निसर्गाच्या गप्पा (भाग १०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 July, 2012 - 14:54

निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)

मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||

हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.

- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुभांगी - किती मोठे आहे हे कलिंगड ? मागे एकदा आमच्याकडील कुंडीतही असेच आले होते पण फार मोठे झाले नाही, साधारणतः टेनिस बॉलएवढेच झाले व पुढे वाढले नाही......

शेळी - तुम्ही कुठल्या भोपळ्याचा वेल लावणार आहात ? - दुधी का लाल. लाल भोपळ्याला फळ धरायला खास जमीन व हवामान लागते असं माझा शेतकरी मित्र म्हणत होता. दुधीचे फार नखरे नसतात, कुठेही फलधारणा सहज होते.

शशांक, कलिंगड टेनिसबॉलपेक्षा मोठे आहे साधारणतः २५० ग्रॅम. पण ते खुपच कडक आहे Happy
अजुनतरी काही खराब होण्यासारखी चिन्हे दिसत नाहियेत. काही करावे का त्यासाठी?
अजुन एक गेल्या दोन एक दिवसात बरीचशी फुले गळुन पडलियेत. काही काही ठिकाणी तर बोटाच्या पेराएवढी फळे येवुन ती ही गळुन पडताहेत Sad
असो.
वर्षुदी, पावसाळा आहे ग नावाला इथे पन दिवसभर दमट हवा असते ना उन ना पाऊस. कधीतरी एखादी सर येवुन जाते जमीन ओली करायला.

अजुन एक गेल्या दोन एक दिवसात बरीचशी फुले गळुन पडलियेत. काही काही ठिकाणी तर बोटाच्या पेराएवढी फळे येवुन ती ही गळुन पडताहेत >>> हे पण सेम, ब-याच फळांमधून एकच फळ टिकले व ते फार मोठे झाले नाही.....
खूपच कडक आहे >>>>- म्हणजे अजून कच्चेच असणार, जरा (किती दिवस हे सांगणे अवघड आहे) वाट पहाणे, फार पाणी न देणे (असा पाण्याचा ताण दिला की फळ छान गोड होते), फळाखाली छोटासा प्लॅस्टिकचा तुकडा ठेवा - ते फळ खराब होऊ नये म्हणून. पण बरेच दिवस घेते ते पिकायला व खराबही होत नाही लगेच. जवळपासच्या फळवाल्याकडे चौकशी करा - ते पिकले हे कसे ओळखायचे ते.

शशांक,
दुधी हि मानवाने खायला / वाढवायला सुरवात केलेली पहिली भाजी आहे. म्हणून इतकी गुणी, बरं.
लाल भोपळ्याला, फळ नाही धरले, तरी भाजीसाठी पाला भरपूर मिळतो.

शुभांगी, वेल छोटा असल्याने एक फळ वाढतेय. जास्त फळे वेलाला झेपणार नाहीत. तशीही शेतीतजोएका वेलावर मर्यादीतच फळे ठेवतात. आता पावसात फळाखाली चिखल होणार नाही हे बघायला पाहिजे.

वॉव्...शुभे! लकीयेस गं! मस्त आलय कलिंगड! Happy

नमस्कार निगकर्स!

माझ्याकडे मागच्या आठवड्यात या झाडाने (हो झाडानेच) हजेरी लावली. थोड्या अडगळीच्या ठिकाणी ठेवलेल्या कोरफडीच्या कुंडीत हे नविनच झाड दिसलं. कृपया याचं नाव, गाव सांगायला मला मदत करा.

Nokia-x21242

plant

आणि ही त्याची पानं.

Nokia-x21236

हो शशांकजी! साईझ मोठी असल्याने मी त्यावरुन टाकलेत.

धन्स दिनेशदा.. Happy

आम्ही नागफणी याला म्हणतो.

imagesCAJYYGD9.jpg

शुकु..,' बाळा'ला जप नीट.. >>>> हे बाळ निसर्गतःच चांगलं टणटणीत असतं, बाळसेदारही. काही किड वगैरे लागत नाही, फक्त दिनेशदा म्हणतात तसे चिखलापासून जपणे, बस्स...

ओह..बघते शशांकजी. पण त्याला काही आहे का प्रपोगेशनसाठी?

वॉव्...आवळे कसले लगडलेत!!

शुहे...अगं या सुपार्‍या ना?:अओ:

मदत.....
मी कुर्ग हुन आणलेला तोंडलीचा वेल व्यवस्थीत वाढला आहे..पण चक्क वरच्या व्हरांड्यात(पॅरापेटवर) गेलाय. वर गच्ची आहे. फुलं फळं आली का बघायला गच्चीत जावं लागेल्...आता काढणंही शक्य नाही...काय करु?

अग ते मी चाखुन बघितले निंबोळीसारखे थोडे तुरट गोड लागत होते.
सुपार्‍या आहेत का? मला फक्त नारळ ओळखु येतात.

शुभांगी, हे Chrysalidocarpus lutescens आहे - कुंडीत लावायचे जे शोभेचे पाम असते ते. फळे सुपारीसारखी असल्याने एरीका पाम असेही म्हणतात याला.

शुभांगी मस्तच आहे कलिंगड.
माझ्याकडचा "तो" भोपळू नसून खरबूज आहे. साधना ........तू अगदी कर्रेक्ट सांगितलं होतंस. आणि खरच अगदी मोसंबी एवढं होऊन ते कुंडीतच गळून पडलं. काय सुगंध येत होता त्याला.
आणि चवही मस्तच! पण फार गर निघाला नाही.

ओह..बघते शशांकजी. पण त्याला काही आहे का प्रपोगेशनसाठी? >>> या वनस्पतीचे (व्हिपकॉर्ड लिली) कंद असावेत बहुतेक. कमी जास्त पाणी घालून ट्राय करा - येईल परत कोंब त्याला..

शुभांगी कुलकर्णी - एक मित्रत्वाचा सल्ला - असे कुठलेही माहित नसलेले फळ खाऊन वगैरे पाहू नका - अनेक अनोळखी वनस्पती प्रचंड विषारीही असू शकतात (टचवूड, कोणाला काही अपघात न होवो...)

<<या वनस्पतीचे (व्हिपकॉर्ड लिली) कंद असावेत बहुतेक. कमी जास्त पाणी घालून ट्राय करा - येईल परत कोंब त्याला<<
मी तर असं काही लावलं नव्हतं. अचानक आलं ते झाड. वार्‍यामार्फत बीजप्रसारण होत असावं का?

आर्या - त्याचे कंद असतात - जमिनीत ते बराच काळ निद्रिस्त रहातात व योग्य वातावरण निर्माण झाले (योग्य तेवढी आर्द्रता, रुजण्या एवढे पाणी) की त्याला कोंब फुटतात.
वार्‍यामार्फत बीजप्रसारण होत असावं का? >>> मला शंका आहे असं काही होत असावं म्हणून. दिनेशदा जास्त सांगू शकतील......

हम्म...मी त्याचा ऑकरन्स चेक केला. जनरली हिमालयन रेंजेस मधे आढळतं म्हणे हे झाड. अर्थात नर्सरीज मधे वै. असेल पण आमच्या घराच्या आसपास कुठेही कुणाकडेही हे झाड नसणार याची मला खात्री आहे.

Pages