डांगर

Submitted by सीमा on 8 May, 2012 - 13:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बेसिक रेसीपी साठी :उडदाची डाळ १ वाटी
ऐनवेळी :
चवीनुसार तिखट किंवा हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
दही लागेल तस
फोडणीचे साहित्य
कांदा हवा असेल तर

क्रमवार पाककृती: 

डांगराची कृती फार सोपी आहे. आजी ,आई भाज्या कमी मिळायला लागल्या कि नक्की करायच्याच.
डाळ तयार करुन ठेवली कि बाकी आपण ऐनवेळी काय मिक्स करु तसे. मेतकुटासारखे.

उडदाची डाळ स्वच्छ धुवून , कापडावर पसरुन कोरडी करुन घ्यावी. नंतर मंद आचेवर भाजुन घ्यावी. (चकलीच्या भाजणीसारखे)
मिक्सर मधुन रवाळ दळावी.
ऐनवेळी लागेल तेव्हा , त्यात दही घालून मिश्रण तासभर भिजवावे. कांदा,कोथिंबीर ,मीठ,तिखट घालून कालवून फोडणी घालावी.
डांगर तयार. Happy

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे
अधिक टिपा: 

आठवेल तशी रेसीपी लिहिलीये. आईला विचारुन आणखी काही बदल असले तर लिहिन.

माहितीचा स्रोत: 
आजी , आई, सांगली जिल्हा :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे अगदी गोंधळून टाकले सर्वांनी. मी डांगराचे पिठ पाहिले आहे. लालसर पिवळे असते. भिजवून त्याचे गोल गोल गोळे करायचे नि खायचे. पोह्यापासून पिठ तयार करतात त्यापासून डांगर तयार होते.

Pages