अंबाडे / बी-लिंबु चे लोणचे..[फोटो सहीत]

Submitted by सुलेखा on 9 July, 2012 - 13:20
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१०-१२ अंबाडे.
हे लहान बाळकैरी सारखे दिसणारे आंबट फळ आहे.यात कोवळी अगदी लहानशीच बी असते.
१० लसुण पाकळ्या.
२ टेबलस्पुन आले किसलेले.
१ टेबल्स्पुन काश्मिरी तिखट.
१ टेबलस्पुन मीठ.
१ टेबलस्पुन मोहोरीची डाळ.
१ टेबलस्पुन तीळ भाजलेले.
१ टेबलस्पून जीरे,मेथीदाणा
१ टीस्पुन हिंग.
१ टीस्पुन हळद.
१ टीस्पुन बडीशोप.
१/२ वाटी तेल.

क्रमवार पाककृती: 

१ टीस्पुन तेल गरम करुन त्यात मेथीदाणा,मोहोरी,जीरे ,हिंग घालावे.ते परतुन घ्यावे.
उरलेले तेल गरम करावे .तेल तापले कि गॅस बंद त्यात हळद घालावी.हे तेल थंड करण्यास ठेवावे.
हे परतलेले जिन्नस्,मोहोरी डाळ,तीळ,तिखट,आले व लसुण आणि मीठ मिक्सरमधे छान पुड / पेस्ट /[वाटण ]करुन घ्यावी.
अंबाडे उभे एकाचे चार चिरुन घ्यावे.फोडणी च्या थंड तेलात वाटलेला मसाला व बडीशोप एकत्र करुन घ्यावा.त्यात चिरलेले अंबाडे घालुन मिश्रण पुन्हा एकदा छान ढवळावे.
अंबाड्याचे खमंग लोणचे तयार आहे.
Ambade lonache.JPG
हे लोणचे टिकते.
उ.प्र. मधे "कमरख" या नांवाचे फळ/भाजी मिळते ते रसाळ व आंबट असते.त्याचा उपयोग चटणी ,कोशिंबीरी मधे व भाजी-आमटीत आंबटपणासाठी वापरतात्.त्याचे हा मसाला वापरुन लोणचे [पण टिकाऊ नसते]करतात. तेव्हा कमरख सारखेच अंबाडेचे लोणचे करावेसे वाटले.चव छान असुन टिकणारे आहे. हे अंबाडे मीठाच्या पाण्यात उभी चिर देवुन टाकायचे.वर्षभर टिकतात्.आंबटपणासाठी उपयोग करता येतो.तसेच खाल्ले असता तोंडाला चव येते.

अधिक टिपा: 

मी अंबाडे कसे दिसतात ते कळावे म्हणुन प्लेट मधे काही अंबाडे तसेच ठेवले आहेत्.व ४-५ मसाल्यात चिरुन टाकले आहेत्.अंबाडे महाराष्ट्र बाहेर दिसत नाहीत.
[कॅमेर्‍याचे सेल डिस्चार्ज झाल्याने फोटो आत्ता देता येत नाही.नंतर टाकते]

माहितीचा स्रोत: 
स्व-प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे देवा, काय टेम्पटिंग फोटो आहे. भन्नाट कलर आहे. जेवण झाल्यावर टाकला नाही तर जीवाचे हाल झाले असते. तसेही झालेच म्हणा.