मायबोली गणेशोत्सव २०१२ साठी स्वयंसेवक हवेत

Submitted by रूनी पॉटर on 30 July, 2012 - 21:55

मायबोली गणेशोत्सव २०१२ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.
गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे. ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.
मागच्या काही वर्षातले गणेशोत्सव इथे बघता येतील.

पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.
धन्यवाद.

यंदाचे संयोजक मंडळ खालील प्रमाणे निवडले आहे.
तोषवी, _मधुरा_, शुगोल, स्नेहश्री, युगंधर, चिन्मय_कामत, जाई.साहित्ययात्री
सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजक मंडळातील सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
संयोजक मंडळात यायची खूप इच्छा होती.
पण काही अडचणींमुळे नियमित ऑन-लाइन असणे शक्य होणार नसल्यामुळे मी नांव दिले नाही.
तरीदेखील मंडळाला काही मदत लागल्यास हक्काने सांगावे.
या वर्षी म.भा.दि. संयोजक मंडळात होतो त्यामुळे थोडाफार अनुभव आहे.

नवीन संयोजक मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा !!!!
माझी पण इच्छा होति पण माझा मुलगा लहान असल्याने जमनार नव्हते पण २०१३ ला नक्की.......:)

आशुतोष०७११ (मुख्य संयोजक), स्नेहश्री, तोषवी, _मधुरा_. शुगोल, nilams, मिनू>>>

अर्रे!! क्या बात है Happy

सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा!
काहीही मदत लागली तरी हक्काने सांगा Happy

अरे वा! सर्व संयोजकांचे अभिनंदन. गणेशोत्सव दणक्यात होऊ द्या. Happy

हजारोंच्या संख्येने भाग घ्यायला आम्ही आहोतच Wink

आशुतोष०७११ (मुख्य संयोजक), स्नेहश्री, तोषवी, _मधुरा_. शुगोल, nilams, मिनू अभिनंदन !
मी करू शकेन असे काही असेल तर जरूर सांगा.

आशुतोष०७११ (मुख्य संयोजक), स्नेहश्री, तोषवी, _मधुरा_. शुगोल, nilams, मिनू>>> संयोजकांचं अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा Happy माझ्या हातून व्यवस्थितपणे काही मदत होण्याजोगी असेल तर हक्काने सांगा.

वाह! अभिनंदन! गणपती बाप्पा मोरया!

संयोजकांचे पान/ संपर्क व गणेशोत्सवासाठी साहित्य पाठवायचे पान कधी ऊघडणार?

आशुतोष०७११ (मुख्य संयोजक), स्नेहश्री, तोषवी, _मधुरा_. शुगोल, nilams, मिनू >>> नव्या संयोजक मंडळाचे हार्दिक अभिनंदन ! Happy

Pages