'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.
ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.
जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //
ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
दिनेश दा..किती ग्वाड.. बरोबरे
दिनेश दा..किती ग्वाड.. बरोबरे ना तिचं.. एकटी कशी पळून जाणार...
दिनेशदा लेक भारीये
दिनेशदा लेक भारीये तुमची!
नारिकेल(नारळ) पुराण आवडल्याबद्दल सर्वांचे आभार्स!
साधना का ग लाथ घालते "त्याला"?
शोभा "त्याला" मिठी मारून ती तूच का?
इनमीनतीन ....याला (बोका) आम्ही कोडल्यामुळे तो चिडलाय.
आता नारिकेल पुराणानंतर
आता नारिकेल पुराणानंतर "मार्जार पुराण" सुरु झालंय तर - अति उत्तमम्
मार्जार: - सतत स्वतःला साफ राखणारी - असा अर्थ आहे म्हणे या संस्कृत शब्दाचा...
शशांक. इजिप्त मधली प्राचीन
शशांक. इजिप्त मधली प्राचीन संस्कृती आणि इन्का संस्कृती पण मांजराला देव मानत असत. माचुपिचु डोंगराचा
आकारही म्हणे, बसलेल्या मांजरासारखाच आहे. पण त्या कूळाची पण मजा आहे ना, मांजरासारखा पिटुकला प्राणी, आणि तिचा भलामोठा भाचा, तो वाघ ! असे उदाहरण विरळाच असेल.
साधना का ग लाथ घालते
साधना का ग लाथ घालते "त्याला"?>>>>
वॉशिंग मशिनच्या मागे जाऊन तीचे चाक कसे गोल फिरते ते डोके घालुन पाहतो. >>>> तो बोका डोके घालतो म्हणून ही लाथ घालते.... (साधनाच्या लिस्टमधे कबुतरांनंतर बोक्याचे नाव दिसतंय बहुतेक....हा हा हा ...... बिचारा बोका...)
कॅटवॉक - ज्याने हे नाव शोधून
कॅटवॉक - ज्याने हे नाव शोधून काढले तो/ती धन्यच... आपल्याकडे पाठ करुन डौलात चालणार्या मांजरी कडे (बोका नाही हं) एकदा नक्की बघा - लगेच कळेल कॅटवॉक काय ते - पर्फेक्ट नाव......
शोभा "त्याला" मिठी मारून ती
शोभा "त्याला" मिठी मारून ती तूच का?>>>>>>>>>>>नाही नाही नाही.त्रिवारच काय, शतवार पण नाही. मी सर्व प्राण्यांपासून लांबच असते.

शोभा "त्याला" मिठी मारून ती तूच का?>>>>>>>ती "ती" आहे. तिचेच ते पिल्लू. प्रथम तिचा रंग असा काळ्पट होता, नंतर पिंगट झाला, सध्या जरा जास्तच झालाय.
लेक म्हणाली, मम्मी आपली सोनू
लेक म्हणाली, मम्मी आपली सोनू पळून गेली असेल तर कुणाबरोबर तरी पळून गेली असेल ना ! एकटी कशी जाणार ?
म्हण्जे सोनु पळून जायच्या वयात आलीय तर....
आमचा बोका अजुन तिन महिन्याचा नाहीय तर त्याला बाहेर जायचे वेध लागताहेत. परवा रात्री कधी खाली गेला ते कळलंच नाही. शेजा-यांनी आणुन दिला परत. त्याच्यामागे ५ कुत्रे लागलेले. आमच्या खालची लेन कुत्र्यांसाठी राखीव आहे आणि मागची लेन मांजरांसाठी. तो चुकून कुत्र्यांच्या लेनमध्ये गेला.
शोभा आपली मांजरे एकाच घराण्यातली आहेत बहुतेक....
बोक्याच्या अंगाला वास यायला लागला की ऐशु त्याला शांपुने आंघोळ घालते. बोक्याला ते अजिबात आव्डत नाही. आंघोळ झाली की तो स्वतः परत अंगाची सगळी साफसफाई करतो.
मला कुत्री नी मांजरी अजिबात आवडत नाही. ऐशुच्या हट्टामुळे आधी कुत्रा आणला. आणि आता बोका आणलाय (बाळंतपणे काढायचा त्रास नको म्हणुन
). मांजरांना पाहिले की त्यांना फुटबॉल समजुन एक दणदणीत लाथ घालायचा मोह होतो. हल्ली दिवसातुन दोनचार वेळेस ही हौस पुरवुन घेते... 
वॉशिंगमशिनच्या मागचे कवर निघालेय. घरात लहान मुले नसल्याने मी ते लावायच्या फंदात पडले नाही. मशिन चालु असताना मागचे चाक फिरत राहते. ह्या इडीयटाने त्यात डोके घातले आणि ते कापले गेले तर आम्हाला फुकट काशीयात्रा आणि सोबत सोन्याचे मांजर दान करावे लागेल या भितीने त्याला लाथ घालुन उडवत राहते. तोही माझे लक्ष चुकवुन मागे जायचा प्रयत्न करत राहतो.
मांजरांना पाहिले की त्यांना
मांजरांना पाहिले की त्यांना फुटबॉल समजुन एक दणदणीत लाथ घालायचा मोह होतो. हल्ली दिवसातुन दोनचार वेळेस ही हौस पुरवुन घेते... स्मित>>>>>>>>>>काय ग साधना?
मी कधी असं करत नाही हो 
कधी नाही म्हणजे दिवसा नाही तर
कधी नाही म्हणजे दिवसा नाही तर रात्री करतेस का????
दोन - चार दिवस इकडे आले
दोन - चार दिवस इकडे आले नव्हते, तर केवढ्या गप्पा झाल्यात! नारळ आणि मांजरपुराण मस्त... पण मांजरांचं एवढं कौतुक होऊनही अजून कुत्रेप्रेमी शांत कसे?
काल अक्षरधाराच्या प्रदर्शनात मस्त पुस्तकं होती. पैसे संपले आणि पुस्तकं धरून हात दुखायला लागले म्हणून खरेदी थांबली माझी. चितमपल्लींची दोन पुस्तकं घेतलीत - 'चैत्रपालवी' आणि 'पक्षी जाय दिगंतरा'.
अरे वा ! गप्पा अगदि जोरात
अरे वा ! गप्पा अगदि जोरात चालल्यात.
जिप्सी, काळजी घे रे बाबा ! आणि सक्तीची विश्रांती घे ! नाहीतर तुझ्यातला फोटोग्राफर जागा व्हायचा आणि तु चष्म्याचे फोटोसेशन करायला लागायचास्.....:फिदी:
दिनेशदा, राजापुरकडची भाषा मी जरा विसरले होते, आता एकदम आठवली !
आज आमच्याकडे आमरस-पोळीचा
आज आमच्याकडे आमरस-पोळीचा बेत.
दिनेशदा, हे आंबे राजापूरचे आहेत बरं का !
गौरी, पक्षी जाय दिगंतरा मला
गौरी, पक्षी जाय दिगंतरा मला आवडत...
चैत्रपालवी बहुतेक नाही वाचल. चितमपल्लींचा शब्दकोश बाबांना घेऊन दिला होता...इथे कुणी वापरतं का? छान आहे ...:)
आमरस जोरदार नि षे ध ....
आमरस जोरदार नि षे ध ....
सुप्रभात. ही आमच्या एरीयातील
सुप्रभात.
ही आमच्या एरीयातील माऊ. माश्यांचे निवडलेले टाकले की धावत कुंपणाजवळ येतात.

काल आले नाही तर ५० पोस्ट बापरे.
जिप्स्या काळजी घे. फोनते नंतर.
मानुषी नारळ पुराण खुप आवडले. माझ्या सासरी बंब होता आता अर्धा आहे. त्याचे झाकणच कोणीतरी चोरून नेले. आता आणायचे आहे बनवून. लग्न झ्याल्यानंतर ३-४ वर्षे आम्ही बंबच पेटवायचो.
माझी आई अजून नारळाच्या पात्यांचे खराटे काढते. तिचा हातच बसला आहे. शिक्षीका असुनही ती वेळ मिळेल त्या वेळेत रोज खराटे काढायला बसायची व रिटायर्ड होऊन १० वर्षे झाली तरी अजून बसते. मी पण तिला मदत करायचे पण गंमत म्हणुन.
शशांकजी म्हणजे तुम्हाला मांजरांची गोडी लागली म्हणायची तर.
सगळ्यांचे मांजरांचे जोक्स भारीच.
वेका आज मी आंब्याचे आईस्क्रिम करणार आहे :स्मितः
प्रज्ञा, तुझा पत्ता दे बरं,
प्रज्ञा, तुझा पत्ता दे बरं, घरीच येते डायरेक्ट तुझ्या;.. आमरस खायला!! (किती तो वाईट्टपणा!! इथे आमरसाचा फोटो द्यायचा म्हंजे...............)
गौरी, चितमपल्लींची बहुतेक सगळीच पुस्तकं छान आहेत. रातवा,सुवर्णगरूड आणि पाखरमाया ही पुस्तकं विशेष छान वाटली. त्यांचं चकवाचांदण तर खिळवून ठेवतं. मात्र केशराचा पाऊस तितकंसं चांगलं नाहीये.
जागू, तुझ्या आईंना किती उत्साह आहे गं कामाचा.....
जागु , माऊ तुझ्या हातचे ३९
जागु , माऊ तुझ्या हातचे ३९ प्रकारचे मासे खाऊन मस्त गुबगुबली आहे ...;)
अगं पण पुढच काही वाचताच येत नाहिये
एक तुझ्या आईच्या कामाच् तेवढं नीट दिसतंय .... आणि तिच सॉलिड कौतुक...:)
प्रज्ञा, काय सुंदर रंग आहे
प्रज्ञा, काय सुंदर रंग आहे अमरसाचा !
आमच्याकडे आता नेहमी आकाश ढगाळलेलेच असते. पण ज्यावेळी ढग थोडेसे विरळ असतात, त्यावेळी
असा नजारा दिसतो. केवळ २/३ रंग आणि अशी देखणी फ्रेम तयार होते.
आमच्याकड्च्या गुलाबांना सुंगध नसतो पण रंग आणि आकार, अप्रतिम असतात. खरं तर या दोन्ही
गुलाबांच्या फुलांचे फोटो मी आधीही टाकले होते. पण प्रत्येक फुल मला नवे दिसते. त्याचे हे दोन नमुने.
एकटी कशी पळुन जाईन हे भारीच
एकटी कशी पळुन जाईन हे भारीच होतं..
कधी नाही म्हणजे दिवसा नाही तर रात्री करतेस का????>>>>> साधना
माउ, आमरस, गुलाब बेस्ट
काल दुर्गा भागवतांचं ऋतुचक्र मिळालं.. सध्या हातात असलेलं पुस्तकं संपलं की ते वाचेन..
धन्यवाद लोक्स. तुमच्या
धन्यवाद लोक्स. तुमच्या शुभाशिर्वादामुळे आता एकदम ठिक आहे. डोळ्याला आतुन मार लागला नाहिये, बाहेर थोडे लागल्याने सूज आली होती. माझी कलिगपण आता बरी आहे, पण तिला ३ आठवडे विश्रांती घ्यायला सांगितली आहे.
उन्हाळ्यात मी जास्वंदीच्या फांद्या कापलेल्या आणि आता बघतोय तर त्यांना क्रीम कलरची कसलीशी किड लागली आहे. क्रिम कलरचे छोटे छोटे पुंजके आलेत आणि त्यात बारीक मुंग्यासारखे काही तरी आहे. एक पूर्ण फांदी वाळली
यावर उपाय काय?
डोळ्याला आतुन मार लागला
डोळ्याला आतुन मार लागला नाहिये, बाहेर थोडे लागल्याने सूज आली होती. माझी कलिगपण आता बरी आहे, पण तिला ३ आठवडे विश्रांती घ्यायला सांगितली आहे.>>>>> जिप्सी - तुम्हा सर्व मंडळींना काहीही गंभीर इजा झाली नाही हे वाचून इतके बरे वाटले.....
त्या जास्वंदाच्या कीडीबाबत - जवळच्या एखाद्या रोपवाटिकेत नाहीतर झाडांची औषधे विकणार्या दुकानात ते नेऊन दाखव - त्यांना चांगली औषधे माहिती असतात. जी फांदी पूर्ण वाळली आहे ती छाटून टाक - अलगद -इतर झाडाला इजा होणार नाही अशी - आता पावसाळ्यात फुटेल बघ जास्वंद छान.... व फुलेलही....
धन्यवाद शशांक मी जितकी जमेल
धन्यवाद शशांक
मी जितकी जमेल तितकी ती किड खरडवण्याचा प्रयत्न केलाय. ती फांदी आता काढुन टाकतो.
तंबाखुचे पाणी किंवा हिंगाचे पाणी शिंपडुन बघु का?
मी जितकी जमेल तितकी ती किड
मी जितकी जमेल तितकी ती किड खरडवण्याचा प्रयत्न केलाय.>>>>> ते जपून कर,कधी कधी खोडाला इजा होऊन ती कीड आत-आत जाते, पण एखादे बेगॉन सारखे जालिम औषधही मार ती कीड घालवण्यासाठी - जाणकाराला विचारुन.
कधी कधी खोडाला इजा होऊन ती
कधी कधी खोडाला इजा होऊन ती कीड आत-आत जाते>>>>ओह्ह, हे लक्षातच आलं नाही.
झाडांवर तंबाखूचे पाणी
झाडांवर तंबाखूचे पाणी फवारण्याचा उपाय इथे अनेकवेळा सांगितलाय. पण ही अक्कल प्राण्यांना पण आहे.
पंखात / केसात शिरणारे किटक त्यांना पण त्रास देतात. त्यासाठी कावळे सिगरेट्स पळवतात आणि ती चावून चावून ते लाळेने पंखाना लावतात. यासाठी ते काही मुंग्यांचा पण वापर करतात.
अशी काही पाने माकडांना माहित असतात आणि तीसुद्धा त्या पानाचा रस अंगाला चोळतात. काही माकडांनी
जंगली गोम यासाठी वापरायला सुरवात केलीय. तिच्या अंगाचा येणारा तीव्र वास, तिच्या शत्रूंना तिच्यापासून दूर ठेवतो. त्यासाठी हि माकडे ती गोम पकडतात, अंगाला चोळतात. पण नवल म्हणजे गोम मारत नाहीत, जिवंत
सोडतात. खार सुद्धा ही अक्कल वापरते. त्यासाठी जर तिला विषारी सापाची कात मिळाली, तर ती, आपल्या अंगाला चोळते.
या सर्वाचे चित्रीकरण, बीबीसी ने केलेले आहे.
सुप्रभात. दिनेशदा फोटो
सुप्रभात.
दिनेशदा फोटो अप्रतीम आहेत.
शांकली धन्स ग. केशराचा पाउस मध्ये चित्तमपल्लींनी त्यांच्या वैवाहीक जीवनावर जास्त लिहील्या मुळे तस वाटत. पाखरमाया माझ्याकडे संग्रही आहे पुस्तक छान आहे.
वेका
जिप्स्या फोन उचलत का नाहीस ?
चिमुरी मी कालच संपवल ऋतूचक्र वाचून. खुप छान आहे.
दिनेशदा मस्त माहिती
दिनेशदा मस्त माहिती
मानुषी.. नारळ पुराण
मानुषी.. नारळ पुराण मस्त.
जिप्सी काळजी घे स्वतःची व कलीग नी त्या तिसर्या व्यक्तीलाही लवकरच बरे वाटेल हि अपेक्षा.
मांजरांना पाहिले की त्यांना
मांजरांना पाहिले की त्यांना फुटबॉल समजुन एक दणदणीत लाथ घालायचा मोह होतो. >> साधना
दिनेश, गुलाब मस्तच. जागू आजचे सुप्रभात बघून 'समईच्या शुभ्र कळ्या' आठवले.
मानुषीताई, नारळ आख्यान मस्तच होते. पुढचा अध्याय कधी घेताय निरुपणाला?
जिप्सी, काळजी घे रे बाबा. रच्याकने नक्की रिक्षातून पडल्यामुळेच डोळ्याभोवती काळेनिळे झालेय ना?
Pages