"नमस्कार, नमस्कार... या या या.. कश्या आहात? खुप दिवसांनी आलात? ... अहोSSS, ऐकलत का? आपल्या त्या पमीच्या सासूच्या वैनी आल्यात बर का
..... अरे व्वा, मनू, बनू साठी सोबत 'जिगळ्या' आणल्यात आणि खास 'मटारच्या करंज्या' पण... छान छान... धन्स बरंका
बाकी कश्या आहात? घरी सगळे ठीक? ... अहोSSS, 'च्यामारी' आणा की आता .....घ्या घ्या... आवडली ना? एकदम स्पेशल आहे बरका
आता आलाच आहात तर जेऊनच जा... आमच्या यांना काही त्रास नाही हो... यांना नवे पदार्थ ट्राय करायला गिनीपिग्ज हवेच असतात बर ते जौद्या... काय खाणार? ... काय नॉनव्हे़ज नाही??? ओह, आज मंगळवार नै का??? हम्म्म... पण आमच्या यांच्या हातचे नॉनव्हेज चाखाच तुम्ही एकदा... त्या माबो वर बघुन बघुन एक एक नव नव्या रेसिप्या करत असतात... कधी 'कोलंबीच कालवण' तर कधी 'लँब चॉप्स' आणि परवा तर कायतरी 'पोटली' मधल चिकन आणि काल 'केळीच्या पानातले बांगडे'...आणि हो .. ते 'मूर्ग शोले' राहिलच... आह्हा हा ... सुटलं न तोंडाला पाणी?? असु दे, परत कधीतरी....
चला जेऊन घेऊ अहोsss आजचा बेत काय आहे ओ? 'कैरीची कोशिंबीर', 'मसाला वांग', 'सांबार वड्या', 'भाजक्या मसाल्याची आमटी' आणि 'वरणफळं'. .. सह्हीच! आणि लाच्छा पराठा पण... क्या बात है?? अहो सोबत ती झणझणीत 'कांदा लसूण चटणी' पण घ्या हां...
व्वा! मस्तच झालं नै जेवण... आता 'जेवणानंतर काहीतरी गोडधोड' तर हवच :).... अहो घ्या, घ्या... २ टॉवर खल्लेत तरी हरकत नाही
काय म्हणता? पोट खुप भरलं? मग आता हे ...'हज'म'स्साला' घ्याच....मी तयारचं ठेवते हल्ली....
लागणारे जिन्नसः
लिंबाचा रस - अर्धी वाटी;
आले - १ इंच तुकडा;
थोडी पुदिन्याची पाने;
साखर - लिंबाचा रस किती आंबट आहे त्यावर अवलंबुन;
चाट मसाला;
चिमुटभर मिठ;
थंड लेमोनेड
हज'म'स्साला
१. आले किसुन त्याचा रस काढुन घ्यावा;
२. साखर आणि पुदिन्याची पाने खलबत्ता किंवा मिक्सरमधे वाटुन घ्यावीत.
३. लिंबाचा रस, आल्याचा रस आणि साखर-पुदिना मिश्रण आणि मिठ नीट एकत्र करावे. मग गाळणीतुन गाळून घ्यावे.
४. तयार अर्क आता बर्फाच्या रिकाम्या ट्रे मधे घालुन फ्रिझ करावा.
तयार क्युबा...
५. आयत्यावेळेस ग्लासात थंड लेमोनेड ओतावे. त्यात या अर्काच्या १-२ क्युब्ज सोडाव्यात आणि वरतुन थोडा चाट मसाला भुरभुरावा.... थंड गार असे हे "हज'म'स्साला' भरपेट जेवणानंतर नक्की प्यावे
१. आले, लिंबु, साखर, पुदिना इ इ प्रमाण आपापल्या आवडीनुसार घ्यावे;
२. मी अर्क बनवल्यावर अर्ध्या रसात थोडा खाण्याचा हिरवा रंग घातला.. जस्ट गंमत म्हणून
३. वरती दिलेला वेळ हा अर्क बनवण्यासाठी आणि शेवटच्या हाज'म'स्साला बनवण्यासाठी लागणारा वेळ आहे. फ्रिझ करण्याचा वेळ त्यात धरलेला नाही. फ्रिझ न करता डायरेक्ट अर्कही वापरु शकता.
४. तयार अर्काच्या फ्रोझन क्युब्ज, सेल्फ सिलींग बॅगमधे भरुन फ्रिझ करता येतिल. आयत्यावेळेस हव्या तेव्हढ्या क्युब्ज काढुन घ्याव्यात.
५. लेमोनेड अगदी थंडगार हवे लेमोनेड ऐवजी लेमस्क्वॉश पण चालेल.
त.टि.: यात स्पर्धेतल्या सगळ्याच मसाला पाककृतींची नावे टाकु शकले नाही त्याबद्दल क्षमस्व... ज्यांच्या पाकृ यात नाहीत त्यांना .... च्यामारी
लाजो एकदम सह्ही.
लाजो एकदम सह्ही.
मस्तच. लाजो खरच ग्रेट आहेस
मस्तच.
लाजो खरच ग्रेट आहेस तु. कधी भेटतेयस ते सांग.
सही ! ते गारेगार नुसते खायला
सही !
ते गारेगार नुसते खायला पण आवडेल
हिरवा रंग फ्रेश दिसतोय एकदम!
हिरवा रंग फ्रेश दिसतोय एकदम! आणि ग्लासची सजावटदेखील
निषेध! निषेध! माझी कैरीच्या
निषेध! निषेध!
माझी कैरीच्या मसालावाली कारली नाही मेंशन केली लाजोने :भ्या भ्या:
सुरेख दिसतय !
सुरेख दिसतय !
मस्त !
मस्त !
___/\__ दंडवत लाजोबै!!! महान
___/\__ दंडवत लाजोबै!!! महान आहेस तु!!
खुप सुंदर दिसतय!!!
मस्त.
मस्त.
जगात भारी!
जगात भारी!
सह्ही
सह्ही
ला>>>जो>>>>>>>>>> मस्तमस्त
ला>>>जो>>>>>>>>>> मस्तमस्त मस्सालेदार सुरुवात केलीस..
आणी वरून थंड थंड्,पाचक हज'म'स्साला;.. सह्हीये
सहीच एकदम
सहीच एकदम
मस्तच लाजो, डिसेंबर च लक्षात
मस्तच
लाजो, डिसेंबर च लक्षात आहे ना माझ्याकडच्या मुक्कामाच ??
हम पें ये किसने हरा रंग
हम पें ये किसने हरा रंग डाला
खुशीने हमारे हमें...
मार डाला
होsss मार डाला...
मस्त.. नुसत्या कांड्या
मस्त..
नुसत्या कांड्या पेप्सीकोला म्हणून पण खाता येतील!!!
मस्त लाजो, रंग संगति उत्तम
मस्त लाजो, रंग संगति उत्तम !
नक्कि करुन पाहणार
लाजोसाठी यंदा खास ठाणे गटग
लाजोसाठी यंदा खास ठाणे गटग ठेवणार आहे मी..
इथे जे जे पदार्थ आणि रेसिप्या करते ना ते सर्व बनवायचे...
कसल्या युक्त्या वापरते आहेस तू...
लाजो, तुस्सी ग्रेट हो जी !!
लाजो, तुस्सी ग्रेट हो जी !!
नुसत्या कांड्या पेप्सीकोला
नुसत्या कांड्या पेप्सीकोला म्हणून पण खाता येतील!!! >>> मलाही त्या कांड्या बघून तीच आठवण झाली. तोंपासू.
मस्तच लाजो !
मस्तच लाजो !
मस्तच लाजो !
मस्तच लाजो !
खुप खुप आभार्स मंडळी >>>खास
खुप खुप आभार्स मंडळी
>>>खास ठाणे गटग ठेवणार आहे मी..
...
इथे जे जे पदार्थ आणि रेसिप्या करते ना ते सर्व ...<<< तुम्ही बनवायचे आणि मी खायचे का??
सेना, नक्की करु रे गटग
Pages