तिरंदाजी - खेळाबद्दल माहिती
- एकूण चार स्पर्धा - पुरुष वैयक्तिक, पुरुष सांघिक, महिला वैयक्तिक, महिला सांघिक
- एकूण सहभागी स्पर्धक १२८ (६४ पुरुष व ६४ महिला)
प्रत्येक सहभागी देशाच्या फक्त ६ खेळाडूंना सहभाग घेता येतो (३ पुरुष व ३ महिला)
वैयक्तिक प्रकारात ३ खेळाडू तर ३ खेळाडूंचा १ संघ
- तिरंदाजीचा समावेश १९०० साली झालेल्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये केला गेला. त्यानंतर १९०८ साली लंडन मध्ये तिरंदाजी स्पर्धां वगळण्यात आली होती.१९२० साली एकदाच तिरंदाजीची स्पर्धां झाली.त्यानंतर ५२ वर्षांनी १९७२ मध्ये म्युनिक ऑलिम्पिकमध्ये तिरांदाजीला परत स्थान मिळाले ते अजूनही कायम आहे.
- तिरंदाजीत लक्ष्याच्या मध्याच्या जास्तीत जास्त जवळ बाण मारणे साध्य करणे हेच ध्येय. ऑलिम्पिक तिरंदाजीचे लक्ष्य १२२ सेमी व्यासाचे असते आणि त्याचा मध्य भाग १२.२ सेमी व्यासाचा असून तो सोनेरी असतो (जास्तीत जास्त १० गुण) . लक्ष्यावर एकूण १० गोल आखलेले असतात आणि आतील गोलात बाण लागल्यास १० गुण तर बाहेर येत येत प्रत्येक गोलातील गुणांची संख्या कमी होत सर्वात बाहेरच्या गोलात बाण लागल्यास १ गुण मिळतो. खेळाडू ७० मी. अंतरावरून लक्ष्याचा वेध घेतात. पुरुष आणि महिला वेगवेगळया स्पर्धांत सहभागी होतात.
- सर्व चारही स्पर्धा बाद फेरीच्या असतात. स्पर्धेच्या सुरुवातीला सर्व स्पर्धक क्रमवारी ठरविण्याच्या स्पर्धेत भाग घेतात. प्रत्येक स्पर्धकाने ७२ बाण मारणे आवश्यक असते. प्रत्येकाला ४ मिनिटांच्या वेळेत ६ बाण मारायच्या १२ फेर्या पूर्ण कराव्या लागतात. ७२ बाण मारून झाल्यावर गुणांची बेरीज करून त्यानुसार सांघिक आणि वैयक्तिक क्रमावारी निश्चित केली जाते. १ ते ६४ क्रमांक वैयक्तिक खेळाडूस दिले जातात.
- वैयक्तिक स्पर्धा
- बाद फेरीची स्पर्धा - क्रमांक १ चा स्पर्धक क्रमांक ६४ स्पर्धाकाविरुद्ध खेळतो. प्रत्येकी ५ फेर्या असतात. आणि प्रत्येक फेरीत ३ बाण मारायचे असतात. गुण जास्त असलेला स्पर्धक ती फेरी जिंकतो. फेरी जिंकल्यास २ गुण तर बरोबरी झाल्यास १ गुण मिळतो. ६ गुण आधी मिळवणारा स्पर्धक विजेता घोषित केला जातो. बरोबरी झाल्यास दोन्ही स्पर्धक अजून एका बाण मारतात. ज्याचा बाण मध्य्याच्या जास्तीत जास्त जवळ जातो तो विजेता ठरतो.
- सांघिक स्पर्धां
- बाद फेरीच्या स्पर्धेत एकूण १२ संघ भाग घेतात. दोन्ही संघ ४ फेर्यांमध्ये प्रत्येकी ६ बाण मारतात. प्रत्येक खेळाडू एका फेरीत २ बाण मारतो. जास्ती गुण असणारा संघ विजेता घोषित केला जातो. बरोबरी झाल्यास ३ बाणांचा शूट ऑफ होतो. त्यातही बरोबरी झाल्यास ज्यांचे बाण मध्य्याच्या जास्तीत जास्त जवळ असतात तो संघ विजेता ठरतो.
- सर्वोत्कृष्ट ४ संघ उपांत्य फेरीत जातात.
- उपांत्य फेरीतील विजेते संघ अंतिम फेरीत एकमेकांविरुद्ध खेळतात.
- अंतिम फेरीतील विजेत्यास सुवर्ण, हरलेल्यास रौप्य आणि उपांत्य फेरीतील दोन पराजित संघातील लढतीत विजेता ठरलेल्या संघास कांस्य पदक दिले जाते.
भारतीय संघ आणि प्रतिस्पर्धी..
यंदा भारतास तिरंदाजी पदक मिळायची शक्यता आहे. दिपिका कुमारी ही १८ वर्षीय भारतीय तिरंदाज महिलांच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. आणि तिचा फॉर्म बघता पदक मिळावे. तसेच पुरुष संघही चांगल्या फॉर्म मध्ये आहे. आधी झालेल्या दोन अंतरराष्ट्रीय स्पर्धात दुसरा क्रमांक पटकावलेला आहे.
भारतीय पुरुष संघात राहुल बॅनर्जी, तरुणदीप रॉय आणि जयंत तालुकदार आहेत तर महिला संघात दिपिका कुमारी, बोम्बायला देवी आणि चेक्रुवोलू स्वुरो आहेत.
सांघिक खेळात महिलांमध्ये कोरिया, चीन, चायनीज तैपेई आणि भारत ह्या संघात उपांत्य लढती होण्याची शक्यता आहेत तर पुरुषांमध्ये कोरिया, अमेरिका, इटली, भारत हे संघ यायची शक्यता आहे.
मूळ लेख - http://www.london2012.com/mm/Document/Documents/Publications/01/25/72/48...
दिपिका व संपुर्ण संघाला
दिपिका व संपुर्ण संघाला शुभेच्छा
हे छान झालं. (एक भा प्र :
हे छान झालं.
(एक भा प्र : तिथली चित्रं टाकायची झाली तर कॉपीराइटचा प्रश्न येईल का ?
चित्रं बघितली की पटकन डोक्यात पक्कं होतं म्हणून विचारलं.)
चित्रे तिथून घेतली आहेत असे
चित्रे तिथून घेतली आहेत असे लिहिले तर बहुतेक येणार नाही.... तरी पण मा.अॅडमिनांना एकदा विचारुन बघावे.. ते हो म्हणल्यास टाकता येतील..
अरे वा. मस्त. लेकीला वाचायला
अरे वा. मस्त.
लेकीला वाचायला देईन.
हो चित्र टाकता येत असतील तर छानच होईल.
मस्त माहिती दिलीस रे. सध्या
मस्त माहिती दिलीस रे.
सध्या बघणं शक्य वाटत नाहिये वेळेअभावी पण सर्व बातम्या फॉलो करेनच

यंदाच्या १५ ऑगस्टला देशाविषयीचा अभिमान अजुन जास्त वाढेल अशी कामगिरी सर्व खेळाडु करतील अशी आशा आहे.
सहीच! मराठीत वाचताना अधिक मजा
सहीच! मराठीत वाचताना अधिक मजा येते.
मस्त... नेमबाजी बद्दल पण
मस्त... नेमबाजी बद्दल पण माहिती देता आली तर बघा प्लिज...
हिम्सकूल, प्रचिंबाबत
हिम्सकूल, प्रचिंबाबत अॅडमिनना विपु केली आहे. बघूया ते काय म्हणतात.
हिम्या, ज्या मूळ मसुद्याचं
हिम्या, ज्या मूळ मसुद्याचं मराठीकरण केलं आहे त्याचीही लिंक लेखात द्यावी असं वाटतंय.
तब्बल २ तासांनी मंजूच्या
तब्बल २ तासांनी मंजूच्या पोस्टीला अनुमोदन देऊन काही उपयोग नाही हे लक्षात आल्याने पोस्ट संपादित केली आहे
तिरंदाजीच्या क्रमवारीच्या
तिरंदाजीच्या क्रमवारीच्या फेरीत कोरियाच्या इम डाँग ह्युने ६९९ गुण नोंदवत जागतिक विक्रम नोंदवला आहे. भारताचे तरुणदीप राय,राहुल बॅनर्जी आणि जयंत तालुकदार अनुक्रमे ६६४, ६५५ आणि ६५० गुणांसह ३१व्या,४६व्या आणि ५३व्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे भारतीय पुरुष संघ शेवटच्या=बाराव्या स्थानी फेकला गेला आहे.
मयेकर हेच लिहायला आलो होतो..
मयेकर हेच लिहायला आलो होतो.. आता महिला काय करतात ते बघायचं..
पुरुष सांघिक मध्ये सुद्धा कोरियानी जागतिक विक्रम नोंदवला आहे..
भारतीय संघाची पुढची लढत जपान बरोबर आहे..
आणि तो इम डाँग ह्यु 'लीगली
आणि तो इम डाँग ह्यु 'लीगली ब्लाईण्ड' आहे म्हणे !!
वा.. या खेळाबद्दल अजिबात
वा.. या खेळाबद्दल अजिबात माहिती नव्हती आधी..
वा ! मस्त माहिती दिलीहेस रे
वा ! मस्त माहिती दिलीहेस रे ..
महिला क्रमवारीची फेरीही पार
महिला क्रमवारीची फेरीही पार पडलेली आहे... त्यातही पहिले दोन क्रमांक कोरियाच्या खेळाडूंनीच पटकावलेले आहेत. भारताची दिपिका कुमारी ८ व्या क्रमांकावर तर बोम्बायला देवी २२ आणि स्वुरो ५९ व्या स्थानावर आहेत..
तसेच सांघिक कामगिरीनुसार भारताचा क्रमांक ९ वा आहे..
सोमवारी महिलांची एलिमिनेशन
सोमवारी महिलांची एलिमिनेशन राऊंड आहे ना? तिकडे लक्ष ठेवायला हवे.
आज पुरुषांच्या सांघिक
आज पुरुषांच्या सांघिक स्पर्धेच्या पदकांचा निकाल लागेल.
उद्या महिलांच्या.
तिरंदाजीच्या म्याचेस पहायला
तिरंदाजीच्या म्याचेस पहायला मजा येते. पुरूष सांघिक गटात आपली आणि जपानची बरोबरी झाली. म्हणून शूट-आऊट की हिट-आऊट अशी काहीतरी फेरी घेतली गेली. त्यात जपानचे १०-१०-१० आणि आपले ९-९-१० गुण झाले आणि आपला संघ २ गुणांनी हरला.
जपान्यांनी शेवटच्या क्षणी
जपान्यांनी शेवटच्या क्षणी बरोबरी साधली
२१-२१ बाणांनंतर भारत २ गुणांनी पुढे होता.
मी बघितली मॅच टीव्हीवर
मी बघितली मॅच टीव्हीवर लाईव्ह.. दोन्ही संघ कोणत्याही दबावा शिवाय खेळत होते.. पण शेवटी जपानी लोकांनी कमाल बाण मारले आणि जिंकले.. भारत जपान मधल्या तिरंदाजीच्या लढती कायमच अश्या अटीतटीच्या होतात असे समालोचक सांगत होते..
आता उद्या महिला काय करतात ते बघायचे...
भारत जपान मधल्या तिरंदाजीच्या
भारत जपान मधल्या तिरंदाजीच्या लढती कायमच अश्या अटीतटीच्या होतात असे समालोचक सांगत होते.. >>>
अरे वा! ही माहिती नव्यानेच कळली.
(मी टी.व्ही. म्यूट करून पाहत होते. शेजारच्या फ्लॅटमधून कान किटवणारे ड्रिलिंगचे आवाज येत आहेत दिवसभर
)
भारतीय संघाची पुढची लढत जपान
भारतीय संघाची पुढची लढत जपान बरोबर आहे.. >>>> मी आज पाहिली.
अर्रर्र थोडक्यासाठी ना, असं वाटलं. जपान मस्तच.
आपल्या खेळाडूंनी हातातली मॅच
आपल्या खेळाडूंनी हातातली मॅच घालवली.. जास्त लीड घ्यायची संधी पहिल्या पासूनच घालवली...
६ मधे ५२ भारत ६ मधे ५१
६ मधे ५२ भारत
६ मधे ५१ डेन्मार्क
१ मार्क ने डेन्मार्क विजयी
१ मार्क ने डेन्मार्क विजयी
तिरंदाजी आत्ता वैयक्तीक साठी
तिरंदाजी आत्ता वैयक्तीक साठी बोम्बायला देवीची पहिल्या फेरीची मॅच सुरु आहे...
मी पण हाच धागा शोधत होतो..
मी पण हाच धागा शोधत होतो..
जिंकली बोंबायला देवी.
जिंकली बोंबायला देवी.
१/१६ मध्ये दाखल.. ती मॅच पण
१/१६ मध्ये दाखल.. ती मॅच पण लगेचच आहे... जिंकली तर उपांत्यपूर्व फेरीत दाखल होईल..
Pages