निसर्गाच्या गप्पा (भाग १०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 July, 2012 - 14:54

निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)

मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||

हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.

- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांचे आभार.... Happy

कबुतरे पाठवलेल्यांचा तीव्र निषेध.. त्यांना काय पाठवावे याचा विचार चालु आहे Happy

दिनेशदा,
<<<< मोराचे पंख आणि हमिंग बर्डचे झळाळते रंग, पण असेच तयार झालेले असतात.
तिथे रंगद्रव्य नसते तर सगळा प्रकाश आणि लोलकाचा खेळ असतो. अर्थात म्हणून ते
कमी सुंदर ठरतात, असे अजिबात नाही.>>>>>

हाच प्रकार "daniel egg fly" या फुलपाखरात सुद्धा दिसतो. वास्तविक पांढरे असलेले ठिपके प्रकाशात जांभळे दिसतात.
egg ply daniel.JPG

साधना, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
जिप्स्या..काय रे पक्षी,फुलं ,पानं नको कै साधना ला.. तिला मांजरी दे त्यापेक्षा Lol

दिनेश दा , रंगांबद्दल मस्तरंगीन माहिती!!!

आपल्याला दिसणा-या रंगांच्याबाबत जी चर्चा चालू आहे त्यालाच उद्देशून हे वाक्य मला वाटते बहुतेक "मॅट्रिक्स" सिनेमातील आहे -

If real is what you can feel, smell, taste and see, then 'real' is simply electrical signals interpreted by your brain.

हो शशांक, शेवटी कुठल्याही संवेदनेत, मी हा शेवटचा पण सर्वात महत्वाचा घटक असतोच ना !

या महिन्यात अनेक वाढदिवस आहेत. माझ्याकडून एखादा विसरला गेला असेल तर माफ करुन टाका बरं !

नमस्कार लोकहो.
कधीतरी उन्हाळ्यात कलिंगड खाऊन बिया गॅलरीत ठेवलेल्या सुकण्यासाठी त्यातलीच एखादी रुजली असेल कुंडीत आणि त्याच रुपांतर असं झालय आता

आणि हे पहिलं वहिलं कलिंगड

मामी बोनस आहे माझ्यासाठी तो. वेल खाली उतरली होती ग्रीलच्या रॅकमधुन आणि हे कलिंगड खाली लोंबत होते मला दिसलेच नव्हते मग खालच्यांनी मला अगदी फोन करुन सांगितले.
मला फक्त एक शंका आहे. आता कलिंगडाचा सिझन नाही आणि हे नैसर्गिकरित्या आलेले असल्याने कितपत टिकेल?

वॉव्..शुकु.. एकदम कलिंगड... ते ही अनपेक्षितपणे लागलेलं पाहून किती आनंद झाला असेल नं..
कलिंगडांचा मोसम नाही तिथे सध्या?? पण उन्हाळा तर चालू आहे अजून.. बघ बाजारात ही मिळत असतील ..

साधना, वाढदिवसाच्या, खूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊउ उशीरा शुभेच्छा! रागवू नको ग! Happy
Perennial-Pleasures-Nursery-Custom-Services-Wedding-Flowers.jpg

बघ मी तुला, कबुतर, मांजर नाही दिल भेट म्हणून. आता खूष ना? Happy

बघ मी तुला, कबुतर, मांजर नाही दिल भेट म्हणून. >> त्या गुच्छातली फक्त ती कबुतराच्या रंगाची फुले बघताना उडणार्‍या कबुतराची आकृती दिसतेय Happy

Pages