lol तयार होते, फक्त जमिनीत येतात तेव्हढी मोठ्ठी पाने येणार नाहीत.
याची भाजी तर अतिशय छान लागली.

मेथी

हा फोटो या ब्लॉगवरून घेतला आहे, जार कसे ठेवावे ते दाखवण्यासाठी...http://adkjerseygirl.wordpress.com/

या मेथीच्या भाजीची कृती खालीलप्रमाणे;

२-३ मुठ भाजी
३-४ पाकळ्या लसूण
२ मिरच्या,
१ मध्यम बटाटा
१ मध्यम टोमॅटो
१ टेस्पून खवलेला नारळ
तेल, राई, जीरे

कृती:
तेलात लसुण, मिरची, राई-जीर्‍याची फोडणी करून घ्यावी.
त्यात कांदा टाकून गुलाबी रंगावर परतून घ्यावा, मग त्यात टोमॅटो टाकून परतावा.
आता बटाटा बारिक चिरुन घालावा.
बटाटा नीट शिजला की चिरलेली मेथी घालावी. मिठ घालून झाकण ठेवून शिजवावे.
भाजी तयार आहे.

इथेच विद्याकने दिलेली घावणाची पाकृ
ताकात रवा १-२ तास भिजत घालायचा त्यात कांदा, हि.मिरची, मेथी, टोमॅटो,आले,कोथींबीर चिरुन टाकायची चवीपुरते मीठ्,साखर ,२-३ चमचे तेल टाकुन घावण (उत्तप्पे) टाकावे. तुम्हांला कितीही धन्यवाद दिले तरि अपुरेच पडतील.

रुनीने मुंबईला या भाजीच्या बेसन घालून केलेल्या, तेलावर जरा परतलेल्या वड्या खाल्ल्या होत्या.

ही भाजी नुसतीच परतून एव्हढी छान लागणार नाही बहुधा.

Happy Sprouting Happy

वाढणी/प्रमाण: 
१-२
माहितीचा स्रोत: 
Backyard Diva Blog
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी कडधान्यांसारखंच मेथ्यांना मोड आणत असावेत >>> मी तरी मूग/मटकीसारखीच पद्धत वापरते. मसूर आणि मेथ्यांना कधी-कधी जास्त वेळ लागतो पण तरी पद्धत तीच.

बाटली पद्धत मला वाटतं थोडे लंबाडे मोड आणि पानं येण्यासाठी असावी.

मेथ्यांना काही स्पेशल ट्रीटमेन्ट लागत नाही. फार सहज मोड येतात. >>> +१
सिंडरेला +१..
मनी, तुम्ही दिलेली माहीती छानच आहे, करुन बघेन कधीतरी हे बाटलीचं पण.

उन्हात (प्रकाशात ) ठेवले तरच क्लोरोफिल तयार होईल व पाने येतील, अंधारात ठेवले तर नुसते पांढरे मोड येतील.

मनी,खुप छान माहीती दिलीत नक्कि ट्राय करुन बघेन.
मट्की ला ही या प्रकारे मोड येतील का? कारन मी फड्क्यात गुंडाळुन ठेवते नेहमी सारखी पण मोड च येत नहि..

हे सँडविच मध्ये भरून छान लागते.

अवाकडो, टोमॅटो, काकडी, ही मेथी, सँडविच मसाला टाकून मस्त होते जेवण. ऑफीसजवळ मिळायचे एका नॅचरल फूड्स असे दुकान होते. तेव्हा पासून मी पण स्प्रॉउट जार आणून करते असे.

हे दिवसातून दोनदा करायचं >> म्हणजे फक्त हलवणं की पाणी टाकून हलवणं ?
मी आत्ता करतेय हा प्रयोग. पण ह्या वाक्यावर गाडी अडली आहे.
मेथ्यांना मोड येत असताना त्यात पाणी टाकून हलवायचं का परत ? (किती तो अडाणीपणा :इश्श:)

फार खळबळ नाही धुवायचे, (नाहीतर मोड मोडतील) एकदाच पाणी टाकून ते ओतून टाकायचे. थोडक्यात दमटपणा ठेवायचा. (नाहीतर मोड सुकतात.) पाणी टाकून ओतताना, धान्य हलतेच. जर हलवले नाही तर खालच्या धान्यांवर वरच्या धान्यांच्या वजनाचा भार येतो.

सॉरी रुणुझुणू, मी पाहीलाच नाही तुझा प्रश्न.. दिनेशदा सांगतायत तसं हळूवार हलवायचे. छोटे मोड तर असेच येतात कडधान्याला पण ही पध्दत मोठे मोड/ स्प्राउट्स आणण्यासाठी वापरतात.

मनी

दिनेशदा, मनी धन्यवाद.
काल मेथ्या ठेवल्यात बाटलीमध्ये. बघू आता काय काय होतं ते.
मेथ्यांना लांब-लांब दाढीमिशा येणार म्हणून माझ्यापेक्षा लेकच जास्त एक्साइट झालाय Lol

वा. मस्त, अशा बाटलीमेथ्या करुन बघेन.
दिनेशदा>>अशाच पद्धतीने मूगाला छान मोड येतात. अगदी बीन स्प्राऊट्स म्हणतात तसे. फक्त मूगाची बाटली उन्हात ठेवायची नाही.>> ही नवीन माहीती.

मनी खुप खुप धन्यवाद बरं का. आता पुढचे काही महिने म्हणजे घरचे कंटाळेपर्यन्त मेथीच मेथी घरी. Proud
स्वच्छ सोपी सहज हायजिनिक आणि काय काय अशेवे ही घरगुती मेथी Happy

माझी झाली तयार C.JPGA.JPGB.JPG

माझ्या बरण्यांमधे जरा गर्दी झाली होती पण पुढच्यावेळी कमी मेथ्या घ्यायला हव्या. .
मी फ्रिजात भाज्या ठेवायच्या जाळीच्या पिशव्या वापरल्या.
सहज मनात आलं की बरणीऐवजी ह्या पिशव्याच वापरल्या तर? रोज पाण्याखाली धरायच्या दोनदा. कदाचित बरण्यांपेक्षा हे जास्त सुटसुटीत होईल काय?

मी भिजत घातलेल्या मेथ्यांनाही सणसणीत मोड आले आहेत. पण मी कॅसरोलमध्येच ठेवल्या होत्या. मूग/ मटकीपेक्षा एक दिवस जास्त लागला. 'मेथ्या' इतकंच शोधलं उजवीकडच्या बॉक्समध्ये तर केवढ्यातरी पाककृती मिळाल्या आहेत. आज त्यातले काहीतरी एक घडेल.

मनीषा, थेट पिशव्याच वापरल्या, तर मेथ्यांना हवा लागत राहील आणि मोड येण्यासाठी आवश्यक असणारा दमटपणा मिळणार नाही मेथ्यांना.

पुनम हो बरोबर. ते ल्क्षातच आलं नाही माझ्या. Sad

तू त्याच मोठ्या मोड आल्देल्या मेथ्या बाटलीत ठेऊन बघ ना. पानही येतील

पूनम, प्रकाशात ठेवाव्याच लागतील. डायरेक्ट ऊन नाही लागलं तरी चालेल. आमच्याकडे मेथ्यांना छोटी छोटी हिरवी पानं तर आली आहेत पण मोड मूळ फोटोत दाखवल्याइतके लांब नाही झाले. मनीषाच्या फोटोत दिसत आहेत तशी झालीय मेथी. दिवस सुद्धा सहा लागले. अजून काढली नाहीये मी. मोड अजून लांब व्हायची वाट बघावी की उद्या खायला काढावी ?
फोटो टाकते जरा वेळाने.

मनीषा, अगो: हिरवी झाली आहे मेथी. मी कॅसरोलचे झाकण काढून वर फडके घालून उन्हात ठेवली होती. एकूण प्रोसेसला तीन दिवस लागले.

हेकाय... ही मेथी अजून थोडे दिवस बाटलीत ठेवलीस ना तर अजून मोठे होतील पण भाजी केलीस तरी चालेल, बाटलीत त्या दाटल्या होत्या बहूतेक कारण माझी मेथी ३-३.५ इंच झाली होती ४-५ दिवसांत... पण मेथीचं पिक कसलं भारी आलंय.

अगो: आता मेथी वापरायला काढलीस तरी चालेल, ७ दिवस भरपूर झाले.

धन्यवाद ट्राय करून पाहील्यबद्दल... :))
रुणू, तू परत टाकलीयेस कां मेथी?

मी चाळणीतच केली. आज चौथ्या दिवशी ही छोटी पानं आलीत. आज सकाळपासून झाकण न लावता बाहेर उन्हात ठेवली होती. तासा-तासाने पाणी शिंपडले.

methya_0.JPG

मामी Lol
मनी, मी मेथीची भाजी तू सांगितलेल्या पद्धतीने केली. एकदम भारी झाली होती. आता पुढच्यावेळी मंजूडीने सांगितल्याप्रमाणे आंबोळ्या करणार Happy

Methi.jpg

स मे घालून भाजणीची थालिपीठं केली. उरलेल्याचं उद्या काही तरी करणार. भारी आयड्या आहे ही मेथी उगवायची. तुम्हाला खूप धन्यवाद Happy

भारीच आयडिया!!! Happy

मी बॅकयार्डात व्हेजी पॅच मधे मेथी लावते..किंवा स्प्राऊटिंग कंटेनर्स मधे नुसते मोड आणते... आता बाटलीत लावुन बघते...

मामी Lol सगळेच बाटलीवाले.....

मामी >> Lol बाटलीचा नाद बर्रा हाय हा ..
रुणू.. बाप्रे तुझा परत फसला प्रयोग.. देवा,अब मेरा क्या होगा!!!!
श्री मेथीमाँ प्रसन्न!!' म्हणतेय मनात..आज मी पण भिजत घातलीये.. ,'

Pages