Submitted by जागो मोहन प्यारे on 4 May, 2012 - 14:42
मार्ग सत्याचा खुला आहे समोरी जोवरी
जिंदगी बेभान जगतो मी असा या भूवरी
शाम नामाने भुलूनी राधिका झाली हरी
शोधते ती राधिकेला होउनीया बावरी
ती रसोई जानकीची येइ वर धरणीतुनी
नारिच्या नशिबात चूलच सत्य सांगे 'बाबरी'
देउनी किरणे जगाला तो रवी दमला असा
सांज होता तो रथाच्या सप्त वाद्या आवरी
जीर्ण साडी फाडुनी केली तयाची गोधडी
रंग त्याचा उजळला तो बाळ बसता त्यावरी
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
शाम नामाने भुलूनी राधिका झाली
शाम नामाने भुलूनी राधिका झाली हरी
शोधते ती राधिकेला होउनीया बावरी
हे एका बंदिशीच्या मुखड्यावरुन घेतले आहे
माई री शाम शाम शाम रटत शामा शाम भई
पूछत अपने सखियन से शामा कहाँ गई ?
छानै बंदिश सुद्धा ऐकवा
छानै
बंदिश सुद्धा ऐकवा कधितरी जामोप्याजी .....
एक कदम और आगे.... मतला
एक कदम और आगे....
मतला मस्तच, आवडला.
कणखरांशी सहमत मतला मस्तच
कणखरांशी सहमत
मतला मस्तच
छान
छान
सर्व प्रतिसादकान्शी सहमत
सर्व प्रतिसादकान्शी सहमत ..............!
बाबरी? काफिया?
बाबरी? काफिया?
जामोप्या मस्तच प्रयत्न. वाटतच
जामोप्या मस्तच प्रयत्न. वाटतच नाही की तुम्ही कालच गझल रचायला शिकलाय.
आनंदयात्री बहुदा अरी हा काफिया असेल. :_
बाकी गझलेत तो,ती,ते,ते,त्या,ती ही एकवचनी,बहुवचनी सर्वनामे नसतील तर बरं.
सहमत.. सर्वनामे टेकू म्हणून
सहमत.. सर्वनामे टेकू म्हणून वापरावी लागली, हळुहळु ती गाळता येतील.
आवडली
आवडली
मस्त ..... गझलेचं वेड लागलं
मस्त ..... गझलेचं वेड लागलं म्ह्णायचं......
देवप्रिया आणि कालगंगा
देवप्रिया आणि कालगंगा यांच्यात फरक काय?
नचिकेतशी सहमत आहे. आधी
नचिकेतशी सहमत आहे. आधी लक्षातच आले नाही. जोवरी व भूवरी असा मतला गझलतंत्रामुळे होत नाही.