अण्णा, जिंकण्यासाठी लढताय कि..[१]

Submitted by मी-भास्कर on 31 July, 2012 - 03:36

अण्णा, जिंकण्यासाठी लढताय कि..[१]

राजकारणात उतरल्यावर तर कुस्ती अशा विविध १०० अगडबंब सुमोंशी आहे हे नक्की.
Anna and corruption.jpg

आदरणीय अण्णा,
सादर दंडवत.
एक समर्थक या नात्याने हे पत्र.
कोणत्याही सत्तेला एक व्यवस्था चालवावी लागते. लोकशाही मार्गाने सत्ताप्रदान हा सर्वात उत्तम मार्ग मानला जातो. सत्तेचा कल कॆंद्रीकरणाकडेच असतो. सत्ता माणसाला भ्रष्ट करते आणि अनिर्बंध सत्ता संपूर्ण भ्रष्ट करते. सत्तेतील माणसे भ्रष्ट होण्यापासून रोखण्यासाठी चांगली घटना, कायदे आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक असते. आपल्या लोकशाही-व्यवस्थेत मुख्य सत्ता सत्तारूढ पक्षाकडे एकवटली आहे. विरोधी पक्ष स्वच्छ, जागरूक व प्रबळ असेल तर तो सत्तेवर अंकुश ठेवू शकतो. आपल्या इथे या सर्वांचे तीन तेरा वाजल्याने एक फार अवघड लढाई आपल्याला या वयात हाती घ्यावी लागली आहे.
भ्रष्ट व्यवस्थेत ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत अशा अती बलिष्ट वर्गाशी हा संघर्ष आहे. यांच्याच आश्रयाला असलेला वर्गही प्रचंड संख्येने आहे. ही ताकदच संसदेत कोण जाणार हे ठरवते. याच व्यवस्थेने सर्वसामान्यांनाही इच्छा असो वा नसो भ्रष्टाचाराची सवय लावली आहे. किंबहुना असे म्हणता येईल की जवळपास प्रत्येक जण ( खर्‍या अर्थाने भ्रष्ट नसला तरी ) कोणत्या ना कोणत्या कारणाने भ्रष्ट ठरविला जाऊ शकतो. त्यामुळे तुमच्या कोणत्याही पाठिराख्याला ’भ्रष्टाचारी’ म्हणून ’अंदर’ करून बदनाम करणे सत्तेला सहज शक्य आहे. त्यामुळे शक्तीच्या दृष्टीने ही अगदी विषम लढाईआहे.
अंतीमतः पुरेशा संख्याबळाने तुमचे समर्थक संसदेत असल्याशिवाय भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी आवश्यक ते बदल होऊच शकत नाहीत. पाठीशी असणारे संख्याबळ जास्तीत जास्त वाढवणे हेच फक्त तुमच्या हाती आहे. सरतेशेवटी विरोधकांना निवडणुकीत पराभूत करून चळवळीच्या समर्थकांना निवडून आणण्यासाठी संख्याबळ हवेच. तुमची ही शक्ती वाढूच नये याची पूर्ण खबरदारी तुमचे विरोधक घेताहेत आणि आपण त्यांच्या सापळ्यात नकळत अडकता असे आम्हाला वाटते.
तुमच्या मागे अल्पसंख्य व दलीत नाहीत असे आरोप केले की तुमची टीम इमेज क्रिएशनच्या मागे आपली शक्ती वाया घालविते. तुमच्या मागे संघ आहे म्हटले की तो कसा नाही हे सांगण्यासाठी आटापिटा केला जातो. आता उद्या तुमच्यात आदिवासी कोठे आहेत असे म्हटले की पुन्हा शक्तिव्यय. हे सर्व करतांना आपला शक्तीव्यय तर होतोच पण संख्याबळही वाढत नाही, असे आपल्याला वाटत नाही का? अगदी ताजे उदाहरण रामदेवबाबा आणी मोदी भेटीचे आहे. तुमचे विरोधक या भेटीबाबत आक्षेप घेऊन जुनेच 'डिव्हाईड अँड काँकर' चे तंत्र वापरत आहेत. उद्या कोणी आदिवासी नेता तुम्हाला पाठींबा द्यायला आला तर ते त्याला माओवादीही ठरवतील आणि तुमची देशद्रोह्यांशी हातमिळवणी आहे असे म्हणतील. मग पुन्हा शक्तिव्यय! असे असूनही आपण त्याच त्या सापळ्यात का अडकतां?
या ठिकाणी चर्चिलचे एक वाक्य आठवते. लढाईची सूत्रे हाती घेतल्यावर त्यांनी जाहीर केले की "हिटलरचा संपूर्ण पाडाव करण्यासाठी मी सैतानाची मदत घेण्यासही मागेपुढे पाहाणार नाही."
इतक्या टोकाचे जरी नाही तरी -
" भ्रष्टाचाराच्या लढाईत प्रामाणिकपणे साथ देणार्‍या कोणाही भारतीयाची मी मदत घेईन." असे ठणकावून सांगण्यात आपल्याला काय अडचण आहे?
आणिबाणीविरुद्ध लढतांना जयप्रकाशांनी हेच केले होते आणि म्हणून ते जिंकले. त्यामुळे
' दिल्ली तो अभि बहोत दूर है| ' हेच खरे!

16 September, 2012
अण्णा नवी टिम निवडून आंदोलन सुरू करणार असल्याचे वाचले.
या नव्या टीमच्या आंदोलनाचा मागोवा घ्यायचा आहे खालील धाग्यावर :
http://www.maayboli.com/node/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भ्रष्टाचाराविरुद्ध कायमस्वरुपी तोडगा निघेल असे मानणे बालिश आणि भोळसटपणाचे आहे. शेवटी भ्रष्टाचार म्हणजे लोकांची वा कायद्याची नजर चुकवून केलेला पैशाचा, साधनसंपत्तीचा अपहार. स्वार्थी लोक त्यांच्या परीने विद्यमान व्यवस्थेतील त्रुटी शोधून त्याचा फायदा घेतच रहाणार. त्यामुळे त्यावरील उपायही कायम चालू राहणे आवश्यक आहे.
आज लोकपाल काही प्रमाणात भ्रष्टाचार रोखू शकेल. पण उद्या आणखी काहीतरी बनवावे लागेल. हे चालायचेच. अमुक एक यंत्रणा बनवली आणि आता सगळे कसे सुखाने राहू लागतील अशी अपेक्षा करणे गैर आहे.

एखादे शरीर अमक्या एका रोगाने ग्रासले आहे आणि त्यावर एक औषध उपयोगी पडेल म्हणून उद्याच्या रोगावरही तेच चालेल असे नाही. आणि कायमस्वरूपी औषध मिळण्याची शक्यताच नाही.

अजून एक उदाहरण म्हणजे सॉफ्टवेअर आणि हॅकर. हॅकर जमात सॉफ्टवेअरमधील त्रुटींचा फायदा घेऊन व्हायरस, वर्म्स वा केवळ गुप्त माहिती उघडी करणे असले प्रकार करत असते. सॉफ्टवेअर लिहिणारे अशा हॅकर हल्ल्यांचा अभ्यास करून आपले सॉफ्टवेअर अशा हल्ल्यांना दाद देणार नाही असे बनवायचा प्रयत्न करतात. पण अशा नव्याने बनलेल्या सॉफ्टवेअर मधे नवे खाच खळगे असतात आणि मग नव्या समस्या, नवी उत्तरे. हे चक्र चालूच रहाणार.

ह्याकरताच कायदे बदलण्याची सोय आहे. आणि जागरुक लोकशाहीत हे घडतेही.

भ्रष्टाचार रोखण्यासाठी हजारो कायदे आहेत ज्यांची अंमलबजावणी करायची म्हटली तरी भ्रष्टाचार नाहीसा होईल. पण ते कायदे कागदावर आहेत. आणखी एक लोकपाल आणून त्यात भर पडेल असं वाटत नाही. कदाचित लोकपाल आपले काम चोख करेलही. पण आजवरचा कायद्यांचा अनुभव पाहता फक्त आणखी एक घटनाबाह्य सत्ताकेंद्र निर्माण होऊन लोकशाहीच्या व्यवस्थेला आव्हान देता येऊ शकेल हा धोका आहे. कदाचित खाऊ खाण्यामधे आणखी एक वाटेकरी निर्माण होऊ शकेल. त्याला सामावून घेतले कि डोकेदुखी कैक पटीने वाढेल.

किमान ज्यांना चोर म्हटले जातेय त्यांना घरी बसवता येऊ शकतं. लोकपालाला मात्र अशा प्रकारे लोकांचा सामना करायचाच नाही. तो अनिर्बंध आहे. आपल्या देशात अद्याप राज्यघटनाच लागू झालेली नाही तिथे लोकपालाच्या तरतुदी ज्याप्रमाणे लोकांना हव्या आहेत त्या आणि तशाच लागू केल्या जातील याची खात्री देता येईल का ?

लोकशाहीत लोक प्रगल्भ असणे हे एकमेव औषध आहे.

श्री विजय कुंभार यांनी माहिती अधिकाराच्या अनुभवावर लिहिलेले पुस्तक वाचले. त्यात कुम्भारांनी माहिती आयुक्ताच्या तर्‍हेवाइकपणाबाबत किस्से सा.गितले आहेत. आपल्याकडे कोणतेही पद मिळाले की ते त्याच्या डोक्यात जाते. शेषन यांच्याबाबत हाच अनुभव आला. शेषन यांचेबाबतीत लोकसत्ताचे माधव गदकरी यांनी हा माणूस पदावरून जाताना अत्यन्त हास्यास्पद झालेला असेल असे भाकीत केले होते. तसेच झाले. शेवती ते जाहिराती करू लागले. खासदारकीसाठी शिवसेनेकडे तिकीट मागायला गेले इ. त्यांचे निर्णय अनेकदा कोर्टाने रद्द्द केले. शेवटी सरकारला त्यांच्या हुकूमशाहीला लगाम घालण्यासाठी ३ इलेक्शन कमिशनर नेमून बहुमताने निर्णय घेण्याची तरतूद करावी लागली. आपल्या देशाच्यालोकांची मानसिकताच अशी आहे 'डंडा' मारल्याशिवाय ते काही करतच नाही. they like to get ruled. स्वयंशिस्त माहीतच नाही. आणिबाणी त्यातूनच आली . सुरुवातीस लोकाना ती फारच आवडली कारण डंड्याने शिस्त आली होती. जसे लोकाना डंडा खायला आवडते तसेच संधी मिळताच सत्तेचा अतिरेक करायलाही आवडते. ज्याला काही अधिकार मिळतात त्याचा तो लगेच गैरवापर करायला सुरुवात करतो. अगदी पोलीस हवालदारापासून तर राष्ट्रपतीपर्य्यन्त हे खरे आहे. आणीबाणीचा अनुभव हेच सांगतो. आज मंत्र्यांच्या गैरव्यवहाराची उदाहरणे ही सत्तेच्या गैरवापराचीच आहेत. तसेच लोकपाल या नियोजित भस्मासुराबद्दल सांगता येईल. तो वाइटांचा नाश केल्यावर चांगल्या माणसाकडे वळणार नाही कशा वरून.? माहिती आयुक्त, न्यायाधीश, लोकपाल ह्या घटनात्मक पदांवर निवड करण्यापेक्षा त्यांना वाइट कामामुळे त्या पदांवरून काडून टाकणे फार कठीण ;जवळ जवळ अशक्यच असते. रामस्वामी की कुठल्या तमिळ सुप्रीम कोर्ट जजबद्दल आपण हे अनुभवले आहे. भ्रष्ताचार केल्याचे सिद्ध होऊनही संसदेत त्यावर महाभियोग पारित होऊ शकला नाही कारण दक्षिणेच्या खासदारानी केवळ तो तमिळ आहे म्हणून महाभियोगाला विरोध केला. त्यामुळे रोगापेक्षा औषध भयंकर अशी स्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बाकी आता रामदेवबाबाची नौटंकी सुरू झाली आहे. आणि त्याचे ४ कोटी टॅक्स बुडवल्याचे प्रकरण बाहेर आले आहे. अगदी मुहुर्तावर ते बाहेर 'काढले' म्हटले तरी मुळात असे प्रकरण निर्माणच का व्हावे? आता बाबा ती माझ्या सी ए ची चूक आहे अशी काही तरी सारवासारव करील . अण्णांनीही त्यांच्या ट्रस्तचे हिशेब धर्मदाय आयुक्ताना सादर न केल्याचे प्रकरण 'काढण्यात' आले होते तेव्हा हाच डिफेन्स घेतला होता की ती अनियमितता आहे भ्रष्टाचार नव्हे! अण्णांच्या ट्रस्ट मधून अडीच लाख रुपये अण्णांच्या वाढदिवसाला खर्च केले याचे समाधानकारक उत्तर अजूनही त्यानी दिलेले नाही. कार्यकर्त्यांन्ची तशी सद्भावना होती असे काहीसे ते सांगतात. गांधीवादाने बरीच वळणे घेतली आहेत गेल्या काही वर्षात Happy

चला आता रामदेव बाबाचा ९९ टक्के लोकपाल कसा आहे ते पाहू. (९९ % हा त्यांचाच शब्द आहे.)

>>अण्णांनीही त्यांच्या ट्रस्तचे हिशेब धर्मदाय आयुक्ताना सादर न केल्याचे प्रकरण 'काढण्यात' आले होते तेव्हा हाच डिफेन्स घेतला होता की ती अनियमितता आहे भ्रष्टाचार नव्हे! अण्णांच्या ट्रस्ट मधून अडीच लाख रुपये अण्णांच्या वाढदिवसाला खर्च केले याचे समाधानकारक उत्तर अजूनही त्यानी दिलेले नाही. कार्यकर्त्यांन्ची तशी सद्भावना होती असे काहीसे ते सांगतात. गांधीवादाने बरीच वळणे घेतली आहेत गेल्या काही वर्षात <<
@ बाळू जोशी
म्हणजे किती वर्षात? आणि कोणती वळणे?
मुळात महात्माजींचे अनुयायी म्हणवून घेणारेच ६५ वर्षातिल बहुतेक काल सत्तेवर आहेत. ते खरोखरचे अनुयायी असते तर भारतातील गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी इतकी भयानक वाढली असती का? त्यांनी पुढच्या सात पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती जमा केली असती का? दारूचे उत्पादन व सेवन इतके वाढले असते का? दारू पिण्याला आज आलेली प्रतिष्ठा आली असती का? खेड्यापाड्यातून लोड शेडिंग आणि चैनबाजीच्या जागी विजेची लयलूट असे दिसले असते का?
त्यांच्या तुलनेत अण्णांचे आयुष्य महात्माजींचे खरे अनुयायि म्हणवून घेण्यास अधिक पात्र नाही काय? त्यांच्याबाबतीत घेतले जाणारे आक्षेप हे तुलनेने अगदीच क्षुल्लक नाहीत काय?
रणनीति ठरविण्यात आणी विरोधकांच्या कुशल रणनीतीपुढे अण्णा खूप कमि पडले म्हणून अपयशी ठरले असले तरी त्यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न विसरण्याची चूक आपण करू नये. आपण एक किमि पुढे जाऊ असे वाटले होते खरे पण निदान पाच पावले तरी पुढे गेलोच. मिडिया, फेसबुक आशा माध्यामांमधून उभि राहिलेली चळवळ आणखी कितीशी पुढे जाणार?
जयप्रकाशांची संपूर्ण क्रांति जरी हवेत विरली तरी आणिबाणीच्या दंडेलशहीतून त्यांनी आपल्याला बाहेर काढले हे कसे विसरता येईल? तसेच हेहि आहे.

भास्करजी

तुमच्या पोस्टशी काही बाबतीत सहमत. पण एक शंका आहे.

अण्णा महात्मा गांधींचे अनुयायी म्हणून त्यांना महाराष्ट्रात सन्मान मिळाला नाही का ? त्यांच्या संकल्पनांना निधी सरकारनेच दिला. त्यांना प्रसिद्धी ज्या योजनांमुळे मिळाली त्या योजनांना शासनाने मुक्त हस्ते मदत केलेली नाही का ? असे कित्येक अण्णा काही करू पाहतात त्या सर्वांच्या नशिबी हे येत नाही. आमीरच्या कार्यक्रमात असे बरेच लोक दिसले. गावासाठॉ डोंगर फोडून रस्ता बनवणारा शेतकरी नगर जिल्ह्यातही आहे. सकाळ मधे बरंच काही आलं होतं त्यांच्यावर. काय केलं शासनाने ?

स्वतःच्या खर्चाने विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे बांधून ती मोफत रहायला देणारे एक सेवानिवृत्त शिक्षक बहुधा सातारा जिल्ह्यातले आहेत. अतं: दीप भव या भावनेने काम करणारे हजारो लोक आहेत. मग अण्णांना देशव्यापी प्रसिद्धी का मिळाली असावी ?

श्री. मी-भास्कर,

म. गांधी अन त्यांचे अनुयायी. यासंदर्भात आपण जे कळकळीने लिहीलेत ते माझ्या अल्पमतीने समजावून घेतले तितके समजले.

किरणरावांना आली, तशी मलाही हे वाचल्यानंतर शंका आली आहे, त्यांची वेगळी, माझी वेगळी आहे. त्यांची कांद्यासारखी एकच आहे, माझी द्राक्षांच्या घडासारखी लोब्युलर आहे.

शंकेचे निरसन केलेत तर धन्यवाद देईन. शंका अशी:

आपण स्वतः, स्वतःला म. गांधीजींचे "खरे" अनुयायी समजता काय? म. गांधीजींचे "खरे" अनुयायी असणे म्हणजे नक्की कसे असावे असे आपणास वाटते? म. गांधीजींचे "खरे" अनुयायी म्हणून आजवर (महात्माजींच्या राष्ट्रपुरुष म्हणून उदयानंतर) ज्याज्या लोकांनी काही समाजोपयोगी केले त्यांतील तुम्हास खरेच आवडलेल्या कमीतकमी एका माणसाचे (स्त्री/पुरूष) नांव आपण सांगाल काय? त्यांचे कार्य हे "खरे" अनुयायी असण्याचे प्रतिक कसे, हेही सोदाहरण स्पष्ट करणार काय? 'आजकालचे म. गांधीजींचे"खरे" अनुयायी' हा शब्दप्रयोग आपण फक्त आजच्या मायबोलीवरील गांधीवाद्यांना हिणवण्यासाठी वापरत आहात काय? मा. अण्णा हजारे यांच्याबद्दल आपणास वाटणारी आपुलकी ही ते गांधीजींचे "खरे" अनुयायी आहेत म्हणून वाटत आहे, की त्यांनी काँग्रेस नामक पक्षाला विरोध दाखविला म्हणून?

या प्रश्णांची उत्तरे आपण द्यालच.

-(खोटा अनुयायी) इब्लिस.

१०० % अनुयायी असणं म्हणजे काय हो भा बुवा?

एक चित्र / मूर्ती/ वस्तू असेल तर त्याची हुबेहुब कॉपी करता येते. पण अनुयायाने आपल्या आदर्शाची जशीच्या तशी कॉपी कशी करायची?????

Kiran..,

>> अतं: दीप भव या भावनेने काम करणारे हजारो लोक आहेत. मग अण्णांना देशव्यापी प्रसिद्धी का
>> मिळाली असावी ?

तुमच्या प्रश्नाचा रोख कळला नाही. प्रसिद्धी देण्याचं काम अण्णा करत नाहीत, तर प्रसारमाध्यमे करतात. 'ज्याअर्थी त्यांना देशव्यापी प्रसिद्धी मिळालीये, त्याअर्थी तेही प्रसिद्धीलोलुप आहेत' हे तुम्हाला सुचवायचं नाहीये असं गृहीत धरतो.

माझ्या अंदाजाप्रमाणे त्यांनी लढा देऊन भ्रष्ट मंत्र्यांना घरी बसवलं म्हणून त्यांच्याकडे पुढारीपण चालून आलं असावं. निरलसपणे कार्य करणार्‍या कितीशा लोकांनी पाठपुरावा करून भ्रष्ट मंत्र्यांना घरी पाठवलं आहे? कोणीच नाही! कारण ते काम सेवाभावी वृत्तीच्या लोकांचं नाही.

तर मग अण्णांसारखा सेवाभावी माणूस त्याचं सेवेचं काम सोडून तुमच्याआमच्यासाठी उपोषणाला बसत असेल, तर त्याची प्रसिद्धी झालीच पाहिजे. ह्यात भ्रष्ट राज्यकर्त्यांचं सोडून बाकी सर्वांचंच भलं आहे.

आ.न.,
-गा.पै.

गापै

अण्णांच्या इतिहासाचा धांडोळा घ्या. मंत्र्यांना घरी बसवण्याइतके अण्णा मोठे कसे झाले, त्यांच्या उपोषणाला महत्व देण्याआधी कुठल्या मॉडेलला सरकारने उचलून धरले वगैरे.. त्या वेळी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश मधून स्वतः दिग्विजयसिंग काय जाणून घ्यायला अण्णांकडे येत आणि अण्णांना आर्थिक मदत कुठून मिळाली या प्रश्नांची उत्तरे आपण शोधून घ्याल यात शंकाच नाही. ती एकदा मिळाली कि तुम्हाला नेमकं काय कळालेलं नाही हे तुम्ही समजावून सांगू शकाल.

ज्या वेळी मंत्र्यांना घरी बसवले गेले त्या वेळी खरं तर आजच्या सारखे टीव्ही चॅनेल्स नव्हते. २४ तास रिपोर्टिंग नव्हतं. दूरदर्शनही संध्याकाळी सहा वाजता सुरू व्हायचं. त्या काळात अण्णांच्या उपोषणाची दखल घेऊन मंत्र्यांना घरी बसवल्याचे मार्क्स १०० तले १० गुण तरी तत्कालिन सरकारला द्यायचे कि नाही ? अण्णांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेच त्यांच्या १४ आंदोलनातून दिसून येतं. ११ वेळा त्यांच्या मागण्या मान्य झाल्या आणि ३ वेळा त्यांनीच अचानक उपोषण मागे घेतलं. एकदा भाजपाचे सरकार सत्तेवर असताना त्यांचा वाकड्या तोंडाचे गांधी या शब्दात सत्कार झालेला आठवतो.

मुद्देसूद चर्चा करणे हे उद्दीष्ट असल्यास खालील मुद्यांचा विचार व्हावा.

१. अण्णांना अंधपणे समर्थन किंवा विरोध थांबवणे
२. अण्णांना विरोध काँग्रेसप्रेमापोटी नसावा.
३. अण्णांना विरोध म्हणजे तो काँग्रेसी असा टोन नसावा.
४. अण्णांना समर्थन काँग्रेसविरोधातून नसावं.
५. अण्णांचं समर्थन म्हणजे कोंग्रेस विरोधी हा टोन नसावा.
६. भ्रष्टाचार विरोधी आंदोलन असावं कि नसावं यावर चर्चा व्हावी.
७. अण्णा वरील आंदोलनाला सर्वंकष नेतृत्व देऊ शकतात का यावर चर्चा चालू द्यावी. अशी चर्चा होताना नेतृत्वावर टीका होणे म्हणजे राष्ट्रद्रोही वगैरे टोन नसावा.

बाळू जोशी.

आपला इथला संदेश वाचला.

१.
>> बाकी आता रामदेवबाबाची नौटंकी सुरू झाली आहे. आणि त्याचे ४ कोटी टॅक्स बुडवल्याचे प्रकरण
>> बाहेर आले आहे. अगदी मुहुर्तावर ते बाहेर 'काढले' म्हटले तरी मुळात असे प्रकरण निर्माणच का
>> व्हावे?

भारतातले करविषयक नियम कसेही वाकवता येतात. तुम्ही प्रामाणिकपणे आयकर भरलात तरीही तुम्हाला आयकरभवनात वारंवार खेटे घालायला लावता येऊ शकतात.

२.
>> अण्णांच्या ट्रस्ट मधून अडीच लाख रुपये अण्णांच्या वाढदिवसाला खर्च केले याचे समाधानकारक
>> उत्तर अजूनही त्यानी दिलेले नाही.

हे मात्रं खरंय. माझ्या माहितीप्रमाणे अविनाश धर्माधिकारी तेव्हा सारा व्यवहार सांभाळत होते. त्यांना (=अविनाश) कुठल्याश्या अधिकृत कामाला पैसे हवे होते, पण ते कायद्याला धरून झालं नसतं. म्हणून कायदेशीर बाबीत बसवण्यासाठी अण्णांच्या वाढदिवसाचे निमित्त योजण्यात आले. ही रक्कम अखेरीस अभय फिरोदिया यांनी भरून दिली आहे.

एखादी अनियमितता असेल तर ती नियमित करून घेण्याची सोय सर्वत्र असते. तो जाणूनबुजून केलेला भ्रष्टाचार नव्हे.

३.
>> अण्णांनीही त्यांच्या ट्रस्तचे हिशेब धर्मदाय आयुक्ताना सादर न केल्याचे प्रकरण 'काढण्यात' आले होते
>> तेव्हा हाच डिफेन्स घेतला होता की ती अनियमितता आहे भ्रष्टाचार नव्हे!

साफ चूक! धर्मादाय आयुक्तांनी 'चुकून' नोटीस बजावली होती. त्याबद्दल त्यांनी अण्णांची लेखी क्षमाही मागितली आहे.

आ.न.,
-गा.पै.

गा पै

संदर्भ सोडून पोष्ती कोट करू नयेत. ही पोष्ट तुमच्या कुठल्या पोष्टला अनुसरून आहे हे माहीत असावे असं वाटतंय... विनाकारण गोंधळ निर्माण करू नका.

Kiran..,

>> संदर्भ सोडून पोष्ती कोट करू नयेत.

म्हणूनच म्हणतोय की तुमच्या विधानांचा संदर्भ तुम्हीच स्पष्ट केलात तर बरं होईल. आपल्याला थोडी मदत म्हणून माझं म्हणणं अधिक पृथक्करण करून सांगतो.

१.
>> अण्णांच्या इतिहासाचा धांडोळा घ्या. मंत्र्यांना घरी बसवण्याइतके अण्णा मोठे कसे झाले, त्यांच्या
>> उपोषणाला महत्व देण्याआधी कुठल्या मॉडेलला सरकारने उचलून धरले वगैरे..

आपण कृपया सांगा की अण्णा कसे मोठे झाले ते. त्यांचं कुठलं मॉडेल कुठल्या सरकारने उचलून धरलेलं तेही सांगा. आणि या बाबी आपल्या चर्चेत कुठे आणि कशा बसवायच्या हेही कृपया सांगा.

२.
>> त्या वेळी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश मधून स्वतः दिग्विजयसिंग काय जाणून घ्यायला अण्णांकडे येत
>> आणि अण्णांना आर्थिक मदत कुठून मिळाली या प्रश्नांची उत्तरे आपण शोधून घ्याल यात शंकाच नाही.

आपण या दोन प्रश्नांची उत्तरे दिलीत तर बरं होईल. आपल्याला काहीतरी सांगायचंय, पण माझं वाचन तितकसं नसल्याने आपणच मला (आणि इतर वाचकांना) मदत करा.

३.
>> ती एकदा मिळाली कि तुम्हाला नेमकं काय कळालेलं नाही हे तुम्ही समजावून सांगू शकाल.

जे मला कळलं नाही ते मी आजून कुणाला कसं समजावून सांगू! Uhoh म्हणून म्हणतो की, उपरोक्त प्रश्नांची उत्तरं मिळाली की पुढे त्यांचं काय करायचं तेही आपणच कृपया सांगावे.

आ.न.,
-गा.पै.

अण्णा मोठे कसे झाले याबद्दलची तुमची पोस्ट वाचली. यात आपण निष्कर्षाप्रत आल्याने नाईलाज झाला. इतिहासाचा धांडोळा घ्या ही तुमच्यासाठी सूचना आहे जी बंधनकारक नाही. तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा खरोखरीच असेल तर इतर अनेक गोष्टींप्रमाणे कदाचित गूगलवर तुम्हाला ते सापडेलच. इतर वाचकांना ते माहीत आहे असं गृहीत धरलेलं आहे. या संदर्भातली ही शेवटची पोष्ट.

>>कसले आरोप ? कसलं स्पष्टीकरण ? समजले नाही. उगाच किबोर्ड बडवायला लावू नका. पोष्टी सुस्पष्ट आहेत.
सुस्पष्ट नाहीयेत, संदिग्धपणे आरोप करत आहात म्हणुनच गापै यांनी स्पष्टीकरण विचारले आहे. हे लोकांना माहिती आहे ते माहिती आहे, तुम्हीच शोधुन काढा असे म्हणण्याला काही अर्थ नाही कारण जर आरोपसदृश लिहित असाल तर त्याचे स्पष्टीकरण देण्याची जबाबदारीपण लेखकाचीच असते. पहा पटते आहे का !

>>इतर वाचकांना ते माहीत आहे असं गृहीत धरलेलं आहे. या संदर्भातली ही शेवटची पोष्ट.

त्यांच्या पोष्टी वाचक मुर्ख आहेत असे "गृहीत" धरूनच लिहलेल्या असतात, त्यामुळे त्यांना स्पष्टीकरण देण्याची गरजच नाही.

@रॉबीनहूड.

काही आयडीजच टिखल्या, टोल्या, बेचिराख, ठंपी, मुनमुन, टन्या इ. इ. वेगवेगळी असंख्य नावे घेऊन एकच पोस्ट टाकतात. जी गोष्ट सर्वांना माहीत आहे ती नेमक्या या आयड्यांना माहीत नसते याचा अर्थ सुस्पष्ट आहे. नाव बदललं तरी तो अहंकार, तो दुस्वास, ती मळमळ यांचा भपकारा जाणवतोच आहे.

@महेश
आरोप कुणी केलेत ते तपासून पहा. बघा पटतेय का ? गापै यांच्या पोष्टीने मुद्दा भरकटलेला आहे. हा प्रकार कसा आहे माहीत आहे का ? आधी मुद्दा खोडून काढायचा. मग कुणी काही लक्षात आणून दिले कि तुम्हीच सांगा म्हणायचे. ते सांगायला गेले कि आता लिंक द्या म्हणायचे. गापै, रॉबिनहूड उर्फ (:खोखो:) यांच्या बाबतीत या गोष्टी नव्या नाहीत. आपल्यासारख्यांचा वेळ जातो. आता अण्णांचा इतिहास माहीत करून घ्यायला हजारो वर्षे मागे जावे लागेल असं काही आहे का ?

मी गापै यांना उद्देशून सूचना केलेली आहे. रॉबीनहूड यांना ती भलतीच झोंबलेली दिसतेय.

ज्या वेळी मंत्र्यांना घरी बसवले गेले त्या वेळी खरं तर आजच्या सारखे टीव्ही चॅनेल्स नव्हते. २४ तास रिपोर्टिंग नव्हतं. दूरदर्शनही संध्याकाळी सहा वाजता सुरू व्हायचं. त्या काळात अण्णांच्या उपोषणाची दखल घेऊन मंत्र्यांना घरी बसवल्याचे मार्क्स १०० तले १० गुण तरी तत्कालिन सरकारला द्यायचे कि नाही ? अण्णांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेच त्यांच्या १४ आंदोलनातून दिसून येतं. ११ वेळा त्यांच्या मागण्या मान्य झाल्या आणि ३ वेळा त्यांनीच अचानक उपोषण मागे घेतलं. एकदा भाजपाचे सरकार सत्तेवर असताना त्यांचा वाकड्या तोंडाचे गांधी या शब्दात सत्कार झालेला आठवतो.

या पोष्टीतूनही उपरोक्त आयडींना काहीच समजत नसेल तर नाईलाज आहे.
प्रशासनाकडे रॉबिनहूड या आयडीसंदर्भात तक्रार द्यावी लागेल.

मित्रहो,
वर इंग्रजी robinhood नावाने काही पोस्ट्स टाकलेल्या आहेत. हा आय डी गेल्या दोन्-तीन आठवड्यात निर्माण झालेला आहे. मी गेले ११ वर्षांहून अधिक काळ मायबोलीचा सदस्य आहे. मी मराठी 'रॉबीनहूड' या नावाने मायबोलीवर आहे. पूर्वी रोमन आय डी असताना माझे स्पेलिंग "robeenhood" असे होते. त्यामुळे हा आय डी पूर्ण वेगळा आहे. त्या पोस्ट्स माझ्या नाहीत. ती मतेही माझी नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

@ रॉबीनहूड

ते लक्षात आलेले आहे. या आयडी कुणाचा आहे हे माहीत आहे पण काही संकेतांना धरून ते सांगता येत नाही. या आयडीची तक्रार करण्यात आलेली आहे.

एकदा भाजपाचे सरकार सत्तेवर असताना त्यांचा वाकड्या तोंडाचे गांधी या शब्दात सत्कार झालेला आठवतो.<<

हे आठवते, म्हणूनच धागाकर्त्यांना वर लोब्युलर प्रश्न विचारले आहेत... ते बहुतेक कार्यबाहुल्यामुळे उत्तर देणार नाहीत आता.

@किरण
>>अण्णा महात्मा गांधींचे अनुयायी म्हणून त्यांना महाराष्ट्रात सन्मान मिळाला नाही का ? <<

केवळ तेवढ्याने फार फार तर स्वातंत्र्यसैनिकाची पेन्शन सहजगत्या मिळेल. ( पण कधि काळी महात्माजींचे विरोधक असण्याबद्दल मात्र अनेकांना छळले गेल्याची उदाहरणे आहेत. )
सेनेतुन निवृत्त होऊन परतत असतांना विवेकानंदांच्या पुस्तकाच्या वाचनाने त्यांना देशसेवेसाठी सर्व आयुष्य देण्याची प्रेरणा मिळाली असे अण्णांनी स्वत: अनेक भाषणांमधून सांगितले आहे. त्यानंतर प्रत्यक्ष ग्रामसुधारणेच्या कामाला सुरुवात केल्यावर त्यांनी महात्माजींच्या कार्याचा व मार्गाचा अभ्यास केला असावा. आपली राहाणि तात्कालीन ग्रामीण भागाशी सुसंगत ठेवली असावी. ग्रामसुधारणेचे काम निरलस व निरपेक्ष बुद्धिने केल्याने त्यांचा लोकसंग्रह वाढला. एखाद्याने स्वकर्तृत्वावर लोकसंग्रह वाढवला कि राजकारणी लोक त्त्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी कशी धडपड करतात ते आपण नेहमीच पाहातो. सत्तेवर असलेल्यांजवळ अशांना आपल्याकडे ओढण्यासाठी खूप मार्ग असतात. अण्णांना शासनाकडून मिळालेला मानसन्मान व निधी वगैरे या सर्वांचा एकत्रित परिणाम होता.
सत्तेतील लोकांच्या भ्रष्टाचारामुळे ग्रामीण जनतेला म्हणावा तसा फायदा मिळत नाही याबद्दल आवाज उठवायला अण्णांनी सुरवात केल्यावर चित्र बदलायला लागले. सत्ताधीशांनी मंत्र्यांना डच्चू दिला तो अण्णांच्या चळवळीने मतपेतीला धक्का पोचेल असे वाटल्याने.

>>असे कित्येक अण्णा काही करू पाहतात त्या सर्वांच्या नशिबी हे येत नाही.<<

पूर्ण सहमत. पण त्यासाठी अनेक कारणे संभवतात. जिथे नेत्यांच्या वा पक्षाच्या हितसंबंधात बाधा येण्याची शक्यता असते तेथे तर नुसती उपेक्षाच नव्हे तर प्रचंड छळवाद केला गेल्याचीही उदाहरणे आहेत.

>>मग अण्णांना देशव्यापी प्रसिद्धी का मिळाली असावी ? <<

ती मला वाटते मागच्या दीड्दोन वर्षांपासून. प्रसारमाध्यमांना सारख्या ब्रेकिंग न्युज लागत असल्यामुळे इतका चांगला प्रश्न हाती आल्यावर त्यांनि तो पुरेपुर वापरला.

@किरण
>>अण्णांच्या उपोषणाची दखल घेऊन मंत्र्यांना घरी बसवल्याचे मार्क्स १०० तले १० गुण तरी तत्कालिन सरकारला द्यायचे कि नाही ? <<
ती मते गमवावी लागतील अशी भीती वाटल्याने का होइना सत्तापक्षाने थोडीतरी सेंसिटिव्हिटी दाखवली असे फार तर म्हणता येईल. पण भ्रष्टाचार रोखण्याच्या इच्छेपोटी ति कारवाई झालि असति तर त्यानंतर भ्रष्टचार कमी झाला असता. प्रत्यक्षात मात्र तो फोफावतोच आहे.

>> ६. भ्रष्टाचार विरोधी आंदोलन असावं कि नसावं यावर चर्चा व्हावी. <<
मग काय असावं? सांगाल का?

>>अण्णांच्या इतिहासाचा धांडोळा घ्या. मंत्र्यांना घरी बसवण्याइतके अण्णा मोठे कसे झाले, त्यांच्या उपोषणाला महत्व देण्याआधी कुठल्या मॉडेलला सरकारने उचलून धरले वगैरे.. त्या वेळी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश मधून स्वतः दिग्विजयसिंग काय जाणून घ्यायला अण्णांकडे येत आणि अण्णांना आर्थिक मदत कुठून मिळाली या प्रश्नांची उत्तरे आपण शोधून घ्याल यात शंकाच नाही. ती एकदा मिळाली कि तुम्हाला नेमकं काय कळालेलं नाही हे तुम्ही समजावून सांगू शकाल.<<

यातून निव्वळ संशय निर्मिती होईल असे नाहि का वाटत तुम्हाला? तुमच्या जवळचि नेमकी माहिती द्याल तर बरे.

माझ्यामुळे मंत्री गेले हा अण्णांचा भ्रम आहे. खरे तर ते पक्षाला डोईजड झाले होते. त्याना घरी पाठवून आपली 'संवेदनाशीलता 'दाखवणे व स्वतःची प्रतिमा उजळवणे हा खरा हेतू होता.सुंठीवाचून खोकला गेला असाही आनन्द होता. मी मंत्री घालवले हा जसा अण्णांचा प्रचार आहे तसा आम्ही आण्णाना प्रतिसाद देऊन दोषी मंत्र्या.वर कारवाई केली हेही एक 'भांडवल' आहे. उदा:- सेनेने सुताराना काढले कारण सुतारानी पुण्यात सेनेपेक्षा मोठे होण्याचा उद्योग सुरू केला होता. म्हणून काढले. त्याच वेळी त्यांच्या पेक्षा गंभीर आरोप आणि पुरावे असताना बबन घोलपाना शेवटपर्यन्त हात लावलेला नाही. काँग्रेसबाबतही नाईलाजाने मंत्रीमंडळात घ्यावे लागलेल्या मंत्र्यानाच फक्त संधी साधून काढण्यात आले. मात्र सोइस्कर लोकाना अण्णानी आरोप करूनही तसेच कायम ठेवण्यात आले. आजही गुलाबराव देवकराना काढा असे अण्णा आग्रह का धरीत नाहीत? महाराष्ट्रात एवढे मोठे स्कॅम होऊनही अण्णानी त्यात चकार शब्द काढलेला नाही. की हा भ्रष्टचार नाही? आपल्या आंदोलनाला महाराष्ट्रातूनच सुरुंग लागून आपली दिल्लीतली पत कमी होऊ नये म्हणून ते एक 'अंडरस्टँडिंग' आहे असा निष्कर्ष काढायला पुरेसा वाव आहे. दोन भाडोत्री पत्रकार यात मध्यस्थाची भूमिका बजावतात अशी माहिती स्थानिक रीत्या सहज मिळते...

@इब्लिस
माझ्या अति अल्पमतीनुसार शन्कानिरसनाचा प्रयत्न :
>>आपण स्वतः, स्वतःला म. गांधीजींचे "खरे" अनुयायी समजता काय?<<

मी त्यांच्या कांहि विचारांचा कमालीचा चाहता आहे आणि त्यातील जे आचरणात आणणे शक्य आहे ते आणलेले आहेत इतकेच.

>>म. गांधीजींचे "खरे" अनुयायी असणे म्हणजे नक्की कसे असावे असे आपणास वाटते? म. गांधीजींचे "खरे" अनुयायी म्हणून आजवर (महात्माजींच्या राष्ट्रपुरुष म्हणून उदयानंतर) ज्याज्या लोकांनी काही समाजोपयोगी केले त्यांतील तुम्हास खरेच आवडलेल्या कमीतकमी एका माणसाचे (स्त्री/पुरूष) नांव आपण सांगाल काय? <<
ही घ्या कांहि नावे कि ज्यांच्यात अनुयायी असल्याची बहुतेक सर्व लक्षने दिसतात असे मला वाटते : लाल बहादुर शास्त्री, वल्लभभाई पटेल, विनोबा भावे, राजेंद्रप्रसाद, ग.प्र. प्रधान, अलिकडील आमटे व बंग कुटुंबीय, अण्णा.

>>त्यांचे कार्य हे "खरे" अनुयायी असण्याचे प्रतिक कसे, हेही सोदाहरण स्पष्ट करणार काय? <<
हे मला जमणार नाही. ’मला वाटते ते चूक की बरोबर?’ हे पडताळून पाहाण्यासाठी लाखोंच्या संख्येने ’गांधी-अभ्यासक’ आहेत त्यांची मते मागवावी. मी त्यांच्यापैकि नाही हे स्पष्त करतो.
>> म. गांधीजींचे "खरे" अनुयायी' हा शब्दप्रयोग आपण फक्त आजच्या मायबोलीवरील गांधीवाद्यांना हिणवण्यासाठी वापरत आहात काय? <<
नाही.
>>मा. अण्णा हजारे यांच्याबद्दल आपणास वाटणारी आपुलकी ही ते गांधीजींचे "खरे" अनुयायी आहेत म्हणून वाटत आहे, की त्यांनी काँग्रेस नामक पक्षाला विरोध दाखविला म्हणून?<<
अण्णांनी घालवलेल्या मंत्र्यांमध्ये सर्वपक्शीय लोक आहेत.

@बाळू जोशी
>>आज मंत्र्यांच्या गैरव्यवहाराची उदाहरणे ही सत्तेच्या गैरवापराचीच आहेत. तसेच लोकपाल या नियोजित भस्मासुराबद्दल सांगता येईल. तो वाइटांचा नाश केल्यावर चांगल्या माणसाकडे वळणार नाही कशा वरून.?
गुन्हेगारांचा नाश केल्यावर न्यायाधीश शिक्षा करायला सज्जनांकडे वळतील तेव्हा न्यायाधीश नकोतच असे आपण म्हणतो का?
लोकपालाशिवायही आहे त्या कायद्यांचीच कडक अम्मलबजावणि करुनहि भ्रष्टाचार कमी करता येईल असे म्हणणे वेगळे ; पण लोकपाल भस्मासूर होईल अशी भीती दाखवून त्याला विरोध करणे वेगळे. तो भस्मासूर होऊ नये यासाठी तरतुदी करता येतात. न्यायाधीशांना देखील इंपीचमेंट करून काढता येते. कोणतेही सत्तास्थान भ्रष्त होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर उपाय म्हणून कायदे आहेतच. ते कितपत परिणामकारक आहेत ते तपासावे लागेल.
पण म्हनुन एखादे सत्तास्थान आवश्यक असेल तर निर्माणच करायचे नाही काय? कित्येक सत्तास्थाने तर कशासाठी आहेत तेच कलत नाही. उदा. व्हिजिलन्स कमिशनर कशासाठी आहेत?
त्यांनाच इफेक्टीव बनवता येणार नाही का?

Pages