जिगसॉ पझल - रंगांचा खेळ बाय द पेंटर ऑफ लाईट !

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

Thomas Kinkade म्हणजे The Painter of Light हे समीकरण मला जेव्हा मी त्याच्या पेंटिंगवर आधारित पझल सोडवायला घेते तेव्हा नव्याने आणि प्रकर्षानं जाणवतं.

सकाळच्या, संध्याकाळच्या प्रकाशात, दिव्याच्या प्रकाशात हे पझल माझ्यासाठी फार वेगवेगळ्या रंगछटा घेऊन आलं.
... पझलचा एखादा भाग लख्ख सूर्यप्रकाशात फार सोपा आणि सहज जुळण्यासारखा वाटत असतानाच, अचानक आभाळ भरुन आलं की तेच रंग अनोळखी वाटायला लागायचे आणि एखादा तुकडा सापडता सापडता अगदी सापडेनासा व्हायचा.

बदलत्या प्रकाशातला हा रंगांचा खेळच हे पझल सोडवताना माझ्यासाठी खूप आव्हान देणारा होता...

विषय: 
प्रकार: 

मस्त पझल! किती तुकड्यांचं आहे?

मलाही थॉमस किनकेडच्या चित्रांमधला ड्रीमी, fairytale-ish ग्लो फार आवडतो Happy किनकेडला फाईन आर्ट्स क्षेत्रातील कलाकार आणि तज्ज्ञांनी कायम कमी लेखले तरी लोकांनी त्यांच्या चित्रांच्या प्रिंट्स लोकांनी वेड्यासारख्या विकत घेतल्या. दोन-तीन महिन्यांपूर्वीच वारले ना ते? पेपरात वाचल्याचं आठवतं...

सुपर्ब पेंटिंग आणि हे लावताना प्रचंड पेशन्स हवा ना. त्यासाठी तुझं कौतुक. किती पिसेस आहेत हे ?

धन्यवाद सगळ्यांना Happy
हे १५०० तुकडे आहेत.. साधारण १२ तास टोटल वेळ लागला.
युरोपियन चित्रकारांचा मनावर पगडा असल्याने माझ्या 'आवडत्या चित्रकारांच्या' यादीत थॉमस किनकेड नव्ह्ता आधी कधी. पण त्याच्या चित्रांवर आधारित पझल सोडवायली घेतली, तेव्हा त्याची आर्ट आणि ते रंगांची त्याचं खेळणं मी जास्ती अ‍ॅप्रिशिएट करायला लागले. त्याच्या चित्रांकडे बघायचा माझा दृष्टीकोनच बदलला.
एप्रिल २०१२ मधे गेला तो... ह्या पझलमुळे ओळखीचा झालेला एक कलाकार गेला हे वाईट वाटलं होतं तेव्हा !!

ही शैली माझ्या फारशी आवडीची नाही पण छायाप्रकाशाचा खेळ शिकायला हे नक्कीच इंटरेस्टिंग आहे.
असा गेम रेंम्ब्राचा मिळतो का? अशक्य मजा येईल त्याच्या काही पेंटींग्जचा हा गेम जुळवताना.

भारी ! मला फार फार आवडतात ही पझल्स :जळणारी बाहुली :
ही अशी पझल्स मिळाली की काही करावेसे वाटत नाही. सतत हा तुकडा कुठला बरं हे विचार मनात असतात. लहानपणी फार ओरडा खालाय आईकडून.... पण अजून काही हौस जिरली नाही Happy

अवल, माझ्या पुढच्या भारत भेटीत तुझ्यासाठी एक पझल गिफ्ट म्हणून नक्की Happy

निवांत पाटील, मस्तच Happy
तुकडे किती यापेक्षा ते सोडवताना किती मजा येते आणि संपल्यावर किती आनंद मिळतो हे जास्त महत्वाचं Happy

सायो, तुझ्या लेकीला बेस्ट लक. मला पूर्ण झालेलं पझल पाहायला नक्की आवडेल.

जुन्या मायबोलीवर मी माझ्या ह्या छंदाबद्दल आणि पझल्सशी असलेल्या माझ्या ह्या मैत्रीबद्दल, ती सोडवताना मनात येणा-या विचांरांबद्दल नियमीत लिहित असे, माझ्या जुन्या रंगीबेरंगीवर.
ते लिखाण कदाचित जुन्या फॉन्टमुळे वाचता येणार नाही. पण लवकरच ते लिखाण आणि काही नवीन पझल्स असा ब्लॉग तयार करतीये. त्याची लिंक इथे नक्की देईन. कोणाला इंटरेस्ट असेल तर वाचायला Happy

आता वेगवेगळ्या 'डिफिकल्टी लेव्हलची' पझल करते आणि वेळ लावुन अधिक challenging करायचा प्रयत्न करते... मजा येते.

परत एकदा आवर्जुन अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे Happy

टू गुड!!!

हे १५०० तुकडे आहेत.. साधारण १२ तास टोटल वेळ लागला. >>> चिकाटी वाखाणण्याजोगी आहे Happy

ब्लॉग ची लिंक नक्की दे Happy

पाटिल, तुम्ही केलेले पझल देखिल छान आहे Happy