४-१० वर्षाच्या मुलांचे कॉमन आजार, दुखणी आणि त्यावर उपाय

Submitted by लाजो on 3 June, 2012 - 18:43

४-१० वर्षाच्या लहान मुलांची कॉमन बारिकसारीक आजारपण, दुखणी, जखमा इ इ बाबत अनुभव आणि त्यावर सहज उपलब्ध असलेले घरगुती उपचार -

लहान मुलांना काही झाले अगदी खरचटले, पाय मुरगळला किंवा सर्दी पडसे झाले तरी आम्हा पालकांचा जीव अर्धा होतो. मुलांना डॉक्टरकडे नेणे महत्वाचे आहेच पण कधी कधी बारिकसारीक गोष्टींसाठी डॉक्टरकडे नेण्याची आवश्यकता नसते किंवा अवेळी जेव्हा डॉक्टर / केमिस्ट उपलब्ध नसतिल अश्या वेळेस काही घरगुती उपायांनी तात्पुरता थोडा आराम मिळु शकतो. काही उपाय जे मोठ्यांना लागु होतात ते लहान मुलांना चालतिलचं असे नाही किंवा लहान मुलं ते करु शकतिल असे नाही जसे वाफारा घेणे, गुळण्या करणे इ इ . मग अश्या वेळेस काय करावे? घरच्या घरी पटकन काय द्यावे???

उदाहरणार्थ, रात्रीची वेळ, पोट अचानक बिघडले.. २-३ वेळेस शी/ओकारी झाली ... डॉक्टर सकाळपर्यंत भेटणार नाहित....मग काय करावे? बोट भाजले.... बर्नॉल ची युज बाय डेट एक्पायर झालिये... काय करावे?

अश्या परिस्थितीत आपणच कधी कधी जरा गोंधळलेलो असतो आणि मग घरगुती उपाय पटकन सुचत पण नाहीत. मग इकडे धाव घ्यावी लागते कारण मायबोलीवर लग्गेच मदत मिळेल याची खात्री असते आणि ती मिळतेच. अर्धा जीव तिथेच भांड्यात पडतो. इथल्या सर्वांचा आधार वाटतो Happy

म्हणून या धाग्यावर असे घरगुती उपचार नोट करुन ठेऊ जे, वेळ न येवो, पण कधी लागलेच तर उपयोगात आणता येतिल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सकाळ पेक्षा बरा आहे आता पण पाय पूर्ण जमिनीला टेकवत नाहीये अजून. डॉ म्हणाले 4-5 दिवस त्रास होतो. बर्फाने शिकवायला सांगितले आहे. उद्यापर्यंत थोडा कमी नाही वाटलं तर पुन्हा घेऊन यायला सांगितले आहे.

Pages