फटके अफाट होते

Submitted by Kiran.. on 25 June, 2012 - 23:08

प्रा. देवपूरकर सर, माफ करा.. राहवलं नाही. एका विबासित पतीची करुण कथा !
आमची प्रेरणा http://www.maayboli.com/node/35934

का वाटते पतीला, पत्नी जुनाट होते!
स्टेफनित गुंतले की, जगणे सुसाट होते!!

घन केशकुंतलांनी, नव-यास हे शिकवले....
पाऊल वाकडे कर, पाऊलवाट होते!

असते किती जणांना, अवगत कला जिन्याची ?
अंगास वस्त्र त्यांचे, जगणे विराट होते!

तेव्हां उभे दुतर्फा, मेहुणे खवळलेले ;
ओठांस ओठ होते, तेही अचाट होते!

यावे न आता कोणी जन्मास माणसाच्या!
कण्हतो जिथे जिथे तो, दुखरीच पाठ होते!!

कोड्यासमान माझे सासर खाष्ट होते;
मोजून आठ होते, फटके अफाट होते!

काढून घेतले हो, होते...खिशात नव्हते;
माझेच लक्ष नव्हते...समदे पिसाट होते!

माझ्या घरीच झाली, धुलाइ दांडक्याने;
हातात फक्त माझे, अवयव सपाट होते!

- Kiran..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

माझं नाव गणेश विचारे असल्याचं तुम्हाला कळवलेलं आहे. तसं प्रोफाईललाही लिहीलेलं आहे. तरी पण तुम्हाला किरण या नावानेच हाक मारण्याची हौस असेल तर अशा प्रतिभावान आयडीच्या नावाने हाक मारण्याने मला तर गैरव केल्यासारखेच वाटते आहे. तुमची अशीच गंमत केली तर तुम्ही भोकाड पसरता, लाल टिकल्या टाकता, अ‍ॅडमिनच्या विपूत मायबोलीला थ्रेट असल्याच्या खोट्या तक्रारी करता अशी खात्रीलायक बातमी आहे. असो.

दस-याला पुण्यात भेतूयात की मुंबईत. मुंबईतलं ठिकाण तुम्ही सुचवा, पुण्यातलं मी सुचवतो.

शी काय बाई माणूस आहे
मी अनोळखी पुरुषांना भेटत नाही अगदी त्याला दादा म्हणत असले तरी

Pages