भटकंती मावळ प्रांताची

Submitted by जिप्सी on 7 August, 2012 - 01:09

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. त्यात मावळ प्रातांतला पाऊस हा तर "उडत्या पक्ष्याच्या पंखावर शेवाळं साठवणारा"!!.

अर्जुनाच्या तीरासारखा टोचणारा पाऊस, द्रौपदीच्या मोहक हास्यासारखे खळाळते निर्झर, युधिष्ठीरासारखा सच्चा सह्याद्रीचा निसर्ग, भीमाच्या गदेसारखा अंगावर वार करणारा भन्नाट रानवारा, नकुल-सहदेवासारखा आषाढ-श्रावणातला पाऊस. अशावेळी जर पुन्हा एकदा "पावसाळी भटकंती"चे "महाभारत" घडले तर बिघडले कुठे?

लोहगडाचा रांगडेपणा, लाडक्या पवनाचा नाजुकपणा
लवासाची नवलाई, मुळशीची हिरवाई
काळ्या मातीचा चिखलस्पर्श, हिरवी भातशेती पाहुन मनाला हर्ष
कधी कंटाळवाणा, तर कधी आनंददायी प्रवास
निसर्गाच्या सान्निध्यात घेतलेला मोकळा श्वास
झणझणीत बटाट्याचा रस्सा अन् ज्वारीच्या भाकरीचा फडशा
गरमागरम वरण अन् घरच्या तांदळाचा मऊसुत भात
लोणच्याची फोड त्याला पापड कुरडईची साथ
ताम्हीणी घाटातली धुक्याची अन् धोक्याची वाट
तिथे कोसळणार्‍या धबधब्यांचा आगळाच थाट
पाली बल्लाळेश्वराच्या दर्शनाने झाली पावसाळी भटकंतीची सांगता
हिरवा निसर्ग, खळाळणारे झरे विचारतात पुढची भटकंती "कधी आता"?

थोडक्यात काय तर अजुन एक "पावसाळी विकएण्ड" मावळ प्रांतात सत्कारणी लागला. Happy

४-५ ऑगस्टच्या विकएण्डला लोहगड,पवना, मुळशी,लवासा,ताम्हिणी घाट, बल्लाळेश्वर पाली अशी भटकंती - मायबोलीकर सुर्यकिरण यांच्या घरचा पाहुणचार, त्याच्या शेतात पायी भटकंती, काकूंच्या हातचे गरमागरम जेवण Happy अशा प्रकारे हि भटकंती संपन्न जाहली. Happy
सुर्यकिरण, धन्स रे!!!!

दाट धुके, धुंदकुंद वातावरण, कोसळणारा पाऊस यामुळे फोटो नीट काढता आले नाही, पण who cares Happy , डोळ्यांच्या अपेर्चरने, ह्रदयाच्या शटरस्पीडने, नजरेच्या कॉंपोझीशनने, मनाच्या मेमरी कार्डमध्ये साठवलेले हे विलक्षण फोटो आणि क्षण मात्र नेहमीच आनंद देणारे असणार आहेत.
=======================================================================
=======================================================================

लोहगड
प्रचि ०१

प्रचि २

प्रचि ०३
दुधिवरे
प्रचि ०४

प्रचि ०५
पवना परीसर
प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९
सुर्यकिरण याचे शेत
प्रचि १०
शेतातली विहिर
प्रचि ११
लवासा सीटीच्या वाटेवर
प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८
मुळशी जलाशय
प्रचि १९
ताम्हिणी घाट
प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आ हा हा - काय मस्त फिरलात रे...., वर्णन, प्र चि अप्रतिम.....

...पण फोटो लहान का दिस्ताहेत - का माझ्या संगणकाचा दोष ???

सुकि भाऊ भाग्यवान आहात बुवा.....

जबरी फोटो रे आणि लिहिलेल तर शब्द न शब्द माझ्या मनातला चोरला आहेस अस वाटतय. Happy

एवढ्या पावसात कॅमेरा न्यायची हिमंत दाखवलीस हेच खुप आहे.. Happy

सह्ह्ह्ह्हीच.... सगळे फोटो मस्तच.... Happy

पहिला फोटो... बेस्ट....
भाताचं शेत, लवासाकडे जाणारा रस्ता..... आणि स्विफ्टुकली... Proud
मस्तच... Happy

व्वा! सगळेच फ़ोटो सुंदर, झकास, मस्त, सुरेख, अप्रतिम, .....................................कंटाळले नाही रे, आणखी शब्दच आठवत नाही. Uhoh Proud
अरे इथे आल्यावर तरी आम्हाला सांगत जा. आम्ही पण आलो असतो भटकायला. Happy

जिप्स्या आम्ही काय कडेवर घे म्ह्णणार होतो कारे आम्हाला बोलावली अस्तेस तर चालले अस्ते.. आलोअस्तो तुझ्या बाजुबाजुनी.. आणि सुक्यालाही काही जड नसतो झालो जिथे ५ तिथे २५ काय फरक पडला असता रे.....

धबधब्याचे सगळेच फोटो अव्वल आहेत..१५ वा फोटो तर आहाहा.. खूप खूप आवडले.. त्यांचा खास वेगळा धागा हवा होता आधी एक होता तसा.. खास ताम्हिणी घाटावर..

योग्या, पहिला फोटो क्लासच. २३,२१,९ प्रचि सुद्धा भारीच.
हिवाळ्यात एकदा चक्कर होऊदेत या मार्गावर.

व्वा... सगळेच्यासगळे अति सुंदर आहेत फोटो..
सुक्याचं शेत चांगलं हिरवंगार दिस्तंय.. हिरव्या रंगाच्या सर्व शेड्स मनभावन आहेत !!!

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!

पण फोटो लहान का दिस्ताहेत - का माझ्या संगणकाचा दोष ???>>>माझ्या इथे सगळे फोटो व्यवस्थित दिसत आहे. Happy

आणि स्विफ्टुकली...>>>>येस्स्स पद्मजा Happy स्विफ्टुकली Proud

शोभा, घारूआण्णा, जागू

हिवाळ्यात एकदा चक्कर होऊदेत या मार्गावर>>>>>नक्कीच रे Happy

त्यांचा खास वेगळा धागा हवा होता आधी एक होता तसा.. खास ताम्हिणी घाटावर..>>>>यो, अरे जास्त फोटो नव्हते म्हणुन सगळेच एका शिर्षकाखाली प्रदर्शित केले. Happy

पहिला फोटो हॅट्स ऑफ!
१७ मस्त
इतरही सगळे छानच Happy
कालच मी एका मैत्रीणीला म्हणाले निसर्ग म्हणतं असेल माझे फोटोज निघावेत तर जिप्सीच्याच कॅमेर्‍यातून! Happy

Pages