४-१० वर्षाच्या मुलांचे कॉमन आजार, दुखणी आणि त्यावर उपाय

Submitted by लाजो on 3 June, 2012 - 18:43

४-१० वर्षाच्या लहान मुलांची कॉमन बारिकसारीक आजारपण, दुखणी, जखमा इ इ बाबत अनुभव आणि त्यावर सहज उपलब्ध असलेले घरगुती उपचार -

लहान मुलांना काही झाले अगदी खरचटले, पाय मुरगळला किंवा सर्दी पडसे झाले तरी आम्हा पालकांचा जीव अर्धा होतो. मुलांना डॉक्टरकडे नेणे महत्वाचे आहेच पण कधी कधी बारिकसारीक गोष्टींसाठी डॉक्टरकडे नेण्याची आवश्यकता नसते किंवा अवेळी जेव्हा डॉक्टर / केमिस्ट उपलब्ध नसतिल अश्या वेळेस काही घरगुती उपायांनी तात्पुरता थोडा आराम मिळु शकतो. काही उपाय जे मोठ्यांना लागु होतात ते लहान मुलांना चालतिलचं असे नाही किंवा लहान मुलं ते करु शकतिल असे नाही जसे वाफारा घेणे, गुळण्या करणे इ इ . मग अश्या वेळेस काय करावे? घरच्या घरी पटकन काय द्यावे???

उदाहरणार्थ, रात्रीची वेळ, पोट अचानक बिघडले.. २-३ वेळेस शी/ओकारी झाली ... डॉक्टर सकाळपर्यंत भेटणार नाहित....मग काय करावे? बोट भाजले.... बर्नॉल ची युज बाय डेट एक्पायर झालिये... काय करावे?

अश्या परिस्थितीत आपणच कधी कधी जरा गोंधळलेलो असतो आणि मग घरगुती उपाय पटकन सुचत पण नाहीत. मग इकडे धाव घ्यावी लागते कारण मायबोलीवर लग्गेच मदत मिळेल याची खात्री असते आणि ती मिळतेच. अर्धा जीव तिथेच भांड्यात पडतो. इथल्या सर्वांचा आधार वाटतो Happy

म्हणून या धाग्यावर असे घरगुती उपचार नोट करुन ठेऊ जे, वेळ न येवो, पण कधी लागलेच तर उपयोगात आणता येतिल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पावसाळ्यात सर्दी होवू नये म्हणून

एक वाटी खोबरेल तेलात ३-४ चमचे निलगिरीचे तेल घालावे. थोडेसे तेल रोज रात्री झोपताना मुलांच्या छातीला आणि पाठीला लावावे. चोळू नये.

वाटीभर तेल १५-२० दिवस पुरते.

अरे व्वा! चांगली माहिती गोळा झलिये की इथे Happy
सगळ्यांचे खुप खुप आभार Happy
अजुन काही आठवले तर नक्की भर घला...

दात पडल्यावर रक्त लगेच थांबावे, जास्त दुखु होऊ नये या साठी काय करता येइल? आजच एका मैत्रिणीने हा प्र्श्न विचारलान. तिच्या मुलीचा दात अगदी हलतोय आणि पडण्याच्या बेतात आहे.. पहिलाच दात पडतोय त्यामुळे लेक आणि आई दोघींनाही टेन्शन आलय Lol टूथ फेअरी येणार हे आमिष दाखवलेले आहेच Happy

अगं, दात पडल्यावर मुलं इतकी एक्साईट होतात की रक्त, थोडं दुखणं त्यांना जाणवतच नाही.
आमच्याकडची टुथ फेअरी तर त्या रात्री यायला विसरुनच गेली होती. दुसर्‍या रात्री आली बिचारी एक डॉलर घेऊन. Wink

लहान मुलांच्या motion sickness (गाडी लागणे) यासाठी काही सांगु शकाल का? (औषधांवर सल्ले नको आहेत. कृपया.)

सकाळच्या शाळेसाठी बसमध्ये बसल्यावर मुलीला उलट्यांचा त्रास होतो. सकाळचे दूध देणे बंद केले आहे, पण मग तिला बारा वाजेपर्यंत उपाशी नाही ठेवता येत. शाळेत पोचल्यावर डबा खायला परवानगी मागीतली आहे. ती मिळेलच. मुलीला अजून लवकर उठवून खायला देणे शक्य नाही. बस सकाळी आठ वाजता येते.
डब्यात काय देऊ?
दुधाने प्रचंड त्रास होतो असे लक्षात आले आहे. (हेच शाळा दुपारी असताना होत नाही. ती दूधच काय, व्यवस्थित पोळी भाजी जेऊन शाळेत जाते. तीच बस. तोच प्रवास. काही होत नाही. आता दुर्दैवाने दुपारच्या शाळेचा पर्याय उपलब्ध नाही.)

रैना, माझ्या लेकीला असाच त्रास होता..आम्हाला वाटायचे दुध नकोय म्हणुन नखरे करतेय पण तिच्या डॉक्टरने सांगितले GERD बेबिजना असा त्रास होउ शकतो. तिला तान्ही असतांना अ‍ॅसिड रिफ्लक्सचा थोडा त्रास होता. मग काही आठवडे तिला दुपारी/रात्री दुध द्यायचे आणी सकाळी चिझ, ग्रनोला बार, तुप साखर पोळीचा रोल असे काहेतरी आवडीचे देत होते आणी रोज रात्री जेवण नियमीत ७ वाजता. ४-६ महिन्यात कमी झाला हा त्रास.

माझ्या ६ वर्षाच्या मुलीला सारखे पोटात बेंबीच्या आजुबाजुला दुखते. दरवेळेस डॉ. इन्फेक्शन आहे सांगतात. पण कशामुळे हे असे होत असेल कोणी सांगेल का?
तसेच खाण्यापीण्यात काय काय देत जाउ रोज तिला म्हणजे तिची प्रतिकार शक्ती वाढेल आणि हा पोटदुखीचा त्रास थांबेल? तिला वरचेवर सर्दी खोकला आणि कान दुखणे हे पण होत असते. त्रास व्हायला लागला की डॉची ओषधे असतातच पण मला असे वाटते की तिची प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे हे होत असेल का? ह्यावर मला प्लिज घरगुती उपाय सांगा जेणेकरुन हे सगळे थांबेल अथवा हा त्रास कमी होइल. पोटदुखी तर कायमच आहे.
मला तिचा आहार सुधरवायचा आहे. मी मालती कारवार चे पुस्तक पण वाचते आहे पण मला तुमचा सल्ला हवा आहे.

माझा एक वेगळाच प्रश्न : माझ्या मुलाच्या तळहातात २ वेळा पेन्सील च टोक शिरल. दोन्ही वेळा रडारड, ओरडाआरडा करुन त्यानी ते काढून घेतल. दोन्ही वेळा ४ दिवस लागले ते करायला. काही दुसरी युक्ती किंवा उपाय आहे का पुन्हा अस झाल तर?

निर्मयी तुम्ही पेडीचा सल्ला नक्की घ्या तथापि,
जंत आहेत का ते विचारा त्याचे साधे औषध मिळते.
जनरल प्रतिकारशक्तीसाठी च्यवन प्राश देतात. पण मला त्याचा काहीच अनुभव नाही. विचारून करा.
कायम सर्दी खोकला इत्यादी व बारीक प्रवृत्ती यासाठी पूर्वी टॉन्सिल्स चे ऑपरेशन करत. पण ती जुनी पद्धत झाली सध्या काय करतात माहीत नाही. विचारून घ्या डॉक्टरास.

पोट दुखी म्हणजे पचन बरोबर आहे का? फायबर दिले गेले पाहिजे. फार गोड, मैद्याचे पदार्थ जसे केक्स व कुकीज जास्त देऊ नका. फळे, भाज्या, शेंगा, देशी स्वच्छ आहाराने फरक पडेल. चॉकलेट्स, फरसाण, बिस्किटे, बर्गर्स पिज्जा, कोक इत्यादी कमीत कमी द्या. क्रॉनिक प्रॉब्लेम असेल तर एकदा संपूर्ण चेकप करून घ्या म्हणजे टेन्शन नको. पाणी फिल्टर्ड, उकळूनच द्या म्हणजे इन्फेक्षनचे चान्सेस कमी होतील. जेवायच्या आधी हात हँडवॉश ने धुण्याची सवय लावावी. घरी पेटस असल्यास किंवा कलरिंग वगैरे केल्यावर हात नीट धुवावेत. व मगच जेवावे. मटार व गाजराचे सूप, उत्तम प्रतीची फळे( ज्यूस नव्हे) तिला खायला द्या. पालक पराठा, दही,
वगैरे ताजे अन्न द्या. फ्रोजन/ रीहीटेड अन्न यामुळेही पोट दुखू शकते. अर्धे कच्चे गडबडीत खात असेल तरीही त्रास होतो.

जनरल इम्युनिटीसाठी अ‍ॅलर्जीज नाहीत ना ते बघून घ्या. महत्त्वाचे म्हणजे तिच्याशी गोड व संयम राखून बोलून तिला इतर काही मानसिक त्रास, शाळेत/ पाळणाघरात काही कोणी त्रास देत नाही ना ते नक्की करून घ्या.
कधी कधी काही होत नसताना मुले आईचे लक्ष वेधण्यासाठी अशी काही सबब देतात. नक्की काय त्रास आहे ते त्यांना व्यक्त करता येत नाही. ( काळजी करू नका, घ्या Happy )

हो पुर्वा कुमारी आसव चे माझ्या लक्षातच नाही आले. विचारुन करीन मी सुरु तिला. थँक्स पुर्वा आणि अश्वीनीमामी.
अश्वीनीमामी क्रॉनिक प्रॉब्लेम म्हणजे काय?

कोणी मुलांना सर्दी पडश्यासाठी kali mur आणि Hyland's Sniffles and snizzes ही औषधे दिली आहेत का?
कालच इथे एका काकूंकडून Kali Mur चे खूप कौतुक ऐकले.त्या त्यांच्या मुलांना लहानपणापासून हे औषध देतात आणि त्यांना चांगला गुण येतो.मी पहिल्यांदाच ऐकले हे नाव.अजून कोणाला ह्या औषधांचा अनुभव आहे का?

पूर्वा, आमच्या घरी देतात कालीमूर बिन्धास्त. आजोबांकडे साठा होता होमिओपथि व बाराक्षार वगैरे गोळ्यांचा. आईने आम्हाला दिले व दादा त्याच्या मुलाला देतो. मी नीलला फक्त हायलँडचे टिदिंगच्या गोळ्या दिल्यात. माझ्यामते काहीच हरकत नाही. साईडइफेक्ट तर नसतोच.

अरे वा! बरं झालं सांगितलंस.आता शाळा सुरु होऊन एक आठवडा झाला तर लगेच आमच्याकडे सर्दीला सुरुवात झाली आहे.kali Mur आणून ठेवते मी आता.

नीर्मयी,
उशिरा उत्तर देत्येय पण जर अजुन काही केले नसशिल तर काही करायच्या आधी एका कापसाच्या बोळ्याला गरम खोबरेल तेल लावुन ते ज्या ठिकाणी काहितरी गेले आहे त्यावर थोडावेळ बांधुन ठेव (पोटिस म्हणतात याला ). असे केल्याने तो भाग नरम होतो आणि जे काही गेले असेल ते काढने सोपे जाते.

होप जे काही असेल ते लेकीला त्रास न होता लवकर बाहेर निघो.

माझ्या ३ वर्षाच्या मुलाला महिन्यातून एकदा तरी सर्दी खोकला होतोच, आता climate change मुळे हि असेल. त्याला होमिओपथी ची औषधे सुरु करण्याचा विचार आहे. तर हे लहान मुलांसाठी चांगले असते का? त्याचे काही साइड इफेक्ट्स आहेत का? आणि किती वेळ लागतो गुण येण्यासाठी? जे कोणी होमिओपथी औषधे घेतात त्यांचा अनुभव कसा आहे?

अवंतिका मलाही लहानपणी सर्दी कफाचा खूप त्रास व्हायचा... अजूनही होतो बर्‍याचदा.. पावसाळी हवा, एसी, फूल स्पीड फॅन... धूळीची अ‍ॅलर्जी... आईसक्रीम, काकडी, दही...

मला होमिओ ट्रीटमेंट चालू होती २ वर्ष... त्रास जवळ जवळ बरा झालेला. पण हल्ली हल्ली पुन्हा चालू Sad

इम्युनिटी पॉवर कमी असेल तर हवेतील बदल लगेच बाधतो मुलांना. होमिओ ट्रिटमेंट द्यायला हरकत नाही. डॉक्टर मात्र खात्रीशीर हवेत. खाण्याची पथ्य कॉफी, शेंगदाणे, केळी टाळता आली तर बरे. आणि इम्युनिटी पॉवर ही वाढवण्यासाठी वेज, चिकन (होमिओ औषधांना पथ्य नसल्यास) सूप्स... हिरव्या भाज्या, सॅलड्स वगैरे देत जा जोडीला.

Thanks Dreamgirl Happy
डॉक्टर मात्र खात्रीशीर हवेत>> लालबाग - परेल एरिया मधील होमिओपथी डॉक्टर सुचवु शकाल का?

सर्दी खोकल्यातून व्हिजिंग किंवा इतर कॉम्प्लिकेशन्स होत नसतील तर काळजीचे कारण नाही असे आमचे पेडि म्हणायचे. होइल इम्युन.

अनुमोदन. कन्येला वर्षाहुन जास्त दिवस सारखी सर्दी होती. बाकी तुणतुणीत असायची त्यामुळे मी काही दिले नाही. नंतर आपोआप बरी झाली ते झालीच.

अवंतिका,
डॉक्टर चांगले असल्याची, त्यांचं निदान योग्य असल्याची खात्री करून मग अगदी खुशाल तुमच्या मुलाला होमियोपॅथीचे उपचार सुरू करा.
मात्र हे पेशन्सचं काम आहे. त्वरित परिणाम मिळणार नाहीत.

माझा मुलगा अडीच-तीन वर्षांचा असताना त्याला रासायनिक कारखान्यांच्या प्रदुषणामुळे सतत खोकला व्हायचा. तेव्हा जवळपास दीड-दोन वर्षं आम्ही त्याला होमिओपॅथीची औषधं दिली होती. खूप उपयोग झाला होता. या वयोगटातली लहान मुलं होमिओपॅथीच्या गोड गोळ्या अगदी आवडीनं खातात.

Pages