"सत्यमेव जयते" भाग ५ (Is Love A Crime?)

Submitted by आनंदयात्री on 3 June, 2012 - 01:49

आज, ३ जूनच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
नेहमीचाच, पण जाहीर चर्चेसाठी थोडासा वेगळा असा विषय वाटतोय...

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोनी टिव्हीवर दाखवण्यात येणार्‍या क्राईम पेट्रोल नावाच्या सिरीयल मध्ये खर्‍या घडलेल्या घटना दाखवून त्यावर भाष्य करून सावध केले जाते. त्यात अशीच एक ऑनर किलिंगची घटना दाखवली होती. ती बघून या खवीस खाप-मानसिकतेची प्रचंड चीड आली होती.

उत्तरप्रदेशातील एक तरूण्-तरूणी प्रेमात पडतात आणि पळून जातात. मग मुलीचे नातेवाईक तिला काही दिवसांनी फोन करून सांगतात की आम्ही तुम्हाला माफ केलंय तर आता या. हे दोघे तिच्या घरी गेल्यावर अर्थातच दोघांना पकडतात. मुलाला लगेच मारून टाकतात. तर मुलीवर तिचे चुलत भाऊच वारंवार बलात्कार करतात. नंतर एकदा ती पळून जाण्याचा प्रयत्न करते तर तिला गोळी मारतात.

म्हणजे स्वतःच्या संमतीनं लग्न करण्याची या मुलीला परवानगी नाही कारण त्यामुळे घराण्याची अब्रु धुळीस मिळते. मग त्या चुलत भावांनी जे काही भयानक गैरकृत्य केलं त्याचं काय समर्थन करणार? अशावेळी बहिणीचं नातं सोईस्करपणे विसरतात की काय! हे केल्याने घराण्याचं नाव उंच होतं काय!

ही घाणेरडी आणि कुजलेली मानसिकता बदलायला प्रचंड परिश्रम आणि काळ लागणार आहे यात शंकाच नाही. अमीर खानच्या एपिसोडमुळे त्यावर अजून एक प्रहार केला गेला आहे असं समजुयात.

मुळात आपल्याकडे वयाला मान देण्याची जी परंपरा आहे त्यामुळे ही खाप पंचायत जिवंत आहे. वय वाढलयं म्हणजे जास्त अक्कल हे समीकरण मोडीत काढण्याची गरज आहे. प्रश्न तरूणांना आहे, त्यांना त्यांचा जीवनसाथी निवडण्याचा पूर्ण हक्क आहे, त्यांना ठरवूद्यात. चुकत आहेत असं वाटत असेल तर फारतर दिशा दाखवा.

***********************************************

नाविक, नौका, पतवार, बदलना होगा धारा का क्रम भी
तुम नूतन अभियानो से ये चीरजर्जर मार्ग बदल डालो....

खाप पंचायतीची मुळे मनुस्मृतीत आहेत का? मनुस्मृतीतील शिक्षांचेच आजचे रुप म्हनजे खाप पंचायत असेल का?

मामी फार भयंकर आहे तुम्हि सांगीतलेली गोष्ट. जातीपाती, धर्माचे विष केवढे भयानक पद्धतीने भिनले आहे Sad

मामी,

तुम्ही लिहिलेला किस्सा वाचून खरेच वाईट वाट्ले.

माणसं फक्त जातपात आणि धर्म या गोष्टी साठी ईतक्या खालच्या थराला पण जाउ शकतात.........

विदारक परिस्थिती आहे ही.

>>> मुळात आपल्याकडे वयाला मान देण्याची जी परंपरा आहे त्यामुळे ही खाप पंचायत जिवंत आहे. वय वाढलयं म्हणजे जास्त अक्कल हे समीकरण मोडीत काढण्याची गरज आहे.

अनुमोदन! भारतात व महाराष्ट्रात देखील बर्‍याच भटक्या जातीत पंचायत परंपरा आहे. जातींचे बरेच निर्णय हे पंचायतीत एकत्र बसून घेतले जातात. जेजुरीला दरवर्षी बर्‍याच जातींची जातपंचायत भरते. रामनाथ चव्हाण यांनी यावर बरेच लेखन केले आहे. यात लग्न जमविणे, दोन कुटुंबातील कुरबुरी न्यायालयात न जाता सोडविणे, एखाद्याने पंचायतीचा निर्णय न मानल्यास त्या कुटुंबावर बहिष्कार टाकणे असे अनेक निर्णय याच पंचायतीत होतात. काही जातीत लग्न झाल्यावर पहिल्या रात्री सर्व पंचायतीसमोर वधूपित्याला आपली मुलगी ही कुमारिका आहे अशी शपथ घ्यावी लागते व त्याचा पुरावा वधूमाता दुसर्‍या दिवशी जावयाकडील महिलांना सादर करते. अफगाणिस्तानमध्ये देखील अशीच कौर्मायपरीक्षा आहे असे काही पुस्तकातून वाचले आहे. एकंदरीत शहरात राहणार्‍या पुढारलेल्या जाती सोडल्या तर बर्‍याच जमातीत जातपंचायत हीच सर्वेसर्वा असते व पंचायतीचे निर्णय सर्वांवर बंधनकारक असतात. त्यामुळे एखाद्या कुटुंबात जर जातीबाहेर लग्न होणार असले तर जातपंचायत त्या कुटुंबावर लगेच बहिष्काराचे अस्त्र उपसते.

आंतरजातीय विवाहाला विरोध करणे यात वैचारिक बुरसटलेपणा आहे ,असे कुणीही मुळीच समजू नये ...वाढत्या आंतरजातीय विवाहामुळेचं आज ब्राह्मण उपवर मुलांना मुली मिळणे अतिशय मुश्कील झाले आहे ,आणि इतर जातीय,/धर्मीय मुले ब्राह्मण मुलीना "कटवणे" हे एक फुशारकी मारण्याचे काम मानू लागली आहेत ...

बहुतांश कथित "सुधारक" विचाराच्या ब्राह्मण पालक व मुलींमुळे आज ब्राह्मण जातीतील मुलांची अतिशय कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे...याचा कोणी विचार करणार आहे का?

या जात पंचायती फार महत्वाचा विषय आहे.
लक्ष्मण माने यांच्या पुस्तकात याविषयी वाचले आहे. अजुनही गावोगावी या प्रथा मूळ धरुन आहेत. मास्तुरेंनी लिहिलेल्या प्रथांविषयी दलित सहित्या मधे बरेच लेखन आहे.

काही काही वेळेस या जात पंचायती पण जुने सोडून देउन समाजातल्या अनिष्ट प्रथा बंद करायला पुढाकार घेतात. मला वाटते या एपिसोड (मराठी प्रतिशब्द? ) मधे असेही एक उदाहरण घ्यायला हवे होते.

मास्तुरे

जातपंचायतीचे काही निर्णय हे चांगले देखील असतात. पुण्यात आंध्रातून आलेल्या लोकांची अशीच एक पंचायत आहे. काही कारणाने मुलीने तक्रार दिली असता मुलाकडच्यांनी तिच्यावर भरपूर आरोप केले. मुलीचं म्हणणं ऐकल्यावर तिने असा आरोप केला कि मुलगा तिला वैवाहिक सुख देऊ शकत नाही. पंचायतीने ससून मधे त्या मुलाची वैद्यकिय तपासणी करवून घेतली. त्यात मुलीचा आरोप खरा निघाला. यानंतर पंचायतीने त्या मुलीला घटस्फोट मिळण्यासाटी वकिलांची व्यवस्था केली आणि मुलाकडून आणि कुटुंबियांकडून मुलीची फसवणूक झाल्याचे लिहून घेतले आणि मुलीच्या भविष्यात अडथळा ठरणार नाही असे प्रतिज्ञापत्रही लिहून घेतले.

कोर्टाची तारीख घेऊन त्यावर शिक्कामोर्तब झाल्यावर पंचायतीने योग्य मुलगा पाहून मुलीचे लग्न लावून दिले. अर्थात हे चांगलं उदाहरण जर असलं तरी न्यायाधिश बनण्याचा हक्क पंचायतीला नाही हा मुद्दा उरतोच. चुकीचे निर्णय घ्यायला कितीसा वेळ लागतो ? त्यांच्या फैसल्यावर सुनावणीही होऊ शकत नाही.

@ मंदार

मग ब्राह्मण मुलांनी स्वजातीतीलच मुलींशी लग्न करयचे असा कुठे नियम आहे?

नुस्ता सावरकर, सयाजीराव गायकवाड याचे गुण गायचे का? त्यांनी सुरु केलेले उपक्रम पुढे चालवा कि!
करा कि रोटी-बेटि व्यवहार बाकि जातीतील लोकांशी, तुम्हाला कोणी अडविले आहे ?

हा जातियवादच खूप सार्‍या प्रश्नांचे मूळ आहे.

कारण काही असो पण, हरियाणातील मेहम चौबिसी येथील खाप पंचायतीच्या 'त्या' पाच सदस्यांशी बोलताना खुद्द आमीर खान फार जपून बोलत असल्याचे (मला) जाणवले. मूळ रेकॉर्डिंग दीर्घ असल्याचे जाणवत होते, तसेच त्या सदस्यांची बरीच मते 'एडिट' केल्याच्या खुणा स्पष्ट दिसतात. त्या सदस्यांना निरोप देतानाही तो अदबीनेच म्हणाला की, "मला तुमची काही मते पटलेली नाहीत....तरीही". "खाप" परंपरेपुढे केन्द्र सरकार (मग ते कुठल्याही पक्षाचे असो) वारंवार नमतेच घेत आले आहे, ज्याअर्थी आजही हरयाणा, राजस्थान आणि यू.पी. मध्ये या पिढ्यानपिढ्या दमदारपणे चालत आलेल्या ग्राम न्यायनिवाडा पद्धतीला अद्यापिही शह बसलेला नाही.

याला कारण खाप मागे असलेली व्होट बॅन्क, जिला कोणताही चाणाक्ष राजकारणी (किमान त्या भागातील) व्यक्ती तडा देऊ इच्छित नाही. केवळ जातगोत्राशी निगडित असलेले प्रेमविवाह यांच्यापुरतीच खापची कार्यक्षेत्र मर्यादा नसून जमीनजुमले, शेतीवाडी, कुटुंबकलह, ग्रामविकास योजना आदी अनेक बाबतीत 'खाप' सदस्य (जे एपिसोडमध्ये दाखविल्यानुसार वयाने खूप ज्येष्ठ असतात) जो निर्णय घेतात तो मुकाटपणे ग्रामस्थ मान्य करतात असे चित्र त्या भागात आहे. जी व्यक्ती खापच्या निर्णयाला विरोध करते त्याविरूद्ध खाप कडे असलेले 'जालीम' औषध म्हणजे सामाजिक बहिष्कार. बरे, हा बहिष्कार त्या संबंधित इसमापुरताच मर्यादित नसून पुर्‍या कुटुंबाला त्याच्या झळा बसतात, ज्यात म्हातारीकोतारी यांच्याबरोबरीने लहान मुलांचाही समावेश असतो. हे चित्र त्या कुटुंबाच्या दृष्टीने फार विदारक असून आमीर खानला ती मुलगी सांगत होती त्याप्रमाणे गावातील बलुतेदार खाप बहिष्कृत कुटुंबाला वाळीत टाकतात. अस्थिरक्षा आणण्यासाठी मडकेही गावातील कुंभार देत नाही, म्हणजे तोही खापच्या दरार्‍याला किती टरकून असेल याची कल्पना येते.

स्त्री-भ्रूण हत्या, मेडिकल एथिक्स अशा एपिसोडवरील मतेमतांतरे पाहून ऐकून काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यासंदर्भात योग्य ती कानूनी कारवाई करण्याचे अभिवचन आमीर खान टीमला दिल्याच्या बातम्या झळकल्या, पण मला खात्री आहे की राजस्थान असो वा हरियाणा, कोणताही मंत्री वा पक्ष हा एपिसोड पाहून 'खाप' विरूध्द ब्र काढणार नाही.

त्या तीन राज्यातील ग्रामीण भागातील असा हा 'अजब न्यायनिवाडा' महाराष्ट्रासारख्या राज्यात रुजला नाही हे या राज्यातील ग्रामीण जनतेचे सुदैवच म्हणावे लागेल.

अशोक पाटील

अंतरंगी , इथे माबो वर सल्ले देणे सोपे आहे ...जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे..............

एखाद्या उपवर ब्राह्मण मुलाच्या लग्नासाठी स्वत: प्रयत्न करून बघित;ए का कधी?

आणि ब्राह्मण मुलांना इतर जातीय मुलींशी लग्न करा हा शहाजोग सल्ला देण्या-ऐवजी ब्राह्मण मुली आणि पालक यांना प्रबोधन करून ब्राह्मण मुलाशीच लग्न करण्यास प्रवृत्त का करू नये?त्यासाठी एखादी संस्था /चळवळ चालू करुया की !

माझे विचार काहींना विकृत वाटतील ,पण मी या प्रकारात खूप पोळलो आहे .वेळप्रसंगी मुलाला -मुलीला मारून /धमकावून ही आंतरजातीय प्रेम-विवाहाची थेरं बंद पाडा . कारण आजकाल खरे प्रेम कुणीच करत नाही ,असते ती फक्त वासना !

अशोक जी

मी हरियाणात झिरकपूरला वर्षभर (जाऊन येऊन) राहीलोय. जोधपूरला तीन महीने आणि पंजाब - उत्तर प्रदेश - चंदीगड बॉर्डरवरच्या रामगढला दोन वर्षे. यांची पद्धत थोडीफार माहिती झाली आहे. अतिशय बेरकी आणि क्रूर लोक असतात हे.

राजस्थान, गुजरातच्या काही भागात आणि हरियाणाच्या काही भागात खान मंडळींच्या सिनेमावर बहिष्कार आहे. हा निर्णयही काही उजव्या संघटनांनी खाप /जात पंचायतींना हाताशी धरून अंमलात आणलेला आहे.

आणि ब्राह्मण मुलांना इतर जातीय मुलींशी लग्न करा हा शहाजोग सल्ला देण्या-ऐवजी ब्राह्मण मुली आणि पालक यांना प्रबोधन करून ब्राह्मण मुलाशीच लग्न करण्यास प्रवृत्त का करू नये?त्यासाठी एखादी संस्था /चळवळ चालू करुया की !

माझे विचार काहींना विकृत वाटतील ,पण मी या प्रकारात खूप पोळलो आहे .वेळप्रसंगी मुलाला -मुलीला मारून /धमकावून ही आंतरजातीय प्रेम-विवाहाची थेरं बंद पाडा . कारण आजकाल खरे प्रेम कुणीच करत नाही ,असते ती फक्त वासना ! >>>>>>>>>>>>>>>>

-^- -^- -^- -^-

No Comments.

@पाटील सर
कारण काही असो पण, हरियाणातील मेहम चौबिसी येथील खाप पंचायतीच्या 'त्या' पाच सदस्यांशी बोलताना खुद्द आमीर खान फार जपून बोलत असल्याचे (मला) जाणवले. मूळ रेकॉर्डिंग दीर्घ असल्याचे जाणवत होते, तसेच त्या सदस्यांची बरीच मते 'एडिट' केल्याच्या खुणा स्पष्ट दिसतात. त्या सदस्यांना निरोप देतानाही तो अदबीनेच म्हणाला की, "मला तुमची काही मते पटलेली नाहीत....तरीही"<<<<<

खापच्या मुला़खतीतील 'हंशा' देखील वरून जोडलेला होता..

आणि ब्राह्मण मुलांना इतर जातीय मुलींशी लग्न करा हा शहाजोग सल्ला देण्या-ऐवजी ब्राह्मण मुली आणि पालक यांना प्रबोधन करून ब्राह्मण मुलाशीच लग्न करण्यास प्रवृत्त का करू नये?त्यासाठी एखादी संस्था /चळवळ चालू करुया की !

माझे विचार काहींना विकृत वाटतील ,पण मी या प्रकारात खूप पोळलो आहे .वेळप्रसंगी मुलाला -मुलीला मारून /धमकावून ही आंतरजातीय प्रेम-विवाहाची थेरं बंद पाडा . कारण आजकाल खरे प्रेम कुणीच करत नाही ,असते ती फक्त वासना ! >>>>>>>>>>>>>>>>
केवळ भारताचे दुर्दैव Sad

कारण आजकाल खरे प्रेम कुणीच करत नाही ,असते ती फक्त वासना ! >>>>>>>>>>>>>>>>

म्हनजे लग्न स्व जातीय असेल तर लग्न आणि परजातीय असेल तर वासना ! वा छान विचार आहेत.


आणि ब्राह्मण मुलांना इतर जातीय मुलींशी लग्न करा हा शहाजोग सल्ला देण्या-ऐवजी ब्राह्मण मुली आणि पालक यांना प्रबोधन करून ब्राह्मण मुलाशीच लग्न करण्यास प्रवृत्त का करू नये?त्यासाठी एखादी संस्था /चळवळ चालू करुया की !

म्हनुनच म्या म्हनते,खाप पंचायत म्हनजे मनुस्मृतीचा आज शिल्लक राहिलेला भाग

साक्षात भिमाने आंतरजातीय विवाहाला विरोध करायचा म्हणजे अजबच.... भिमा, हिडिंबा तुझ्या जातीतली होती काय रे? Proud

.वेळप्रसंगी मुलाला -मुलीला मारून /धमकावून ही आंतरजातीय प्रेम-विवाहाची थेरं बंद पाडा >>>>

हे उत्तेजित करणारे- प्रव्होक करणारे विधान आपल्या समाजाला कुठल्या शतकात घेवून जाईल ठावूक आहे का?
मला एवढाच आनंद आहे की यासारखे समविचारी लोक कमी आहेत.

वेळप्रसंगी मुलाला -मुलीला मारून /धमकावून ही आंतरजातीय प्रेम-विवाहाची थेरं बंद पाडा<<<

या असल्या टुकार मानसिकतेला मुळातून उखडून टाकणे अत्यंत गरजेचे आहे.

अशा लेखनावर इथे बहिष्कार टाकूया.
प्रतिसादच द्यायचा नाही.
मायबोलिकरहो --- मंजूर??

त्या ऐवजी ह्या अशा प्रत्येक लिखाणानंतर देव त्यांना सदबुद्धी देवो अशी प्रार्थना करु या.....

Get Well Soon MAMU................

ते लव्ह कमांडोवाल्यांनी खाप वाल्यांची पार अक्कल काढली. थोबाडं बघण्यासारखी झाली होती. वय गेलं खड्ड्यात असल्या 'खाप'रांना चाबकाने फोडले पाहिजे...

मूळात जात-पात प्रकार बंद करणे जरूरी आहे.

एखादी जात म्हनजे उच्च हाच विचाराने सर्व सुरु होते.

बाकी, हरयाणात माझे वडील होते काही काळ कामासाठी. एकंदर तिथली लोकांचे विचार जहाल वाटतात जेव्हा जात वगैरे प्रश्ण येतात. त्यांचा कायम शब्द "हमारी बिरादरी" वगैरे असायचे.

(ता.क: अक्खा हरयाणा असा आहे असा अर्थ काढू नये, पण एकंदरीत विचार करण्याची "बहुतांशी" व्रुती काही गोष्टींवरच अडकलेली अस्ते)

दुसरे म्हनजे, वय आहे म्हणून मान द्या ही प्रथा खूपच बेकार आहे आपला देशात.

नीधप | 3 June, 2012 - 10:43 नवीन
ते लव्ह कमांडोवाल्यांनी खाप वाल्यांची पार अक्कल काढली. थोबाडं बघण्यासारखी झाली होती. वय गेलं खड्ड्यात असल्या 'खाप'रांना चाबकाने फोडले पाहिजे...
<<< +१
मूर्ख आणि डबल स्टँडर्ड्स च उदाहरण म्हणजे ती स्टुपिड खाप पंचायत!
स्त्रियां वर बंधनं घालताना 'सो कॉल्ड भारतीय कल्चर' , त्या वेळी नाही इंग्लंड चा समाज फॉलो करणार , बाकी पंचायत समिती च्या निर्णयां ना समर्थन करताना इंग्लंड च्या परंपरांचे उदाहरण , बिग जोक !
एपिसोड नंतर 'घर याद आता है मुझे' गाणं काय सुरेख , राम संपत ची अत्ता पर्यंत च्या प्रत्येक एपिसोड ची गाणी अतिशय आवडली !

@ किरण....

मी तुमच्याइतका काळ जरी हरियाणाच्या त्या भागात काढलेला नसला तरी त्या भागातील काही जाट मंडळींशी अगदी खाटल्यावर बसून परंपरेविषयी मनसोक्त बोलाचाली करण्याचे काही प्रसंग मी अनुभवले आहेत. खूप वेळा कोणत्या ना कोणत्या कारणाने मी हरियाणा खोलवर भागात गेलो आहे. अर्थात मी १९८८-९० च्या आगेमागेच्या घटनांविषयी हे लिहित आहे. हरियाणाच्या "कोसली" आणि 'चरखी दादरी" या दोन गावात राहाण्याचाही प्रसंग आला होता तो मिलिटरीमध्ये (त्या साली) लेफ्टनंट पदावर असलेल्या एका जाट मित्राच्या लग्नाला हजर होतो, त्या निमित्ताने. आज जशी 'खाप' परंपरा पध्दतीवर तिखट चर्चा होत आहे (ऑनर किलिंगच्या अनुषंगाने म्हणतोय) त्यावेळी ती तितकीशी होत नव्हती. "सामाजिक बहिष्कार" मात्र जर आजही आहे तर वीसपंचवीस वर्षापूर्वी किती प्रखरतेने अस्तित्वात असेल याची कल्पना आपण सर्वच करू शकतो. अशा एका कुटुंब-प्रमुखाला अगदी अर्ध्या तासासाठीच भेटता आले. तेही रामशरण (लेफ्टनंटचा थोरला मेहुणा, जो पोलिस खात्यात असल्यामुळे असेल कदाचित) यांच्या सोबतीने. रामराम वगैरे होण्यापूर्वीच तो सत्तरीचा म्हातारा अगदी अटॅक आल्यासारखा थरथर कापत होता आम्हा चौघांना पाहून. त्याला वाटले की रामशरण आणि आम्ही तिघे पोलिस स्टेशनवरच त्याला न्यायला आलो आहोत (आमच्याकडे जीप होती, पण खात्याची नव्हती). तसा उंचाडा पण शरीराची अक्षम्य अशी हेळसांड झालेल्या त्या वृद्धाची ती भाषा धड हिंदी नव्हती वा हरियाणवी....फक्त भेदरटपणाने तो तोतरेही बोलत होता; रामशरणच काहीबाही समजावून सांगत होता त्याला आणि आमच्यासाठी अनुवादकाचे कामही करीत होता. कुटुंबप्रमुखाची त्या अवस्थेला कारण म्हणजे त्याच्या मुलाने गोत्रातीलच पण एका सधन बापाच्या मुलीशी प्रेमविवाह करून लखनौला पलायन केले होते आणि 'खाप' ने तो विवाह अमान्य केल्याने आणि हा आपल्या मुलाला गावी परत बोलाविण्यास असमर्थ ठरल्याने 'ग्राम बहिष्कारा'चे शिक्षा निमूटपणे सोसत होता. त्याला घरातील अन्य चौघांच्या [त्यातही तीन स्त्रिया - दोन मुली आणि पत्नी] शिध्यासाठी तसेच धाकट्याला शाळेला सोडायला जाण्यासाठी रोज किमान १२-१५ किलोमीटर चालत जावे लागत असे....कारण ? दुकानदारांनी त्याला सामान विकायचे नाही अशी तंबी....[तंबी म्हणजे खापचा आदेश....लिखित नसतो, पारावरच सर्वांना तसे सांगितले जाते.] बरे, चालत का ? तर अगदी त्या गावातून वा गावाच्या हद्दीवरून धावणार्‍या स्टेट बसमध्येही त्याने चढायचे नाही. चालत वा सायकल हेच साधन. [अर्थात त्या बापाला कुणी प्रत्यक्ष मारहाण केली असल्याचे त्याने सांगितले नाही....- मला वाटते, रामशरण आमच्यासोबत असल्याने त्याने तसे सांगितले असेल.]

अजूनही खूप अनुभव सांगता येथील इथे....पण वाचणार्‍याला ते केवळ अविश्वसनीय वाटतील. थोडक्यात कोणतीही 'महिला दक्षता समिती' इच्छा असूनही त्या भागात खापविरूद्ध कसलेही ठोस कार्य करू शकत नाही... आजही !

पुढे लग्नानंतर आमच्या लेफ्टनंट मित्राला या सामाजिक बहिष्कार परंपरेबद्दल काहीसे छेडले असता त्यानेही हतबलतादर्शक खांदे उडविले आणि संभाषणाचा सांधा बदलला. म्हणजे अशिक्षित असो वा सुशिक्षित, बेकार असो वा वेल सेटल्ड....हरियाणातील सार्‍यांना 'खाप' मंजूरच आहे असे ध्वनीत होत होते.

आमीरच्या या एपिसोडनंतरही त्यांच्या वर्तणुकीत तीळमात्र फरक पडणार नाही असे जे मला वाटते (तुम्हालाही वाटत असेल) ते याच स्थानिक प्रवृत्तीमुळे.

अशोक पाटील

कार्यक्रम पाहात असतानाच माबोवरच्या ब्राह्मण खाप पंचायतीच्या विशिष्ट मेम्बरांचे काय प्रतिसाद अस्तील असे इमॅजिन करून हसू येत होते. आता गेट वेल सून म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही. Happy धन्यवाद अतरंगी हा मार्ग लक्षात आणून दिल्याबद्दल . नाहीतर उगाच डबक्यात दगड मारण्यासाठी बोटे शिवशिवू लागली होती. ं

अशोकजी

हे लोक अतिशय बेरकी आहेत हे मी म्हटलं ते त्याचमुळे. आमीरच्या शो मधे आलेले ते लोकही चेह-यावरून बेरकी दिसत होतेच. त्यातला दाढीवाला मला ओळखीचा वाटला. मात्र, काही केल्या संदर्भ लक्षात येईना.. असो.

मी तिथं असतानाच नवविवाहीत दांपत्याला फसवून बोलावून घेऊन जिवंत जाळण्याची केस कानावर आली होती. पोलीस तपासात काय झालं काहीच कळालं नाही. तिथल्या वास्तव्यात प्रश्न विचारणं हे विरोधात जाऊ शकतं. दहशत आहेच.

Pages