"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. त्यात मावळ प्रातांतला पाऊस हा तर "उडत्या पक्ष्याच्या पंखावर शेवाळं साठवणारा"!!.
अर्जुनाच्या तीरासारखा टोचणारा पाऊस, द्रौपदीच्या मोहक हास्यासारखे खळाळते निर्झर, युधिष्ठीरासारखा सच्चा सह्याद्रीचा निसर्ग, भीमाच्या गदेसारखा अंगावर वार करणारा भन्नाट रानवारा, नकुल-सहदेवासारखा आषाढ-श्रावणातला पाऊस. अशावेळी जर पुन्हा एकदा "पावसाळी भटकंती"चे "महाभारत" घडले तर बिघडले कुठे?
लोहगडाचा रांगडेपणा, लाडक्या पवनाचा नाजुकपणा
लवासाची नवलाई, मुळशीची हिरवाई
काळ्या मातीचा चिखलस्पर्श, हिरवी भातशेती पाहुन मनाला हर्ष
कधी कंटाळवाणा, तर कधी आनंददायी प्रवास
निसर्गाच्या सान्निध्यात घेतलेला मोकळा श्वास
झणझणीत बटाट्याचा रस्सा अन् ज्वारीच्या भाकरीचा फडशा
गरमागरम वरण अन् घरच्या तांदळाचा मऊसुत भात
लोणच्याची फोड त्याला पापड कुरडईची साथ
ताम्हीणी घाटातली धुक्याची अन् धोक्याची वाट
तिथे कोसळणार्या धबधब्यांचा आगळाच थाट
पाली बल्लाळेश्वराच्या दर्शनाने झाली पावसाळी भटकंतीची सांगता
हिरवा निसर्ग, खळाळणारे झरे विचारतात पुढची भटकंती "कधी आता"?
थोडक्यात काय तर अजुन एक "पावसाळी विकएण्ड" मावळ प्रांतात सत्कारणी लागला.
४-५ ऑगस्टच्या विकएण्डला लोहगड,पवना, मुळशी,लवासा,ताम्हिणी घाट, बल्लाळेश्वर पाली अशी भटकंती - मायबोलीकर सुर्यकिरण यांच्या घरचा पाहुणचार, त्याच्या शेतात पायी भटकंती, काकूंच्या हातचे गरमागरम जेवण अशा प्रकारे हि भटकंती संपन्न जाहली.
सुर्यकिरण, धन्स रे!!!!
दाट धुके, धुंदकुंद वातावरण, कोसळणारा पाऊस यामुळे फोटो नीट काढता आले नाही, पण who cares , डोळ्यांच्या अपेर्चरने, ह्रदयाच्या शटरस्पीडने, नजरेच्या कॉंपोझीशनने, मनाच्या मेमरी कार्डमध्ये साठवलेले हे विलक्षण फोटो आणि क्षण मात्र नेहमीच आनंद देणारे असणार आहेत.
=======================================================================
=======================================================================
लोहगड
प्रचि ०१
प्रचि २
प्रचि ०३दुधिवरे
प्रचि ०४
प्रचि ०५पवना परीसर
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९सुर्यकिरण याचे शेत
प्रचि १०शेतातली विहिर
प्रचि ११लवासा सीटीच्या वाटेवर
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८मुळशी जलाशय
प्रचि १९ताम्हिणी घाट
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
पहिला प्रचि भन्नाट, अफलातुन..
पहिला प्रचि भन्नाट, अफलातुन.. सगळेच प्रचि मस्त आहेत रे... खुप सुंदर..
मस्तच सुक्या आम्ही कधी येउ
मस्तच

सुक्या आम्ही कधी येउ
प्रसन्न वाटले फोटो बघुन.
प्रसन्न वाटले फोटो बघुन. सुंदर
मस्तच
मस्तच
आ हा हा - काय मस्त फिरलात
आ हा हा - काय मस्त फिरलात रे...., वर्णन, प्र चि अप्रतिम.....
...पण फोटो लहान का दिस्ताहेत - का माझ्या संगणकाचा दोष ???
सुकि भाऊ भाग्यवान आहात बुवा.....
वॉव! पहिलेच प्रचि कस्ले
वॉव! पहिलेच प्रचि कस्ले खल्लास!! मस्त!!
भटकंतीचे वर्णनही मस्त!
जबरी फोटो रे आणि लिहिलेल तर
जबरी फोटो रे आणि लिहिलेल तर शब्द न शब्द माझ्या मनातला चोरला आहेस अस वाटतय.
एवढ्या पावसात कॅमेरा न्यायची हिमंत दाखवलीस हेच खुप आहे..
जिप्स्या, अतिशय सुरेख प्रचि.
जिप्स्या, अतिशय सुरेख प्रचि. पहिला फोटो तर खासच.
योगेश, पहिला फोटोसाठी तुला
योगेश, पहिला फोटोसाठी तुला _/\_
तुझ्या नजरेला पुन्यांदा _/\_
सह्ह्ह्ह्हीच.... सगळे फोटो
सह्ह्ह्ह्हीच.... सगळे फोटो मस्तच....
पहिला फोटो... बेस्ट....

भाताचं शेत, लवासाकडे जाणारा रस्ता..... आणि स्विफ्टुकली...
मस्तच...
व्वा! सगळेच फ़ोटो सुंदर, झकास,
व्वा! सगळेच फ़ोटो सुंदर, झकास, मस्त, सुरेख, अप्रतिम, .....................................कंटाळले नाही रे, आणखी शब्दच आठवत नाही.


अरे इथे आल्यावर तरी आम्हाला सांगत जा. आम्ही पण आलो असतो भटकायला.
सुकी, आम्हाला पण बोलाव की.
सुकी, आम्हाला पण बोलाव की.
काय म ज्जा आहे ......किति
काय म ज्जा आहे ......किति भ ट कं ती.... वर्णन, प्रचि अप्रतिम....
जिप्स्या आम्ही काय कडेवर घे
जिप्स्या आम्ही काय कडेवर घे म्ह्णणार होतो कारे आम्हाला बोलावली अस्तेस तर चालले अस्ते.. आलोअस्तो तुझ्या बाजुबाजुनी.. आणि सुक्यालाही काही जड नसतो झालो जिथे ५ तिथे २५ काय फरक पडला असता रे.....
अप्रतिम. जिप्स्या पंख लागलेत
अप्रतिम.
जिप्स्या पंख लागलेत का रे तुला ?
धबधब्याचे सगळेच फोटो अव्वल
धबधब्याचे सगळेच फोटो अव्वल आहेत..१५ वा फोटो तर आहाहा.. खूप खूप आवडले.. त्यांचा खास वेगळा धागा हवा होता आधी एक होता तसा.. खास ताम्हिणी घाटावर..
पहिला प्रचि भन्नाट, अफलातुन
पहिला प्रचि भन्नाट, अफलातुन
पहिला प्रचि भन्नाट, अफलातुन
पहिला प्रचि भन्नाट, अफलातुन
योग्या, पहिला फोटो क्लासच.
योग्या, पहिला फोटो क्लासच. २३,२१,९ प्रचि सुद्धा भारीच.
हिवाळ्यात एकदा चक्कर होऊदेत या मार्गावर.
पहिला म्हणजे खरोखर पहिल्या
पहिला म्हणजे खरोखर पहिल्या नंबरचा....
सुक्या, चक्कर मारायची आहे रे.....
वाह!
वाह!
व्वा... सगळेच्यासगळे अति
व्वा... सगळेच्यासगळे अति सुंदर आहेत फोटो..
सुक्याचं शेत चांगलं हिरवंगार दिस्तंय.. हिरव्या रंगाच्या सर्व शेड्स मनभावन आहेत !!!
वा मस्तच ! पहिला आणि चौथा खूप
वा मस्तच ! पहिला आणि चौथा खूप आवडले !
सगळ्या प्रचि डोळ्याला आणि
सगळ्या प्रचि डोळ्याला आणि मनाला आनंद देणार्या.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!! पण
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
पण फोटो लहान का दिस्ताहेत - का माझ्या संगणकाचा दोष ???>>>माझ्या इथे सगळे फोटो व्यवस्थित दिसत आहे.
आणि स्विफ्टुकली...>>>>येस्स्स पद्मजा
स्विफ्टुकली 
शोभा, घारूआण्णा, जागू
हिवाळ्यात एकदा चक्कर होऊदेत या मार्गावर>>>>>नक्कीच रे
त्यांचा खास वेगळा धागा हवा होता आधी एक होता तसा.. खास ताम्हिणी घाटावर..>>>>यो, अरे जास्त फोटो नव्हते म्हणुन सगळेच एका शिर्षकाखाली प्रदर्शित केले.
मस्त जिप्स्या ... सुंदर ...
मस्त जिप्स्या ... सुंदर ...
सही, सुंदर, सुरेख... अजुन काय
सही, सुंदर, सुरेख... अजुन काय काय म्हणू
मस्तं. पहिले ३ फार आवडले.
मस्तं. पहिले ३ फार आवडले.
पहिला फोटो हॅट्स ऑफ! १७
पहिला फोटो हॅट्स ऑफ!

१७ मस्त
इतरही सगळे छानच
कालच मी एका मैत्रीणीला म्हणाले निसर्ग म्हणतं असेल माझे फोटोज निघावेत तर जिप्सीच्याच कॅमेर्यातून!
अरे लेका... किती फिरशील आणि
अरे लेका... किती फिरशील आणि किती जळवशील आम्हाला???
सगळेच फोटो मस्त!
Pages