काळ्या मसाल्याची आमटी

Submitted by स्नेहश्री on 4 July, 2012 - 00:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आज मस्त पाऊस पडत आहे.
काही जणांना पाऊसांत भिजायला आवड्त तर काहीनां पाऊस घरात Njoy करायला आवडतो.
पाऊस घरात Njoy करणार्‍यांसाठी ही आमच्या काकुच्या गावची बुरंबाड- कोकणातील खास पाककृती.

साहित्यः-
शिजवलेली डाळ.. (कोणतीही.. हरभरा, तुर, मुग, मसुर.. तुमच्या आवडीप्रमाणे)
१ कांदा भाजुन.. मी गॅसवर भाजते (चुल असल्यास उत्तम)
फोडणी चे साहित्य..(तेल, जिरे, मोहरी, हिंग, हळद).
मीठ
काळ्या मसाल्यासठी:-
१+१/२ चमचा बडीशोप
६/७ मिरीचे दाणे
१ चमचा खसखस
४/५ लवंगा
१ इंच दालचिनी
तमालपतत्राच १ पान

मसाल्याचे सर्व सहित्य वेगवेगळे (खमंग)भाजुन घ्यावे.
व एकत्र पुड करावी.
इतरः
पहिल्या वाफेचा भात.. शक्यतो पटणी/ लाल तांदुळाचा वा आंबेमोहोराचा.

क्रमवार पाककृती: 

१) कांदा भाजुन मिक्सर मध्ये बारिक करुन घ्यावा. जिरे, मोहोरीची फोडणी करुन प्रथम त्यात बारीक केलेला कांदा घालावा.
२) नंतर वरुन डाळ घालावी
३) त्यात गरजेनुसार पाणी व चवीनुसार मीठ घालुन घ्या.
४) आणि मग त्यात तयार मसाला घाला आणि छान उकळी काढवी.
५) धुवांधार पाऊस, वाफाळता भात आणि त्यावर गरम गरम आमटी......वा!!!!! क्या बात है...!!!!

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे.. साधाराण ४ जणांना
अधिक टिपा: 

कोरडे मसाले मी भाजुन ठेवते. व पुड करुन ठेवते.. आयत्या वेळेला पुड परत मिक्सर मधुन फिरवयची म्हणजे ताज्या मसाल्याचा फील येतो.

माहितीचा स्रोत: 
मंगलाकाकु..
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येस्स अश्विनी तै सुके खोबरेपण भाजून घालते.. पण येथे चुल नाही आहे ना.. होळीत भाजलेल खोबर्‍याने तर एकदम भारी चव येते..

लाजो ताई नक्की करुन बघ.. विकांताला आमची आमटी-भाताची पार्टी करतोच.. Happy
होय रुणुझूणु ताईअ.. एकदम भारी लागतात.. डाळीचे गोळे.. पण मस्त लागतात यात.. Happy

होय मोन्स.. मी ऐकल आहे..

सही!
आमच्याकडे एखाद्या मोठ्या कार्यानंतर जेव्हा सलग तीनचार दिवस पक्वान्नं खाऊन जीभ जडावलेली असते तेव्हा श्रमपरीहाराला ही आमटी आणि भात असतोच असतो. Happy
अश्विनी म्हणाली तसं कांदा आणि सुकं खोबरं खमंग भाजून वाटून एक मसाला... सुक्या मिरच्या आणि लसणी भाजून वाटून दुसरा मसाला आणि खडे गरम मसाले भाजून पूड करून तिसरा कोरडा मसाला असे तिन्ही मसाले तेलावर परत परत परतायचे, इतके की पंचक्रोशीत दरवळ पसरला पाहिजे Wink मग शिजवलेली डाळ, मीठ आणि गूळ घालून पाणीदार आमटी उकळ उकळ उकळवायची. पत्रावळीवर वाफाळता भात आणि त्यावर तूप ओतून आमटी भातात घालत घालत भुरकत भुरकत खायची. अहाहा!!!

एक फार बिगरी यत्तेतला प्रश्न विचारतेय. कांदा भाजायचा म्हणजे नक्की कसा? किती वेळ? वरचं साल काढून फक्त का अर्धी चीर देऊन? कृप्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे

कांदा भाजायचा म्हणजे नक्की कसा? किती वेळ? वरचं साल काढून फक्त का अर्धी चीर देऊन?
वरदा:
कांदा भाजायचा म्हणजे नक्की कसा? वरचं साल काढून फक्त का अर्धी चीर देऊन?: कांदा सालासकट भाजायचा डायरेक्ट गॅस वरती. हव तर थोडा तेलाचा हात लाव कांद्याला म्हणजे खमंग भाजला जाईल.

किती वेळ? : कांद्याच साल पुर्ण काळ झाला पहिजे. कांदा भाजायला ७/८ मि. पुरतात.

आम्ही चिन्चेचा कोळही घालतो.मस्त आंबट गोड आमटी होते वरणफळाची!!!!! तोपासू!!!!!!!!!आज रात्रीचा बेत पक्का!

फोटु विकांताला बहुदा..
@ मंजुडी... भारी वर्णन.. जाम भुक लागली आहे..वाचुन
@ रैना , विविन, सुचारिता धन्यवाद.

कुठल्याही उपासाच्या दिवशी मायबोली अज्जीब्बात उघडु नये, उपास मोडल्याचे पाप लागते.:अरेरे:

स्नेहश्री धन्यवाद केल्यावर आता कळवण्णारच. !:स्मितः

आजच करून खाल्ली ही आमटी...बाजरीच्या भाकरीबरोबर!
अप्रतिम चव!
शेअर केल्याबद्दल धन्यवाद!

मी आज केली होती. आवडली सगळ्यांना. कोकणात आमच्याकडे याला गरम मसाल्याची आमटी म्हणतात.
वर तुम्ही जे प्रमाण दिलं आहे तेच घेऊन जरा गोडसर वाटली चवीला म्हणून किंचित लाल तिखट घातलं वरुन. जास्मिन राईस, तूप, आमटी आणि आंबा-मेथी लोणचं मस्त लागलं.

सगळ्यांना धन्यवाद.
बित्तुबंगा .. सायो धन्यवाद.
सायो.. अगं खरयं कांद्यामुळे थोडी गोडुस चव येत असावी...माझ्या बाबतीत तिखट झेपण जरा कठीण आहे .. म्हणुन मी जपुन असते.. तिखट हवी असल्यास.. थोडी लाल मिरची परतुन घे.आणि मसाल्याबरोबर वाट.. मस्त चव येते. Happy

@ दिनेशदा.. मस्त लागते... फक्त शिळी उसळीचा रस्सा + शिळी कडक भाकरी चुरुन वर तेलाची धार ... बुक्की मारलेला कांदा..वाह..!! क्या बात है टाइप.. Happy

काल केली ह्या आमटीतली वरणफळं.
मसाला (कांदा आणि बडीशेप वगळता) मला कटाच्या आमटीजवळ जाणारा वाटला, म्हणून हरबर्‍याची डाळ घेतली होती.
मस्त. एकदम खमंग चव आली. एरवीच्या वरणफळापेक्षा अर्थातच खूप निराळी.
आता हा मसाला नेहेमी वापरत जाईन.
धन्यवाद!

Pages