एक मोठी काचेची बाटली, झाकण नको, पातळ कापड किंवा जाळी, जाड रबरबँड किंवा दोरा, २ टेस्पू मेथी, २ कप पाणी किंवा मोड आलेल्या मेथ्या ३-४ टेस्पून
दिनेशदांनी समुद्रमेथीची आठवण करून दिल्यापासून केव्हा ही मेथी उगवतेय आणि भाजी बनवतेय असं झालं होतं, तेव्हा मी थोड्या मेथ्या कॉस्टकोच्या पालकाच्या डब्यात माती टाकून पेरल्या होत्या, त्याही छान झाल्या होत्या. मग एक jar sprouting ची पोस्ट माझ्या चेपुवर आली आणि म्हटलं एकदा करून तर बघूया आणि ते इतकं मस्त जमलं की आता दर पंधरा दिवसांतून एकदा असतेच. एकदा उगवली की फ्रिजमध्ये ही बरेच दिवस टिकते. बिनमातीची आणि घरात खुपच छान उगते.
मी आधी मेथ्यांना उसळीसाठी मोड आणून घेतले होते तेच वापरले होते. एका बाटलीत मेथ्या टाकून त्या बाटलीला जाळीचा कापड बांधायचा. मग त्या बाटलीत पाणी टकून चकलीसारखं गोल-गोल फिरवायचं (Swirl) म्हणजे सगळ्या मेथ्यांना पाणी मिळेल, मग बाटली पलटून ते पाणी काढून टाकायचं...
हे दिवसातून दोनदा करायचं , एकदा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना, बाहेर फार उष्णता असेल तेव्हा दिवसातून चारदा करावे. किचन काउंटरवर उन्हाची तिरिप येत असेल तर तेथे ठेवावे पण खुप उन्हात ठेवू नये. ३-४ दिवसांत समुद्रमेथी किंवा बाटलीमेथी तयार होते, फक्त जमिनीत येतात तेव्हढी मोठ्ठी पाने येणार नाहीत.
याची भाजी तर अतिशय छान लागली.
मेथी
हा फोटो या ब्लॉगवरून घेतला आहे, जार कसे ठेवावे ते दाखवण्यासाठी...http://adkjerseygirl.wordpress.com/
या मेथीच्या भाजीची कृती खालीलप्रमाणे;
२-३ मुठ भाजी
३-४ पाकळ्या लसूण
२ मिरच्या,
१ मध्यम बटाटा
१ मध्यम टोमॅटो
१ टेस्पून खवलेला नारळ
तेल, राई, जीरे
कृती:
तेलात लसुण, मिरची, राई-जीर्याची फोडणी करून घ्यावी.
त्यात कांदा टाकून गुलाबी रंगावर परतून घ्यावा, मग त्यात टोमॅटो टाकून परतावा.
आता बटाटा बारिक चिरुन घालावा.
बटाटा नीट शिजला की चिरलेली मेथी घालावी. मिठ घालून झाकण ठेवून शिजवावे.
भाजी तयार आहे.
इथेच विद्याकने दिलेली घावणाची पाकृ
ताकात रवा १-२ तास भिजत घालायचा त्यात कांदा, हि.मिरची, मेथी, टोमॅटो,आले,कोथींबीर चिरुन टाकायची चवीपुरते मीठ्,साखर ,२-३ चमचे तेल टाकुन घावण (उत्तप्पे) टाकावे. तुम्हांला कितीही धन्यवाद दिले तरि अपुरेच पडतील.
रुनीने मुंबईला या भाजीच्या बेसन घालून केलेल्या, तेलावर जरा परतलेल्या वड्या खाल्ल्या होत्या.
ही भाजी नुसतीच परतून एव्हढी छान लागणार नाही बहुधा.
Happy Sprouting
मस्त. करुन पाहणार. थँक्स
मस्त. करुन पाहणार. थँक्स मनी.
भाजी कशी केली?
मस्त मस्त, चित्र पाहुन चांगली
मस्त मस्त, चित्र पाहुन चांगली कल्पना आली, धन्स मनी
रैना, भाजी एकदम सोप्पी
रैना, भाजी एकदम सोप्पी आहे...
लसणाची फोडणी करून मिरची, कांदा परतायचा, कांदा गुलाबी झाला की टोमॅटो आणि बटाटा बारिक चिरुन परतायचा. हळद टाकायची. मग ही चिरलेली भाजी टाकायची, जरा झाली की मिठ टाकून २-३ मि. झाकून ठेवाय्ची. भाजी तयार... भाकरीसोबत तर अम्म्म्म्मेझिंग लागते...
नुसत्या मोड आलेल्या मेथ्यांची
नुसत्या मोड आलेल्या मेथ्यांची उसळ नेहमी होते आमच्याकडे. अशा पद्धतीने भाजी करुन बघेन एकदा.
एकदम सह्हीच. शिवाय माती, वाळू
एकदम सह्हीच. शिवाय माती, वाळू काढा ही भानगडच नाही.
अतिशय म्हणजे अतिशयच आवडलं हे प्रकरण. आता घरचीच मेथी - नेहमीच.
खूप खूप धन्यवाद, मनी.
करुन पाहीन मनी. मस्त आयडिया
करुन पाहीन मनी. मस्त आयडिया आहे.
सहिचे... बारिक मेथी ला अशिच
सहिचे...
बारिक मेथी ला अशिच बारकी - बारकी पानं असतात..
मस्त! मस्त!! इकडे सहज मिळते,
मस्त! मस्त!!
इकडे सहज मिळते, पण ह्या अश्या प्रकाराने घरी करून बघायला हरकत नाही.
ही मेथी घालून आंबोळ्या/ धिरडी एकदम मस्त चविष्ट होतात. म्हणजे आमच्याकडे ही समुद्रीमेथी भाजीसाठी न आणता आंबोळ्यांसाठीच आणली जाते.
मनी, great idea, पण बाटलीत
मनी, great idea, पण बाटलीत पाणी ठेवायचे नाही का?
मस्त आयडिया. पण ही मोडांसकटच
मस्त आयडिया. पण ही मोडांसकटच फोडणीला द्यायची ना? कारण पाने फार मोठी नाही दिसत आहेत.
दिनेशदांच्या समुद्र मेथीची लिंक मिळेल का?
मनी..भाजी फार कडू लागते
मनी..भाजी फार कडू लागते का????
माझा प्रयत्न आवडल्याबद्दल
माझा प्रयत्न आवडल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद...
दीपा: बाटलीत पाणी ठेवायचे नाही.
संघमित्रा: हो हो अगदी मुळांसकट घ्यायची, काहीच फेकायचे नाही.
मंजुडी: मुंबईत तर ५-१० रुपयांना कितीतरी जुड्या मिळतात पण इकडे खायची हौस भारी म्हणून असले प्रयोग करावे लागतात :))
अवनी: अगं मुंबईच्या मेथीला जरा २-२ बारकीच पण आकाराने मोठी पानं असतात, बहुतेक ती भाजी वाळूतली असते म्हणून, या भाजीला तेव्हढी पोसलेली पानं नाही आली पण हेही नसे थोडके :))
माती लागत नाही म्हटल्यावर
माती लागत नाही म्हटल्यावर नक्की करून बघणार.
बाटलीत पाणी ठेवायचं नाही ना ?>> +१
भाजी फार कडू लागते का???? >> +१
ओह...पाण्याचं उत्तर कळलं. कडू
ओह...पाण्याचं उत्तर कळलं.
कडू लागते का तेवढं सांगा
नाही लागत रुणू.. भाजी मस्त
नाही लागत रुणू..
भाजी मस्त होते एकदम याची..
पुण्यात पण मिळत नाही असली मेथी.. मी पण हा प्रयोग करुन बघ्णार..
कडू म्हणजे साधारण मेथीसारखीच
कडू म्हणजे साधारण मेथीसारखीच पण चवीत फरक असतो.
अरे वा बाटलीत ठेवायची कल्पना
अरे वा बाटलीत ठेवायची कल्पना आवडली.
मी एका पसरट भांड्यात ठेवले होते दोनदा. पण तेव्हा उन्हाळा असल्याने बरिचशी सुकलीच. आता बाटलीत ठेवुन बघते.
याप्रमाणे बर्याच धान्यांचे मोड आणुन करुन बघता येईल.
धन्यवाद
ओक्के. धन्यवाद
ओक्के. धन्यवाद
क्या बात है मनी. याला म्हणतात
क्या बात है मनी. याला म्हणतात हौस !!!
अशाच पद्धतीने मूगाला छान मोड येतात. अगदी बीन स्प्राऊट्स म्हणतात तसे. फक्त मूगाची बाटली उन्हात ठेवायची नाही.
आणि मी यासाठी मिनरल वॉटरच्या बाटल्या, वरचा भाग कापून वापरतो.
मला पण सॉलिडच आवडला हा
मला पण सॉलिडच आवडला हा प्रकार.
आजच मेथ्या भिजत टाकायचा विचार आहे. मोड काढूनच वापरेन. ऊन हवेच असे आहे का ? कारण इथे उन पडत नाही फार. बाल्कनीतल्या प्रकाशात ठेवली तर थंडीही लागेल. उबदार नाहीये. कुठे ठेवू मग बाटली ?
अगो, ओव्हन जरासा गरम कर आणि
अगो, ओव्हन जरासा गरम कर आणि मग त्यामध्ये ठेव.
मी कधीच मेथ्यांना मोड आणले नाहीयेत म्हणून हा प्रश्न- बाकी कडधान्यांना येतात त्या पद्धतीने मेथ्यांना मोड येत नाहीत का? त्यासाठी वेगळी पद्धत का लागते? सिरियसली विचारत आहे.
मस्त. करुन बघते लग्गेच.
मस्त. करुन बघते लग्गेच. बाहेरच्या समुद्रमेथीच्या जुड्या स्वछ करण्यात फारच कष्ट खर्ची पडतात. हे सोप्पय :०)
पूनम, अगं ह्या मेथीला हिरवी
पूनम, अगं ह्या मेथीला हिरवी पानं येतात म्हणजे नैसर्गिक प्रकाश लागणार ना ? अवनमध्ये ठेवून होईल का ? ( झाडं लावण्याचा शून्य अनुभव आहे. प्लीज हसू नका प्रश्न चुकीचा वाटला तर ... )
मी हल्ली उपसलेली कडधान्यं कॅसेरॉलमध्ये बंद करुन मोड आणते. कपड्यात बांधून झाकून वगैरे नाहीच जमत इकडे मलातरी. भारतात जमेल उबदार हवेमुळे. कॅसेरॉल पद्धत वापरायला लागल्यापासून मेथीला मोड आणले नाहीयेत. आज करुन बघते.
सही आयडिया! मस्त ! आजच करते .
सही आयडिया! मस्त ! आजच करते . धन्यवाद गं
अगो, स्टेज २ पर्यंत
अगो, स्टेज २ पर्यंत ओव्हनमध्ये ठेवू शकतेस, मग बाहेर ठेव. मग येतील पानं असं वाटतंय.
मी आज मटकी/ मूग भिजवतो तशा भिजवून बघते मेथ्या. त्यांना बाटलीची स्पेशल ट्रीटमेन्ट का हे मला शोधायचं आहे
पूनम, मूग/ मटकीला मोड येतात
पूनम, मूग/ मटकीला मोड येतात त्यापेक्षा मेथ्यांना मोड यायला जास्त वेळ लागतो. म्हणजे आज सकाळी मेथ्या भिजत ठेवल्या तर उद्या सकाळी त्या उपसायला होतात असा अनुभव आहे.
आणि वर फोटो दिला आहे त्यात मेथ्यांच्या बाजूला मिश्र कडधान्य पण दिसत आहेत. म्हणजे बाटली ट्रीटमेंट बाकी कडधान्यांनाही चालेल. किंवा उलट, बाकी कडधान्यांसारखंच मेथ्यांना मोड आणत असावेत.
ओके पूनम
ओके पूनम
सही आयडिया...........
सही आयडिया...........
दोन चमचे मेथी ची किती उसळ
दोन चमचे मेथी ची किती उसळ होईल? किती लोकाना पुरेल?
( प्रश्न माणसाबाबत आहे. शेळीबाबत नाही.)
मेथ्यांना काही स्पेशल
मेथ्यांना काही स्पेशल ट्रीटमेन्ट लागत नाही. फार सहज मोड येतात. माझ्या ओव्हरनाइट भिजवलेल्या मेथ्या नुसत्या उपसून ठेवेलेल्या एक दिवस बोलमधे राहिल्या होत्या - जाळीबिळी नाही, विशेष उबदार जागी नाही, अंगासरशी होतं तेवढंच काय ते पाणी - तरी त्यांना संध्याकाळपर्यंत सुंदर मोड आले होते.
Pages