निसर्गाच्या गप्पांच्या ९ व्या भागात सर्व निसर्गप्रेमींच स्वागत.
सध्या पावसाचे आगमन दाराशी येऊन ठेपल आहे. सृष्टी आता पाना-फुलांनी, गवतानी हिरवीगार, थंडगार होणार. डोंगर माथ्यावरून पावसाच्या धबधब्यांची तोरणे वाहणार. पशूपक्षी, जनावरांनाही आनंदी आनंद होणार. या आशयाचे छायाचित्र नि.ग. च्या ९ व्या भागासाठी मायबोलीकर निसर्ग प्रेमी जिप्सि याने दिले आहे.
महाभारतात भृगु आणि भारद्वाज ऋषी यांच्यातील वृक्षांविषयी झालेला संवाद. भॄगु ॠषी म्हणतात,
'पंचमहाभूतांनी व त्यांच्या गुणांनी सगळी सृष्टी व्यापलेली आहे.'
त्यावर भारद्वाज शंका घेऊन विचारतात,
"वृक्षाच्या ठिकाणी हे पंचमहाभूतं व त्यांचे गुण हे दिसून येत नाहीत. वृक्षांना दिसत नाही, ऐकू येत नाही. ते वास घेऊ शकत नाहीत. म्हणून वृक्ष-वनस्पती पंचभौतिक आहेत, असं कसं म्हणता येईल ?"
भारद्वाजांच्या या प्रश्नावर भृगूंनी उत्तर दिलं,
उष्णतेमुळं व फार थंडीमुळे ही वनस्पतींची पानं, फळं, फुलं, त्वचा ही ग्लान-म्लान होऊन जातात. म्ह्णून त्यांना स्पर्शज्ञान असलंच पाहिजे.
वादळी वार्यांचा गोंगाट इ विजेचा कडकडाट यांच्यामुळं झाडांची फळं इ फुलं भंगून जातात. त्यामुळं झाडांना कान असून, त्यांनी ती ऐकत असली पाहिजेत.
वेली वृक्षांना वेष्टीतात व सर्वत्र संचार करताना दिसतात. त्यांना दृष्टी असल्याशिवाय मार्ग कसा दिसेल ? म्हणून वृक्षांना दृष्टी असली पाहिजे.
सुगंधी वासाच्या द्रव्यांनी इ धुरांनी झाडं निरोगी होऊन त्यांना फुलांचा बहर येतो. म्हणून वृक्षांना घ्राणेंद्रिय अवश्य असलं पाहिजे.
आपल्या पायांनी वृक्ष पाणी पितात. त्यांना काही रोग झाल्यास इतर द्रवपदार्थ पिऊन ते व्याधींचा प्रतिकार करू शकतात. यावरून वृक्षांना रसनेंद्रिय असलं पाहिजे.
त्याचप्रमाणे वृक्ष जे पाणी व इतर द्रव ग्रहण करतात, ते पाणी किंवा ते द्रव अग्नी म्हणजे सूर्यप्रकाश व वायू यांच्या सहाय्यानं पचवून टाकतात. वृक्षांनी घेतलेला आहार असा पचल्यामुळे त्यांच्या ठिकाणी स्नेह म्हणजे तुकतुकीत कांती व वृध्दी किंवा वाढ ही दिसून येतात."
या सर्व गोष्टींवरून भृगू ऋषी असा निष्कर्ष काढतात : वृक्ष सुखदु:खं अनुभवतात. कापले असतानाही वाढतात, म्हणून वृक्षांमध्ये जीव आहे. ते अचेतन नाहीत अस स्पष्ट होतं.
एके ठिकाणि असं म्हटल आहे की, वन्य प्राणी हे सिध्द जीव आहेत. परंतु मानवाला योगक्रियेद्वारे प्रयत्नानं सिद्धी प्राप्त करुन घ्यावी लागते. म्हणून सुमारे नव्वद टक्के योगासनांची नावं ही पशुपक्षांच्या नावावरून घेतली आहेत. सिंहमुद्रा, मयूरासन, हंसासन, क्रौंचासन, भुजंगासन, मकरासन, कूर्मासन, म्त्स्यासन, शलभासन इत्यादी. ही नुसती आसनांचीच नावं नाहीत, तर त्याबरोबर त्या त्या पशुपक्ष्यांच्या आणि इतर जीवांच्या स्वाभाविक गुणधर्मांचाही त्यात विचार केलेला आहे.
(पाखरमाया - मारुती चितमपल्ली)
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf
अनुक्रमणीका:
पान १ -
प्रकाशचित्रे/ माहिती : कुमुद्/वॉटरलिलि, पेट्रीया, पावसातील झाडांची प्रकाशचित्रे.
माहिती :
"गीता प्रवचने" अध्याय १५, - आचार्य विनोबा भावे.
लोकसत्तातील लेखाची लिंक -http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=227526:...
माहिती हत्तीचे खाणे, ताम्हणाच्या बिया रुजविण्याची माहीती
पान २
प्रकाशचित्र : पावसाची ओढ, पांढरे कांचन
लिंक - ३डी कार्ड कलाकृती - http://www.brooklyn5and10.com/Postcarden-A-Mini-Living-Garden-s/232.htm
माहिती : बिनफुलांचे गुलाबाचे झुडूप, हत्ती, गांधिलमाशी, माशी चावल्यावरचे उपाय
पान ३
प्रकाशचित्र/माहीती : कॅन्डल बुश, पायर
माहिती : प्र.के. घाणेकरांची कविता, हत्तीचे प्लॅस्टीक खाणे, बाभळी आणि गवत, विष्ठे मार्फत बिजरुजवणी, फ्लाय माशीचा डंख
पान ४
प्रकाशचित्र : बिनवासाची रातराणी,घोसाळे, छोटे गोल जाम, कमळ, उल्हास नदी
माहिती : भरत व्यास यांचे हिंदीतले काव्य, घोसाळ्याची जाळी- बॉडी स्क्रबर
लिंक - जांभुळ पिकल्या झाडाखाली - http://www.maayboli.com/node/35264#new
खोपा इनला इनला - http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%...
पान ५
प्रकाशचित्र : कमळ, वॉटरलिलि, साप
माहिती : मिठी, दहिसर, पोयसर नद्या, कमळ व वॉटरलिलि फरक
ज्ञाने., अ. १०, श्लोक ९, ओवी १२७., ओवी २४८, श्लो. ७, अ. १३, ज्ञाने.
पान ६
प्रकाशचित्र : पिवळी अबोली, पिवळा चाफा, रानफळ फालसा
लिंक - कुमुद्/कमळ - http://www.maayboli.com/node/35684#new
पान ७
प्रकशचित्र/माहिती - पिवळी अबोली, वेल्कम टू सेंट्रल अमेरिकन रेनफॉरेस्ट, लाल चाफा, जट्रोफा, इंडियन स्नेकवीड
लिंक - विडंबन - http://www.maayboli.com/node/35718?page=1#new
पान ८
प्रकाशचित्र - ऑर्कीड, पावडर पफ
गप्पा
पान ९
प्रकाशचित्र - ग्रे हाऊंड जातीचा कुत्रा
माहिती - ऑर्कीड
पान १०
प्रकाशचित्र - रातराणी, पंखरुपी सरडा
माहिती - शॅमेलिऑन (रंग बदलणारा सरडा), कर्नाटकच्या जन्गल ट्रेक मधील सरडा
पान ११
प्रकाशचित्र /माहिती - पांढरे तामण, जांभळे, सरडा, शॅमेलिऑन, रामराखी वेल-फळे, अळूचे झाड, वाढदिवस शुभेच्छा
माहिती/चर्चा - घरी मश्रूम बनविणे
लिंक - सरडा - http://www.maayboli.com/node/26325
पान १२
प्रकाशचित्र्/माहीती - चाफा, पांढरा चाफा,बिब्बा, वॉटर हायसिंथ, सुर्यफुल
माहीती : बिब्बा
लिंक - बिब्बा - http://zerobugetfarming.blogspot.in/p/blog-page.html, http://medplants.blogspot.in/2012/03/semecarpus-anacardium-bhallataka.html
पान १३
प्रकाशचित्र : झेंडू, सुर्यफुल रचना, गुलाब
माहिती : अंगणात लावण्याची झाडे, वॉटर हायसिंथ सुर्यफुल रचना, पुस्तक - द सिक्रेट कोड
लिंक - सुर्यफुल गणित
पान १४
प्रकाशचित्र - ससा, व्हॅनिला वेल, ड्राईड फंगस/मश्रुम, एक्झोरा
माहिती - मश्रुम, ससा, आकाश-आभाळ, व्हॅनिला वेल
पान १५
प्रकाशचित्र - कमळ बी, चिंचेचे बोन्साय, जास्वंद, पेरू, आंब्याचा कोंब
माहिती - कमळाचे बी, बोन्साय
लिंक - बोन्साय - http://gardentia.net/gardening_notes09.htm
पान १६
प्रकाशचित्र - मोगरा, हिरवा चाफा, मदनबाण, आंब्याचे कोंब, कांचन, चिपळूण मधील इंद्रधनुष्य, चिमिन
माहिती - ऑरगॅनिक शेती, कांचन
पान १७
प्रकाशचित्र - डान्डेलीच्या जन्गलातले वारूळ, मेहेंदीची फुले, कनकचंपा/रामधनचंपा, चिमिन
महिती - कागडा, गुलाबी गुलबक्षी,
लिंक - http://tasbir.net/, रानफुले - http://www.maayboli.com/node/35001
पान १८
प्रकाशचित्र - महोगनीची फळं, गुलाब, धबधबे,
माहिती - अर्जुन,
लिंक - कासच्या पठाराबद्दल - http://epaper.esakal.com/Sakal/26Jun2012/Normal/PuneCity/page2.htm,
पान १९
प्रकाशचित्र -शेंदरी गुलाब, ऑस्ट्रेलियन बाभूळ, कवठी चाफा, शंकासुर
माहिती - ऑस्ट्रेलियन बाभूळ, वेडी बाभुळ, सुबाभुळ, गिरिपुष्पाच्या पानांचा खत म्हणून वापर, उजूच्या आजोबांची वारी, कविता
पान २०
प्रकाशचित्र - खजुरी/शिंदी, जंगली हळद, चमेली, निवडूंग (ब्रह्मकमळ), फुलपाखरू कोष, अनंतमुळ, पपईच्या बियांना मोड, फळाचे झाड
माहिती - खजुरी/शिंदी, अनंत, अनंतमुळ
लिंक - वेडी बाहुळ - http://www.maayboli.com/node/21956, http://www.esakal.com/esakal/20120702/4800563177643520492.htm, http://www.sendmyflower.com/flowers-species/brahma-kamal-beautiful-flowers/
पान २१
प्रकाशचित्र - गुलाब, सर्प गंधा, पिवळी फुले, डबल मोगरा, तोंडली
माहिती/गप्पा - पक्षांच नाट्य,
लिंक http://www.maayboli.com/node/36134
पान २२
प्रकाशचित्र - 'पॉक छॉय' भाजी, निळी फुले, देव चाफा
माहिती/गप्पा - सुबाभुळ, मासे, जुनी-नवी पिढी, पाकोळी आणि कावळा
लिंक चिवने - http://www.maayboli.com/node/17090
पान २३
प्रकाशचित्र - निर ब्राम्ही, पावशा, चातक,
माहिती - ब्राम्ही, नाईल नदी, विमान प्रवास वर्णने,
लिंक http://www.youtube.com/watch?v=BegWK3vGg7I
पान २४
प्रकाशचित्र - कांचन, मधुमालती,
माहिती -विमान प्रवास वर्णन, टोमॅटो लागवड,
लिंक ब्राह्मी - http://www.aayisrecipes.com/2009/04/01/brahmi/, http://www.maayboli.com/node/19512
पान २५
प्रकाशचित्र - दयाळ, सज्जन गड, बकुळ, कांडवेल,
माहिती/गप्पा - पाऊस वर्णन, कावळा आणि कोकीळा पिल्लू, पक्षी नर मादी,
पान २६
प्रकाशचित्र - गुलाब, रक्त चंदन, पपई, थायलॅण्ड मधे वापरले जाणारे हर्ब्स, गलांगल मासा, धरणाच्या भिंतीवर चालणारे प्राणी, कलमी कृष्णकमळ
माहिती -फोझन प्लॅनेट - अळीच्या खाण्याविषयी माहीती, टेरेस गार्डन, Caught in the Act- सिंह लढाई, रक्त चंदन, कोथिंबीर लागवड,
पान २७
प्रकाशचित्र - वड, पिंपळ बोन्साय, तांबट, निसर्ग दृष्य, पिवळा गुलाब
माहिती - इंडोनेशियन खाणे, बकर्या-गिधाडे, वारी
पान २८
प्रकाशचित्र - शतावरी, कारल्याची वेल, ताडावरील घरटी, लाल फुल
माहिती/गप्पा - पंढरपुर दर्शन, प्राण्यांचे जीवन, मानवी जीवनमान, तण आणि वेल
लिंक
पान २९
प्रकाशचित्र - मांजरी, नर्तकचे घरटे
माहिती - मांजर प्रेम, डॉस मधील फाईल्स, नर्तकचे घरटे
लिंक http://bookboon.com/
पान ३०
प्रकाशचित्र - अनंत, गुलाबी जास्वंद,
माहिती - शैवाल अन्न, अनंत आणि तगर कुळ, फुकुओकांचे पुस्तक, तगर व अनंताची नावे
लिंक http://www.foodfromnorthernlaos.com/2012/05/09/river_weed/ फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf, पांढरी फुले http://www.maayboli.com/node/36402#new, चर्चा - http://groups.yahoo.com/group/fukuoka_farming/
पान ३१
प्रकाशचित्र - गुलाब, कदंब, कोकीळ, कोकिळा, धनेश
माहिती/गप्पा - मुंबई परीसरात दिसणारे पक्षी, कोकीळ-कोकीळा, मोराच्या हालचाली
पान ३२
प्रकाशचित्र - वेगवेगळ्या पोझ मधील मोर,
माहिती - मोर, मोरांची चिंचोली
पान ३३
प्रकाशचित्र - हायड्रेंजीया
माहिती/गप्पा - गोगलगायींचा बंदोबस्त, ओरेक्स प्राण्याचं पाडस-सिंहीण, मोर, मुंग्याची संरक्षण प्रणाली
लिंक nisargayanmagazine@gmail.com, चिलट घालवणारे झाड - http://en.wikipedia.org/wiki/Forking_Larkspur]\
पान ३४
प्रकाशचित्र - भोपळा किंवा टरबुज वेल, सुवर्णपत्री फुले, ढग, गुलाबी कण्हेर, पुष्प गुच्छ.
माहिती - गाय
लिंक
ह्या ब्राम्हीचा उपयोग नक्की
ह्या ब्राम्हीचा उपयोग नक्की काय आहे कोणाला माहीत आहे का ?
सुप्रभात. जागु, चाफा सुन्दरच.
सुप्रभात.
जागु, चाफा सुन्दरच. मला हा हळदुली रन्ग फारच आवडतो.
काल पावसाचे अगदी झिम्माड होते. घरी बसुनच अनुभवला. आज ऑफिसला येताना अन्धेरी -पार्ल्याच्या मधे पश्चिमेला खजुरी-शिन्दी चे झाड दिसले. पावसाने हिरवेगार झालेले आणि केशरी फळान्नी लगडलेले.
नि.ग. आणि त्यावरील जाणकार यामुळे आपल्या आजुबाजुला असलेला निसर्ग असा नव्याने दिसतो.
मधु
मधु
नीर ब्रहमी: उपयोगी भागः
नीर ब्रहमी:
उपयोगी भागः पंचांग ??????
<<<<मी इथला अनोखा निसर्ग
<<<<मी इथला अनोखा निसर्ग अनुभवतोय सध्या. विमानातून, नाईल नदीचा उगम बघितला.
इथले आंबे, काजू, देशी बदाम, कडुनिंब, शेवगा...... सगळेच अनोखे आहे.. आणि एक महाकाय वृक्ष, सहज काही शेकडो वयाचा.. लिहितोच लवकर.>>>>>> दिनेशदा, आमची उत्सुकता फार ताणू नका नाहीतर आम्हीच सगळे तिकडे येवू.
जागु, चाफा फारच सुंदर !
जागु, चाफा फारच सुंदर !
ब्राह्मी चा पाला केशवर्धक
ब्राह्मी चा पाला केशवर्धक म्हणुन वापरतात. पण ती हीच ब्राह्मी का ते आठवत नाही. लहानपणी चिखलाच्या कडेला उगवलेला पाला तोडुन न्यायचो घरी. धुवुन मग खोबरेल तेलात उकळवुन ते तेल डोक्याला लावायचो.
माझ्या आठवणीप्रमाणे ब्राह्मी चा पाला काही काढ्यांमधे असतो. तो मेंदु सतेज करण्यासाठी वापरतात.
पण पुन्हा ही आणि ती एकच का ते माहीत नाही.
सावली ती ब्रम्ही वेगळी,
सावली ती ब्रम्ही वेगळी, मोरपिसातल्या निळ्या डोळ्याच्या आकाराची पाने असतात.
विमानातून जाताना, जर खाली ढग नसतील, तर पृथ्वीची अनोखी रुपे दिसतात. यावेळी अदीस अबाबा ते लुआंडा या प्रवासात, लेक व्हीक्टोरीयाचा उत्तर भाग बघायला मिळाला. इजिप्तला समृद्ध करणारी, नाईल नदी या सरोवरात उगम पावते. तिला ब्ल्यू नाईल म्हणतात आणि इथिओपियातला डोंगराळ भागात उगम पावते ती व्हाईट नाईल. या दोन्ही नद्या मग एकत्र येऊन नाईल बनते.
या दोन्ही नद्यांचे माहितीपट मामीकडे ठेवले आहेत. या नाईल नदीबद्दल लिहावे तेवढे थोडेच. इजिप्तची ९० % प्रजा, या नदीच्या आसपास राहते. जगप्रसिद्ध अस्वान धरण, याच नदीवर आहे. त्याचे बॅकवॉटर आहे तब्बल ५५० किमी. म्हणजे मुंबै ते गोवा !!!
या प्रवासातच लेक व्हीक्टोरियाच्या आधी एक सरोवर लागले आणि त्यात एक अप्रतिम निर्जन बेट दिसले.
गर्द हिरव्या सरोवरात, बदामी रंगाचे बेट, आणि त्या बेटावर दोन सरोवरे. एक आकाशी रंगाचे तर दुसरे, मोरपिशी रंगाचे ( गुगल अर्थ वर बघा बघू )
तशी सोय नव्हती म्हणून, नाहीतर थेट त्या बेटावर उडी मारून, उर्वरीत आयुष्य तिथेच काढायचा, विचार बळावला होता माझ्या मनात !!
दुबईला, अटेंबरो साहेबांची फ्रोझन प्लॅनेट सिडी घेतली, अजून एकच भाग बघितलाय. भारतात मिळत असेल तर विकत घ्याच !!! चित्रीकरणाची नवनवीन तंत्रे वापरुन, साहेबांनी अनोखी सैर घडवली आहे.
दिनेश, परत एक्दा - अॅटनबरो
दिनेश, परत एक्दा - अॅटनबरो साहेबांच्या काय्काय सिडीज आहेत ते सांगा. कोणी तिथुन येणारा गावला तर सांगेन आणायला.
रच्याकने, एवढय उंचीवरुन खालचे हे काय नी ते काय ते कसे कळते?? मला आसेतुहिमाचल फक्त डोंगर दिसतील, हा सह्याद्री, हा सातपुडा हे काय ओळखता येणार नाही....
साधना, कुठल्याही मोठ्या
साधना, कुठल्याही मोठ्या दुकानात मिळतील त्या, ह्यूमन प्लॅनेट, लिव्हींग प्लॅनेट, लाईफ, फ्रोझन प्लॅनेट अशी काही शीर्षके आहेत. फ्लॉवर पॉवर अशी थ्री डी तंत्रज्ञानात चित्रीत केलेली सिडी येतेय. यू ट्यूबवर अप्रतिम ट्रेलर आहे.
सध्या मोठ्या विमानात आपल्यासमोरच चालता नकाशा असतो. त्यामूळे भूभाग नीट समजतात, एमिरेटस, कॅथे सारख्या विमानात तर स्काय शो या सदरात, विमानाच्या नाकावरचा, पोटावरचा कॅमेरा जे टिपत असतो, ते सर्वच दिसत असते. शिवाय हाय डेफिनेशन, लाईव्ह नकाशे दिसत असतातच.
सुप्रभात. दिनेशदा, तुमचे
सुप्रभात.
दिनेशदा, तुमचे सगळेच लिखाण वाचत आले आहे. अप्रतिम, पुन्हा पुन्हा वाचण्यासारखे.
सध्या मोठ्या विमानात आपल्यासमोरच चालता नकाशा असतो. त्यामूळे भूभाग नीट समजतात, एमिरेटस, कॅथे सारख्या विमानात तर स्काय शो या सदरात, विमानाच्या नाकावरचा, पोटावरचा कॅमेरा जे टिपत असतो, ते सर्वच दिसत असते. शिवाय हाय डेफिनेशन, लाईव्ह नकाशे दिसत असतातच. >>>> हे नविनच कळले. अनुभव कधी घेता येईल माहित नाही.
सध्या मोठ्या विमानात
सध्या मोठ्या विमानात आपल्यासमोरच चालता नकाशा असतो. त्यामूळे भूभाग नीट समजतात, एमिरेटस, कॅथे सारख्या विमानात तर स्काय शो या सदरात, विमानाच्या नाकावरचा, पोटावरचा कॅमेरा जे टिपत असतो, ते सर्वच दिसत असते. शिवाय हाय डेफिनेशन, लाईव्ह नकाशे दिसत असतातच.>>>>>>>>
अगदी १००% सहमत!
आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रवासात आपल्यासमोर दिसणारे मूव्ही/सीरियल्स किंवा ऑडिओ म्युझिक यापेक्षा हे चालते नकाशेच मी प्रचंड एन्जॉय केले. आपण कसे आणि कुठे चाललो हे फार मस्त समजते.
तुम्हाला शाळा कॉलेजात भूगोलात कितीही कमी मार्क पडले असले तरी!(डोळा मारणारी बाहुली!)
या नकाश्यांवर एक विमानाच्या आकाराचा अॅरो असतो तो कधी लांबचा व्यू कधी अगदी जवळून असं दाखवून आपलं भगोलिक प्रबोधन करत असतो.
पण यामुळे एकदा एक गंमत झाली होती.
मला आत्ता केबीनमधे बसल्या
मला आत्ता केबीनमधे बसल्या बसल्या पावश्याचा आवाज ऐकु येतोय.
अगदी अस्सा........
http://www.youtube.com/watch?v=BegWK3vGg7I
तशी सोय नव्हती म्हणून, नाहीतर
तशी सोय नव्हती म्हणून, नाहीतर थेट त्या बेटावर उडी मारून, उर्वरीत आयुष्य तिथेच काढायचा, विचार बळावला होता माझ्या मनात !! >> तिथे माबोवर पोस्ट टाकायची सोय असेल तरच जा
मामी, दिनेशनी तुझ्याकडे ठेवलेल्या माहितीपटांची एक यादी दे प्लिज. म्हणजे ते शोधता येतील. जे मिळणार नाहीत त्यांच्याकरता एक गटग करावे लागेल
तिथे माबोवर पोस्ट टाकायची सोय
तिथे माबोवर पोस्ट टाकायची सोय असेल तरच जा>>> अगदी अगदी..
पण यामुळे एकदा एक गंमत झाली होती.>>>>> मानुषी गंमत लिहिलाय ना??
तशी सोय नव्हती म्हणून, नाहीतर
तशी सोय नव्हती म्हणून, नाहीतर थेट त्या बेटावर उडी मारून, उर्वरीत आयुष्य तिथेच काढायचा, विचार बळावला होता माझ्या मनात !! >> तिथे माबोवर पोस्ट टाकायची सोय असेल तरच जा...

+१०००
नाईल तर डोळ्यासमोर आली वर्णन वाचताना..
मानुषी..काय गम्मत झाली होती गं??
अर्रे गिरीश काय सुंदर क्लिप
अर्रे गिरीश काय सुंदर क्लिप आहे.
अगदी पावसाचा फील येतो!
कालच मी शिंजिराचा आवाज रेकॉर्ड केला आहे. खूपच कंटिन्युअस आणि जोराजोरात शीळ घालत होता.
दिनेशजी बाटलीमधे टॅमेटो ची
दिनेशजी
बाटलीमधे टॅमेटो ची लागवड करतात
त्या बद्दल अधिक माहिती आहे का कोणाकडे
मी बागकाम सुरू करतोय माझ्या आजोबांच्या बागेत
लिहिते गं बर्षू ......चिमुरे!
लिहिते गं बर्षू ......चिमुरे! माझा कर्सर गणलाय.
आहाहा.. गिरिश.. गोड आवाज आहे
आहाहा.. गिरिश.. गोड आवाज आहे अगदी चातकाचा.. इतक्या गोड आवाज वाल्या पक्ष्याला चक्क ब्रेन फीवर बर्ड असं नाव.. अरेरे !!!
गोड आवाज आहे अगदी चातकाचा..
गोड आवाज आहे अगदी चातकाचा.. इतक्या गोड आवाज वाल्या पक्ष्याला चक्क ब्रेन फीवर बर्ड असं नाव.. >>>>> ब्रेन फीव्हर बर्ड म्हणजे "पावशा" - पावसाच्या सुमारास ओरडतो व ते ओरडणे 'पेरते व्हा, पेरते व्हा' असे वाटते म्हणून तो पावशा.... (The Common Hawk-Cuckoo (Hierococcyx varius), popularly known as the Brainfever bird, is a medium sized cuckoo resident in South Asia.)....माहिती विकीपिडियावरुन. हा पावशा -

चातक वेगळाच पक्षी आहे.
Scientific name: Clamator jacobinus (Boddaert). Common name: Pied Crested Cuckoo (English Common); Chatak (Hindi, Marathi); (नाव व फोटो आंतर्जालावरुन)

हा चातक -
घ्या मंडळी गंमत पाहिजे तर
घ्या मंडळी गंमत
पाहिजे तर नंतर डिलिट करते.
आम्ही लेकीकडून(वॉशिन्ग्टन डीसी) परतत होतो. तरी मधे यूकेत ८/१० दिवस होतो. खरं म्हणजे डायरेक्ट उसगावातून देशात फ़्लाइट असेल तर खरंच एक्झॉस्ट व्हायला होतं.
तर आम्ही लंडनला इमायनात(म्हराटीत प्लेन) बसलो.
देश यायला अजून वेळ होता. बहुतेक सर्व झोपलेले कारण भारतीय वेळेनुसार रात्रीचे २/३ वाजलेले. मी नेहेमीप्रमाणे नकाशातला ऍरो फ़ोलो करत! प्रवासात झोपलं तर काही तरी मिस् होईल अशी एक भावना नेहेमी मनात असते. थोडक्यात प्रवासात खूप वेळ नाही झोपू शकत! असो....
तर आता भारताच्या देशेने चाललं होतं विमान. मधेच जरा हादरे बसायला लागले. जरा पोटात खड्डाच पडला घाबरून! झोपी गेलेल्यांची झोप जराशी चाळवली इतकंच! नवरोबा तर घोरत होते. इतक्यात तो दुष्ट ऍरो उलटा वळला. म्हणजे चांगलं विमान भारताच्या दिशेने चाललं होतं ते अचानक उलटं वळलं आणि चक्क पाकिस्तानच्या देशेने जायला लागलं. मी भक्तिभावाने ऍरोला फ़ॉलो करत होते. हादरेही वाढले. पण बहुतेक सगळे प्रवासाने थकलेले झोपलेच होते. आता मात्र नवरोबांना उठवलं .....म्हटलं ....अहो आपलं विमान हायजॅक तर नाही ना झालेलं?
नवरोबा कसेबसे जागे होऊन म्हणाले, ....तू स्वता: झोपत नाहीस मलाही झोपू देत नाहीस.
पण एव्हाना त्यांनाही तो ऍरो उलटा चाललेला दिसत होता आणि हादरेही कळत होते. आता मी मात्र गर्भगळित!
पण तेवढ्यात हवाईसुंअरीची अनाउन्समेन्ट ऐकली, " खराब हवामानामुळे आपलं विमान भारतात न उतरवता दुबई विमानतळावर उतरवतो आहोत!"
जीव भांड्यात...नाही मोठ्या घंगाळ्यात पडला.
तिथे चांगले ३ तास थांबून मगच देशात लॅन्ड झालो.
मंडळी हसू नका हं!
शशांकजी, माझा जरा गोंधळ
शशांकजी, माझा जरा गोंधळ होताच, पावशा आणी चातकामधे.
धन्यवाद.
मी भक्तिभावाने ऍरोला फ़ॉलो करत
मी भक्तिभावाने ऍरोला फ़ॉलो करत होते.>>>>> हे मस्तच.....
मंडळी हसू नका हं!>>>>> या सूचनेमुळे न हसता वाचले ........ परत.
बरं इथे स्मायली देत नाही
बरं इथे स्मायली देत नाही वाचल्यावर!
मानुषी, फुकट पाकिस्तान बघता
मानुषी, फुकट पाकिस्तान बघता आलं असतं की.. त्यात काय....
दिनेशदांची संपत्ती गुगलवर
दिनेशदांची संपत्ती गुगलवर एखाद्या ठिकाणी (एखादे नविन गमेल अकाउंट उघडून) चढवावी आणि मग ज्याला हवी त्याने ती तेथुन डाऊनलोड करावी असे मला तरी वाटते.
मामी, जमेल का गं हे??
आधीच एक गंमत झाली असं
आधीच एक गंमत झाली असं सांगितलं नसतं तर काहितरी थ्रिलिंग वाचायला मिळणार असं वाटलं असतं मानुषी.. पण गंमत आहे हे माहित असल्याने हसत हसतच वाचलं.. स्मायली टाकत नाही आता..
ऑफिसशेजारी आंब्याचं झाड आहे.. तिथे कोकिळ कुहु कुहु करत असताना बघुन आले. इतके दिवस फक्त आवाज तरी यायचा नाहीतर कोकिळ तरी दिसायचा फक्त.. आज पहिल्यांदा बघुन ऐकायचा योग आला
शशांक, माधव, चिमुरी........
शशांक, माधव, चिमुरी........ !!!!!!!!!!!!!!
साधना.......पाकिस्तान फुकटमे देखनेका आयडिया अच्छा है!
ळी, मोरपिसातल्या निळ्या
ळी, मोरपिसातल्या निळ्या डोळ्याच्या आकाराची पाने असतात.>>> अगदी पण हा आकार कसा सांगावा या संभ्रमात होते मी. तु सी ग्रेट हो दिनेशदा. चिनी गुलाब कसा जमिनीवर पसरतो तसा हा पण पसरतो.
Pages