कॅम्पातल्या (अर्थात पुणे कॅन्टॉन्मेन्ट एरीआच्या) आठवणी !

Submitted by दीपांजली on 5 May, 2012 - 03:29

कॅम्प अर्थात पुणे कॅटोन्मेन्ट एरीआ:
पुण्यातला माझा अतिशय लाडका भाग आणि अनेक सुंदर आठवणींनी भरलेला !
पहिल्यांदा कॅम्प ला गेले ते आई बाबां बरोबर साधारण पाचवी किंवा सहावीत असताना.. अगदी वेगळ्याच दुनियेत गेल्या सारखं वाटलं होतं.. वेगळीच लोकं, वेगळीच दुकानं , सगळं वेगळच वातावरण, ख्रिसमस म्हणून आई बाबांनी कॅम्प मधे नेलं.. नंतर 'सुप्रिया' मधे जेवायला आणि आईच्या आव्डत्या 'निड्ल वुमन' दुकानात , ते माझं पहिलं कॅम्प दर्शन !
त्या नंतर आई बाबां बरोबर जेंव्हा जेंव्हा गेले ते ख्रिसमस च्या वेळी किंवा वेस्टएन्ड ला सिनेमा पहायला !
पहिल्यांदा इन्डिपेन्डटली कॅम्प मधे जायचं निमित्त घडलं 'सॉफ्टी' आणि मार्झोरिन च्या त्या किर्ती मुळे !
नुकत्याच अकरावीत जाउ घातलेल्या कॉलनीतल्या मोठ्या मुली नेहेमी कॅम्प च्या गप्पा मारायच्या, मग आम्ही ज्युनिअर शाळकरी पोरींनी पण ठरवलचं 'आपलं आपलं' कॅम्प ला जायचं म्हणून !
कॉलनीतल्या मैत्रीणी बरोबर गेले ते नौवीत असताना, बस नी गेलो होतो कोथ्रुड हून कुठले तरी भलतेच रुट घेऊन आधी पुलगेट ला गेलो आणि भर दुपारी एम जी रोड पर्यंत चालत गेलो आणि फक्त वंडरलँड च्या फेर्‍या करून सॉफ्टी खाऊन परत आलो होतो घरी जायला उशीर होईल म्हणून !
नंतर जायचा रुट समजल्यावर ' जंगली महाराज रोड-कुंभार अड्डा-लाल देवल (Ohel David Synagogue) मार्गे माझ्या शाळेतल्या सायकल नी, कॉलेज मधल्या सनी नी, जॉब करत असताना स्कुटीनी सतत अडीच वर्षं अशा सगळ्या वहानांनी कॅम्प च्या भरपूर वार्‍या केल्या, टायर्स झिजवली , त्यात १९९० ते २००१ काळात कॅम्पचे अक्षर्शः गल्ली बोळ झिजवले !
कॅम्प च्या आठवणी फारच नॉस्टॅल्जिक करतात कारण बर्‍याच गोष्टी पहिल्यांदा पाहिल्या त्या कॅम्प मधे !
'कॉस्मोपॉलिटिन कल्चर' चा पहिला अनुभव, अल्ट्रा मॉडर्न क्राउड, ' पहिलं सॉफ्टी' , पहिली पेस्ट्री, पहिलं बर्गर, 'सिंगाडे, लिची फ्रुट ,इराण्याच्या दुकानातला चहा, शेपुच्या स्वाद चे इराण्याच्या दुकानाचे सामोसे (अर्थात कॅफे नाझ), श्रुसबेरी बिस्किट्स या सगळ्याची चव पहिल्यांदा घेतली कॅम्प च्या भटकंती काताना .. मेनुकार्ड वर मधे 'बीफ' पहिल्यांदा पाहिलं 'द प्लेस सिझलर्स' मधे , मोड आलेली मटकी टाकून , लिंबु पिळलेली कोन मधली भेळ पहिल्यांदा खाल्ली कॅम्प मधेच, गाडी वरचं सँडविच पहिल्यांदा कॅम्प मधेच खाल्लं !'
पहिल्यांदा ट्रॅफिक चे नियम तोडले म्हणून पांढर्‍या पोलिसानी आडवलं कॅम्प मधेच.. . त्याचं काय झालं , कॅम्प मधे जरा शाइन फेकत जाऊन म्हणत ताईची लुना नेली अठरा पूर्ण नसताना, लायसन्स नसताना आणि आडवलच पोलिसानी लाल देवल पाशी !
या शिवाय इंग्लिश मधून भीक मागणारे 'व्हाइट कॉलर' भिकारी पण पहिल्यांदा पाहिले कॅम्प मधेच !
त्या मार्झोरिन च्या बाहेरचे भिकारी(लहान पोरं) मात्र फार गुंड असायची, भीक मागण्या साठी मागेच लागत, पस्र च ओढायचे एपोरं..काही पैसे नाहीयेत म्हंटलं तर खायला द्या म्हणायची, खायला नाहीये म्हंटलं तर "जो आप खा रहे हो, वो दे दो, आप बस करो' म्हंटल होता एक टारगट पोरगा Proud
मार्झोरिन ची एक आठाव्ण : तर त्यांच्या फेमस सॉफ्टी आइस क्रिम पिक अप स्टेशनची सिलिंग लेव्हल खूप शॉर्ट होती, एका ख्रिसमस ला त्या सॉफ्टीच्या दुकानात भयानक म्हणजे अगदी धक्काबुक्कीची गर्दी होती... इतकी गर्दी कि सॉफ्टी मिळाल्यावर बाजुच्या लोकांना लागु नये म्हणून आइस क्रिम मिळाल्यावर हात उंच करून न्यावं लागत होतं सगळ्यांना आणि नादात मार्झोरिन च्या छताला टेकत होतं प्रेत्यकाचं सॉफ्टी.. त्या दिवशी सॉफ्टीच्या रांगेतले हे सीन बघून अक्षरशः हसून मेलो होतो आम्ही.. जो येइल त्याचं आइस क्रिम छताला !

कॅम्प ची खरेदी हा पण एक स्वतंत्र विषय आहे !
'बुटिक' ही कन्स्पेट पहिल्यांदा कॅम्प मधेच पाहिली..'नुमाइश' नावाचं वंडरलँड मधलं बुटिक आणि एम.जी रोड चं स्वतंत्र बलानिज माझं लाडकं होतं..
पहिले ब्रँडेड शुज, वेस्टर्न ड्रेसेस ची इतकी मोठ्या प्रमाणात दुकानं पहिल्यांदा कॅम्प मधे पाहिली !
मी १९९१ मधे पहिला ४ आकडी किमतीचा ड्रेस आई बाबां कडून मिळवला तो कॅम्प मधूनच.. (अर्थात बलानिज मधून).. नंतर माझं मलाच अडीच ह्जाराचा स्कर्ट टॉप सांभाळायचं, नीट मेन्टेन करणे प्रकाराचं टेन्शनच आलं. पण त्या वेळाचा सर्वात महाग आणि लाडका ड्रेस होता तो !
वंडरलँड , क्लोव्हर सेंटर, स्टर्लिंग सेंटर तर आहेतच पण असंख्य छोटी छोटी बुटिक्स, फॅन्सी ज्वेलरी, बोहर्‍यांची लेसची दुकानं- ड्रेस वरच्या 'योक' ची, शो बटन्स ची एकदम हटके दुकानं, कस्टम मेड पर्सेस, शुजची बुटिक्स वगैरे त्या वेळी फार नव्या वाटायच्या कन्स्पेट्स !
कॉलेज मधे 'इंटिरिअर डिझायनिंग' शिकत असताना अधुन मधुन काही साइट व्हिजिट्स किंवा अर्किटेक्ट ऑफिस व्हिजिट्स असायच्या अरोरा टॉवर्स आणि परिसरातील पॉश ऑफिसेस मधे .. तेंव्हा पासून 'तीव्र इच्छाशक्ति' कि काय म्हणतात ती फार होती कि मी पण करीन कधीतरी इथे जॉब !
माझ्या कोणी 'वेल विशर' ने तथास्तु म्हंटलं आणि पहिला जॉब लागला कॅम्प मधेच 'अरोरा टॉवर्स' वेस्ट विंग मधे.. 'आनंद गगनात मावेनासा होणे' वगैरे काय असतं ते तेंव्हा समजलं !
जॉब करत असतानाची ती अडीच वर्षं फार सुंदर होती.. दररोज लंच ब्रेक आणि संध्याकाळी एक चक्कर एम.जी रोड, कधी इस्ट स्ट्रीट ला मारायची.. कधी क्लोव्हर सेंटर ची बेसमेन्ट मधली शॉप्स धुंडाळायची , कधी ऑफिस च्या पार्टीज मोना फुड्स मधे, घरी जाताना कॅम्प स्पेशल खाउ न्यायचा.. कधी आईच्या उपासाच्या दिवशी सरप्राइज खाउ अर्थात बुधानिचे जाळीदार वेफर्स, कधी बटाट्ट्याच्या सालीचा चिवडा , कधी भावासाठी बर्गर , कधी नाझ चे सामोसे .. कधी डबा विसरला तर ऑफिस बॉय ला सांगून नाझ ची भुर्जी किंवा जॉर्ज ची बिर्याणी मागवायची.. फार सुंदर दिवस होते !
आवडत्या एरीआत ऑफिस होतं म्हणून मी कह्रोखर इतर ठिकाणी जॉब ला सुध्द अप्लाय करत नव्हते.. नंतर दुसरं ऑफिस जवळच पण इस्ट स्ट्रीट ला काय गेलं, त्याने सुध्दा मला चुकल्या सारखं वाटायचं.. मग अडीच वर्षांनी काँढव्याला ऑफिस गेलं आणि कॅम्प एरीआ सुटलाच, फार वाइट वाटलं पण करिअर मधली मोठी संधी सोडायची नव्हती, आयुष्यात पुढे तर जायचं होतं.. . कॅम्प च् वार्‍या बन्द नाही झाल्या पण बर्‍याच कमी झाल्या !
अता गेले ११ वर्षं यु.एस ला असते , कॅम्प च्या आठवणीच काय त्या राहिल्या पण दर वेळी भारतात जाते तेंव्हा मात्रं कॅम्प ची चक्कर झाली नाही असं होत नाही.
अता सगळीकडे मॉल कल्चर झालय, सगळीकडे ब्रँडेड वेस्टर्न कपडे मिळतात तरीही आजही कॅम्प एरीआ आपलं वेगळेपण टिकवून आहे, फिग लिफ टेलर , छोटी बुटिक्स, बोहर्‍यांची दुकानं अजुनही आहेत !

असो, तर माझ्या आठवणी हे फक्त निमित्त.. परवा शर्मिला फडकेच्या ' पुन्हा सिनेमा' लेखात वेस्टएन्ड थिएटर चा विषय काय निघाला आणि सगळ्या आठवणी पुन्हा एकदा अगदी फ्रेश झाल्या !
तुम्ही पण लिहा कॅम्प च्या भटकंतीचे, खादाडी, खरेदीचे अनुभव !

हे माझे मस्ट इट लिस्ट्सः
द प्लेस(सिझलर्स)
कॅफे नाझ आणि महानाझ(सामोसे, भुर्जी पाव, चहा)
मोना फुड्स
मार्झोरिन
पास्चर बेकरी
बुधानि वेफर्स
जॉर्ज ची बिर्याणि
गाडीवरची सँडविचेस
मटकीवाली कोरडी भेळ
सुप्रिया

तुम्ही पण अ‍ॅडिशन्स करा...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेकर्स बास्केट राहिले वरच्या लिस्ट्मध्ये. पहिल्यांचा एवढे हलके, कमी गोड, क्रिमी केक्स तिथेच खाल्ले.

बी, तुला अनुमोदन. मला सध्या रोजच तस वाटत. मला आधी वाटलेले आता रोज कँपमधून जाते त्यामुळे अप्रुप राहिले नाही की काय. आता खरतर कल्याणी नगर एरीआ छान चकाचक वाटतो.

स्वाती, अगदी खरं. कल्याणी नगर जास्त छान वाटतं.
चल तु आता कल्याणी नगर आणि कोरेगाव पार्क असा बाफ चालु कर. Happy भरपुर आहे लिहायला.

कर सुरु स्वाती ,कल्याणी नगर बीबी Happy
आम्ही अजुन राहिलो नाही पण लग्ना नंतर भारतात जी इनव्हेस्टमेन्ट केलीये ती एकदम हार्ट ऑफ कल्याणी नगर , गोल्ड अ‍ॅडलॅब्ज च्या बरोब्बर समोर ,रेन्ट नी दिलय गेले ६ वर्ष ..एखाद्या भारतवारीत येउन तिथे रहायची मजा घ्यावी असं वाटतं खरं , पण नाही योग आला अजुन !

हो हो कॅम्प गटग होवुन जावु दे. नावनोंदणी चालु झाली आहे. मी, डी आणि नी>>>>>> +चि>> मी अगदी हेच लिहिणार होते. Proud
आता माझा पण चि यातच समजुन घ्या ग.

१०० वी पोस्ट टाकनेका हक तो मेराच बनता है.

त्या निमित्त 'शामुन्स'ची फुलं आणि 'केक एन काउंटर'चा यम्मी चॉकलेट केक यांची आठवण करुन मी हा धागा सेलेब्रेट करते. या दोन्ही जागा कॅम्पमधे ABC फार्मजवळ आहेत. 'चॉकलेटी' लोकांनी केक एन काउंटरचा केक एकदा खायलाच हवा. Happy

'चॉकलेटी' लोकांनी केक एन काउंटरचा केक एकदा खायलाच हवा.>>>>>> नक्कीच...

लवकर ठरवा आता एखादं कॅम्प गटग...

नमस्कार. मी पुण्यात नव्यानेच आलेय त्यामुळे काहीच माहिती नाही. पण तुमच्या सर्वांबरोबर राहून नक्की माहिती करुन घ्यायला आवडेल. त्यामुळे मी पण येणार गटग ला.

कॅम्पात एवढी मज्जा आहे???
खरच माहितीच नव्हतं.
एकदोनदा जाउन आलोय कॅम्पात.
पण इथे जेवढ लिहिलय तसा गायडन्स मिळाला नव्हता तेव्हा.
प्लॅनॅट एम च्या दुकानात जाउन बरीच गाणी ऐकली होती हेडफोन लावुन हे आठवतय.
समोश्यात नॉनव्हेज प्रकार असु शकतो हा धक्का कॅम्पातच पचवला.
आता तर तिकडे मॉल वैगेरे आल्याने बराच बदल झालाय पण हॅपनिन्ग जागा आहे.
कयानी बेकरीतला फ्रुट केक मिळ्वण्यात मी अजुनही अपयशीच ठरलोय,
तिकडचा साधा केकही मस्त होता.
आता एखाद्या जाणंकाराला घेवुन फिरायला हवय.

डिजे एक नम्बर काम केलस हा धागा काढुन. Happy
नायतर दहा वर्ष इकडे राहुन कॅम्पातली मजा माहितीच नव्हती हेच पुढे सुरु राहिल असतं.

काल रात्री माझ्या स्वप्नात पण कँप आणि परिसर तरळत होता.... Happy

गोळीबार मैदानावर भरणारी वेगवेगळी प्रदर्शने (त्यातील संरक्षण खात्याच्या वेगवेगळ्या रणगाडे, तोफा इ. चे प्रदर्शन आठवतेय), बी जे मैदानावर भरणारी एक्स्पो - जत्रा - प्रदर्शने - संगीत कार्यक्रम, ए एफ एम सी कॉलेज, त्यांचे हॉस्पिटल, ऑडिटोरियम व तिथे होणारे कार्यक्रम..... ए आय टी दिघीचा कँपस व परिसर....

कोरेगाव पार्कातील सुंदर सुंदर बंगले व सजावटी. Happy

झका, कयानी तेवढ्या बाबतीत अगदी 'पुणेरी' आहेत. बेकरीतल्या लोकांचं दिसणं सोडलं तर अगदी पुणे-३० सारखे वागतात ते. ( पुणे ३० Light 1 मी तिथेच शिकले आहे सपमधे. मलापण ३०पणाचा अभिमान आहे Happy ).

बेकरी ७ वाजता उघडते ८.३० ते उशीरात उशीरा ९ पर्यंत सगळं काही संपलेलं असतं. मग दिवसभर बंद आणि परत ४ वाजता उघडते ते १-१.३० तास फक्त. तिथलं इंटेरियर, सर्विस, विकल्या जाणार्‍या मालाची क्वालिटी आणि क्वांटिटी यात काहीही बदल नाही. पदार्थ जास्त खपतात, मागणी आहे म्हणुन बिचारे जास्त काहीही बेक करणार नाहीत. Happy लवकर या आणि घ्या असा खाक्या आहे.

झका, फ्रुट केक. पिंचीच्या गटगला येताना काय गिफ्ट आणायची हा प्रश्न सुटला माझा. Happy

maja yetey wachayla. Pune for me is camp, dp road, koregaon park, kalyani nagar, viman nagar.. Ek k.p. cha pan dhaga suru kara plz. Mi ch kela asta pan marathi type karta yet nahiye.

कॅम्प मधे मराठी लोक फारसे रहात नाहीत का? मला तिथे चुकूनही कुणी मराठी बोलणारा आढळला नाही.>>>>>>>>>>>>>>थोड आजुबाजुला फिरलात तर चिक्कार माणस सापड्तील..धेड्गुजरी हिंदी,इंग्लीश बोलणारी पण Happy

चुंग हुवा चायनीज रेस्तराँ आहे का अजून. १९८० मध्ये पहिले चायनीज तिथे खाल्लेले. मैत्रीणींबरोबर पहिल्यांदाच इत्क्या लांब आलेलो. शिवाय जॉर्ज म्हणूनही एक जागा होती जरा स्टायलिश वाटायची. पर्ली फिनिशचे आणि
वेगळीच राउंडेड हाय हील्स असलेले शूज तिथे घेतले होते. त्या वारली दुकानातूनही स्ट्फ घेतले होते काय काय.

बी | 8 May, 2012 - 01:37

कॅम्प मधे मराठी लोक फारसे रहात नाहीत का? मला तिथे चुकूनही कुणी मराठी बोलणारा आढळला नाही.
<<<
रहात असतील कदाचित पण बहुसंख्य दुकानं , रेस्टॉरन्ट्स सगळी नॉन इंडियन -नॉन मराठी लोकांचीच आहेत.
तशी लक्ष्मी रोड ची पण बरीच दुकानं नॉन मराठी लोकांचीच आहेत पण कॅम्प्म कॅम्प आहे लक्ष्मी रोड लक्ष्मी रोड Wink
लक्ष्मी रोडचे ग्राहक, आजुबाजुला रहाणारी जनता वेगळी आहे त्यामुळे तमाम नॉन मराठी दुकानदार सुध्दा अस्खलित मराठी बोलतात लक्ष्मी रोड ला.

कॅम्प मधे मराठी लोक फारसे रहात नाहीत का? मला तिथे चुकूनही कुणी मराठी बोलणारा आढळला नाही.>>>>>>>>>>>>>>थोड आजुबाजुला फिरलात तर चिक्कार माणस सापड्तील..धेड्गुजरी हिंदी,इंग्लीश बोलणारी पण >>>>

बी आणि अनु, त्याचं कारण आहे. साधं उदाहरणच द्यायचं तर माझी सोसायटी. इथे माझे नेबर्स पारसी, तामिळ, बिहारी, इराणी, फ्रेंच, गुजराथी, बोहरी मुस्लीम, कोकणी, कॅथलिक असा मिक्सड क्राउड आहे. जेव्हा आम्ही क्लबमधे बसतो किंवा मुलांच्या आया गार्डनमधे गप्पा मारत असतात तेव्हा कॉमन भाषा म्हणुन हिंदी किंवा इंग्लीशच बोलावं लागतं. मग दोन मराठी माणसं बोलतानाही बेसिक मॅनर्स म्हणुन हिंदी किंवा इंग्लीशच. नंतर इतकी सवय होते कि तिसरी व्यक्ती नसतानाही हिंदी/इंग्लीशमधेच बोललं जातं. ही परिस्थिती कॅम्पच्या आजुबाजुला सगळीकडेच असल्याने मराठी कमीच बोललं जातं. बाकी शिष्ठपणा, शो ऑफ, फॅशन हे कारण नाहीच तर कॉमन भाषा हेच कारण आहे.

डिजे, लक्ष्मी रोड ते रविवार पेठ-गंज-भवानी वगैरे ठिकाणचे अनेक गुज्जु-मारवाडी व्यापारी पेशवाईच्या काळापासून पुण्यात आहेत.
आमच्या शाळेत भरपूर गुज्जु मुली होत्या. काही अ तुकडीत टॉपर्स वगैरे. त्यांच्या घरी गेल्यावर घरातले सगळे पण मराठीच बोलताना दिसत.

हो :)नी,
माझ्याही काही गुज्जु मैत्रीणी , एक मुस्लिम मित्रं घरातही शुध्द मराठी च बोलतात !
रविवार पेठेत तर एक बोहरी दुकानदार इतका पुणेरी होता ,नावाला डोक्यावर टोपी आणि दाढी , आवाज ऐकला तर भट एकदम :).
मी पैसे चुकुन डाव्या हाताने दिले तर टिपिकल नेजल टोन मधे ' ताइ , पैसे उजव्या हाताने द्या , लक्ष्मी कधी डाव्या हाताने देउ नये , असा पुणेरी सल्ला पण दिला Happy

चुंग हुवा चायनीज रेस्तराँ आहे का अजून. >>> अमा, चुंग फा नावाचं एक छान रेस्टॉ. होतं ईस्ट स्ट्रीट वर. तुम्ही त्या बद्दल म्हणताय का ? मी पण १९८० मेधे पहीले चायनीज तिथेच खाल्ले. खूप आवडायचे ते रेस्टॉ.

बाकी शिष्ठपणा, शो ऑफ, फॅशन हे कारण नाहीच तर कॉमन भाषा हेच कारण आहे.>>>>>>>>>>>>>> अगदी मिक्स्ड क्राउड खुपच आहे...म्ह्नुन तर एम.जी .रोड वर गणपती,,मोहरम,आंबेडकर जंयती ,ख्रिसमस सगळच जोरात साजर होत.....
अजुन एक आहे, कॅम्प मधे जी बिनधास्त फॅशन पाहाय्ला मिळ्ते ती इतरत्र तुलनेने कमीच Wink

कॅम्प खूप धुळकट झाला आहे आत्ता. आमच्यावेळेस अगदी नवीन वाटायचा. आता अगदी उखरलेला मलिन झालेला रंगरंगोटी जुना झालेला वाटतो कॅप. तिथला वेस्ट एन्ड मॉल्स पण मला इतका काही खास नाही आवडला. कॅप्माच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत चालायला छान वाटायचे तेंव्हा. मी मनिषा कोईरालाचा हम हिन्दुस्थानी की कुठला तरी सिनेमा तिथेच पाहिला. ऑबेरॉई टॉवर्स मधे आमची पार्टी होती.

Pages