४-१० वर्षाच्या मुलांचे कॉमन आजार, दुखणी आणि त्यावर उपाय

Submitted by लाजो on 3 June, 2012 - 18:43

४-१० वर्षाच्या लहान मुलांची कॉमन बारिकसारीक आजारपण, दुखणी, जखमा इ इ बाबत अनुभव आणि त्यावर सहज उपलब्ध असलेले घरगुती उपचार -

लहान मुलांना काही झाले अगदी खरचटले, पाय मुरगळला किंवा सर्दी पडसे झाले तरी आम्हा पालकांचा जीव अर्धा होतो. मुलांना डॉक्टरकडे नेणे महत्वाचे आहेच पण कधी कधी बारिकसारीक गोष्टींसाठी डॉक्टरकडे नेण्याची आवश्यकता नसते किंवा अवेळी जेव्हा डॉक्टर / केमिस्ट उपलब्ध नसतिल अश्या वेळेस काही घरगुती उपायांनी तात्पुरता थोडा आराम मिळु शकतो. काही उपाय जे मोठ्यांना लागु होतात ते लहान मुलांना चालतिलचं असे नाही किंवा लहान मुलं ते करु शकतिल असे नाही जसे वाफारा घेणे, गुळण्या करणे इ इ . मग अश्या वेळेस काय करावे? घरच्या घरी पटकन काय द्यावे???

उदाहरणार्थ, रात्रीची वेळ, पोट अचानक बिघडले.. २-३ वेळेस शी/ओकारी झाली ... डॉक्टर सकाळपर्यंत भेटणार नाहित....मग काय करावे? बोट भाजले.... बर्नॉल ची युज बाय डेट एक्पायर झालिये... काय करावे?

अश्या परिस्थितीत आपणच कधी कधी जरा गोंधळलेलो असतो आणि मग घरगुती उपाय पटकन सुचत पण नाहीत. मग इकडे धाव घ्यावी लागते कारण मायबोलीवर लग्गेच मदत मिळेल याची खात्री असते आणि ती मिळतेच. अर्धा जीव तिथेच भांड्यात पडतो. इथल्या सर्वांचा आधार वाटतो Happy

म्हणून या धाग्यावर असे घरगुती उपचार नोट करुन ठेऊ जे, वेळ न येवो, पण कधी लागलेच तर उपयोगात आणता येतिल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या सहा वर्षाच्या मुलाला छोट्या घामोळ्या (पाठीवर आणि पोटावर) आल्या आहेत. मागे केव्हातरी आल्या होत्या तेव्हा नायसिल लावल्याचं आठवतंय पण ते देशातून आणलं होतं. आता नाही आहे. अमेरिकेत कुठली पावडर आहे का तशीच किंवा दुसरं काही करता येईल का? त्याला खाज येतेय. रात्रीपुरता जॉन्सनची बेबी पावडर लावली आहे. आणि अ‍ॅलर्जीचं औषध पण देऊन ठेवलंय.

कुणाला काही दुसरं सुचवता आल्यास आभार Happy

आभार स्वाती. Happy

ते एक आहेच घामोळंच आहे का ते पाहावं लागेल. या पोरांची ट्रॅक हिस्र्टी म्हणजे डॉक्टरकडे न्यायची संधी आई-बाबांना दिल्याशिवाय त्यांचं (आणि इंशुरन्सवाल्यांचं) पोट भरत नाही. लेट्स सी Happy

तिकडे डॉक्टर औषधं पण देतात का? एतेन. Happy
आमचा डॉक्टर थांबा अजून ४ दिवस शिवाय काही बोलतच नाही. शुक्रवारी घेऊन जा, प्रिस्क्रिप्शन मिळायचे जास्त चान्सेस. Light 1

अमितव, आमचा डॉक्टर पण तेच म्हणतो पण ते डॉक्टरने म्हटल्याशिवाय आमचे "हे" ऐकत नाहीत त्यामुळे आम्ही सर्वांना समान संधी देतो...

सोडून दिल्याने सुटणारे किती प्रश्न आम्ही दमड्या मोजूनच सोडले आहेत. फक्त प्रत्येक वेळी नवीन प्रश्न आणि ऑप्शनला टाकल्यासारखा पेपर Wink

माझ्या मुलीचे वय २ वर्षे आहे . पण तिला शीच फार त्रास होतो म्हणजे थोडक्यात ती शी करायला बघत नहि. शी आली कि एकाद्या कोपर्यात लपते आणि शी होऊ देत नहि. त्यामुळे तिचीshee कडक होते आणि शी करतना रक्त पण येत . काय करावे काळात नाही द्रोक्टेरla दाखवले ते त्यांनी एक औषद दिले पण ते ५ माल पेक्षा जास्त देउनय असे सांगितले आता तिला त्या ओउश्धने हि काही फरक पडत नहि. काही घरगुती उपाय जे ने करून ती वेवस्थित शी करेल

माफ करा पण २ वर्षांसाठी इथे धागा नाही आहे

तिकडे पॉटी ट्रेनिंगची पुस्तकं मिळतात का? असतील तर घ्या नाहीतर ऑनलाइन स्टोरीज मिळाल्या तर प्रिंट काढून तिला पॉटीवर बसायला लावून वाचून दाखवा. आमच्या डेकेअरला तशी पुस्तकं ठेवलेली पाहिली आहेत. नशीबाने मुलांनी घरी ती वेळ आणली नाही Wink

कदाचीत गोष्टीतल्या प्राण्याने पॉटी वापरली तर त्यावरून मुलांना प्रेरणा मिळत असावी. Happy

अम्या- prune Juice देवुन पहा (पाव ते अर्धा कप). अथवा ८/१० मनुका रात्रभर पाण्यात भिजवुन सकाळि त्या कुस्करुन ते पाणि प्यायला द्या. ति कोपर्यात लपेल तेव्हा तिला हसुन, टाळ्या वाजवुन बाथरुममध्ये न्यायचा प्रयत्न करा. नाहि ऐकले तर ओरडु नका, बाउ करु नका. शि च्या जागि साबण लावल्यासहि फायदा होतो. शि केलि तर शाबासकि द्या. आवडिचा खाउ, खेळणे द्या. training videos दाखवा.

मुख्य म्हनजे आहारात काय आहे? भरपूर पाणी लिक्विड जायला पाहिजे, व फायबर असलेले पदार्थ जायला पाहिजेत. म्हणजे शी क ड क होणार नाही. तिचा आहार तपासा. बिस्किटे मैदा फरसाण कमी करून भाज्यांचे सूप खिचडी असे द्या. हा एक मोठा इ व्हेंट आहे असे काही बिल्ड अप करू नका. होईल तेव्हा होईल. म्हण जे तिची भीती कमी होईल. उलटे डिस्ट्रॅक्ट करा. आयपॅड वर कार्टून किंवा गे म बघता झाली तर तिला कळ् नार नाही.

फायबरबाबत अनुमोदन. प्रून्स वर्क्स लाइक वंडर! म्हणून अर्थात अतिरेक नको.
हा एक मोठा इ व्हेंट आहे असे काही बिल्ड अप करू नका. होईल तेव्हा होईल.>>>>१००% अनुमोदन.

एक खात्रीलायक उपायः जेव्हा कधी घरातल्यांना जायचं असेल तेव्हा तिला ऐकू जाईल अशा प्रकारे 'अरे मला शी लागली... मी चाललो शी करायला .... ' असे नाचत बागडत आनंदाने बाथरूममध्ये जा. आणि हे दिवसाच्या प्र त्ये क बाथरूम विसिटच्यावेळी करायला विसरू नका. शिवाय बाहेर आल्यावर 'मी शी कशी केली', 'शी कडक होती का मऊ', आणि मुख्य म्हणजे 'का असं झालं'(तर आज मला वाटतं मी पाणी कमी प्यायलो, किंवा गाजराची कोशिंबीर नाही खाल्ली म्हणून शी कडक झाली... आज मी सगळं केलं तेव्हा मऊ झाली' वगैरे) , हे तिला समजेल अशा शब्दांत एकमेकांना सांगायचं - तिला बसवून नाही सांगायचं. मुलं ऐकत असतात.
जेव्हा कधी ती स्वतःहून तुमच्यासारखं वागायचा प्रयत्न करेल, तेव्हा तिचं योग्य तेवढंच कौतुक करा. आणि ते कौतुक हळूहळू बंद करा... बाहेर आल्यावर ती पण तुमच्यासारखंच बोलायचा प्रयत्न करेल, तेव्हा तिला सपोर्ट करा. जेव्हा ती फायबरयुक्त अन्न खाईल, तेव्हाही तिला आठवण करून द्या 'आत्ता तू हे खाते आहेस ना, त्यामुळे शी मऊ होणार.' नंतरची शी मऊ झाली तर उत्त्तम, पण नाही झाली तर थोडे अजून खावे लागणार बरं का, असे सांगा.

ऑल द बेस्ट! एका नातेवाईकांच्या एका मुलीच्या बाबतीत गंभीर मानसिक परिणाम झाल्यामुळे ते निस्तरायला त्या कुटुंबाची २-३ वर्षे फक्त वाया गेलेली पाहिली आहेत, म्हणून एवढी मोठी पोस्ट!

धारा मस्त सांगीतलेस. अजुन एक, काही मुले थकुन मग बसुनच कुथायला लागतात. त्या गडबडीत शी साफ होत नाही. मग खडा नी गॅसचा त्रास. त्यामुळे उभे राहुन वा योग्य प्रकारे बसुन करायला शिकवा. ज्यवेळी उभे राहुन करेल तेव्हा टाळ्यांनी प्रोत्साहन द्यावे लागते. इ. इ. (अनुभवी बोल Uhoh )

जेव्हा वाटेल लेक शी करणार आहे तेव्हा आधी व नंतर त्या जागेवर तेल / तुप लावा पटकन शी होते नी जास्त जोर द्यावा लागत नाही.

शी करतना रक्त पण येत >>> याचा अर्थ कडक शी मुळे आत जखम होत असावी. तेल / तुप / वा कुठलेतरी मलम (डॉकला विचारुन) लावाच.

खाण्याकडे लक्ष देणे महत्वाचे. यावेळी सुप सारखा चटकन कामी येणारा दुसरा प्रकार नाही.

रच्याकने गॅस होतोय का? बाटली (दुधाची) घेते का? चालुए का?

खूप आभार वेका , राया , आमा व धारा तुम्ही सांगितलेले उपाय वापरून पाहेन. आणि धारा तुम्ही सांगितल्या परमाने आमच्या घरी शी ला गेल्याचे चर्चा होर आणि तीच बोलते कि अमुक तमुक शीला गेलाय म्हणून आणि पोतीवर बसायलाच पाहत नाही मग सासू बी तिला कागदावर बसवत आणि कुटायला लावतात तो त्याचा सीन पाहण्या जोगा असतो

तरी तुम्ही दिलेले सूचना मी वापरून पाहीन

अजुन एक सल्ला : मैदा बंद करायचा खुप उपयोग होतो .... बिस्किट , केक वगैरे थोडे दिवस जरा जपुन द्यायचे... मनुक आणि आळशी (flax seeds) चा पण चान्ग्ला उप्योग होतो .......

पाच महिन्याच्या मुलीला थोडासा खोकला झाला आहे. बालाजी तांबेंच्या पुस्तकात सितोपलादी चुर्ण आणि मध असा काहीसा घरगुती उपाय वाचला असल्याचे आठवतेय पण आता ऐनवेळी ते पुस्तक सापडत नाहीये. कोणाला काही आयडीया असल्यास कृपया कळवावे. त्याच पुस्तकातील उपाय असे नाही तर इतरही खात्रीशीर उपाय असल्यास प्लीज वेलकम. तोपर्यंत आम्ही शोधतोच.
धन्यवाद Happy

तुम्ही रहाता तिथल्या आजूबाजूच्या निबिड अरण्यात कोणत्या वनस्पती उपलब्ध आहेत?
त्यातली कोणती कशी द्यायची ते सांगतो, आधी काय आहे ते समजू द्या.
कारण जवळपास डॉक्टर नामक प्राणी नसेलच? अन ५ महिन्याच्या बाळाला काही काढे चूर्ण इ. खिलवायची(, तेही बाता नामक इंजिनियरच्या पुस्तकात वाचून) प्रायोगिकता तुमच्यात आहेच.

इब्लिस Proud
गेले दोन दिवसांत तीनदा खोक खोक केले, तेवढ्यासाठी डॉक्टर नको कारण तो आणखी काही सांगेल असा यामागचा विचार.
मी स्वताही ईंजिनीअरच आहे, त्यामुळे याची कल्पना आपल्यापेक्षा कमीच. जर आपण या साठी डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देत असाल तर तो हि वेलकम Happy

अभिषेक, वर्षाच्या आतल्या बाळाला मध देऊ नका असे इथे सांगतात. तुमच्या डॉकने बाळ घरी नेताना चेकलिस्ट दिली नाही का? म्हणजे काय लक्षणे असतील तर डॉककडे जावे वगैरे. दोन दिवसात तिनदा खोक खोक - ड्राय कफ असेल तर दूध्/फ्लूइड भरपुर मिळतेय ना याकडे लक्ष द्या. सर्दी झालेय का? ताप नाही ना ते पहा.

एवढ्या लहान बाळाला काही द्याल ते डॉक्टर किंवा वैद्याचा सल्ला घेऊन मगच द्या.

पुस्तकात वाचून काही करु नका प्लीज

एवढ्या लहान बाळाला काही द्याल ते डॉक्टर किंवा वैद्याचा सल्ला घेऊन मगच द्या.

पुस्तकात वाचून काही करु नका प्लीज>>>..+१

मी डॉक्टर नाही. हे फक्त गेल्या ३ वर्षांतील अनुभव आहेत.
< १ महिना वयात ताप --> इमर्जन्सी मध्ये दाखल करा. रक्त/ किडनी/ मस्तिष्क ताप शक्यता.
त्या नंतर ३ दिवसांहून जास्त राहिलेला सर्दी/ खोकला/ ताप (औषधे देवूनही) -> डॉक्टर कडे जा. ते कान/ घसा तपासतील. श्वास घेताना वीझिंग होतंय का इ. तपासून जर bacterial infection असेल तर antibiotics देतील. अस्थमा ची शक्यता वाटली तर निळा/ ऑरेंज पफर देतील. किंवा नाकातला स्प्रे देतील.
हे सगळं करूनही फरक वाटला नाही तर allergist ची भेट घ्यायला सांगतील.

६ वर्षांखालील मुलाला खोकल्याला कफ सिरप देऊ नका. एकूणच ओवर द counter कफ सिरपचा उपयोग यावर प्रश्नचिन्हच आहे. मधाचा सुद्धा उपाया पेक्षा अपायच होतो असं वाचलंय.

गेले दोन दिवसांत तीनदा खोक खोक केले, तेवढ्यासाठी डॉक्टर नको कारण तो आणखी काही सांगेल असा यामागचा विचार.
>>>
seriously!!!!!!!!!!!

Avaghad ahe Sad

Davakhanyat nya!

माझ्या ४ वर्षाच्या लेकीला तळहात आणि तळपायावर लाल पुरळ आले आहेत म्हणजे पुरळ नाही म्हणता येणार कारण आपण हात फिरवल्यावर हाताला लागत नाही पण टिपक्यांसारखे दिसतय. तर तिला तिथे खुप खाज सुटलीय.
काल पहाटे तिला हा त्रास झाला डॉक्टरला दाखवेपर्यंत लालसरपणा व खाज कमी झालेली. डॉक्टरने पित्त आहे असे सांगुन मलम आणि सिरप दिले पण रात्री पुन्हा तिला खुप खाज सुटलेली. रात्रभर तिचे पाय खाजवावे लागले. रात्री ३ वाजता तिने मला तिची अंघोळ करायला लावली. सकाळनंतर पुन्हा तुचा त्रास कमी झालाय पण यावर काही घरगुती उपाय आहेत का असे रात्री मध्यरात्री उपयोगी येणारे. तसेच हे काय अस्य शकेल म्हणजे कुणाला असा त्रास झाला आहे का?

अभिषेक, प्लीज डॉककडे न्या मुलीला. अमितव, यांना अनुमोदन.
निल्सन, अ‍ॅलर्जीवालं काही खाण्यात आलं का ते पहा. डॉकच्या मलमने आराम पडत नसेल तर बदलवून आणा. साय, दही, शुद्ध घरचं तूप चोळून पहा. चंदन असेल तर उगाळून लावा. (चंदन पावडर नको). कुठलेही मलम लावतांना आधी थोड्या भागावर लावून मगच प्रयोग करा. त्वचा कोरडी पडू देऊ नका. स्टीम देत रहा.

पित्तच असेल तर अंगावर कोकम चोळून अंघोळ घाला. कोकमाचे सरबतही पोटातून देता येईल.
शेंगदाणे वगैरे खाल्ले होते का ? (शेलफिश, मश्रुम, चीज, पिझ्झा ) अ‍ॅलर्जी आली असेल. एखादा किटकही चावला , चुरडला गेला असेल. परत त्रास होत असेल तर ताबडतोब डॉक्टरकडे न्या. काय खाल्ले होते ते मात्र आवर्जून त्यांना सांगा.

खाण्यात काही वेगळे नव्हते मी निट आठवुन पाहिले पण त्याआधी तीन दिवस तिला सर्दी-ताप होता तेव्हा डॉकक्डुन औषध घेतलेली. मी डॉकला विचारले की त्या औ.ची अ‍ॅलर्जी किंवा साईडइफेक्ट आहे का तर ते म्हणाले असे असते तर लगेच झाले असते दोन दिवसांनी नाही.
चिन्नु, दिनेशदा धन्यवाद. कोकमबद्दल माहित असुनही आठवत नव्हते. धन्यवाद

>>
मी डॉकला विचारले की त्या औ.ची अ‍ॅलर्जी किंवा साईडइफेक्ट आहे का तर ते म्हणाले असे असते तर लगेच झाले असते दोन दिवसांनी नाही.>>
असे काही नाही. बरेचदा माईल्ड अ‍ॅलर्जी असेल तर २ दिवसांनी त्रास सुरु होतो. मला असे झाले होते.
खाज कमी होण्यासाठी आमच्या डॉकच्या नर्सने सांगितलेला उपाय - पाण्यात बेकिंग सोडा घालून मिश्रण करायचे. लावले की आराम पडतो.

Pages