कैरीची कढी

Submitted by मिनोरि on 15 May, 2012 - 22:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कैरी १
हिरव्या मिरच्या २
नारळाचे दूध १ कप
मोहरी, हिंग्,मेथ्या,तेल फोडणीसाठी
मीठ
तांद्ळाचे पीठ १ चमचा
साखर अर्धा चमचा

क्रमवार पाककृती: 

कैरीचे मोठे तुकडे करावे. मिरची उभी चिरून घ्यावी. तेलात हिंग, मोहरी व ३ -४ मेथ्या घालून फोडणी करावी.त्यात कैरीचे तुकडे व मिरची घालावी. थोडेसे परतून मग त्यात हळद घालावी. थोडेसे पाणी घालावे व कैरी शिजू द्यावी. नंतर थोड्याश्या पाण्यात तांद्ळाचे पीठ घोळवून ते नारळाच्या दुधात घालावे व हे सर्व मिश्रण कैरीत टाकावे. मीठ व साखर घालून उकळी आणावी.

वाढणी/प्रमाण: 
२ व्यक्ती
माहितीचा स्रोत: 
कौटुंबिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कृती.
आमच्या घरी पण साधारण अशीच करतात (तांदळाच्या पिठाच्या जागी शिजलेली चणाडाळ किंवा बेसन वापरतात.) छान लागते.

छान वेगळीच कृती.. नादुचाच काय तो प्रोब्लेम.. Happy
टोके, कैरीऐवजी ताक वापरता येईल पण दोन्ही वापरून आंबट्ट होईल कदाचित कैरी आंबट नसल्यास वाप्रता येईल

अरे हिथ आहे कि कैरीच्या कढीची रेसिपी .. आमची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे पण .. आता धागा काढू की नको अस झालं .. जाऊदे .. Happy

विदर्भात नारळाचं दुध नै वापरत कशातच .. ते सोडून करुन बघेल म्हणते ..

मी कैरी उकडून तिचा गर घेते आणि दाटपणासाठी बेसन पीठ लावते. आलं लसूण मिरचीचा ठेचा घालते आणि कोथिंबीर optional.