आंबट चुक्याची चटणी

Submitted by Geetanjalee on 23 April, 2012 - 07:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आंबट चुक्याची पाने (देठ बरोबर घेतले तरी चालते ) , मीठ , मिरची , हिंग , जिरे , गूळ चवीपुरता

क्रमवार पाककृती: 

उन्हाळा असल्यामुळे नवीन प्रकारच्या चटण्या जेवताना छान वाटतात...माझ्या आज्जी कडून शिकले, तिला खूप प्रकारच्या चटण्या / कोशिंबिरी येतात..., ते पण कुठलेही रेसीपीचे पुस्तक न वाचता Happy बागेतच लावला होता चुका..म्हणून try करून पहिली

आंबट चुक्याची पाने,मिरची थोड्याश्या तेलावर खरपूस परतून घ्या. मी चपात्या झालेल्या तव्यावरच परतून घेतला,
मिक्सर पेक्ष्या खलबत्यात वाटल तर अजून चान लागते...
जिरे पण खलबत्यात ओबडधोबड वाटले तर अजून चान लागते...
नंतर तेलावर हिंगाची फोडणी टाकून परतून घ्या. थोडासा गूळ घालून मुरवत ठेवावं,

वाढणी/प्रमाण: 
हवे तसे
माहितीचा स्रोत: 
आजी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users