"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. त्यात मावळ प्रातांतला पाऊस हा तर "उडत्या पक्ष्याच्या पंखावर शेवाळं साठवणारा"!!.
अर्जुनाच्या तीरासारखा टोचणारा पाऊस, द्रौपदीच्या मोहक हास्यासारखे खळाळते निर्झर, युधिष्ठीरासारखा सच्चा सह्याद्रीचा निसर्ग, भीमाच्या गदेसारखा अंगावर वार करणारा भन्नाट रानवारा, नकुल-सहदेवासारखा आषाढ-श्रावणातला पाऊस. अशावेळी जर पुन्हा एकदा "पावसाळी भटकंती"चे "महाभारत" घडले तर बिघडले कुठे?
लोहगडाचा रांगडेपणा, लाडक्या पवनाचा नाजुकपणा
लवासाची नवलाई, मुळशीची हिरवाई
काळ्या मातीचा चिखलस्पर्श, हिरवी भातशेती पाहुन मनाला हर्ष
कधी कंटाळवाणा, तर कधी आनंददायी प्रवास
निसर्गाच्या सान्निध्यात घेतलेला मोकळा श्वास
झणझणीत बटाट्याचा रस्सा अन् ज्वारीच्या भाकरीचा फडशा
गरमागरम वरण अन् घरच्या तांदळाचा मऊसुत भात
लोणच्याची फोड त्याला पापड कुरडईची साथ
ताम्हीणी घाटातली धुक्याची अन् धोक्याची वाट
तिथे कोसळणार्या धबधब्यांचा आगळाच थाट
पाली बल्लाळेश्वराच्या दर्शनाने झाली पावसाळी भटकंतीची सांगता
हिरवा निसर्ग, खळाळणारे झरे विचारतात पुढची भटकंती "कधी आता"?
थोडक्यात काय तर अजुन एक "पावसाळी विकएण्ड" मावळ प्रांतात सत्कारणी लागला. 
४-५ ऑगस्टच्या विकएण्डला लोहगड,पवना, मुळशी,लवासा,ताम्हिणी घाट, बल्लाळेश्वर पाली अशी भटकंती - मायबोलीकर सुर्यकिरण यांच्या घरचा पाहुणचार, त्याच्या शेतात पायी भटकंती, काकूंच्या हातचे गरमागरम जेवण
अशा प्रकारे हि भटकंती संपन्न जाहली. 
सुर्यकिरण, धन्स रे!!!!
दाट धुके, धुंदकुंद वातावरण, कोसळणारा पाऊस यामुळे फोटो नीट काढता आले नाही, पण who cares
, डोळ्यांच्या अपेर्चरने, ह्रदयाच्या शटरस्पीडने, नजरेच्या कॉंपोझीशनने, मनाच्या मेमरी कार्डमध्ये साठवलेले हे विलक्षण फोटो आणि क्षण मात्र नेहमीच आनंद देणारे असणार आहेत.
=======================================================================
=======================================================================
लोहगड
प्रचि ०१
प्रचि २
प्रचि ०३
दुधिवरे
प्रचि ०४
प्रचि ०५
पवना परीसर
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
सुर्यकिरण याचे शेत
प्रचि १०
शेतातली विहिर
प्रचि ११
लवासा सीटीच्या वाटेवर
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
मुळशी जलाशय
प्रचि १९
ताम्हिणी घाट
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
जीप्स्या लेका.. मला बी बोलवत
जीप्स्या लेका.. मला बी बोलवत जा कि
काय एकटे एकटे जाता
अवांतर : भारीच फोटो .. __/\__
जिप्स्या जबरीच फोटोस एकदम
जिप्स्या जबरीच फोटोस एकदम
पहिला फोटू एकदम सह्हीईईईच
जिप्सी जाम लक्की आहात. आणी
जिप्सी जाम लक्की आहात. आणी असेच रहा. मागच्या वर्षी आम्ही हडशी, लवासा ( खूप उशीर झाल्याने खाली लवासा पाहिले नाही) गेलो होतो. अशीच हवा, तुफान पाऊस, वाटेतले धबधबे मज्जा आली.
मात्र हे धबबबे कुठले लवासा घाटातले का? जरा प्रकाश टाका प्लीज.
मस्त
मस्त
मस्त फोटो
मस्त फोटो
प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स
प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स
मात्र हे धबबबे कुठले लवासा घाटातले का?>>>>हो, यातील काही फोटो लवासातील आणि काही ताम्हिणी घाटातील आहे.
भन्नाट मित्रा... ते धबधबे व
भन्नाट मित्रा...
ते धबधबे व झरे कुठले आहेत रे?
पहिलाच फोटो खल्लास !!!! सुंदर
पहिलाच फोटो खल्लास !!!!
सुंदर !
जिप्स्या मस्तच आलेत रे फोटो.
जिप्स्या
मस्तच आलेत रे फोटो. तुझी हौस इतकी दांडगी आहे फिरायची कि बास. प्रतिदिनेशदा आहेस. कविता पण आवडली. कुणाची आहे ती ?
रच्याकने - लवासाला आलास तर खारवड्याच्या जागृत देवस्थानाला चक्कर टाकायची होतीस. प्रसिद्ध आहे ठिकाण ( मी देखील खारवडेकर होतोय लवकरच)
चंदन, रूणुझुणु, किरण
चंदन, रूणुझुणु, किरण प्रतिसादाबद्दल धन्यवाद
ते धबधबे व झरे कुठले आहेत रे?>>>>>पवना परीसर, लवासा आणि ताम्हिणी घाटातले.
कविता पण आवडली. कुणाची आहे ती ? >>>किरण, या पामराचा छोटासा प्रयत्न
लवासाला आलास तर खारवड्याच्या जागृत देवस्थानाला चक्कर टाकायची होतीस. प्रसिद्ध आहे ठिकाण>>>>हे माहित नव्हते रे. ताम्हिणी घाटाच्या आधी जागृत विंझाईदेवीचे मंदिर आहे तेही पाहायचे होते पण नक्की कुठे आहे तेच कळले नाही. रस्त्याने जाताना कुठे बोर्ड दिसतो का ते पहातच होतो पण नाही दिसला.
मस्त.
मस्त.
Pages